मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)

Submitted by राज1 on 23 January, 2017 - 03:47

मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)
दोन वर्षापूर्वी मी माझ्या मुलाचा आभ्यासा बद्द्ल विचारले होते. दोन वर्ष्यानी तरी तो अभ्यास करायला लागेल असे वाटले होते. पूर्वी थोडा तरी अभ्यास करायचा आता ५ मिनिट पण अभ्यास करत नाही. सकाळी ८ किंवा ८.३० ते ९.०० वाजे पर्यंत उठतो व २ किंवा ३ वर्ष्याच्या मुलासारखा खेळत बसतो. मला व माझ्या मिसेस ला कारण नसताना त्रास देतो. त्याच्या आजी, आजोबाना पण असाच त्रास देतो. अभ्यासात हुशार आहे. (७०% किंवा ८०% मार्क मिळतात). खेळाची खूप आवड आहे म्हणून ground लावले पण तेथे जात नाही. घरीच T.V. बघत बसतो. रविवारी तर ५ ते ६ तास T.V. बघत बसतो व T.V. नसेल तर mobile वर ३ ते ४ तास गेम खेळत बसतो. mobile काढून घेतला किंवा T.V. बंद केला तर आम्हाला मारतो.
तोंडात बोट घालयाची सवय आजून गेली नाही.
बोबडे बोलणे कमी करण्यासाठी स्पीच therapist कडे गेलो. त्यांनी दिलेला अभ्यास त्याने केला नाही म्हणून आम्ही स्पीच therapist कडे पुन्हा गेलो नाही.
आत्ता त्याची Thyroid टेस्ट positive आली. वजन ४३.५ किलो.
त्याच्या आक्रस्ताळेपणा बद्दल आमच्या एका councillor मित्राने त्याला psychiatrist कडे नेण्याचा सल्ला दिला त्या मित्राला Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) ची शंका येते आहे. काय करावे काही समजत नाही.

कृपया सल्ला द्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज1,
मुलाच्या ट्रीटमेंट साठी सगळ्यांनी सल्ले दिले आहेत, आता मुलाच्या ट्रीटमेंट साठी काय करत आहात.

सुरज,
सगळ्यांनी योग्य सल्ले दिले आहेत.
मुलगा घराबाहेर पडायला तयार नाही.
मी KEM हॉस्पिटल मध्ये पण जाउन आलो, पण तिथल्या डॉक्टरनी सांगितलं मुलाला बघितल्या शिवाय काहीच सांगता येणार नाही. काय करावे समजत नाही.
आयुष्यातली महत्वाची वर्षे वाया जाता आहेत हे मुलाला समजत नाही

2017 चा हा धागा आहे. त्यानंतर 2023 ला तुम्ही वहिनी सरकारी नोकरीत आहेत असे प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. एव्हढ्या महत्त्वाच्या काळात तुमची परिस्थिती हलाखीची आहे असा समज झाल्याने लोकांनी उपाय सुचवताना खर्चाची मर्यादा लक्षात ठेवून सल्ले दिले असे लक्षात येते.

सरकारी नोकरी असल्याने खर्चिक इलाज जमला असता. तसेच तुम्ही जे काही उपाय केले आहेत ते ही गेल्या काही महिन्यांत तुम्ही इथे सांगितले. अशी जबरदस्ती नसते.

पण वेळ वाचला असता. अनावश्यक सल्ला दिला गेला नसता.
मदत हवी असेल तर गरज पडल्यास ओळख लपवून का होईना आवश्यक ती माहिती देणे गरजेचे आहे हे यावरून लक्षात आले. अर्थात उत्तम सल्ला मिळेलच याची खात्री नाही ही तयारी पण असावी.

राज1
तुम्हाला आता मुलाकडे पूर्णवेळ लक्ष द्यावेच लागेल. तुम्ही लिहले आहे कि पार्ट टाइम जॉब बघून तुम्ही मुलाकडे लक्ष देणार त्याबद्दल काय ठरवले आहे. मुलगा घराबाहेर पडत नसेल तर ऑनलाईन मोबाईल किंवा इंटरनेट addiction counsellor असेल तर कोणीतरी please सांगा.

खोलवर मनावर परिणाम करणारी घटना घडली तरी माणूस असा वागू शकतो.

आजू बाजूला घडणाऱ्या प्रतेक गोष्टीचा मुलांच्या मनावर परिणाम होत असतो.
काही परिणाम वर वर होतात पण काही घटनांचा परिणाम खोल मनावर होतो.
सर्व दुनिया च आपल्या विरुद्ध आहे असे त्यांचे वर्तन असते.
हिंसक प्रतिक्रिया त्याचे चे द्योतक असते.

हेमंत,
काहीही झालं असलं तरी यातून बाहेर पडावे लागणार हे नक्कीच, घरात बसून नुसते गेम खेळून आयुष्य नक्कीच जाणार नाही.

आशा प्रश्नांना उत्तर नसतात.एकी कडे प्रेम असते एकी कडे कर्तव्य असते.
मुलाच्या भवितव्याची चिंता असते.

मानसिक दोष असेल तर डॉक्टर न चा सल्ला आणि उपचार आणि दुसऱ्या बाजूला संयम .
ह्या गोष्टी गरजेच्या असतात.

काळ जसा निघून जाईल तसे प्रश्न मिटत जातील.

संयम आणि आशा कधी सोडू नका

हेमंत,
महत्त्वाची वर्षे निघून जात आहेत हीच काळजी आहे.

मुलगा घराबाहेर पडत नसेल तर ऑनलाईन मोबाईल किंवा इंटरनेट addiction counsellor असेल तर कोणीतरी please सांगा. >>>

मुलाने मोबाईल गेम्स , टीव्ही , युट्युब पूर्णपणे बंद केला तर फावल्या वेळात ( शिल्लक राहिलेल्या ) तो काय करणार आहे त्याचा प्लॅन पहिले तयार करून ठेवा. तुम्ही त्याला आता पुस्तके वाच म्हटल्यावर तो लगेच काही ते काम करू शकणार नाही. त्याची सेकंड प्रायॉरीटी काय आहे ती ओळखून त्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार करा. आणि तुम्हाला आवडो अथवा न आवडो त्यात तुम्ही सुरवातीला तितकाच वेळ पार्टीसिपेट करा.
याचा रिझल्ट तुमची इच्छाशक्ती किती आहे / किंवा तुम्ही स्वतः कारणे (वेळ देऊ शकत नाही / शक्य नाही इत्यादी ) किती देता यावर अवलंबून आहे.

महत्त्वाची वर्षे निघून जात आहेत हीच काळजी आहे. >>>>

हे थोडा वाचायला हार्श वाटेल पण बराच विचार करून पण शुगरकोट करता आला नाहीय. वाचून वाईट वाटले तर माफ करा.
हा धागा येऊन अल्मोस्ट ७ वर्षे झाली आहेत. आता मुलगा १६ वर्षांचा झाला असणार. टिन age ची सुरवात अशी होणे हा मोठा प्रॉब्लेम आहे. या वयात प्रचंड एनर्जी असते आणि ती डिसिपेट पण व्हावी लागते. या धाग्यात दिलेले उपाय तुम्ही करून पहिला असाल असे गृहीत धरून लिहतो. मुलाला जर काही मानसिक इश्यू नसेल तर (तुम्ही डॉ कडून तसे कन्फर्म करून घेतला असाल ) आणि फक्त घरातील वातावरण हाच घटक कारणीभूत असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे . वय वाढेल तसं सगळं काही ठीक होईल असा विचार चुकीचाच नव्हे तर घातक पण ठरू शकेल.

मी / आम्ही मुलांसाठी एवढे करतो अजून आणखी काय करायला पाहिजे ? असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पहिले मनातून काढून टाका , तसेच काही गिल्ट आला असेल ( अप ब्रिनगिंग मध्ये कमी पडलो इत्यादी ) तर तो पण काढून टाका.

पहिले ऑब्जेक्टिव्ह फायनल करा. ( नेमकं काय कमी करायचं आहे ) छोट्या छोट्या पायऱ्या. या आठवड्यात रोजचा १० मिनिटे त्याला रेग्युलर ( त्याच्या रेग्युलर ) कामातून बाहेर काढणे, भले फिरायला जा ( तुम्ही तो घराबाहेर पडत नाहीय असं लिहलं आहे पण शाळेत जातो ना? ) /काहीतरी काम काढा घरात. त्याचा रेग्युलर काम डिस्टर्ब कसं करता येईल त्यावर विचार करा. नेट कनेक्शन एक तासासाठी बंद करणें ( त्याच्या नकळत ), मोबाईल फॉरमॅट करा सगळे गेम डिलिट होतील ( त्याच्या नकळत ), घरात मोबाईल जॅमर बसवून घ्या जो हवा तेंव्हा चालू बंद करता येईल. यामुळे तुमच्या कामावर इफ्फेक्ट होईल पण ते सहन करावे लागेल.

हे सगळे एका दिवसात होणार नाही, आठवड्याला ३० मिन इम्प्रोवमेंट चे टार्गेट धरा. ( अगदी १५ मी धरला तरी चालेल ) त्याला हळू हळू दुसऱ्या कामात गुंतवा, त्याला लगेच अभ्यासाला बसवू नका , तो बसेल हि अपेक्सा पण करू नका.
पहिले आहे त्या फेज मधून बाहेर येऊद्यात. त्याचे मित्र आहेत काय ते बघा, बहुतेक वेळा दुसऱ्या दिवशी मित्रांना share करण्यासाठी मुले टीव्ही बघणे / गेम ची लेवल पूर्ण करणें अश्या गोष्टींच्या आहारी जातात.

फक्त एकदा सुरु केलात कि धीर सोडू नका, आणि काहीही झाले तरी सातत्य ठेवा. हे काम म्हणजे एक मोठा दगड खालून डोंगरावर ढकलत नेण्यासारखे आहे. मोमेंटम तुटला कि परत नेला होता त्या पेक्षा जोरात खाली होता तेथे जातो.

शुभेच्छा

कदाचित असे तर नव्हे की तुमचे कुटुंब अशा परिस्थीतीतून जात आहे, एकमेकांचे नातेसंबंध इतके ताणले गेले आणि अशा पातळीवर आले आहेत की चिंता तर वाटते पण दोन्ही पालकांना एकमेकांबद्दल याला/हिला कुणीही सांगुन काही फायदा नाही, हा/ही काहीच जबाबदारी घेणार नाही, मी एकाटा/एकटी किती व काय काय करु, एकटा/एकटीच का म्हणुन करु? असे वाटुन दोघेही हताश झाला आहात?

अनेक कुटुंब अशा परिस्थीतीतुन जात असतात. त्याला तशी कारणेही असतात. जज करण्याचा अजिबात उद्देश नाही पण असे होताना पाहिले आहे म्हणुन एक शक्यता म्हणुन विचारतोय, अथवा अनेकदा असे होत आहे हे आपल्या लक्षात येत नाही तेव्हा या दृष्टीकोनातुन विचार करुन बघा असे जरा धाडस करुन सुचवतोय असेही म्हणता येईल.
असे असेल तर तुम्हाला आधी इंटर पर्सनल रिलेशनशीप मध्ये दखल घेउन त्यावर समुपदेशन करणार्‍या प्रोफेशनलची गरज आहे.

तुमच्या आता पर्यंतच्या प्रतिसादांमधुन तुम्हा दांपत्याच्या एकत्रीतपणे पाठीशी/मदतीसाठी जवळची नात्यातील अथवा मित्रमंडळींपैकी कोणी व्यक्ती ठामपणे उभी नाही असे जाणवले. याला विविध कारणे असु शकतात. पण असे कोणी तुमच्या मदतीस येऊ शकेल असे वाटत असेल तर त्यांची जरुर मदत घ्या असे सुचवतोय.

तुम्ही दांपत्य कुठल्या परिस्थितीतुन जात आहात हे नीट समजुन घेउन तुम्हा दोघांसाठी योग्य ते इंटरवेन्शन आणि तुमच्या मुलासाठी योग्य तो उपचार हे दोन्हीही मिळणे तेवढेच मह्त्वाचे आहे असे वाटते.
त्यासाठी जवळची कोणी व्यक्ती मदतीस येणार नसली तर दोघांपैकी एकाने यात पुढाकार घेउन या दृष्टीकोनातुन खंबीरपणे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

जोडीदार म्हणेल मला काहीही धाड भरली नाही तुलाच गरज आहे, तूच जा.
तर आपण जाउन 'मी भेटलो, ते म्हणतात तुम्हाला प्रोब्लेम आहे, तीन दिवसांनी अजुन बोलावले आहे."
तीन दिवसांनी " ते म्हणाले तुमचा प्रोब्लेम नीट समजण्यास तुमच्या जोडीदाराला एकदा घेउन या शक्य असेल तर."
अशी ट्रिक करुन दोघांनी जाणे, असे कदाचित वर्क करेल. ( यासाठी आधी प्रोफेशनला एकटे भेटुन, परिस्थीती सांगुन आगाउ सुचना देणे ओघाने आलेच.)

मुला बाबतीत मात्र तो येणारच नाही, औषध घेणारच नाही असे तो करणारच हे गृहीत धरुनच खुबीने, विविध ट्रिक्स वापरुन त्यास असे करण्यास प्रवृत्त करावे लागेल. (औषध घेण्याचे नाटक करुन गोळी हातातच ठेवुन नंतर फेकुन देणे, तोंडात घेउन बाजुला ठेवुन पाणी पिणे मग जाउन थुंकुन टाकणे हे प्रकारही कॉमन आहेत. )

मानसीक समस्या आणि आजारांबाबतीत रुग्णाला स्वतःला याची जाणीव नसेल तर डॉककडे नेणे हे एक दिव्य असते आणि नेल्यावरही उपचार घेण्यास सुरु ठेवण्यास प्रवृत्त करणे हे त्याहुन एक दिव्य असते.
यातुन तुम्हाला मार्ग मिळो यासाठी शुभेच्छा.

प्रतिसादा बद्दल धन्यवाद
मुलाला मानसिक इश्यू आहेत, त्याची ट्रीटमेंट ३ महिन्यापूर्वी चालू होती, मुलाला बघितल्या शिवाय डॉक्टरांनी ट्रीटमेंट देता येणार नाही हे सांगितले, त्यामुळे आता ट्रीटमेंट बंद आहे.(पहिल्या visit च्या वेळॆला फक्त तो डॉक्टरांकडे आला होता)
नेट कनेक्शन एक तासासाठी बंद करणें हे करता येईल.
आत्ता तरी कोणीही त्याला मित्र नाहीत.
नातेवाईक कोणीही मदत करत नाहीत.
मुलाची औषधे तो घेतंच नव्हता, मलाच कश्यात तरी मिसळून ती औषधे द्यावी लागायची.
१६ वर्षाच्या मुलाला त्याच्या Future बद्दल काही समजत नसावं ह्याचं दुःख होतं.
आता आम्ही ठरवतोय कि जॉब सोडल्या शिवाय मुलाकडे लक्ष देता येणार नाही. एक दोन महिन्यात हे ठरवत आहोत

ह्या वर काही उपाय नसतो.
आपलेच ओठ आणि आपलेच दात .

काही ही करू शकत नाही.
संयम ठेवा ..
प्रगती म्हणजे पैसे कमावणे इतकाच त्याचा अर्थ असतो..
मुलाला भविष्याची चिंता नाही हा विचार डोक्यातून काढा.
शिक्षणात इंटरेस्ट नसेल तर त्याला दुसऱ्या क्षेत्रात गुंतवा.

परिस्थिती नुसार व्यक्ती नी बदललं पाहिजे.

माणूस बाहेरील समस्या,संकट शी लढू शकतो पण घरात विचित्र स्थिती निर्माण झाली की तो व्यक्ती किती ही ताकत वान,श्रीमंत,सत्ताधारी असला तरी घरात मात्र हरतो,हतबल होतो.
हे माहीत आहे त्या मुळे तुमच्या भावना मी नीट समजत आहे.

तुम्ही पहिले मनातून काढून टाका मुलगा बाकी मुलांसारख नाही.

जे आहे ते आहे जास्त चिंता करू नका.

१) त्याच्या साठी संपत्ती निर्माण करून ठेवा.
२) त्याला शिक्षणात इंटरेस्ट नसेल तर जबरदस्ती करू नका आणि अपेक्षा पण ठेवू नका.
३) नियमित उपचार चालू ठेवा.
४), त्याला खेळ,संगीत,पोहणे, व्यायाम,जॉगिंग, ट्रॅकिंग ,अशा शारीरिक मेहणीती च्या गोष्टी ची आवड लावा.
शारीरिक मेहनतीने शरीरात positive energy निर्माण होते, नैराश्य दूर होते,माणसात आत्मविश्वास येतो.
मन आनंदी होते.
हया सर्व गोष्टी साठी जे हार्मोन्स कारणीभूत असतात त्याचे प्रमाण शारीरिक व्यायामाने च निर्माण होतात.

मोबाईल आणि टीव्ही मुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे प्रतेक घरात हीच स्थिती आहे.
माणसाला एक तरी छंद असायलाच हवा.
मोबाईल आणि टीव्ही सोडून.

उगाचच चिंता करणे सोडा.
काही तो मागे वैगेरे राहणार नाही

>>मुलाला मानसिक इश्यू आहेत, त्याची ट्रीटमेंट ३ महिन्यापूर्वी चालू होती, मुलाला बघितल्या शिवाय डॉक्टरांनी ट्रीटमेंट देता येणार नाही हे सांगितले, त्यामुळे आता ट्रीटमेंट बंद आहे.>>
IPH ठाणे यांच्याकडे ऑनलाईन काउंसेलिंग आणि कन्सल्टिंगची सोय आहे. त्यांचे संकेतस्थळ - https://www.healthymind.org/
त्यांच्याकडे ऑनलाईन सेवा देणार्‍या डॉक्टर आणि काउंसेलरची यादी - https://www.healthymind.org/online-counseling.php
इमेल अ‍ॅड्रेस दिले आहेत, मेल करुन तारीख, वेळ ठरवून घेता येइल. ऑनलाईन कन्सल्टिंग करुन औषधोपचार सुरु करता येतील.
माझ्या नातेवाईकांचा यांच्याकडचा अनुभव चांगला आहे.

रायगड,
alternative schooling चा आम्ही नक्की विचार करू.
हेमंत,
तो इतर मुलानांसारखाच आहे, फक्त मोबाइल आणि इंटरनेट addiction मध्ये अडकला आहे.
त्याला माझ्यापेक्षा जास्ती कॉम्पुटर hardware (कॉम्पुटर पार्टस) बद्दल माहिती आहे
आम्ही मुलाला सांगितले आहे त्याला जे पाहिजे त्याने शिकावे, पण शिकायचे तो काहीच बोलत नाही

मुलाला मानसिक इश्यू आहेत, त्याची ट्रीटमेंट ३ महिन्यापूर्वी चालू होती, मुलाला बघितल्या शिवाय डॉक्टरांनी ट्रीटमेंट देता येणार नाही हे सांगितले>>> डॉक्टर होम व्हिजिट करतात का? कदाचित थोडे जास्त चार्जेस घेतिल पण ट्रिटमेन्ट सुरु ठेवण महत्वाच आहे.

सुनिधी,
आमच्या बरोबर तो फक्त गेमिंग कॉम्प्युटर किंवा गेमिंग मोबाईल बद्दल बोलतो.
प्राजक्ता,
एक होमिओपॅथी डॉक्टर ज्या counselor पण आहेत त्या होम visit साठी येत होत्या पण मुलगा त्यांनी सांगितलेले टास्क पूर्ण करायचा नाही, त्यांनी होम visit करण बंद केल, ती ट्रीटमेंट बंद झाली.
नीलूदा,
email मिळाला नाही, please पुन्हा पाठवणार का.

नीलूदा,
sorry, माझा संपर्क disable होता त्यामुळे email मिळाला नाही, आता enable केला आहे, Please पुन्हा एकदा email पाठवणार का.

राज1
मुलाला मोबाइल Addiction सेन्टर ला नेणार असाल तर दोन ते तीन महिने लागतात असे वाचले होते, जून मध्ये शाळा सुरु होतील, नंतर त्याला शाळा जॉईन करता येईल.

राज1,
मुलाच्या इंटरनेट व मोबाईल Addiction चं काय झालं, मुलाचं वय वाढत चाललंय वं त्याच्या Future बद्दल काळजी वाटली म्हणून मेसेज टाकत आहे.

सुरज,
मुलाची KEM हॉस्पिटल ला ट्रीटमेंट सुरु झाली आहे, IQ टेस्ट करायला सांगितली आहे, त्यानंतर Clenical स्टडी व ओपन स्कूल चे ठरवता येईल असे सांगितले.
आम्हाला दोघानांही (मिसेसला व मला) आमचे जॉब सोडून मुलासाठी पूर्ण वेळ द्यायला लागणार आहे

पल्लवी,
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Pages