मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)

Submitted by राज1 on 23 January, 2017 - 03:47

मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)
दोन वर्षापूर्वी मी माझ्या मुलाचा आभ्यासा बद्द्ल विचारले होते. दोन वर्ष्यानी तरी तो अभ्यास करायला लागेल असे वाटले होते. पूर्वी थोडा तरी अभ्यास करायचा आता ५ मिनिट पण अभ्यास करत नाही. सकाळी ८ किंवा ८.३० ते ९.०० वाजे पर्यंत उठतो व २ किंवा ३ वर्ष्याच्या मुलासारखा खेळत बसतो. मला व माझ्या मिसेस ला कारण नसताना त्रास देतो. त्याच्या आजी, आजोबाना पण असाच त्रास देतो. अभ्यासात हुशार आहे. (७०% किंवा ८०% मार्क मिळतात). खेळाची खूप आवड आहे म्हणून ground लावले पण तेथे जात नाही. घरीच T.V. बघत बसतो. रविवारी तर ५ ते ६ तास T.V. बघत बसतो व T.V. नसेल तर mobile वर ३ ते ४ तास गेम खेळत बसतो. mobile काढून घेतला किंवा T.V. बंद केला तर आम्हाला मारतो.
तोंडात बोट घालयाची सवय आजून गेली नाही.
बोबडे बोलणे कमी करण्यासाठी स्पीच therapist कडे गेलो. त्यांनी दिलेला अभ्यास त्याने केला नाही म्हणून आम्ही स्पीच therapist कडे पुन्हा गेलो नाही.
आत्ता त्याची Thyroid टेस्ट positive आली. वजन ४३.५ किलो.
त्याच्या आक्रस्ताळेपणा बद्दल आमच्या एका councillor मित्राने त्याला psychiatrist कडे नेण्याचा सल्ला दिला त्या मित्राला Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) ची शंका येते आहे. काय करावे काही समजत नाही.

कृपया सल्ला द्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Remedial Coaching घेणारे पुण्यातील कोणी डॉक्टर किंवा councillor असतील तर PLEASE सांगा

पुण्यातील Remedial Coaching डॉक्टर किंवा counselor नाव किंवा फोन नंबर कृपया द्या

Ata kasa ahe tumcha mulga..
Don’t see any comments after that, so thought of checking .

आप्पा सो (नयाहयवह) ,
तुम्हाला संपर्कातून message पाठवला आहे
धन्यवाद

राजेंद्र, डॉक्टर कडे जाउन आल्यावर ते इथेही शेअर करा म्हणजे इतरांना त्याचा उपयोग होईल. कारण सर्व गोष्टी मुलांच्या मनाप्रमाणे केल्यास ते हेकेखोर बनतात व इमोशनल ब्लॅकमेलिंग करायला लागतात असेही आता लक्षात येउ लागले आहे.

मानसी,
संगीता करमरकर-स्पर्श क्लिनिक - Remedial Coaching साठी त्यांच्या कडे गेलो होतो, पण त्यांनी सांगितलेल्या वेळी आम्हाला जायला जमत नसल्यामुळे त्यांच्याकडे गेलो नाही.

Remedial session चा खूप उपयोग होतो. त्या वेळेस कदाचित जाणवत नाही लगेच. तुम्ही नक्की try करा. It was very effective for my kid in long run. तेव्हा सेशनला जायचा कंटाळा यायचा. आपण पैसे घालवतोय का असेही उगीच वाटायचे. पण जेव्हा ट्रीटमेंट संपली त्यानंतर बऱ्याच दिवसांनी लक्षात आले की आक्रस्ताळेपणा खूपच कमी आला आहे.

संगीता करमरकर-स्पर्श क्लिनिक - Remedial Coaching साठी त्यांच्या कडे गेलो होतो, पण त्यांनी सांगितलेल्या वेळी आम्हाला जायला जमत नसल्यामुळे त्यांच्याकडे गेलो नाही.>>>>

राजेंद्र, तुम्ही याआधीही एकदोनदा लिहिले की डॉक्टरच्या वेळा न जुळल्यामुळे तुम्ही गेला नाहीत वगैरे.

तुमची परिस्थिती खूप कठीण आहे हे तुमच्या इतर धाग्यांवरून दिसते. तुमचे प्रश्न, मुलाचे प्रश्न आणि आता करोनामुळे बदललेली परिस्थिती... ह्या सगळ्याला एकत्र तोंड देणे बिकट आहे. पण कुठलाही प्रश्न सोडवताना चिकाटी दाखवावी लागतेच. नाहीतर अपेक्षित परिणाम मिळत नाही. डॉक्टरी उपचारांनी मुलाचा प्रश्न सुटण्यासारखा असेल तर चिकाटीने पाठपुरावा करून हा प्रश्न तरी सोडवून घ्या.

आम्ही त्यांना सांगितले कि आम्हाला महिन्यातला २रा शनिवारी दिवसभर कधीही व ४थ्या शनिवारी दुपारी १ वाजल्या नंतर कधीही अपॉइंटमेंट द्या पण त्यांनी सांगितले कि आम्ही सांगू त्या वेळी यावे लागेल. मुलाच्या शाळेतून व आमच्या ऑफिस मधून प्रत्येक अपॉइंटमेंट वेळी सूट कशी मिळणार.

Trimiti ला संगीता मॅडम शनिवारी असायच्या. आता माहीत नाही. तुम्हाला शक्य नसेल तर घरातले अजून कोणी घेऊन जात असेल तर बघा. प्रत्येक वेळी आईवडील लागतातच असे नाही.

Sorry to say . Then, you are not enough concerned about your child.
How many times have you taken your son to her?
You should be ready to make adjustments in your schedule if your son is your priority 1.
We have never missed a single session for our child and we got the excellent results. Please note, you as a parent, grand-parent need to make lots of changes in your behaviour, if you expect changes in your kid’s behaviour.
Lockdown is good opportunity to start her sessions.

मोहिनी१२३, अती बोलताय. दुसर्‍याला जज करू नका. तुम्ही किती ग्रेट आहात सांगायचं हे व्यासपीठ नाही. मदत करता येत असतल तर करा.
हे असं जजमेंटल लिहायचं आणि मग फेसबुकवर 'माझ्या गॅस वर चहा उकळतोय, दारं सदैव उघडी आहेत. कधीही बोलावसं वाटलं तर या' याला काहीही अर्थ नाही.
प्लीज विचार करा!

त्यांना ब्लेम करू नका हो.
त्यांनी योग्य व्यक्तीला संपर्क केलाय,वेळा खरंच जुळत नसतील तर ते स्वतःच्या जवळची वेळा जुळणारी व्यक्ती शोधून तिथे जातीलच.
त्यांना आपल्या मुलांची किती काळजी आहे, नाही ठरवणारे आपण कोण?आणि काम धंदे शाळा चालू ठेवाव्याच लागतात.
प्रत्येक वेळी समजून घेणारी व्यक्ती ऑफिसात, शाळेत मिळेलच असे होत नसते.त्यांना मुलाच्या समस्येबद्दल कल्पना आहे, शक्य ते उपाय ते करत असतील.माहिती मिळवत असतील.

You are also judging me over here. I have gone through same problem and we have only come out of it only because of Sangeeta Madam’s help. Have you not seen my post “ तसं नका करू प्लीज.त्यांच्या सेशन्सचा खूप उपयोग होतो. तुमची तळमळ संगीता मॅडम पर्यंत पोचू दे”

हे असं जजमेंटल लिहायचं आणि मग फेसबुकवर 'माझ्या गॅस वर चहा उकळतोय, दारं सदैव उघडी आहेत. कधीही बोलावसं वाटलं तर या' याला काहीही अर्थ नाही.- I have never written like this as well.

Aw, this is my last post if I am trolled unnecessarily though I am trying to give sensible advice over here.

साधना+ 1

तुमच्या मुलाचं क्लिनिकल डायग्नोसिस झालंय का? जनरली थोडेफार Behavioral Issues असतील तर ते योग्य थेरपीस्टचे काही सेशन्स घेतले तर नक्कीच मदत होईल. आपल्या मुलाचं वय पाहता तो एकटा जाऊ शकणार नाही त्यामुळॅ तुमच्या कामाच्या जागी एखादा दिवस कामाचे तास कमी/बदल करून जाता येतं का ते पाहा. थेरपीस्ट तसा योग्य वेळा जुळणारा शोधता आला तर तेही पहा. अमेरिकेत माझ्या माहितीत बरेच पालक वेगवेगळ्या कारणाने मुलांना थेरपीजसाठी नेताना पाहिले आहेत. कामाच्या जागी सुपरवायझर नेहमी सहकार्य देतात. भारतातला अनुभव नाही पण बोलून पहा. काय होतंय यावर किती सेशन्स ते अवलंबून असतं असं इतर पालकांच्या अनुभवातून वाटतं. पण सल्ला योग्य व्यक्तींचाच घ्या. योग्य म्हणजे त्या शैक्षणीक पातळीवरचा. रिव्ह्युज वाचा. घरीच काहीतरी आपणच करू/ बघू/ होईल हा अ‍ॅटिट्युड ठेवू नका. वेळ द्यावा लागेल हे मनाशी पक्कं केलंत तर वेळ नक्की काढाल. शुभेच्छा. Happy

इथे पण खूप सहकार्य मिळतं आपण योग्य शब्दात मागितलं तर. पुन्हा कळकळीने सांगते वेळ दवडू नका. चिकाटी,संयम,वेळ भरपूर द्यावा लागेल यात शंका नाही.

मोहिनी यांनी कदाचित तेवढे पोलिटिकली करेक्ट शब्द नसतील वापरले पण त्यांनी जे म्हटले त्यात तथ्य आहे.
हा राजेंद्र यांचा मागच्या पानावरचा प्रतिसादः
Remedial Coaching साठी दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला सांगितल पण त्यांनी सांगितलेल्या वेळी आम्हाला जायला जमत नसल्याने अजूनतरी आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही.
मुलाचं T.V. खूप वेळ बघण, Mobile खूप वेळ खेळत बसण, आम्हाला व त्याच्या आजी-आजोबाना खूप त्रास देण यावर काहीच उपाय सांगितले नाहीत. >>>>
हा या पानावरचा प्रतिसादः
संगीता करमरकर-स्पर्श क्लिनिक - Remedial Coaching साठी त्यांच्या कडे गेलो होतो, पण त्यांनी सांगितलेल्या वेळी आम्हाला जायला जमत नसल्यामुळे त्यांच्याकडे गेलो नाही. >>>>>
मुलगा आहार आणि व्यायाम फॉलो करत नाही असेही म्हटलेय.
राजेंद्र, तुम्ही स्वतः च विचार करा, तुम्ही पूर्ण प्रयत्न करताय असे तुम्हाला वाटते का? मुलांच्या बिहेवियर ची समस्या सोपी नसते हे मान्य आहे. पण ती असे सहज जमेल तेव्हा डॉक्टर कडे जावे आणि एका औषधाने अथवा एका विजिट ने जादूसारखी सॉल्व होईल अशी नाही. चांगले रेकमेन्डेड डॉक्टर असतील तर त्यांच्या स्केजुल प्रमाणे तुम्हाला अ‍ॅडजस्टमेन्ट्स कराव्या लागतीलच ना? बरेच डॉक्टर्स वीकेन्ड ला पेशंट्स बघत नाहीत. पण म्हणून आपण त्या डॉक्टर चा पर्यायच बाद करावा असे करून कसे चालेल? नोकरीच्या ठिकाणी बोलून पहा. पत्नी आणि तुम्ही आलटून पालटून घेऊन जा सेशन्स ना. मुख्य म्हणजे हे लक्षात घ्या की पालकांना आणि घरच्या सगळ्यांना यात बरेच दिवस , कदाचित अनेक महिने एफर्ट्स घ्यावे लागतील, त्यासाठी कदाचित लाइफ स्टाइल चेन्जेसही करावे लागतील. ( अर्थात मी हे कुणी तज्ज्ञ म्हणून नव्हे तर अनुभवी पालक म्हणून लिहितेय)
मुलगा अजाण आहे. तो आपणहून व्यायाम अन आहार फॉलो कसा करेल? यात तुम्हालाच पुढकार घ्यावा लागेल. उदा. खाण्याच्या बाबतीत शिस्त सांभाळणे, व्यायाम करवून घेणे इ. घरच्यांनाच करावे लागेल. तसंच मोबाइल खेळतो , टिव्ही पहातो म्हणताय त्यावर तुम्हीच अ‍ॅक्शन घ्यावी लागेल ना. त्याला मोबाईल न देणे, टिव्ही लावायचा नाही/ ठराविक वेळीच लावयाचा असे नियम करणे आणि तो पाळणे हे तुम्हालाच करावे लागेल. पेशन्स आणि सातत्य याला पर्याय नाही. तुम्हाला शुभेच्छा!

ओह या धागालेखकाचे अजूनही एक दोन असेच धागे आहेत गेल्या ४-५ वर्षातले. तिथेही दर वेळी सगळ्यांनी असेच सल्ले दिलेत कळकळीने. पण लेखकांचे तेव्हाचे आणि आता रीसेन्ट प्रतिसाद पहाता लेखकांनी ते काहीच मनावर घेतलेले दिसत नाही. असो. आता काय बोलणार.

एखाद्याने समस्या व्यक्त केली तर आपण सह वेदना व्यक्त करू शकतो.त्यावर आपल्याला माहीत असलेले उपाय सुचवू शकतो.पण याउप्पर 'आम्ही आमचा वेळ घालवून इतके उपाय सुचवले, तू का केले नाहीत,तू असा कसा/अशी कशी/तुला काही काळजी नाही का/ तू बहुतेक तुझ्या मुलावर प्रेमच करत नाहीस' हे जाब आपण विचारू शकत नाही.Not our place,not our call in his /her personal life and territory.
सल्ले आपण स्वतः स्वेच्छेने दिलेले असतात.ते न देण्याची लिबर्टी आपल्याकडे असते.
बाकी स्पष्टीकरण धागालेखक देतीलच.

<< आम्ही त्यांना सांगितले कि आम्हाला महिन्यातला २रा शनिवारी दिवसभर कधीही व ४थ्या शनिवारी दुपारी १ वाजल्या नंतर कधीही अपॉइंटमेंट द्या पण त्यांनी सांगितले कि आम्ही सांगू त्या वेळी यावे लागेल. मुलाच्या शाळेतून व आमच्या ऑफिस मधून प्रत्येक अपॉइंटमेंट वेळी सूट कशी मिळणार. >>
शाळेत आणि ऑफिस मध्ये बोलून तर बघा. Short break घेऊन नंतर ऑफिस मध्ये जास्त थांबणे शक्य आहे का?
हल्ली या बाबतीत सहकार्य मिळते.

अशा परिस्थितीत बाकी उपायांबरोबरच होमिओपॅथीचा विचार करू शकता. मी स्वतः एक अशी केस बरी होताना पाहिले आहे. मात्र follow up खूप व्यवस्थित लागतो. छोट्या छोट्या गोष्टी पण डाॅक्टर ना कळवाव्या लागतात. मग ते औषधे adjust करून देतात.
Note:
हा मदतीच्या भावनेतून दिलेला सल्ला आहे. नाही पटले तर सोडून द्या. पण होमिओपॅथी कशी खोटी पद्धत आहे इ. इ. चर्चा इथे नको. मला स्वतःला होमिओपॅथीचा खूप छान अनुभव आहे. पूर्वी विश्वास बसत नव्हता. आता अनुभवामुळे बसतो.

>>>>>छोट्या छोट्या गोष्टी पण डाॅक्टर ना कळवाव्या लागतात.>>>>> या लहान गोष्टीच कळल्या की डॉक्टरांना कळतं की मेंदूचा कोणता भाग ओव्हरअ‍ॅक्टिव्ह आहे, कोणत्या संप्रेरकांनी तो सप्रेस करावा , कोणत्या भागास स्टिम्युलेशनची गरज आहे.

मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. मग सायकोअ‍ॅक्टीव्ह औषधे काय करतात तर या किल्ल्या कॉपी करतात अन हवी ती दारे (कुलपे) उघडतात अथवा बंद करतात.

तेव्हा रुग्णाची मनःस्थिती त्यांच्या आजूबाजूच्यांना फार बारकाईने नीरीक्षण करुन, डॉक्टरांपर्यंत पोचवावी लागते. खूप चिकाटीचे काम आहे हे. पण .... तुम्हाला १००% रिझल्ट मिळेल. तेव्हा प्लीज धीर धरा. हे दिवसही जातील.

राजेंद्रसर,
तुमचा मुलगा टी.वी व मोबाईलवर काय पाहतो ह्या कडे लक्ष ठेवा. ह्या वयातल्या मुलांच्या प्रतिक्रिया ह्या त्यांच्या डोक्यात जे भरले जाते त्यानुसारच होतात. ह्या जनरेशनला आपण लहान असताना जसे वातावरण मिळत असे तसे मिळत नाही ही एक समस्या आहे. माझी कन्या ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा टीवी वर कार्टुन वगैरे पाहत असायची. त्यातही पोकेमॉन्,डोरेमॉन,शिन्चॅग वगैरे सारख्या टेम्प्टीग सिरियल्स पाहत असायची. तिची चिडण्याची स्टाईल रडण्याची स्टाईल वगैरे ह्या तत्सम सिरियल्स मधल्या कुणा एका पात्रासारखीच व्ह्यायची. ह्यावर एक उपाय म्हणजे तुमच्या मुलासोबत तुम्हा व तुमच्या पत्नीपैकी एकाने सातत्याने ह्या सिरियल्स पाहायला सुरु करा व त्यात तुम्हीही इन्वॉल्व होता आहेत असे दाखवुन संवाद साधायचा प्रयत्न करा. माझ्या पत्नीने तसे केले व कालांतराने तिलाच शिनचॅन्ग सिरियल पाहायची सवय लागली. ( शिनचॅन मधला शिनचॅन चा बाप त्याच्या पत्नीला टरकुन असतो.) जोक्स अपार्ट. सातत्याने मुलांवर सूचनांचा भडिमारच करत राहिलो तर ते कालांतराने दुर्लक्ष करतात. (वाघ म्हटले तरी खातो वाघ्या म्हटले तरी खातो..हे मुले लवकर समजतात). मुलांच्या भावविश्वाचाही आपण एक भाग झालो तर मुले आपल्याला लवकर स्वीकारतात हे अनुभवले आहे.

वाचत आहे... कधी कधी हे करू नकोस असे म्हणण्यापेक्षा मुलांना त्यापेक्षा तू हे करतोस का असे म्हणावे. या टिपचा मला खूप ऊपयोग झाला. नकारान्ती टोन ने उगीच रिबेल व्हायला लागतात. आपल्याला पण काही नको म्हणाले की तेच करावे वाटते तसंच.
जसं तुम्हाला वाटत असेल मुलाने टिव्ही बघू नये, तर टिव्ही बघू नको म्हणन्याऐवजी चल आपण चित्र रंगवून बघू. आणि नोटीस द्यायची एकदम कृती करण्याऐवजी, आता अजून १० मिनिटानी आपण अभ्यास करू, किंवा पार्कमधून घरी जाऊ. It helps a ton when we say something respectfully. तुम्हाला व तुमच्या मुलाला शुभेच्छा.

Pages