मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)

Submitted by राज1 on 23 January, 2017 - 03:47

मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)
दोन वर्षापूर्वी मी माझ्या मुलाचा आभ्यासा बद्द्ल विचारले होते. दोन वर्ष्यानी तरी तो अभ्यास करायला लागेल असे वाटले होते. पूर्वी थोडा तरी अभ्यास करायचा आता ५ मिनिट पण अभ्यास करत नाही. सकाळी ८ किंवा ८.३० ते ९.०० वाजे पर्यंत उठतो व २ किंवा ३ वर्ष्याच्या मुलासारखा खेळत बसतो. मला व माझ्या मिसेस ला कारण नसताना त्रास देतो. त्याच्या आजी, आजोबाना पण असाच त्रास देतो. अभ्यासात हुशार आहे. (७०% किंवा ८०% मार्क मिळतात). खेळाची खूप आवड आहे म्हणून ground लावले पण तेथे जात नाही. घरीच T.V. बघत बसतो. रविवारी तर ५ ते ६ तास T.V. बघत बसतो व T.V. नसेल तर mobile वर ३ ते ४ तास गेम खेळत बसतो. mobile काढून घेतला किंवा T.V. बंद केला तर आम्हाला मारतो.
तोंडात बोट घालयाची सवय आजून गेली नाही.
बोबडे बोलणे कमी करण्यासाठी स्पीच therapist कडे गेलो. त्यांनी दिलेला अभ्यास त्याने केला नाही म्हणून आम्ही स्पीच therapist कडे पुन्हा गेलो नाही.
आत्ता त्याची Thyroid टेस्ट positive आली. वजन ४३.५ किलो.
त्याच्या आक्रस्ताळेपणा बद्दल आमच्या एका councillor मित्राने त्याला psychiatrist कडे नेण्याचा सल्ला दिला त्या मित्राला Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) ची शंका येते आहे. काय करावे काही समजत नाही.

कृपया सल्ला द्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात कोतबो चा जुना धागा वर आणायचे कारणच काय?
ज्यांचा प्रश्न आहे त्यांना कंफोर्ट असेल तर ते विचारतील... न मागता सल्ले कशाला...
मोहिनी - बी काईन्ड टू वन अनादर... समोरच्याची मनस्थिती आणि परिस्थिती काय आहे आपल्याला माहित नसते... बी केयरफुल... त्यांना किती वाईट वाटले असेल तुमची कमेंट वाचून. .. शक्य असेल तर संपादित करा... प्लिज प्लिज प्लिज...

मी अनु यांच्याशी 100 टक्के सहमत ...

वाद सोडा पुढे चला !

मला वाटते काही डिमांड असणारे डॉक्टर विकेंडला व ईजिली अवैलेबल नसतातच. आणि हेच लॉजिकली योग्यही आहे. जेणेकरून ज्यांचा मॅटर सिरीअस आहे असे लोकंच त्यांना वेळ काढून संपर्क करतील आणि त्यांच्याकडची गर्दी आटोक्यात राहून ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाच त्यांची सर्विस मिळेल.

जर एखादा डॉक्टर चांगला आहे असे सारे म्हणत आहेत तर जमवा, वेळ काढा. एखादा चांगला डॉक्टर वेळीच मिळणे हे नशीब असते हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. जिथे तो मिळण्याची शक्यता असते तिथे जरूर चिकाटी दाखवत चान्स घ्यावा.

आमच्या एका ओळखीच्यांचा मुलगा खूप हायपर होता. इतका की बास!! तर त्याला त्यांनी सरळ दमवणार्‍या एका खेळात नाव घातले. त्याची जबरदस्त प्रॅक्टीस असायची/असते अजुनही. त्यात तो तरबेज तर झालाच पण शांतही झाला. त्या खेळात खूप रममाणही झाला. खूप दमल्यामुळे खाऊन, अभ्यास करुन झोपायचे हे मुख्य काम करु लागला. अवांतर कधीतरीच.
हे इथे किती लागू पडेल माहिती नाही पण सांगायची मुद्दा हा की त्या मुलाच्या अती-शक्तीला योग्य वळण लावले गेले.

संगीता करमरकर यांच्या Remedial Coaching चा नक्की फायदा फायदा होतो हे एक दोघांकडून कळले होते. दुसऱ्या व चौथ्या शनिवारी आम्हा दोघांपैकी एक (मी किंवा मिसेस) व मुलगा जाणारच होतो. मला हे माहित आहे कि एक किंवा दोन दिवस Remidal Coaching ला जाऊन तितकासा फायदा होणार नाही, पण थोडातरी त्याचा फायदा झाला असता. आमच्या ऑफिसेस मधून रेमिडिअल Coaching ला जायची परवानगी मिळाली असती पण मुलाच्या शाळेतून हि परवानगी मिळणारच नव्हती.
दुसरे कोणी Remedial Coaching किंवा child counsellor पुण्यातील असतील तर please सांगा.
मुलाबद्दल बद्दल काहीच वाटत नसतं तर आत्तापर्यंत त्याला (तीन) डॉक्टर कडे नेलेच नसते. डॉक्टर कडे नेले म्हणजे आमची जबाबदारी संपली असे होत नाही. डॉक्टर ची ट्रीटमेंट घेतली कि लागलीच फायदा होईल असे नाही (पी हळद कि हो गोरी), पण काही दिवस ट्रीटमेंट घेउन हि थोडा पण (१%) फायदा होणार नसेल तर ट्रीटमेंट चालू ठेवण्यात काय फायदा.
आपल्या मायबोली वर प्रत्येक बाबतीत सहकार्य नक्कीच मिळतं.
>>>सातत्याने मुलांवर सूचनांचा भडिमारच करत राहिलो तर ते कालांतराने दुर्लक्ष करतात. >>> सत्य आहे >>> + 1

शक्य असेल तर संध्याकाळची अपॉइंटमेंट मिळते का पाहू शकता. सध्या शाळा बंद आहेत या वेळेचा उपयोग करून घेऊ शकता. तसे या वयाच्या मुलासाठी शाळेचे एक दोन तास बुडल्याने फारसा काही फरक पडणार नाही. पण मेडिकल ट्रीटमेंट वेळेत होणे जास्त महत्वाचे आहे असे वाटते.

आमच्या ऑफिसेस मधून रेमिडिअल Coaching ला जायची परवानगी मिळाली असती पण मुलाच्या शाळेतून हि परवानगी मिळणारच नव्हती. >> हे वाचून चिडचिड झाली. ही कुठली शाळा आहे जी मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी सुट्टी देऊ शकत नाही? तुम्ही याची शाळेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना नक्की कल्पना द्या. कदाचित परवानगी मिळेल. तुम्हाला शुभेच्छा!

मुलाने लॉकडाऊन नंतर 9th standard ला शाळेत जाणे बंद केले. आता घरीच बसून मोबाईल खेळत बसतो. बरेच मानसोपचारतज्ज्ञ यांच्या कडे गेलो, counselor कडे गेलो, कोणतीच ट्रीटमेंट तो पूर्ण करत नाही. मेडिसिन घेत नाही व एक दोन session नंतर ती ट्रिटमेंट बंद होते. घरा बाहेर पडत नाही. काही वेळा आठवडाभर आंघोळ करत नाही. वजन खूप वाढलेले आहे. वय 15 वर्षे. त्याच्या पुढच्या प्रगती साठी व शिक्षणासाठी काय करावे ते कळत नाही.
मला वाटत होते part-time job बघावा व उरलेल्या वेळी मुलाला counselor कडे किंवा काही शिकण्यासाठी घेऊन जावे, पण ते अवघड वाटत आहे , काय करावे समजत नाही. आता मिसेस चि बदली झाली आहे, त्याच्या कडे आता मलाच लक्ष्य द्यावे लागणार आहे.
होम schooling बद्दल पण मी विचारले होते, पण मुलगा घराबाहेर पडणार नाही तोपर्यंत काहीच शक्य नाही.
कृपया सल्ला द्या.
नवीन धागा काढायचे समजले नाही म्हणुन याच धाग्यावर लेखन केले.

मुलाबाबत इतर उपाय तज्ज्ञ सुचवतीलच.
व्यायामाकरता: लेस्ली स्वानसन चे वॉक ऍट होम, इतरांचे अगदी सोपे व्यायाम (30 सेकंद जॉग 30 सेकंद विश्रांती, डंबेल चे उभ्या उभ्या करायचे अगदी सोपे व्यायाम) तुम्ही सर्वांनी घरी एकत्र केले तर फायदा होईल.हळूहळू वजन कमी झालं की मग बाहेर रात्री चालायला किंवा सायकलिंग ला जाता येईल.

एक चांगला योग्य माणूस भेटला तर मुलात वागणुकीतून सुधारणा नक्की होईल.डॉ भूषण शुक्लाना एकदा भेटाच.

राज १
तुमची समस्या इतकी वर्षे आहे तशीच आहे हे पाहून खेद वाटला. मुलगा ट्रीटमेंटला दाद देत नाही हे तुमच्या चिंतेचं कारण आहे.
त्याच्या हायपर होण्याच्या समस्येबद्दल अनभिज्ञ आहे. त्याबद्दल क्षमस्व !

पण आता दुसरीकडे मुलगा मोबाईल घेऊन खेळत बसतो असेही म्हटले आहे. ही आणखी एक गंभीर समस्या आहे. खरे तर आता इथे यावर काही ठिकाणी पाहिलेला हुकमी इलाज सांगणे जिवावर आले आहे. कारण त्याच्यावर सडकून टीका होईल. पालकांनी मुलांच्या हाती मोबाईल देणे हीच समस्या आहे. त्यात आधीच्या समस्येची बेरीज झाली आहे. अगदी लहानपणापासून मुलगा रडत असला कि तो का रडतो याचा शोध न घेता त्याच्या हातात खुळखुळ्यासारखा मोबाईल दिल्याने तो शांत होतो. हे तुम्हाला लागू आहे असे म्हणायचे नाही.

पण शाळांमधून हल्ली असे न करण्याबद्दल बजावले जाते. अनेकदा शाळेत पालक शिक्षक बैठकीत चांगल्या सूचना केल्या जातात. त्याचे पालन केलेतरी बर्‍याच समस्यांचे सोल्युशन मिळते.
म्हात्रे पुलाजवळ (पुण्यात राहत असाल तर) डॉ वैशाली देखमुख आहेत. त्यांच्याकडे मंगेशकरच्या डॉक्टरांची मुलं काऊन्सिलिंग साठी असतात. समस्या असो वा नसो, प्रत्येक टप्प्यात एकदा व्हिजिट केल्याने फायदा होतो.

मुलाचे मोबाईलचे व्यसन कसे सोडवायचे हे तुमच्यावर आहे. डॉक्टरांकडे जाऊन सोडवता येत असेल तर तसे करा. मुक्तांगणला जाऊन या हवे तर. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो दाद देत नाही. मग ही जबाबदारी फक्त आणि फक्त तुमच्यावर येऊन पडते. गोड बोलून सोडवता येत असेल तर तसे करा. बुद्धीचातुर्याचा वापर करून उपाय करता येत असतील तर तसे करा.

हे सगळे उपाय फेल जात असतील तर मग कठोर व्हावे लागेल. त्याच्या हातातून मोबाईल काढून घ्या आणि तुम्हाला योग्य वाटतील ते उपाय करा. माझ्या मुलाला कमी वयात अ‍ॅनिमेशन जमत होते, त्याचा शाळेत ग्रुप जमला म्हणून त्याला गेमिंग पीसी घेऊन दिला होता. पन त्याचे व्यसन लागल्यावर तो पीसी बंद करून ठेवला. सवय सुटेपर्यंत. त्यानंतर स्क्रीनटाईम ठरवून दिला. तसे करताना फायदे, तोटे समजावून सांगितले. जे कड उपाय करतोय ते त्याच्या भल्यासाठीच हे त्याला पटवून दिले.
आपल्या करीयरपेक्षा मुलाचे करीयर होणे महत्वाचे आहे. एका टप्प्यानंतर आपल्या करीयर मधे किती गुंतायचे याचा विचार गरजेचा ठरतो. जमल्यास नोकरी बदलावी लागली तर ते ही योग्य ठरेल. पण आपल्या अपत्या साठी या टप्प्यात वेळ काढून त्याची गाडी योग्य मार्गावर आणणे हे गरजेचे झाले आहे.

सात वर्षे गेली आहेत. घंटा वाजतेय. तिचा आवाज ऐका.
आमच्या जुन्या घरी शेजारी एक कानडी कुटुंब राहत होते. आई वडील दोघे हुषार पण मुलगा सतत मोबाईल खेळत असायचा. वजन वाढले. मंद झाला. शेवटी त्याच्या बाबांनी त्याचा मोबाईल काढून घेतला. नोकरी सोडली. घरून कामे घ्यायला सुरूवात केली. रोज पहाटे उठून मुलासोबत रनिंग, व्यायाम सुरू केला. शनिवार रविवार टेनिस, बॅडमिंटनच्या हॉलची मेंबरशिप घेतली. याशिवाय सायकलवर सिंहगडवर जायला सुरू केलं. त्याच्या बाबांचं पाहून इतरांनाही हुरूप आला.

दहावीच्या आधी मुलाची गाडी रूळावर आली. त्यानंतर शाळेजवळच त्यांनी फ्लॅट भाड्याने घेतला. या गोष्टी डॉक्टरांनी सांगायला हव्यात असे नाही. तुमच्या सपोर्ट सिस्टम मधे डिस्कस करा.

डॉ. भूषण शुक्ला यांनी त्याला dyslexia आहे हे सांगितले होते, त्यांनी जी clinical study सांगितली होती त्याची वेळ adjust होणारी नव्हती म्हणुन clinical study करता आली नाही पण दुसर्‍या ठिकाणी clinical study झाली ती मुलाने अर्धवट सोडली.
lockdown मध्ये मोबाईल द्यावाच लागायचा तेव्हांच त्याला ही सवय लागली.
मुक्तांगण मध्ये पण जाऊन आलो पण तेथे 18 वर्षा खालील मुलांना घेत नव्हते.

सोशल मीडिया म्हणजे ऐकावे जनाचे अशी गत आहे.
तुम्हाला लवकरात लवकर योग्य सल्ला मिळेल अशी आशा व्यक्त करतो.

तुम्ही गेल्या सात वर्षांत काय काय केले हे विचारले नाही ही माझी चूक झाली. तुम्हाला जर ती माहिती शेअर करावीशी वाटली तर पुनरुक्ती टाळता येईल.

ट्रीटमेंट अर्धवट सोडणे याला त्या डॉक्टरकडे जाऊन विचारणे हा उपाय वाटतो. अर्थात तुम्ही ते केलेच असेल. डॉक्टरांनी काय सांगितले हे शेअर करा.

दुसर्‍या ठिकाणी clinical study झाली ती मुलाने अर्धवट सोडली>>> मेडीकल ट्रीटमेंट साठी आग्रही रहा. नाहितर जेवायला देणार नाही असं धोरण ठेवून बघा. सांगणे सोपे, करणे अवघड हे माहित आहे, तरी काही गोष्टींत मुलांच्या भल्या साठी तुम्हाला कठोर व्हावेच लागेल. डिस्लेक्सिया आहे हे तर कळले, आता उपाय योजना कराच. दुसरा काहिही मार्ग नाही. लोकांनी सल्ले दिलेले आहेतच.

मुक्तांगण मध्ये पण जाऊन आलो पण तेथे 18 वर्षा खालील मुलांना घेत नव्हते >>>
मुक्तांगण येथे स्वयंसेवक कि अशाच प्रकारचे काम करणाऱ्या एकाकडून लहान मुलांचे इंटरनेट व मोबाइलचे व्यसन यावर उपचार होतात हे ऐकून होते. त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा तशी माहिती आहे. सोबत स्क्रीनशॉटस जोडत आहे. दिलेल्या फोन क्रमांकावर बोलून इथे अपडेट करा. मी जर चक्कर मारली तर विचारेनच. लागला तर तुमचा मोबाईल नंबर लागेल. तो ही त्यांनाच थेट द्यायला लावेन.

Screenshot_20230921_111652_Chrome.jpgScreenshot_20230921_111713_Chrome.jpgScreenshot_20230921_111732_Chrome.jpg

मुलाच्या जागी स्वतःला कल्पुन पहा. इतर मुल नक्की खे ळत नसतील. कुचंबणा होत असेल. शाळा जीवावर येत असेल. होम स्कुलिंग हा मार्ग पटतो का त्याला ते चाचपा. ज्या डॉक्टरांनी निदान केलेले आहे त्यांना चिकाटीने फॉलो अप करा असेच म्हणेन नक्की मार्ग निघेल.

शाळेत मूल त्याला त्रास द्यायची, शाळेच्या प्रिन्सिपल ना पण आम्ही तक्रार केली होती, शाळेत जायला तयार नसायचा. त्याला 5th स्टँडर्ड to 8th स्टँडर्ड पर्यंत 25% च मार्क मिळायचे. त्याला mobile वर गेम हेच आयुष्य वाटायला लागलं आहे. पुण्यातील अजून कोणते होम school असतील तर प्लीज सांगा. किंवा दुसरा काही पर्याय असेल तर सांगा.
मुक्तांगण मध्ये आम्हाला तुम्ही सांगितलेली माहिती कोणी दिली नाही, कर्वेनगर येथील एका संस्थेचा पत्ता दिला होता, त्याच डॉक्टरांची ट्रीटमेंट आत्ता सुरू होती, त्याच्याकडे पण तो जायला तयार नाही.
कोणताही treatment किंवा home schooling साठी त्याचा प्रतिसाद खूप महत्वाचा.

Part time जॉब बघून त्याच्या साठी वेळ देणं हा पर्याय बरोबर आहे का? आता मिसेस चि बदली झाल्याने आता मलाच त्याच्या कडे लक्ष द्यावे लागणार.

>>>>>>त्याच्या साठी वेळ देणं हा पर्याय बरोबर आहे का?
होय राज जी तुम्ही बरोबर करत आहात. आर्थिक घडी जर थोड्याफार तडजोडींनंतर बसत असेल तर तुमची प्रायॉरिटी मुलाचे भविष्य ही असणे स्वाभाविक वाटते.
हरू नका. खचू नका.
होम स्कुलिंग म्हणजे घरीच त्याला शिकवणे. आणि बोर्डात एकदम एक्स्टर्नली बसविणे - असे मला वाटते.
आय मे बी राँग.
हळूहळू त्याला थोडा थोडा अभ्यास करायला लावा. बेबी स्टेप्स. लहान मुलांना जर त्यांच्या आया पाठवत असतील तर जरुर घरी बोलवा. त्यांच्यासाठी थोडा खाऊ व सेलेब्रेटरी वातावरण ठेवा. तुमच्या लेकराचे ट्रिगर्स असे बनलेत की तो मुलं पाहून बिचकतो, त्याच्या कोषात जाउन बसतो.
मुलं घरी आली त्याच्याशी खेळली की त्याचे ट्रिगर्स सकारात्मक सेट होण्याच्या मार्गावरती येतील.
हे मी माझ्या तोकड्या बुद्धीनुसार सुचवते आहे.

आपल्याला खूप शुभेच्छा. सगळं नीट पार पडेल.

हे जरा odd आहे की मिसेस ला सांगितले तिची बदली ज्या ठिकाणी झाली आहे, त्या ठिकाणी मी व मुलगा दोघे पण येऊन राहतो म्हणजे तिला पण सोबत होईल व दुसऱ्या ठिकाणी गेल्या मुळे तो कदाचित सुधारेल.

राजेंद्र
तुमच्या लिखाणात तुम्ही सल्ले मागितलेले दिसले. त्या कुठल्याच धाग्यावर नंतर तुम्ही लिहीले नाही. खरे तर उत्तम श्रोता असल्याचे हे लक्षण आहे म्हणून कौतुक करावे तितके थोडे आहे.
पण हा धागा वाचताना या समस्या तुमच्या वैयक्तिक जीवनातल्या आहेत हे समजले. हा धागा २०१७ चा आहे. आज २०२३ आहे. मुलाचे वय १६/१७ असेल. एव्हढा प्रदीर्घ काळ तुमच्या समस्येचे समाधान झाले नाही हे कळाल्याने वाईट वाटले. पण तुम्ही या काळात काय काय केले हे समजले तर लोक तुम्हाला नेमका सल्ला देतील ना ?

इतर धाग्यातही तुम्ही समस्या सर्वसाधारण असल्याप्रमाणे मांडल्या आहेत. खरे तर त्याच वेळी तुमचा नेमका प्रॉब्लेम सांगितला असता तर नेमका सल्लाही मिळाला असता.
सोशल मीडीयावर किती विसंबून रहायचे याचाही निर्णय घ्यावा लागेल. एव्हढ्या मोठ्या काळात मित्र, नातेवाईक यांच्याकडून झालेली मदत, सल्ले याबद्दल काहीच उल्लेख नसल्याने नेमके काहीच समजत नाही.
त्रोटक माहितीवर तर डॉक्टर सुद्धा उपचार करत नाहीत.

तो आता 15 वर्षाचा आहे. तो कोणतीच ट्रीटमेंट पूर्ण करत नाही. त्याला काही प्रॉब्लेम असतिल तर त्याने स्वतः येऊन प्रॉब्लेम डॉक्टर किंवा councilor ला सांगितला पाहिजे.

राज१,
तुमचा मुलगा अवघा १५ वर्षांचा आहे. त्याला डिसलेक्सिया आहे, स्क्रिन टाईम, मोबाईलचे व्यसन आहे , त्याची समस्या मुळातच इतकी जुनी आहे की त्यातून इतर समस्या निर्माण झाल्या असल्याची शक्यता आहे. थोडक्यात तो हरवलाय. काय योग्य-काय अयोग्य, समस्या कुठली आणि नॉर्मल काय हे त्याने डॉक्टरांना सांगावे ही अपेक्षाच चुकीची. हे काही सर्दी-तापासारखे शारीरीक दुखणे नाही तर मुल डॉक्टरांना सांगु शकेल की घसा दुखतोय, शिंका येत आहेत वगैरे. अगदी अ‍ॅडल्ट व्यक्ती असली तरी अशा प्रकारच्या समस्यांमधे रुग्णाच्या कुटुंबियांनी सर्व समस्या डॉक्टरांना सांगणे अपेक्षित असते. हा तर लहान मुलगा आहे.
एक डायरी/ वही करा आणि त्यात दिवसभरात मुलगा काय कसे वागतो त्याची एक आठवडा नोंद करा. अगदी किती वाजता उठला, काय खाल्ले वगैरे सर्व काही लिहा. त्यानंतर घरात टिव्ही असेल तर तो बंद करा - नो केबल. मुलाचा मोबाईलचा अ‍ॅक्सेस काढून घ्या. कुठल्याही प्रकारचा स्क्रिन टाईम नको. आता तो कसे वागतो त्याची नोंद करा. हे करत असताना एकीकडे मुलासाठी child and adolcent psychiatry साठी चांगल्या हॉस्पीट्लला तारीख घ्या. हॉस्पिटल अशासाठी की गरज पडल्यास पडल्यास सुरवातीला तिथे अ‍ॅडमिट करुन ट्रिटमेंटची सुरवात करता येते. ट्रिटमेंट सुरु केल्यावर मधेच मुलगा डॉक्टर कडे जायला तयार नसला तर तुम्ही एकटे जावून माहिती/डायरीतल्या नोंदी देवू शकताच. डॉक्टर विडीओ कॉलही करतात. सातत्याने प्रयत्न महत्वाचे.

स्वाती 2 पूर्ण सहमत..
राज 1, तुमचा मुलगा जर स्वतःच प्रॉब्लेम डॉक्टरना सांगू शकत असता तर हा धागा काढायची गरज नसती पडली.
नेहमीच्या 15 वर्षे वयाच्या मुलाच्या अपेक्षा त्याच्याकडून करू नका. त्याची ट्रिटमेंट ही top priority ठेवून बाकीच्या गोष्टी adjust करा. बाप्पा तुमच्या प्रयत्नांना यश देवो..

पहिल्या वेळी तो डॉक्टरांकडे (खोटे बोलून न्यावे लागते) येतो पण 1-2 सेशन्स नंतर त्यानी डॉक्टर त्याला क्लिनिक मध्ये बोलावतात तो यायला तयार नसतो, असे दोन डॉक्टरांकडे झाले, त्यांनी दिलेली medicine तो घेत नाही, कशात तरी मिसळून द्यावी लागतात. कोणतेच डॉक्टर त्याला video call किंवा normla call लावायला तयार नसतात.
एक दोन councelor नि त्याच्याशी फोन बोलले पण एक दोन सेशन्स नंतर तो कॉल ब्लॉक करून टाकतो.
एका डॉक्टरांनी त्याला बालेवाडी/ बाणेर येथील rehabilation centre ला त्याला अ‍ॅडमिट करायला सांगितले होते, त्यांची महिन्याची fees Rs.40,000 होती, 4 महिने अ‍ॅडमिट करावे लागणार होते, एव्हढी fee देणे आम्हाला शक्य होणार नव्हत.
आता नवीन डॉक्टर चि treatment म्हणल की घरात कटकट व्हायला लागली आहे.
आता सगळे असह्य व्हायला लागले आहे. ह्यातून काहीच मार्ग दिसत नाही.
मिसेस च्या बदली मुळे आजून अवघड होणार आहे.

राजेंद्र,
पूर्वीपेक्षा थोडी जास्त माहिती मिळाली. चित्र स्पष्ट झालं.

पैसे हा अडथळा नाही. तुम्ही जिथे ट्रीटमेण्ट घ्याल तिथे डॉक्टरांना पैशांची अडचण स्पष्ट सांगा. मायबोलीवर क्राऊडफंडींगचे धागे आहेत. आता राज्य सरकार तर्फे पाच लाखांची मदत मिळते. अट जनरल वॉर्डात दाखल व्हायला लागते. ही माहिती घ्या. मायबोलीवर, इतर ठिकाणी आवाहन करून पहा. तुम्हाला लागणारे पैसे जास्त नाहीत. तुम्ही क्राऊडफंडींग रेज केलेत तर मी सुद्धा त्याची लिंक जास्तीत जास्त ठिकाणी पाठवू शकेन.

प्रश्न मुलापेक्षा तुमच्या स्वतःच्या इच्छाशक्तीचा आहे. मुलावर खापर फोडून कसे चालेल ?
तुमची भूमिका खूप महत्वाची आहे. ऑफीस मधे बोलून बघा. उपचारादरम्यान सुट्टी मिळतेय का विचारा. बिनपगारी रजा मिळते का बघा. शक्य असल्यास ते करतील मद्त. नाहीतर काय करता येईल हे त्यांच्याशीच बोला. अर्ध दिवस सवलत मिळाली तरी काम भागेल. अ‍ॅडव्हान्स मिळतो का बघा. ऑफीस मधे सहकारी कित्येकदा वर्गणी काढून मदत करतात.

मुलाला उपचारासाठी तयार करणे हे तुमच्यापुढचे आव्हान आहे. ते कसे पार पाडायचे हे तुम्हालाच ठरवावे लागेल. तुम्हाला शक्य नसेल तर मुलगा कुणाचे जास्त ऐकतो त्यांची मदत घ्या.

पण आता वेळ घालवू नये असे वाटते.

>>>>आता सगळे असह्य व्हायला लागले आहे. ह्यातून काहीच मार्ग दिसत नाही.
तुम्ही थकला असाल. पण असं निराश होउन कसं चालेल Sad यातून नक्की मार्ग निघेल. तुम्ही विचारलत की तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर दुसर्‍या गावी जायचा विचार करताहात. वरती आचार्यांनी सांगीतल्याप्रमाणे रजा घेउन १ महीना/ १५ दिवस राहून बघा.
लवकरच मार्ग निघेल.

मुलाची वर सांगितलेली ट्रीटमेंट करण्या एव्हढी माझी सॅलरी नाही. आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाही असे नाही, घरी कटकट होते, स्पष्ट येथे लिहिता येणार नाही.
पार्ट टाइम जॉब बघून किंवा मिसेस बरोबर बदलीच्या गावी जावून तेथे पार्ट टाइम जॉब बघावा असे वाटत आहे.

मुलाची वर सांगितलेली ट्रीटमेंट करण्या एव्हढी माझी सॅलरी नाही. >>>> पैशाबाबत वर लिहीले आहे. पुन्हा लिहीत नाही.

आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाही असे नाही, घरी कटकट होते, स्पष्ट येथे लिहिता येणार नाही.>>> पुन्हा एक नवीन समस्या. हे आधी माहिती नव्हते. __/\__

लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघावा. मनापासून शुभेच्छा !

मला या वयात (55 वर्षे) पार्ट टाइम जॉब मिळू शकेल का. मी अजून 2-3 वर्षे नौकरी करू शकतो. आता पूर्ण वेळ नौकरी केली तर मुला कडे लक्ष द्यायला जमत नाही. दोन तीन वर्षानी माझी नौकरी संपेल तो पर्यंत मुलाच्या आयुष्याची वाट लागलेली असेल.

Pages