मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)
दोन वर्षापूर्वी मी माझ्या मुलाचा आभ्यासा बद्द्ल विचारले होते. दोन वर्ष्यानी तरी तो अभ्यास करायला लागेल असे वाटले होते. पूर्वी थोडा तरी अभ्यास करायचा आता ५ मिनिट पण अभ्यास करत नाही. सकाळी ८ किंवा ८.३० ते ९.०० वाजे पर्यंत उठतो व २ किंवा ३ वर्ष्याच्या मुलासारखा खेळत बसतो. मला व माझ्या मिसेस ला कारण नसताना त्रास देतो. त्याच्या आजी, आजोबाना पण असाच त्रास देतो. अभ्यासात हुशार आहे. (७०% किंवा ८०% मार्क मिळतात). खेळाची खूप आवड आहे म्हणून ground लावले पण तेथे जात नाही. घरीच T.V. बघत बसतो. रविवारी तर ५ ते ६ तास T.V. बघत बसतो व T.V. नसेल तर mobile वर ३ ते ४ तास गेम खेळत बसतो. mobile काढून घेतला किंवा T.V. बंद केला तर आम्हाला मारतो.
तोंडात बोट घालयाची सवय आजून गेली नाही.
बोबडे बोलणे कमी करण्यासाठी स्पीच therapist कडे गेलो. त्यांनी दिलेला अभ्यास त्याने केला नाही म्हणून आम्ही स्पीच therapist कडे पुन्हा गेलो नाही.
आत्ता त्याची Thyroid टेस्ट positive आली. वजन ४३.५ किलो.
त्याच्या आक्रस्ताळेपणा बद्दल आमच्या एका councillor मित्राने त्याला psychiatrist कडे नेण्याचा सल्ला दिला त्या मित्राला Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) ची शंका येते आहे. काय करावे काही समजत नाही.
कृपया सल्ला द्या
राजेंद्र तुम्ही स्वतः काळजीने
राजेंद्र तुम्ही स्वतः काळजीने खचुन गेले आहात असं तुमच्या लिखाणातून जाणवतंय. समस्या अतिशय गंभीर आणि मुलाच्या आयुष्यावर परिणाम करणारी असल्याने हे साहजिकच आहे. मी तुमची हताशा समजु शकते. तुम्हाला इथे पब्लिक फोरम वर सगळे तपशील सांगता येणार नाहीत त्यामुळे इथे मिळणारे सल्ले पण एका मर्यादेपर्यंतच उपयोगी ठरतील. हा तिढा सोडवण्यासाठी एक सुचवू का? शक्य झाल्यास तुम्ही दोघे (आई वडील) ह्या संदर्भात पालकांसाठी असलेले समुपदेशन घ्या. त्रयस्थ आणि प्रशिक्षित समुपदेशकाशी तुम्ही मनमोकळेपणाने बोलु शकाल. आणि ते ह्याच क्षेत्रात कार्यरत असल्याने तुम्हाला योग्य आणि सद्य परिस्थितीत शक्य असलेले उपाय सुचवु शकतील.
समस्या कठीण असली तरी अशक्य नाही. उपाय नक्की सापडतील पण सगळ्यात आधी तुम्हाला मनाला उभारी देणार्या आधाराची गरज आहे. तुम्ही मनाने कणखर झालात की तुम्हाला नव्या जोमाने न ह्या समस्येवर काम करता येईल.
आचार्यजी तत्काळ
आचार्यजी तत्काळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तेव्हा मला वाटत होते की traviling किंवा कॅटरिंग क्षेत्रात मला थोडा interest आहे. पण मुलासाठी वेळ द्यायचा तर पार्ट टाइम जॉब बघावा लागेल. office मध्ये मी डेटा entry चि काम करतो, तेच कदाचित बघावे लागेल.
सल्ला मागणे यात चुकीचे काहीच
सल्ला मागणे यात चुकीचे काहीच नाही. तुमच्या समस्येने अस्वस्थ व्हायला होतंय. पण २०१६ पासून तुम्ही याच विषयावर सल्ले मागत आहात. समस्येचे स्वरूप तुम्ही पूर्णपणे सांगत नाही आहात. तुम्हाला मिळणारे सल्ले तसेच असणार. मायबोलीवर वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ आहेत. त्यांच्या ओळखीतले लोक आहेत.
सर्वांनी तुम्हाला सेशन्स घेण्याविषयी २०१६ पासून सुचवलेले आहे. तुम्ही जेव्हढी माहिती देत आहात त्यावरून यापलिकडे कुणीच सल्ला देऊ शकणार नाही. जिथे जिथे उपाय आहे असे वाटते तिथे तुम्ही अडचण सांगून ते उपाय निकाली काढले आहेत. उदा मुक्तांगण मधे लहान मुलांच्या व्यसनावर काम होते. तिथे तुमचे म्हणणे आहे कि अठरा वर्षे वय पाहिजे. तुम्हाला असे कुणी सांगितले ? त्यानंतर पुन्हा एकदा जाण्याची तुमची तयारी आहे का? दिलेल्या फोन नंबर वर फोन करून खात्री केलीत का ? आपल्या प्रयत्नात त्रुटी रहायला नकोत. आर्थिक अडचण सेकंडरी आहे.
डॉ. वैशाली देशमुख
https://www.dmhospital.org/doctor-details/VAISHALI-DESHMUKH यांच्या कडे गेल्यास त्या तुम्हालाही काय करावे काय नको हे सांगतील. कोणत्या डॉक्टरकडे न्यायला हवे हे सांगतील. त्यासाठी मुलाची तयारी करून घेऊ शकतील. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बघा. त्यांना हातचे न राखून ठेवता सांगा. उपाय निघेल.. ( फोन करून जा. अनेकदा त्या जर्मनीला असतात. त्या उपलब्ध असताना जा).
इतका प्रदीर्घ काळ एकाच समस्येवर धागे काढावे लागणे हे दुर्दैव आहे. तुमची आर्थिक ओढाताण होत असेल हे समजू शकतो. परिस्थितीने काहीच सुचत नसेल हे ही समजू शकतो. पण आजूबाजूला कित्येक जण असे आहेत ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला बळ येईल.
मॉडर्न कॅफेच्या चौकात एक मुलगा पेन्सिल पासून सर्व वस्तू विकतो. एका मित्राने त्याच्याकडच्या सर्व वस्तू घेतल्या तेव्हां त्याने सांगितले कि वडील गेल्याने आई त्याला आणि बहीणीला घेऊन पुण्यात आली. आई धुणीभांडी करते. याने तिला मदत म्हणून चौकात वस्तू विकायला सुरूवात केली. भीक मागत नाही. जे पैसे मिळतात त्यातून लहान बहीणीला शाळेत घातले आहे. रात्री तिच्याकडून अक्षर ओळख शिकतो....
इथे हे सांगणे सोपे आहे. तरीही... दुसरा पर्याय आहे का ?
आर्थिक अडचण असलेल्या
आर्थिक अडचण असलेल्या पेशंटसाठी प्रत्येक हॉस्पिटलला असा एक विभाग असतो.
https://www.dmhospital.org/charity-endeavors
जिथे तुम्हाला आवडेल तिथे ट्रीटमेंट घ्या. पण त्या आधी अशा मदत करणार्या विभागाची माहिती घेऊन तिथे भेट द्या.
राज, मार्ग काढाल नक्की या
राज, मार्ग काढाल नक्की या समस्येतून.मला असं वाटतं की मुलाला मोबाईल वर सध्या सवय सुटत नाही तोवर काही क्रिएटिव्ह गेम्स ची आवड लावता येईल का? पॉटरी लाईट, तुकडे इथून तिथून नेऊन विशिष्ट आकार बनवण्याचे गेम्स वगैरे.वजन वाढलं आहे, ठीक.वाढलेल्या वजनाची मुलंही हालचाल असेल तर हेल्दी आयुष्य जगू शकतात.त्यातल्या त्यात घरात हालचाल, चांगलं कमी साखर, कमी ट्रान्स फॅट वालं खाणं इतक्या गोष्टी आता सध्या करता येतील.जितकी शारीरिक दमणूक होईल तितकी चांगली झोप होईल.तो खूप विचार, काळजी करतो का?
आचार्यजी, माझा मुलगा प्रत्येक
आचार्यजी, माझा मुलगा प्रत्येक वेळी आम्ही नेल त्या डॉक्टरांकडे आला असता, त्यांनी दिलेले Task पूर्ण केले असते, मेडिसिन घेतली असती, तो यातून बाहेर पडला असता तर पुन्हा प्रश्न विचारावा लागला नसता.
मुक्तांगण मधल्या स्वयंसेवक यांनीच आम्हाला सांगितले, आम्ही मुलाच्या अॅडमिशन साठीच गेलो होतो.
मायबोली वर सेशन्स कसे घेता येतील, ते कृपया सांगा
मायबोली वर सेशन्स कसे घेता
मायबोली वर सेशन्स कसे घेता येतील, ते कृपया सांगा >> समजले नाही. मायबोलीवर सेशन्स ?
आचार्यजी, माझा मुलगा प्रत्येक
आचार्यजी, माझा मुलगा प्रत्येक वेळी आम्ही नेल त्या डॉक्टरांकडे आला असता, त्यांनी दिलेले Task पूर्ण केले असते, मेडिसिन घेतली असती, तो यातून बाहेर पडला असता तर पुन्हा प्रश्न विचारावा लागला नसता >>> ही गोष्ट आता समजली. धन्यवाद.
आचार्यजी, तुम्ही वरती सेशन्स
आचार्यजी, तुम्ही वरती सेशन्स लिहिली आहेत ती कसली सेशन्स. आणि कुठे घेता येतात.
राजेंद्रजी
राजेंद्रजी
तुम्ही तुमचे सगळे धागे पुन्हा वाचा. या प्रश्नाचे उत्तर त्यात दिलेले आहे. तुमच्या विपूत देखील याबाबतीत चांगले सल्ले दिलेत लोकांनी.
तुम्हाला मनापासून शुभेच्छा !
राजेंद्र , असं दिसतं आहे की
राजेंद्र , असं दिसतं आहे की डिसलेक्सिया हे मुलाच्या समस्येचं मूळ आहे. डिसलेक्सिया असल्याने अभ्यास झेपत नाही, त्यामुळे आक्रस्ताळेपणा. इतर मुलांमध्ये मिसळणं बंद झालं. घरात बसून मोबाईलवर खेळणे आणि त्यामुळे वजन वाढणे. डिसलेक्सियावर उपचार करावे लागतील आणि त्याच्या जोडीला वजन कमी करणे, व्यायाम हेही करावं लागेल.
तुम्ही हताश झाला आहात , हे साहजिक आहे. पण शेवटी मार्ग तुम्हांलाच काढावा लागणार आहे. ट्रीटमेंट करून घेणं हेच आपल्या हिताचं आहे आणि याला पर्याय नाही हे मुलाला समजवण्याचे प्रयत्न करावे लागतील.
रघू आचार्य यांनी कळकळीने सल्ले दिले आहेत. मला तरी ते सगळे पर्याय योग्य वाटतात. क्राउड फंडिंगसाठी प्रयत्न करण्यात काही चूक नाही.
इथे काही डॉक्टरांचे संदर्भ आले आहेत. मी डिसलेक्सिया पुणे असं गुगल केलं तर आणखीही काही डॉक्टर व संस्थांबद्दल माहिती दिसते. त्यातला तुम्हांला सोयीचा वाटतो, तो पर्याय निवडा.
राजेंद्र यांना व्यक्तिशः प्रत्यक्ष जाऊन मदत करणारी व्यक्ती असेल आणि त्यांना ते चालणार असेल तर पहिला पुश मिळेल. कारण आता आधी राजेंद्र यांनाच मोटिव्हेट करायची गरज आहे, असं दिसतं.
भरत +१
भरत +१
भरत +1,
भरत +1,
पुण्यातील डॉक्टर खूप मिळतील पण मुलगा एक- दोन सेशन्स पूर्ण करेल, परत ये रे माझ्या मागल्या.
मी खरच हताश झालो आहे, सगळ्या गोष्टीचं टेंशन आल आहे, मुलाचे problem, मिसेस चि बदली, तिची काळजी, मला या वयात (55) काही काम मिळू शकेल का ही काळजी, मुलाला वेळ देता येणार का, वेळ आत्ता दिला नाही तर खरच अवघड होईल. मी खरंच मानसोपचारतज्ज्ञ यांचा सल्ला घेणार आहे.
कोणती व्यक्ती किंवा संस्था त्याला किंवा आम्हाला मदत करणार असेल तर खरच सांगा.
सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
<< तो आता 15 वर्षाचा आहे. तो
<< तो आता 15 वर्षाचा आहे. तो कोणतीच ट्रीटमेंट पूर्ण करत नाही. त्याला काही प्रॉब्लेम असतिल तर त्याने स्वतः येऊन प्रॉब्लेम डॉक्टर किंवा councilor ला सांगितला पाहिजे.
Submitted by राज1 on 21 September, 2023 - 07:48 >>
-------- मुलाला कळतही नसेल त्याला नक्की कशाचा प्रॉब्लेम आहे.
धागा वाचत आहे, मायबोलीकरांनी वर चांगले सल्ले दिलेले आहेत. अनेक संकटांशी (आर्थिक, आरोग्य... ) एकाच वेळी सामना करत आहात, तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी शुभेच्छा.
(१) बयकोची सरकारी नोकरी असेल तर बदली साठी विनंती करुन बघा. या काळांत, एकत्र रहाणे सर्वांसाठी हितकारक आहे.
(२) मुलाच्या बाबतीत छोटे छोटे टारगेट ठेवा, आणि ते मिळविण्याचा प्रयत्न करा.
(३) येथे लिहीत रहा, सल्ले मिळतील , त्याहीपेक्षा तुम्हाला आवश्यक असलेला एक ब्रेक मिळेल.
https://morrisfoundation.in
https://morrisfoundation.in/contact/
http://www.mdamumbai.com/ यांची पुणे शाखा किंवा कोणी व्यक्ती पुण्यात आहेत का ते विचारता येईल.
त्यांच्याकडे विद्यार्थी स्पॉन्सर करायची सोय आहे. http://www.mdamumbai.com/support-us.php
https://indianexpress.com/article/cities/pune/pune-ngo-gadchiroli-early-...
https://www.pathfinderclinic.com/services-pune/dyslexia-learning-disorde...
https://www.kemhospitalpune.org/learning-disability-in-children/
ट्रीटमेंटचा प्लान पक्का केलात की हॉस्पिटलच्या मदतीने क्राउड फंडिंगसाठी अपील तयार करून इथे कळवा.
भरत,
भरत,
नुसते गेम खेळून किंवा video बघून आयुष्य जाणार नाही हेच मुलाला समजत नाही. त्याचा स्वाभाव खूप बालिश आहे. शिक्षणा शिवाय नौकरी नाही व नौकरी शिवाय पैसा नाही हेच समजत नाही. आम्ही बर्याच वेळा त्याला समजावून सांगितले, पण त्याला ते समजत नाही.
Maharashtra Dislexia
Maharashtra Dislexia Association
http://www.mdamumbai.com/
What Is Dyslexia And How Can A Child Overcome It
https://www.indiatimes.com/explainers/news/what-is-dyslexia-and-how-can-...
भरत यांनी ही लिंक दिली आहे.
भरत यांनी ही लिंक दिली आहे.
हातपाय हलवावे लागतील . किमान त्या त्या व्यक्तींना मेल टाकून, फोनवर संपर्क करून सुरूवात केली पाहिजे. गेल्या सात वर्षात दोनच डॉक्टरांकडे जाऊन मुलगा दाद देत नाही असे म्हणणे पटणारे नाही. तुम्ही स्वतःला मोटिव्हेट करा. तुमचे प्रयत्न पुरेसे नाहीत असे मत कुणाचेही होईल. सरकारी मदत योजना आहेत का याचा शोध घ्या. मेंटल हॉस्पिटलला एक मित्र होते, त्यांचा नंबर शोधतोय. ओपीडी घेत असतील तर मोफत उपचार होतील. ससूनला जाऊन या. तिथे मोफत उपचार आहेत का विचारा. तिथे नसतील तर कुठे याची चौकशी करा.
फक्त सोशल मीडीयात दहा दहा वर्षे सल्ले मागणे म्हणजे प्रयत्न करणे नाही.
माफ करा माझे म्हणणे चुकीचे असेल तर. पण जी माहिती आतापर्यंत दिली आहे त्यावरून लिहीले.
https://reelrundown.com
https://reelrundown.com/movies/Top-Four-Dyslexia-Documentary-Movies
रघू आचार्य, हे सगळं
रघू आचार्य, हे सगळं करण्यासाठी त्यांना स्वतः:ला मदतीची गरज असेल असं वाटतं.
बरोबर. त्या दृष्टीने त्यांना
बरोबर. त्या दृष्टीने त्यांना फोन नंबर दिले आहेत. तिथे त्यांनी गेले पाहीजे.
मिसेस चि government services
मिसेस चि government services आहे, माझा जॉब private कंपनीत आहे, मला माझा जॉब सोडूनच तिच्या बदलीच्या ठिकाणी जावे लागेल.
मिसेस चि government services
मिसेस चि government services आहे >> आधीच स्पष्ट केले असते तर बरे झाले असते.
आचार्यजी,
आचार्यजी,
सात, आठ वर्षात फक्त दोन नाही तर पुण्यातील 5 ते 6 नामवंत मानसोपचारतज्ज्ञ झाले, 3-4 Councilor ना भेटून झाले.
<< मिसेस चि government
<< मिसेस चि government services आहे >>
-------- बदली साठी एक अर्ज खरडून वरच्या अधिकार्यांना सहानुभूतीपूर्ण विचार करायला विनंती करा. अर्जात सविस्तर परिस्थितीचे वर्णन करा. अगोदर प्रयत्न केले असेल तर पुन्हा करा...
मानसिक स्वास्थ्यासाठी रिसोर्सेस एकत्र आणणे गरजेचे आहे, तसा प्रयत्न व्हायला हवा, आर्थिक ताण कमी होईल हा दुसरा फायदा.
आपण सगळे त्यांना गुगल मदत
आपण सगळे त्यांना गुगल मदत करतोय. फोन नंबर्स आणि पत्ते.
त्यांना सध्या ज्या मदतीची गरज आहे ती त्या मुलाबरोबर एका विश्वासू, ट्रेंड आणि मुलाला पटेल अश्या व्यक्तीचा दिवसात काही तास सहवास, ज्यात तो मोबाईल गेम्स न खेळता दुसरं काही कलात्मक किंवा सृजनशील करू शकेल.यांची पूर्णवेळ नोकरी आहे.त्यात फार सूट सवलत दरवेळी मिळणार नाही, पत्नीची सरकारी नोकरी आहे यातही वेळेचे नियम असतील.कोणी त्यांच्या घराजवळ राहणारे त्यांच्या कंसेंट ने(आणि त्यांना पटणार असेल तर) अशी वेळेची मदत करू शकेल का?
उदय,
उदय,
मिसेस Government job ला लागल्या पासुन पुण्यातच आहे, त्यामुळे बदलीच्या गावी जावेच लागणार आहे.
डॉ वैशाली देशमुख यांच्याकडे
डॉ वैशाली देशमुख यांच्याकडे मी दोन्ही मुलांना नियमित न्यायचो. मंगेशकर मधील एका डॉक्टरांनी मला त्यांचे नाव सुचवले होते. तिथल्या अनेक डॉक्टरांची मुले त्यांच्याकडेच असतात. काऊन्सिलिंग साठी मोठी समस्या असायला पाहिजे असे नाही.
तसेच मुक्तांगण बद्दल एका स्वयंसेवक किंवा तत्सम व्यक्तीकडून ऐकलेल्या व्यसनमुक्तीच्या अनुभवावरून इथे लिहीले होते. ते गुगलवरून कन्फर्म केले.
https://iphpune.org/
https://iphpune.org/
Iph ही डॉ आनंद नाडकर्णी यांनी ठाणे इथे सुरू केलेली संस्था आहे. त्यांच्या पुणे ब्रांच ची ही वेबसाईट. त्यावर त्यांचा नंबरही आहे.
ही संस्था अत्यंत कमी खर्चात ट्रीटमेंट उपलब्ध करते
त्यांच्याकडे खूप स्किल्ड डॉ ची टीम आहे, विविध सपोर्ट ग्रुप्स आहेत.
आनंद नाडकर्णी यांची पुस्तके वाचली असली तर त्यात ही खूप माहिती मिळते. जे लहान पेशंट डॉ कडे यायला तयार होत नाहीत त्यासाठी विविध उपाय केलेले वाचलेलं आठवतंय.
इथे तुम्हाला स्वत:ला आणि मुलाला नक्की मदत मिळेल.
तुम्हाला सपोर्ट ग्रुप मधून साथ मिळू शकेल.
पहिल्यांदा मुलाला ना नेता तुम्ही दोघे किंवा एकटे जाऊन या.
सावली,
सावली,
आत्ता IPH(Pune) मधल्या डॉक्टरांची treatment चालू होती. एकदाच तो त्या डॉक्टरांकडे आला, बाकी वेळा आम्हीच गेलो, तेथेही तो यायला तयार नाही.
Pages