हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

होय, गुसलखाना = हम्माम = हमामखाना = बाथरूम

जरी शब्द आता समानार्थी वापरात असले तरी सूक्ष्म फरक असा की गुसलखान्यात स्वतः ची स्वत:च आंघोळ करायची असते तर हमाम हा थोडा सार्वजनिक/ assisted bath टाईप प्रकार असतो/ असायचा. त्यामुळेच हमाम में… ही म्हण तयार झाली.

माझ्या “स्नानांतर” लेखात चर्चा आहे बहुतेक याची.

यासारखेच अन्य काही शब्द:

शफाखाना = दवाखाना = हॉस्पिटल किंवा क्लीनिक

शराबखाना = Bar, दारुचा गुत्ता

गरीबखाना = घर ( स्वत:चा महाल जरी असला तरी विनम्र दिसण्यासाठी त्याला गरीबखाना म्हणतात Happy )

जुम्मेकू नया किस्सा होनाच.

आता काही दिवस आपल्या नवीन हैदराबादी एम्पॉवर्ड बेगम फरजानाचे किस्से लिहीन. हा आजचा, By yours truly :

नई शादी के बाद फरजाना बेगम पहली बार मायके कू आए. उनकी अम्मा बहुत प्यार किये हौर पुछ्छे
- बेटी फरजाना, तेरी ससुराल में सब ठीक है ना ? कैसे लोगां हैं उनो ?

- ठीकीच है अम्मा.

- शादी से तुम ख़ुश है ना फरजाना?

- हौ. मैं तो ख़ुश हूँ शादी से. मेरा शौहर, सास बडी अम्मी, ननद शबनम बानो सबीच अच्छे लोगां है

- अरे वाह, उपरवाले का शुकर है अच्छा ख़ानदान मिला तेरे कू ससुराल का !

- हौ. तुम कू मालूम? मेरी ससुराल के लोगां भोतीच सीधे सिंपल है. कमाल तो ये के कोई कू घड़ी भी देखनेकू नै आता !

- ऐसा बोलरै ? कमालीच सुन रई मैं !

- हौ, रोज सुबु नौ बजे मेरेकू उठाते बडी अम्मी हौर ननद शबनम बानो. हौर एकीच बात बोलते - उठ जा फरजाना, देख ज़रा घड़ी में कित्ते बज रै !!!

Proud Proud

आज जुम्मा, वादे के मुताबिक नया हैदराबादी किस्सा by yours truly :

जुम्मन एक दावत में गए. एक खूबसूरत मोहतरमा पे डोरे डालने कू देखरै:

- सुने क्या तुम? तुम्हारी सूरत मेरी बेगम से भौत मिलती देखो

- अबे खबीस की औलाद, मुर्दाशकल नामाकूल इंसान, तेरे कू गर्मी चढ़ी भोत तो चप्पल से उतारतुं…

- माशाअल्लाह ! ज़ुबान भी मेरी बेगम से हू-ब-हू मिलरई देखो !

Proud Proud

किल्ली, तुम्ही त्या दुसऱ्या धाग्यावर जुम्मनची आठवण काढली म्हणून मग आज त्याला आणले, फरजाना ला हाकलून दिले.

फरजाना पुढच्या जुम्म्याला येईल. Happy

दिया मिर्झा आणि विजय वर्मा

झकास. क्या मस्त बातां कर रै दोनो Happy

दोन्ही आवडते कलाकार. विजय वर्मा पुण्यात राहिलाय, मराठीही छान बोलतो.

मयखाना = bar
बुतखाना = मन्दीर ( बुत = मुर्ती)

Pages