मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)

Submitted by राज1 on 23 January, 2017 - 03:47

मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)
दोन वर्षापूर्वी मी माझ्या मुलाचा आभ्यासा बद्द्ल विचारले होते. दोन वर्ष्यानी तरी तो अभ्यास करायला लागेल असे वाटले होते. पूर्वी थोडा तरी अभ्यास करायचा आता ५ मिनिट पण अभ्यास करत नाही. सकाळी ८ किंवा ८.३० ते ९.०० वाजे पर्यंत उठतो व २ किंवा ३ वर्ष्याच्या मुलासारखा खेळत बसतो. मला व माझ्या मिसेस ला कारण नसताना त्रास देतो. त्याच्या आजी, आजोबाना पण असाच त्रास देतो. अभ्यासात हुशार आहे. (७०% किंवा ८०% मार्क मिळतात). खेळाची खूप आवड आहे म्हणून ground लावले पण तेथे जात नाही. घरीच T.V. बघत बसतो. रविवारी तर ५ ते ६ तास T.V. बघत बसतो व T.V. नसेल तर mobile वर ३ ते ४ तास गेम खेळत बसतो. mobile काढून घेतला किंवा T.V. बंद केला तर आम्हाला मारतो.
तोंडात बोट घालयाची सवय आजून गेली नाही.
बोबडे बोलणे कमी करण्यासाठी स्पीच therapist कडे गेलो. त्यांनी दिलेला अभ्यास त्याने केला नाही म्हणून आम्ही स्पीच therapist कडे पुन्हा गेलो नाही.
आत्ता त्याची Thyroid टेस्ट positive आली. वजन ४३.५ किलो.
त्याच्या आक्रस्ताळेपणा बद्दल आमच्या एका councillor मित्राने त्याला psychiatrist कडे नेण्याचा सल्ला दिला त्या मित्राला Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) ची शंका येते आहे. काय करावे काही समजत नाही.

कृपया सल्ला द्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली च्या मित्र मैत्रिणीशी बोलून छान वाटलं, टेन्शन कमी झालं, माझं कोणीतरी ऐकणार, माझे प्रॉब्लेम कोणीतरी समजावून घेणारं आहे हे बघून बरं वाटलं.

मायबोली च्या मित्र मैत्रिणीशी बोलून छान वाटलं, टेन्शन कमी झालं, माझं कोणीतरी ऐकणार, माझे प्रॉब्लेम कोणीतरी समजावून घेणारं आहे हे बघून बरं वाटलं.

>>>>>कोणीतरी समजावून घेणारं आहे हे बघून बरं वाटलं.
तुम्ही अग्निदिव्यातून जाताय. धिस इज लीस्ट वी कुड ऑफर. निदान मोराल वाढवणं, उत्साहवर्धक बोलणं हे आम्ही करुच शकतो की.
धिस शॅल पास टु. कधीकधी लहानशी गाठ असते आणि ती सुटते व तिढा एकदम सोपा होउन जातो.
---------
पर्स्पेक्टिव्ह बदलतो अचानक आपण ट्रेनच्या खिडकीतून काळाकुट्ट कातळ कातळ बघत असतो. कारण आपल्या खिडकी समोर तेव्हा तोच असतो. आणि अचानक आपली नजर दुसर्‍या बाजूकडे जाते ज्या खिडकीतून स्वच्छ आकाश दिसत असते. आपल्याला फक्त उठून त्या खिडकीत जाउन बसायचे असते.

https://photos.google.com/share/AF1QipOxNjdmQd-6jsib-dzAo2yrAUk2t7ZlTaz5...

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
भाषांतर किंवा सबटायटलिंग ही कामं, कॉपी पेस्ट किंवा ऑनलाईन टायपिंग किंवा ऑनलाईन कॉम्पुटर वर करता येण्यासारखी काही कामं कुणी अशी कामं करत असेल तर please सांगा. मला अश्या कामाची काहीच माहिती नाही
मी Bcom आहे पण अकाउंट्स मध्ये इंटरेस्ट नाही त्यामुळे इनकम टॅक्स किंवा अकाउंट्स writing ची कामं मला करता येत नाहीत.
वकिलांकडे किंवा जिथे टायपिंग ची कामे असतात तेथे सांगून ठेवले आहे.
मला काही काम मिळालं कि मी आहे तो जॉब सोडून दिला कि मुलाबरोबर councillor किंवा इतर ठिकाणी मला जात येईल. ते काम मिळणं महत्वाचं आहे, त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम कमी होतील. अशी कामं लवकर मिळाली तर लवकर प्रॉब्लेम solve होईल
आता मुलगा घराबाहेर तयार आहे पण मला वेळ नाही

तुम्हांला ६-७ महिने बिनपगारी रजा मिळणार नाही का? एकाच कंपनीत खूप वर्षं काम करत असाल तर विचारू शकता. निदान मुलावर उपचाराला सुरूवात होईल. ६-७ महिन्यात तुम्हाला काहीतरी अर्थार्जनाचा मार्गही मिळेल.
बी कॉम ग्रॅज्युएट असाल तर एल आय सी, पोस्ट, जी आय सी चे एजंट म्हणून काम करता येईल. महिन्यात थोडे दिवस हे काम करून मुलाकडे लक्ष देता येऊ शकते.
घरच्या घरी कम्प्युटर टायपिंग वगैरे करून मिळेल हे सोसायटी, आसपासच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकून ठेवा.
जमत/इच्छा असेल तर दररोज काही काळ शेअर ट्रेड करू शकता.
दिवसाचे काही तास ट्युशन, ऑनलाईन ट्युशन घेऊ शकता.
https://internshala.com या साईटवर भारतातले रिमोट जॉब चेक करा.

अनघा,
आत्ता ज्या कंपनीत काम करतो आहे तेथे मला 28 वर्षे झाली आहेत, महिन्यातून एक दिवस सुट्टी घ्यायची किंवा ऑफिस ला कधितरी उशिरा जायचे तरी कटकट होते, 6-7 महिने एवढी सुट्टी मिळणे शक्य नाही, आत्ता पर्यंत ऑफिसचेच काम बघीतले बाकी काही काम केले नाही ही खूप मोठी चूक झाली.
सोसायटी च्या whatsapp ग्रुप वर माझ्या टायपींग च्या कामाबद्दल टाकता येईल

मुलासाठी किमान एक दोन महिने सुट्टी नाही का देणार ते, एरवी ठीक पण इतकी वर्षे जॉब केल्यावर, समोरून समजून घ्यायला हवं. तेवढी मिळाली तरी तुम्हाला जरा वेळ मिळेल विचार करायला, मुलाबरोबर वेळही घालवता येईल.

<< एकुलता एक म्हणून आम्ही केलेले लाड आम्हाला भोवले आहेत. Future (भविष्याबद्दल) बद्दल काहीही बोलत नाही, काय शिकणार आहे, काय करणार आहे काहीच माहिती नाही. आम्हा दोघांना (मी व त्याची आई) काही झालं तर त्याचं त्याच्याकडे कोण बघणार, हीच काळजी लागून राहिली आहे.>>

---- प्रत्येक पालक आपल्या मुलांचे लाड/ हट्ट पुरवितात. तसे करणे गैर वाटत नाही. कधी कधी अती होत असते पण पालकही अनुभवातूनच शिकत असतात. ( केलेले) लाड भोवले... हा विचार झटकून टाका. स्वत: ला दोष देऊ नका.

आपल्या नंतर त्याचे कसे होईल? मुलाच्या भविष्याची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण काळजी वाटून समस्या सुटणार नाही, पण परिस्थिती आणखीनच बिकट बनेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी तुमच्या नियंत्रणांत असणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही करत आहात, आणि पुढेही करणार आहात. प्रयत्नांनाही मानवी मर्यादा आहेत. आपण आपले कर्तव्य १०० % पार पाडत आहोत यात समाधान शोधायचे.

विजय कुलकर्णी यांनी वर म्हटल्या प्रमाणे सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे नाही हे महत्वाचे वाटते.

विजयजी,
'पैशाचे सोंग आणत येत नाही' ही म्हण माहित असेलच>>>+१, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे.
समिधा,
मी लिहिले आहे कि ऑफिसमध्ये आठड्यातून कधी उशिरा जायचं किंवा १ दिवस सुट्टी घायची तरी ऑफिस मध्ये कटकट होते. आत्ता माझी ऑफिस मधली अवस्था "असून अडचण नसून खोळंबा" अशी आहे.
नौकरी सोडून द्यायची म्हणाली तरी घरी कटकट होते आहे. मुलाचं गेम खेळत बसणं, नुसतं झोपून राहणं कमी होत नाही, मला काही काम मिळालं, हि नौकरी सोडली कि बरेचशे प्रॉब्लेम कमी होतील.

एखादे स्टेशनरी किंवा फूड स्टॉल चालू करू शकता का ? किंवा मराठी टायपिंग / इंग्लिश टायपिंग करून दिले जाईल टाईप .

मुलाचं गेम खेळत बसणं, नुसतं झोपून राहणं कमी होत नाही, मला काही काम मिळालं, हि नौकरी सोडली कि बरेचशे प्रॉब्लेम कमी होतील. . >>>>>>>>>>>एक मिडल क्लास उपाय सांगू पटला तर बघा नाहीतर असच काहीतरी वाचलं समजून सोडून द्या.
केवळ एकुलता एक मुलगा आहे व तो अभ्यासात लक्ष न देता खेळत बसतो म्हणून नोकरीधंदा सोडून त्याच्या मागे राहणे कितपत योग्य आहे? जमापुंजी वर किती दिवस गुजराण होईल ? जर तुम्हाला त्याच्यावर लक्षच ठेवायचे आहे तर तुम्ही असे काम निवडा कि ज्यात तो सुद्धा सामील होईल. एखादे खाद्यपदार्थाचे किंवा असेच चीजवस्तूंचे दुकान काढा व त्याची मदत होईल असे टास्क त्याला द्या . घरातून बाहेर पडा. घरी करता येईल असे काम शोधून तुम्ही सुद्धा घरकोंडे व्हाल.
मुलांना १५-१६ वयानंतरच मित्रासारखे वागवावे बाकी मूल थोडेतरी धाकात असावे इथे लोकांना असे लिहिणे सुद्धा आवडणार नाही पण मूल गतिमंद असेल तरच तुम्ही त्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावणे वेगळे पण केवळ अतिलाडामुळे बिघडलेल्या मुलासाठी स्वतः त्रास करून घेणे वेगळे . घरी राहणारच असाल तर मुलाबरोबर फिरा त्याला बाहेरच्या जगाची माहिती करून द्या. एखाद्या अनाथ मुलांच्या आश्रमा मध्ये न्या आणि दाखवा ज्यांना आई वडील नसतात त्यांचे जीवन किती खडतर असते. लहान लहान करत राहाल तर तो कधीच माणसात येणार नाही . अभ्यास कसा आयुष्यात उपयोगी पडेल ते सुद्धा कळू द्या . जास्त मार्कांची / उच्च शिक्षणाची अपेक्षा ठेऊ नका पण शिक्षित होईल एवढं अपेक्षित असू द्या .

ण केवळ अतिलाडामुळे बिघडलेल्या मुलासाठी स्वतः त्रास करून घेणे वेगळे >> त्याची समस्या वेगळी आहे.

@राज १ >> तुम्हाला मागच्या पानावर डायलेक्सिया सोसायटी च्या लिंक्स दिलेल्या आहेत. लवकरात लवकर सदस्यता घ्या.
हे सदस्य एकमेकांना मदत करतात. कदाचित तुमचे स्वतःचे प्रश्न सोडवायला सुद्धा मदत होईल. इथे लिहून तुमच्या भावनांचा निचरा होत आहे हे चांगलेच आहे. सक्रीय मदतीसाठी तुम्ही असे ग्रुप्स शोधून घ्या. डॉक्टर्स सुद्धा सजेस्ट करतील.

अजनबी - तुम्ही सुचविलेले सर्व उपाय सर्वसामान्य परिस्थिती मधे योग्य आहेत / असतील पण येथे राज यांची परिस्थिती वेगळी आहे. त्यांचे इतर धागे पण बघा.

अजनबी,
मला नौकरी सोडता येत नाही, दुसरे काही काम बघत आहे त्यामुळे आर्थिक आवक चालू राहील, मुलाचं आयुष्य मार्गी लागावं हीच अपेक्षा.
काही काम मिळेल तर जुनी नौकरी सोडताना काय कारण सांगावं ते समजत नाही
पूर्वी लिहलं तसं नौकरी सोडून काहीच काम केलं नाही याचा पश्चाताप होत आहे.

राज,
मुलाच्या ट्रीटमेंट मध्ये काही प्रगती झाली का?
त्याचे ओपन स्कूल चालू झाले का?

सुरज,
मुलगा मेडिसिन घेतो एवढंच आत्त्ता चालू आहे, तो घराबाहेर पडतच नाही, बाहेरचं काम सांगितलं किंवा फिरून ये म्हणालं कि भांडायला लागतो.
ओपन स्कूल आजून तरी सुरु करता आलेलं नाही

आत्ता मुलाची KEM ला ट्रीटमेंट चालू आहे तिथली मेडिसिन घेतो आहे. मुलासाठी व्होकेशनल ट्रैनिंग ची ठिकाणं (पत्ते) मिळाले पण मुलगा घराबाहेर पडायला तयार नाही, मी दोन तीन ठिकाणी जाऊन चौकशी करून आलो. मुलाची ऍप्टिट्यूड टेस्ट (कल चाचणी) करणार आहे, म्हणजे त्याचा कल कुठे आहे त्याप्रमाणे व्होकेशनल ट्रैनिंग त्याला देता येईल

मुलाची ऍप्टिट्यूड टेस्ट (कल चाचणी) करणार आहे, मुलाची ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये त्याला कश्याची आवड आहे ते समजेल, त्याप्रमाणे घराजवळच्या व्होकेशनल ट्रैनिंग सेन्टर ला त्याला पाठवता येईल, दुसरा काही पर्याय असेल तर कृपया सांगा.

भ्रमर
मुलाची ऍप्टिट्यूड टेस्ट (कल चाचणी) करायची हे मीच ठरवलं आहे, डॉक्टर ऍप्टिट्यूड टेस्ट (कल चाचणी) बद्दल काय म्हणतील ते माहित नाही.
या आधी व्होकेशनल ट्रेनिंग च्या दोन, तीन ठिकाणी मी जाऊन आलो, मुलाला ते ट्रेनिंग आवडलं नाही आणि मुलाने ते बंद केलं तर नुकसान होईल म्हणून ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेत आहे
घराजवळचे व्होकेशनल ट्रैनिंग सेन्टर बघत आहे म्हणजे तो जायला तयार होईल. आम्हाला जे प्रयत्न करणे जमत आहेत ते करत आहे आणि मायबोली वरच्या मित्र मैत्रिणी मदत आहेच.

राज, तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल. तुमच्या लेकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा..!

counsilor ने सांगितले की वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच ऍप्टिट्यूड टेस्ट (कल चाचणी) करता येते. मला हे माहित नव्हतं.
मुलाला Mild intellectual Disability आहे.

गेली काही वर्ष महाराष्ट्रात शालान्त परीक्षेला बसणार्‍या मुलांची कल चाचणी करून त्याचे निकाल शालेन्त परीक्षेच्या निकालासोबत देतात.
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/aptitude-test-back-for-std... म्हणजे वय १५-१६ वर्षे. अर्थात या चाचणीला किती अर्थ आहे आणि तिचा उपयोग किती हे माहीत नाही . मी शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. आणि त्यातल्या काहींना शेती हा व्यवसाय सुचवला गेला होता.

बाळाचे पाय पाळण्यात सोडता त्या कल चाचणीला काही अर्थ असेल असं वाटत नाही. बेल कर्वच्या टोकाच्या मुलांना आणि नकारात्मक (म्हणजे काय करू नये) फायदा होऊ शकेल. पण काय करावं हा कल कसा कोणी सांगेल मला समजत नाही.
गणित, आकडे, भाषा, त वरुन ताकभात इ. तीव्रतेने समजत/ आवडत नाही तर ढोबळ मानाने काय करू नका फारतर कोणी सांगू शकेल. पण हे सगळं मॉडरेटली जमणार्‍या व्यक्तीने (जे की ८०-९० टक्के असतील) काय करावे, आणि हे आणि हेच करावे कसं काय सांगू शकेल कोणी?
परत ही चाचणी एकदाच घेऊन त्या तासाभरातील शितावरुन भाताची परीक्षा करणे मला पटतच नाही.

अमितव - सहमत. १-२ भेटीमधे असे काही छातीठोकपणे सांगता येणार नाही. शितावरुन भात हा प्रकार वाटतो.

मग माझ्या मुलासाठी आत्ता काय करता येईल, त्याचे vocational training चालू करायचे आहे, त्याला ते vocational training आवडले नाही तर तो ट्रेनिंग सोडून देइल.

मग माझ्या मुलासाठी आत्ता काय करता येईल, त्याचे vocational training चालू करायचे आहे, त्याला ते vocational training आवडले नाही तर तो ट्रेनिंग सोडून देइल.

Pages