हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अनिंद्य, तुमचे हे जोक्स नेहमीच आवडतात. हा ही वाचून हसू आलंच पण ही कामं करुन जलील होणं असेल तर मग लग्न करुन ही कामं करत बायका रोजच जलील होतात असं म्हणावं लागेल.

हे माझे ओरिजनल कंटेंट >>> Happy मग तर एकदम सहीच!

हा जोक आहे लोकहो. त्यावर हसलो तर त्यातील मॅटरशी आपण सहमत असतो असे नाही Happy

हा जोक आहे लोकहो. त्यावर हसलो तर त्यातील मॅटरशी आपण सहमत असतो असे नाही > फा, अनुमोदन
अनिंद्य, ओरिजनल म्हंजे भारीच... आता ओरिजनलच येऊ देत.

>>फजलू: अब क्या बोलना? ज़लील तो रोज़ मैं भी तुम्हारे जित्ताच होरा पर इत्ती मीठी ज़ुबान मे नै बता सकता>>
म्हणजे अर्थ काय? फजलू कामं करतो सर्व पण इतकं छान वर्णन करू शकत नाही?

अनिंद्य जोक मस्त होता. फझलू जलील होत होता कारण सगळं काम त्याच्याच बिचार्‍याच्या अंगावर पडत होतं. इट हॅड नथिंग टु डु विथ फेमिनिझम. असे माझे वैयक्तिक मत आहे.

सबकू थँक्यू है !

धाग्यावर मागील पानांमधे मी अनेक स्वनिर्मित किस्से लिहिले आहेत. दरवेळी तसे specify केले नाही. “Empowered Begum” हे तर पूर्णपणे नवीन, माझे स्वत:चे फ़्रेश कंटेंट आहे.

मी लिहिलेले हड्डी तोडना- बोटी बोटी नोचना, गुर्दा छीलना, नवरा-सासूला बदडणे हे जसे literally घ्यायचे नसते तसेच घरकामाच्या जोकबद्दल आहे. सो, चिल मारो लोगों. लाईट ले लो.

आते जुम्मेकू फिर नया क़िस्सा ले को आताऊं. Happy

असतात. पण गोषातल्या स्त्रीयांशी काहीच संपर्क नाही माझा.

गोषामहल नामक एरिया मात्र आहे हैदराबादेत Happy

आज जुम्मा है, आज का वादा है. एकदम फरेश हैदराबादी किस्सा सुनो :

फजलू : तुम्हारे शादीकू १२ साल हो गए जुम्मन. तुमकू तुम्हारे बेगम ऐसा क्या सिखाए जो तुम्हारे अम्मी नै सिखाए ?

जुम्मन: अम्मी बोलना सिखाए. बेगम चुप रैना सिखाए

Lol Lol Lol

Lol
शब्बो: हमारी शादीकू १२ साल हो गए जुम्मन. मुहब्बत खतम हो गयी मेरे वास्ते. मेर दिल नै जानते तुम.....
जुम्मन: ऐसा क्यू बोलरी बेगम?
शब्बो: मेरे रिश्तेदारोंसे जरा बी ताल्लुकात नई रखते तुम.....
जम्मन: अरी पगली, क्यू इतना मायूस होना? देखो, तुम्हारी सास का कितना खयाल रखता मैं, और देवर का भी...
ये सारे तुम्हारेईच तो रिश्तेदार है ना, जानू?

आज जुम्मा. हैदराबादी एम्पॉवर्ड बेगमों का एकदम नया किस्सा. By yours truly :

फरजाना : क्या बात है शब्बो, कल से तेरे शौहर नै दिखरै?

शब्बो : हमारा झगड़ा हुआ, तो उनो बाहर गार्डन में है

फरजाना : नै है ना. मैं देख कू आई अब्बीच

शब्बो : इमली के झाड के नीचे देखी ?

फरजाना: हौ, झाड़ के निच्चू उदर कोईच नै

शब्बो : खोद के देख, उधरीच मिलेंगा वो नामुराद Lol

गोषातल्या स्त्रीयांशी काहीच संपर्क नाही माझा.>>>>>
आरारा….

अरे मतलब मेरी पैछान सिर्फ मॉडर्न आज़ाद ख़याल मोहतरमाओं से है Lol

Pages