Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमेझॉन रिटर्न रिफंड सोपे
अमेझॉन रिटर्न रिफंड सोपे पडतात.तुमच्या केस मध्ये वस्तू मोठी असल्याने उशीर होत असावा.
1. बिल वर सोफ्याचं नाव, आणि आत उशी आहे, का बिलावर पण उशीचं नाव आहे?बिलावर उशी असेल सोफ्याऐवजी तर केस सोपी होते.जर बिलावर सोफा असेल तर रिटर्न पिकअप वाल्या कडे क्लिअर कागदपत्रे लागतात की त्यांना उशी कलेक्ट करायचीय, सोफा नाही(माझी 3 पानं मागे असलेली 2000 च्या परफ्युम ऐवजी मोजे, आणि मग सर्व रिफंड व्याप आणि शेवटी रिफंड मिळाल्याची केस वाच.)
2. ओपनिंग व्हिडीओ आहे का?किंवा cctv मध्ये हे मिळेल का?जर फक्त उशी असेल तर माणूस छोटे पॅकिंग आणताना दिसेल.
थँक्स भक्ती
थँक्स भक्ती
ज्या dealer कडून तुम्ही सोफा
ज्या dealer कडून तुम्ही सोफा घेतलाय त्याला फोन करा
जाई,
जाई,
हा खाली मला मिळालेल्या वस्तूंचा फोटो,
बिब्स छानच होते अन नि कव्हर पण बाळ रांगायला लागते तेव्हा चांगले आहे.
डायपर सुद्धा महिन्याच्या बाळापासून किमान १ वर्ष बाळापर्यंत होईल असे होते.
एखाद मागवून बघ
VB खूप आभार
VB खूप आभार
अनु, इश्यू तोच आहे.
अनु, इश्यू तोच आहे. व्हेरिफिकेशन ऑफ करून रिटर्न रिक्वेस्ट रेज करायला सांगतोय आम्ही, कस्टमर केअर वाले हो म्हणतात पण पिकअप करतच नाही रिटर्न पार्टनर.
सीसीटीव्ही फुटेज मिळू शकतं, तरी करते.
तुझी केस वाचली आहे आणि म्हणूनच अजूनही थोडी तरी अशा आहे अन्यथा सोडूनच देणार होतो.
केया, धन्यवाद. फोन करून पाहते.
इथे अपडेट करेनच.
त्यांना ट्विटर इंस्टा वर सर्व
त्यांना ट्विटर इंस्टा वर टॅग किंवा व्यक्तिगत निरोप लिहून सर्व केस नीट लिहून पिडायचं. मग प्रेशर ने लक्ष देतात.
त्यांना ट्विटर इंस्टा वर टॅग
त्यांना ट्विटर इंस्टा वर टॅग किंवा व्यक्तिगत निरोप लिहून सर्व केस नीट लिहून पिडायचं. मग प्रेशर ने लक्ष देतात. >> करून बघते.
कस्टमर केअर वाले नुसतं तोंडी
कस्टमर केअर वाले नुसतं तोंडी हो म्हणतात, की रिटर्न शेड्युल झाल्याचं मेल येतं?त्यात रिक्वेस्ट नंबर असतो.
रिटर्न शेड्युल झाल्यावर 2-3 दिवसात इश्यू क्लोज करणे ही कुरियर वाल्यांवर जबाबदारी असते.त्या पिकअप च्या ट्रॅकिंग नंबर मध्ये पिकअप न केल्याचं कारण काय टाकलेलं असतं?(बहुधा ते 'कस्टमर नॉट ऍट होम' किंवा 'कस्टमर पोस्टपोनड पिकअप डेट' असं असेल.
हे रिटर्न पिकअप रिक्वेस्ट नंबर चं मेल येतच नसेल तर चूक कॉल सेंटर वाल्या लोकांची आहे.मेल येत असेल आणि पिकअप होत नसेल तर चूक कुरियर वाल्या लोकांची.कोणत्याही केस मध्ये अमेझॉन ने लक्ष घालणे, पिकअप शक्य नसेल तर उरलेल्या किंमतीचा रिफंड देणे अपेक्षित आहे.
आलेली सर्व पिकअप रिक्वेस्ट मेल बघून त्यातले नंबर नोंदवून इंस्टा वर लांबलचक तक्रार लिहिता येईल.
Anu can start a consultancy
Anu can start a consultancy on such matters
हॅ हॅ, चांगली कल्पना.
हॅ हॅ, चांगली कल्पना.
मी असं काही उघडेपर्यंत चोर नव्या नव्या कल्पना घेऊन मैलांनी पुढे गेले असतील.
अर्थात बरेचदा चोरी नाही, पण महासेल, मेगासेल च्या दरम्यान पॅक करणाऱ्या लोकांवर असलेला प्रचंड लोड, प्रेशर यामुळे हे गोंधळ होतात.किंवा ऑनलाईन शॉपिंग साईट कडून उत्पादकाला गेलेली ऑर्डर अंबिग्यूअस शब्दात असते.
अमेझॉन पे, तिथे गिफ्ट
अमेझॉन पे, तिथे गिफ्ट व्हाउचरने पैसे भरणे, ते अमेझॉनवरूनच वस्तू घेण्यासाठी वापरणे यासाठी काल तब्बल चार तास घालवले. वस्तू हातात आल्या की इथे लिहीन.
अमेझॉन पे, तिथे गिफ्ट
अमेझॉन पे, तिथे गिफ्ट व्हाउचरने पैसे भरणे, ते अमेझॉनवरूनच वस्तू घेण्यासाठी वापरणे यासाठी काल तब्बल चार तास घालवले. >> किती गिफ्ट कार्ड्स होते? ४ तास म्हणजे खूपच झाले. साधारण १ गिफ्ट कार्डला मिनिट भर लागतो, पहिल्यावेळी कदाचित काही मिनिटे लागू शकतील, पण ४ तास खूप झाले.
पूर्वी एखादी वस्तू घेताना अमेझॉन पे चा बॅलन्स किमती पेक्षा कमी असेल तर उरलेली रक्कम दुसऱ्या पेमेंटने देता येत होती, हल्ली तसे दिसत नाही, कारण कळले नाही, हल्ली वॉलेटमध्ये पैसे टाकायला (क्रेडिट आणि डेबिट कार्ड वरून) पण १८% GST लागतो
पूर्वी एखादी वस्तू घेताना
पूर्वी एखादी वस्तू घेताना अमेझॉन पे चा बॅलन्स किमती पेक्षा कमी असेल तर उरलेली रक्कम दुसऱ्या पेमेंटने देता येत होती,>> हो. माझा पण थोडा बॅलंस उरलाय. तो संपवायला खटोटोप करावा लागणार आहे आता.
इथे अमेझॉन पे चा विषय आला आहे
इथे अमेझॉन पे चा विषय आला आहे, म्हणून फुकाचा सल्ला!
Amazon वरच ICICI बँकेचे Amazon ICICI credit card मिळते. खूप उत्तम कार्ड आहे.
वार्षिक चार्जेस काहीच नाहीत.
Amazon वरुन काहीही खरेदी केली तर ३% cashback (Prime member असल्यास ५%)
Amazon Pay मधून electricity, gas bill भरल्यास २% cashback
इतर सर्वच प्रकारच्या खर्चावर (D-Mart, Star Bazar or any other shops, online transactions etc.) १% cashback.
आणि हा cashback Amazon Pay मध्ये जमा होतो.
व्यवस्थित वापरले तर महिन्याचे एका व्यक्तीचे mobile recharge तर cashback मधूनच सुटते!!!
Vi mu tumhala vipu keli aahe
Vi mu tumhala vipu keli aahe
हा अवांतर प्रतिसाद आहे,
हा अवांतर प्रतिसाद आहे, धाग्याशी संबंधित नाही.
अमा, तुमची विपू वाचली आणि मी तुम्हालाही विपू केली आहे.
विपुत कळविण्यासारखे होते ते तिथे कळवले आहे.
पण खालील माहिती इतरांनाही उपयोगी पडेल / आवडेल म्हणून विपुत न लिहिता येथे लिहितो आहे.
.
कोकिलाबेन हॉस्पिटलच्या मागच्या बाजूस 'संगीतकार अनिल मोहिले उद्यान' आहे. हॉस्पिटलच्या बाजूला जी ज्ञान केंद्र शाळा आहे, तिथे एक सिग्नल आहे, ज्याच्या एका कोपऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तर दुसऱ्या कोपऱ्यावर Yes Bank आहे. त्या Yes Bank च्या बाजूनेच मॉडेल टाऊन मध्ये जो रस्ता गेला आहे तिथेच अवघ्या दोन मिनिटांवर हे उद्यान आहे, जेथे संध्याकाळच्या वेळेस काही ज्येष्ठ नागरिक karaoke speaker आणून गाणी गात असतात. जर आपल्याला गायनाची आवड असेल तुम्हीही त्यात सहभागी होऊ शकाल. नक्की भेट द्या! मला खात्री आहे, तुमचे आजारपण नक्की विसरून जाल!!!
I see this park and building
I see this park and building of school from my room . today students were playing cricket and football .
Lovely sunny day. Discharge udya war Gela. Insurance issue. Precondition approval. Tomorrow sort out hoga.
इडली डोसा बॅटर साठी अ
इडली डोसा बॅटर साठी अॅमेझॉनवर बरेच कोनिकल स्टोन ग्राईंडर्स आहेत.
कुणी वापरलेय का ? कुठला चांगला आहे ?
आजीच्या हातच्या जात्यावरच्या दळणाची चव वगैरे अनुभव कुणाला ?
तर नवा पीसी घ्यायचा होता.
तर नवा पीसी घ्यायचा होता. मॉनिटर गेल्या दोन तीन वर्षांत घेतल्याने फक्त सीपीयू हवं होतं. आधी क्रोमामध्ये पाहिलं, तिथे फक्त सीपीयू विकत नव्हते. तशात अमेझॉनचा आपल्या खिशातून पैसे काढून घ्यायचा उत्सवही आला.
माझ्या अॅक्सिस बँक अकाउंटवर बरेच edge reward point जमा झाले होते आणि ते रिडीम करून अमेझॉन गिफ्ट व्हाउचर घेता येत होतं.
आधी पीसी निवडा. त्याच्यासाठी भाच्याला त्याच्याकडेही अमेझॉन ओपन करायला सांगितलं. आणि एकेका पीसी बद्दल चर्चा करत होतो. जो पसंत पडला, त्याची किंमत त्याच्याकडे २००० ने कमी दिसत होती. का ते कळत नव्हते. त्याने स्क्रीनशॉट पाठवल्यावर कळलं की दोन बारकी स्पेसिफिकेशन्स वेगळी होती. हे मॉडेल किंचित वेगळं होतं. त्याच्याकडचं माझ्याकडे दिसेना, माझ्याकडचं त्याच्याकडे नाही. माझ्याकडचं फायनल केलं. मग अॅक्सिस बँकेचे पॉइंट्स रिडीम करून गिफ्ट व्हाउचर जनरेट केलं. त्याच्या ईमेलमध्ये व्यवस्थित सूचना दिल्या होत्या. त्या फॉलो करून गिफ्ट व्हाउचरचे पैसे अमेझॉन पे वर जमा झाले. मग तो सीपीयू आणि एक पोर्टेबल हार्डडिस्क कार्ट घेतले. पेमेंटला अमेझॉन पे आणि अन्य पर्याय - क्रेडिट कार्ड एकत्र वापरणं त्यांना मान्य नाही. म्हणून अमेझॉन पे मध्ये पैसे जमा करणं आलं. त्याला १०,००० ची मर्यादा होती. दहा हजार भरले. आता काय करायचं ते कळेना. म्हणून त्यांच्या हेल्पलाइनला फोन करायला सांगितलं. ही सोय चांगली आहे. आपण फोन करून अनेकानेक पर्याय निवडा, मध्ये ते म्युझिक आणि सूचना ऐका, ही डोकेदुखी वाचली. तर तिथल्या बुवाने सांगितलं की तुम्ही दहा दहा हजार भरून पूर्ण रक्कम भरू शकता, पण त्याने दिलेली माहिती चूक होती. एका महिन्यात दहा हजाराच्या वर भरायचे असतील तर के वाय सी करावं लागतं, असं कुठेतरी दिसलं. ते करायला घेतलं तर त्यांना व्हिडियो कॉल अपेक्षित होता. त्यामुळे अमेझॉन अॅप डाउनलोड करणं आलं. के वाय सीचं प्रोसिजर झालं. सहा तासांत कन्फर्मेशन ईमेल येईल म्हणून सांगितलं. सात तास झाले तरी आलेली दिसली नाही. मग पुन्हा पीसीवरून अमेझॉनमध्ये लॉगिन केलं तर अमेझॉन पे मध्ये आणखी पैसे भरता येतील असं दिसलं. मग उरलेली रक्कम एकहाती भरली. दोन्ही वस्तू कार्टमध्ये टाकलेल्या होत्याच. पे करायला गेलो, तर गिफ्ट व्हाउचरचं प्रमोशन कोड द्या म्हणे. ते आधीच दिलं होतं. तरी त्या व्हाउचरचा नंबर , त्याचा पिन असं तीन चार वेळा टाकून पाहिलं. पिन इन्व्हॅलिड. व्हाउचर नंबर तुम्ही वापरलाय - असा मेसेज. पुन्हा हेल्पलाइन. हा प्रॉब्लेम समजवायला वेळ लागला. मग त्यांच्या वेगळ्या टीमकडे कॉल गेला. ती बया, तुम्ही अॅक्सिस बँकेला विचारा म्हणून हटून बसली. पैसे तुमच्याकडे आलेत, आता त्यांना का विचारू अशी आमची जुगलबंदी काही वेळ चालली. दरम्यान अमेझॉन मेसेज सेंटर ही माझ्यासाठी नवी गोष्ट कळली. तिथून त्यांना त्या एरर मेसेजेसचे स्क्री न शॉट्स पाठवले. तरी त्यांचं उत्तर तेच. मग मी म्हटलं की मी एकाच वस्तूचे - पोर्टेबल हार्ड डिस्कचे पैसे भरता येतात का बघतो, तोवर तू होल्ड कर. मी करून पाहतोय, तोवर तिने फोन कट केला. पेमंट काही होतंच नव्हतं.
. मग अॅक्सिस बँकेला फोन करावा, तर त्यांच्या ऑप्शन आणि मेसेजेसच्या चक्रव्यूहातून गेल्यावर कळलं की आठ वाजता त्यांच्याकडची माणसं दुकान बंद करून घरी जातात.
आता क्रेडिट कार्डाने पूर्ण पैसे भरावे आणि अमेझॉन पे मधले पैसे बिलं भरायला वापरावेत असं विचारमंथन सुरू होतं. मध्ये खडा मारावा म्हणून अॅप मध्ये पाहिलं तर तिथे प्रमोशन कोड बिड काही मागत नव्हते. आरामात पेमंट झालं.
के वाय सीची मेल स्पॅम मध्ये गेली होती.
पोर्टेबल हार्ड डिस्क दुसर्या दिवशी आली आणि पीसी काल.
एक चांगली बाब म्हणजे दोन्हीसाठी अॅडिशनल पॅकेजिंग नव्हतं. एच पी आणि सीगेटच्याच खोक्यातून आले.
फेस्टिव्हलच्या गोंधळात भलतंच काही पाठवायचे म्हणून डिलिव्हरी पर्सनला म्हटलं उघडून दे, तर तो म्हणतो मला पॉवर नाय. ओटीपी दिल्याशिवाय तो खोकंही देईना. शेवटी त्याला मी उघडतो, तोवर तू थांब म्हटल्यावर, त्याला तयार झाला.
इन्स्टॉलेशनला काही प्रॉब्लेम आला नाही. लोकल ट्रेनची सवय असलेल्या माणसाला पहिल्यांदा मेट्रोने जाताना कसं वाटेल, तसं वाटलं.
पोर्टेबल हार्ड डिस्कची खूपच नाटकं झाली. पण तो या धाग्याचा विषय नाही.
भलताच द्रविडी प्राणायाम झाला
भलताच द्रविडी प्राणायाम झाला की भरत.
हो, बराच व्याप झाला.
हो, बराच व्याप झाला.
भरत, मी पाठवल्या असत्या दोनही
भरत, मी पाठवल्या असत्या दोनही वस्तू
मला Due Dap ही साईट सापडली
मला Due Dap ही साईट सापडली आहे.
काही काही वस्तू ज्या अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर दीडशेला मिळतात, इथे २९ रूपयांना मिळाल्या. डिलीव्हरी चार्जेस असतात. म्हणून मी पंधरा वीस वस्तू कार्ट मधे टाकून ठेवते. एकदमच ऑर्डर केलं कि चार्जेस विभागून जातात.
खालच्या लिंकवरचं सेम प्रॉडक्ट अॅमेझॉन वर ४५० रूपयांना आहे.
https://deodap.in/products/0192-cloth-organizer-pouch-laundry-zipper-bag...
मला Due Dap ही साईट सापडली
मला Due Dap ही साईट सापडली आहे... @रानभूली, तुमचा या साईटचा अनुभव चांगला आहे का? कारण मला अतिशय वाईट अनुभव आलेला आहे. एकदा खराब झालेली, धुळीने भरलेली बॅग deliver झाली तर एकदा दुसरीच काही वस्तू मिळाली आहे. मैत्रिणीला पार्सल डिलिव्हरी झाल्याचा मेसेज आला पण पार्सल मिळाले न्हवते. बऱ्याच खटाटोपानंतर व शेवटी कंस्युमर कोर्टात जाण्याची धमकी दिली तेव्हा पैसे रिफंड झाले.
माझ्या ऑर्डर्स व्यवस्थित
माझ्या ऑर्डर्स व्यवस्थित मिळतात. सुरूवातीला एकदा पेमेंट झालं पण ते रेझर पे कडेच राहीलं हा अनुभव होता.
Ohhh. धन्यवाद रानभुली.
Ohhh. धन्यवाद रानभुली. एकंदरीत mixed reviews आहेत म्हणायचे या साईटचे
डिलिव्हरी झाल्याचा मेसेज आला
डिलिव्हरी झाल्याचा मेसेज आला पण पार्सल मिळाले न्हवते >> हे आमच्या आधीच्या घरी फ्लिपकार्टच्या बाबतीत झाले होते. त्यानंतर आईने फ्लिपकार्ट बंदच केलं. त्या वेळी फ्लिपकार्टची डिलिव्हरी सर्विस वाईटच होती. आता खूप छान आहे. आणखी एका ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवली होती. ती त्या डिलिवरी बॉय ने जी जवळची खूण लिहीलेली तिथे देऊन टाकली. डिलिवर्ड म्हणून स्टेटस पण अपडेट केलं. फॉलो अप केल्यानंतर नशीब मिळाली ती वस्तू.
अॅमेझॉन चे आमच्या भागातले एजंट तर उशीर झाला कि डिलिवरी अॅटेंप्टेड असा स्टेटस अपडेट करायचे. घरी न येताच. आईने खूप वेळा कस्टमर केअरला सांगितले होते, एकदा मग त्यांच्या युकेच्या कुठल्या तरी सेंटरला मेल केल्यावर सर्व्हिस सुधारली.
खूपदा डिलीव्हरी पार्टनर्स असे करतात. आता तर मामुर्डीला आमच्या भागात डिलीवरी वाले येतच नाहीत. झोमॅटो वाले पण येत नाहीत. किवळ्याच्या मुकाई चौकात या म्हणतात.
धागा इंडिया मधून कोणी
धागा इंडिया मधून कोणी कुर्तीसेट घेतले आहेत का? इन्स्टाग्रामवर चांगले वाटताहेत दिसायला आणि किंमत वगैरे. ऑनलाईन अनुभव कसा आहे?
त्यांचे रीटेल दुकान पुण्यात पोतनीस परीसरात आहे.
Pages