मुलाचा आक्रस्ताळेपणा कसा कमी करावा (वय वर्षे ९)
दोन वर्षापूर्वी मी माझ्या मुलाचा आभ्यासा बद्द्ल विचारले होते. दोन वर्ष्यानी तरी तो अभ्यास करायला लागेल असे वाटले होते. पूर्वी थोडा तरी अभ्यास करायचा आता ५ मिनिट पण अभ्यास करत नाही. सकाळी ८ किंवा ८.३० ते ९.०० वाजे पर्यंत उठतो व २ किंवा ३ वर्ष्याच्या मुलासारखा खेळत बसतो. मला व माझ्या मिसेस ला कारण नसताना त्रास देतो. त्याच्या आजी, आजोबाना पण असाच त्रास देतो. अभ्यासात हुशार आहे. (७०% किंवा ८०% मार्क मिळतात). खेळाची खूप आवड आहे म्हणून ground लावले पण तेथे जात नाही. घरीच T.V. बघत बसतो. रविवारी तर ५ ते ६ तास T.V. बघत बसतो व T.V. नसेल तर mobile वर ३ ते ४ तास गेम खेळत बसतो. mobile काढून घेतला किंवा T.V. बंद केला तर आम्हाला मारतो.
तोंडात बोट घालयाची सवय आजून गेली नाही.
बोबडे बोलणे कमी करण्यासाठी स्पीच therapist कडे गेलो. त्यांनी दिलेला अभ्यास त्याने केला नाही म्हणून आम्ही स्पीच therapist कडे पुन्हा गेलो नाही.
आत्ता त्याची Thyroid टेस्ट positive आली. वजन ४३.५ किलो.
त्याच्या आक्रस्ताळेपणा बद्दल आमच्या एका councillor मित्राने त्याला psychiatrist कडे नेण्याचा सल्ला दिला त्या मित्राला Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD) ची शंका येते आहे. काय करावे काही समजत नाही.
कृपया सल्ला द्या
राज१,
राज१,
मुलाला माईल्ड इंटलेक्च्युअल डिसॅबिलीटी सांगितली आहे आणि वोकेशनल ट्रेनिंगची गरज आहे तर सध्या घराजवळच्या सेंटरला सुरुवात करा. कल चाचणी वरुन अमुक प्रकारचे काम जमू शकेल असे सांगतात मात्र प्रत्यक्ष आयुष्यात बरेचदा आपल्याला न आवडणारे बरेच काही शिकून घ्यावे लागते, कामाचा भाग म्हणून करावे लागते. सुरवातीला मुलगा आवडत नाही म्हणेल तरी ट्रेनिंगसाठी नेत रहा. लहान मूल शाळेत जाताना सुरुवातीला त्रास देते पण नंतर रमते तसेच हे देखील. सध्या मुलाला घरी काहीही न करता रहायची सवय लागलेय ती लगेच जाणार नाही. त्याच्या कंफर्टझोन मधून बाहेर पडायला तो तयार होणार नाही हे धरुन चालायचे. सध्या कमीत कमी ३-४ महिने तरी त्याचा आधीचा वर्तनाचा पॅटर्न मोडणे हे कुठले ट्रेनिंग द्यावे यापेक्षा महत्वाचे असेल. ट्रेनिंग सेंटरला चौकशी करा की इथे काय काय शिकता येइल ते मुलाला दाखवायला घेवून आल्यास चालेल का म्हणून. त्याला सोबत घेवून जा, तो कसा रिअॅक्ट करतो ते बघा. सेंटरकडून काही पेड ट्रायल पिरीएड वगैरे मिळेल का म्हणून विनंती करा जेणे करुन एक -दोन दिवस थोडे थोडे ट्राय करता येइल आणि तुम्हाला काही अंदाज बांधता येइल.
मुलाला काहीतरी आवडीचं देउन,
मुलाला काहीतरी आवडीचं देउन, लालूच दाखवुन, कार्यभाग साधता येतो का ते पहा. बडगा नको.
सर्वांचे प्रतिसादाबद्दल
सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
स्वाती,
मी या साठीच मुलाची ऍप्टिट्यूड टेस्ट करणार होतो, कि मुलगा त्याला न आवडणाऱ्या वोकेशनल ट्रेनिंगला जाणार नाही किंवा एक दोन दिवस जाऊन जाणे बंद करेल. ऍप्टिट्यूड टेस्ट करून त्याला आवडणाऱ्या वोकेशनल ट्रेनिंग सेन्टर ला त्याला नेता येईल. व्होकेशनल ट्रैनिंग सेन्टर मध्ये पेड ट्रायल पिरीएड बद्दल विचारेन, त्याला कॉऊन्सिलर नी विचारल्यावर मोबाइल आणि कॉम्पुटर ची आवड आहे असे तो म्हणतो.
नौकरी करताना त्याच्याबरोबर व्होकेशनल ट्रैनिंग सेन्टर ला जाता येत नाही आता समजत नाही त्याच्या साठी वेळ कसा काढू ऑफिस मधून एक तास जरी जायचं किंवा सुट्टी घ्यायची तरी कटकट होते नौकरी सोडून दुसरं काही काम केलं नाही याचा पश्चताप होतो आहे, म्हणूनच मी ऑनलाईन कॉम्पुटर वर काही कामं बघत होतो. आत्ता मुलाला वेळ द्यायची गरज आहे तर त्याला वेळ देता येत नाही. सांगायला वाईट वाटतं, मुलगा घरा बाहेर जायला तयार नाही. घरात बसुन दिवस भर गेम खेळत बसणे मोबाईल बघणे, खा खा खाणे हेच करतो. वय 17 वर्षे आहे पण 3-4 वर्षाच्या मुला सारखं खेळत बसतो, भवितव्याची काहीच चिंता नाही.
राज एक लिहु का? तुम्हाला राग
राज एक लिहु का? तुम्हाला राग आला तर आधीच सॉरी म्हणते पण प्लिज त्यावर विचार करा.
तुप्च्या प्रत्येक पोस्ट मधे तुम्ही मुलाला सतत ब्लेम करताय असं मला वाटतं. तुम्ही हाताश असाल, मला मान्य आहे पण तो हे काहीच मुद्दाम नाही करतेय हे लक्शात येतंय का तुमच्या? ही हॅज प्रॉब्लेम. ही नीड्स हेल्प. त्याला स्वतला हे कळत असतं तर तुम्ही इथे मदत मागत नसता. तो चुकीचा नाहिये, त्याला काही तरी होतंय जे तो सांगु शकत नाहिये आणि तुम्ही फिगर ऑट करु शकत नाही आहात.
ही नीड्स टू बी विथ समवन/ सम्वेअर ही विल फाईंड कंफर्ट. तरच बदल होईल.
रीया,
रीया,
राग नाही आला, 17 वर्षाच्या मुलाला आपल्या भवितव्याबद्दल काहीच वाटू नये याच वाईट वाटत. आणी आम्हाला मुला साठी वेळ देता येत नाही याचं वाईट वाटत,त्यामुळे हताश झालो आहे.
राज,
राज,
तुमच्या मुलाला मोबाईल-गेम खेळण्याचे व्यसन आहे आणि जोडीला माईल्ड इंटलेक्च्युअल डिसॅबिलीटी सांगितली आहे. व्यसनाचे असे असते की वेळेला घरातली माणसे उपाशी मेली तरी चालेल पण माझे व्यसन पूर्ण झाले पाहीजे. अगदी भले भले दारुच्या व्यसनात कुणाची पर्वा करत नाहीत तसेच तुमच्या मुलाचेही झाले आहे, त्यात त्याला समजही कमी आहे. त्याचे व्यसन जोवर पूर्ण होत आहे वर दोनवेळचे अन्न मिळत आहे तोवर त्याचे वागणे बदलणार नाही.
तुमचा मुलगा मोबाईल, कंप्युटरची आवड आहे सांगतो कारण त्याला दिवसभर गेम खेळायला आवडते. हे म्हणजे आपल्या मर्जीने दिवसभर गल्ली क्रिकेट खेळणार्या , टिवीवर मॅच बघणार्या मुलाने क्रिकेटची आवड आहे सांगितल्यासारखे. खेळाची आवड म्हणून कोचिंग क्लासाला घातले तर बहूसंख्य मुलं टिकाव धरत नाहीत कारण तिथे नियम पाळून सराव करावा लागतो, प्लेबुकच अभ्यास असतो, काठीण्याच्या पातळ्या पार पाडाव्या लागतात. खेळाची आवड म्हणून स्टेडीयम/ टिमसाठी नोकरी करणार का विचारले तर ते ही करायचे नसते, तिथेही टिकाव लागत नाही कारण कष्ट करायचेच नसतात. तुमच्या मुलाच्या कंप्युटर-मोबाईल आवडीचे पण तसेच आहे.
सेलफोन- इंटरनेट नसलेल्या ठिकाणी व्यसनमुक्ती + दोन वेळच्या अन्नाच्या बदल्यात कुठलेही काम करणे-शिकणे असे करणार्या संस्थेत दाखल करता आले तर फायदा होईल. माझे बोलणे खूप कठोर वाटेल पण सेलफोन रेंज-इंटरनेट नसलेल्या ठिकाणी रहाणे आणि ८ -१० तास हाताला काम, मग ते गवत कापणे असो ,तयार वस्तू पॅक करणे असो , किंवा इतर काही छोटे मशीन चालवणे असे काहीतरी हवे. व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडून कष्टाची सवय लागली की योग्य वोकेशनल ट्रेनिंग निवडता येइलच.
स्वाती२ यांच्याशी सहमत.
स्वाती२ यांच्याशी सहमत.
मुलाला मोबाईल-गेम खेळण्याचे व्यसन आहे. घरातील सर्वांनीच मोबाईल फोन/इंटरनेट बंद करून बघावे. हा उपाय कठोर वाटेल, पण तोच उपयोगी पडेल. इतके वर्ष आपण फोन/इंटरनेटशिवाय जगलोच ना मजेत, काही अडले का? सवय होईलच. फोन/इंटरनेटचे व्यसन केवळ मुलांनाच नाही तर मोठ्यांना पण असू शकते.
स्वाती व उपाशी बोका तुमच्या
स्वाती व उपाशी बोका तुमच्या मताशी सहमत आहे.
घरचं इंटरनेट, TV एकदिवस बंद केलं होत, पण मुलगा दिवसभर घरी झोपून होता, पण घरा बाहेर गेला नाही.
मुलासाठी वेळ कसा काढावा ते समजत नाही. मुलाबरोबर पूर्ण वेळ राहिल्याशिवाय तो घराबाहेर पडणार नाही अस अस मला वाटतं.
झोपू दे. किती दिवस झोपून
झोपू दे. किती दिवस झोपून काढेल? खरोखर सहा महिन्यासाठी internet tv बंद करा. कधी ना कधी माणूस घराबाहेर पडतोच. मी स्वतःच घरचे internet गेले सहा महिने बंद केले आहे. मोबाइल वर जितके आहे तितके आरामात पुरते.
राज
राज
मुलाचे व्होकेशनल ट्रैनिंग चालू झाले का?
सुरज
सुरज
घराजवळच्या (Walking Distance) एका व्होकेशनल ट्रैनिंग सेन्टर ला फोन करून विचारले होते, त्यांच्याकडे मोबाइल repairing, कॉम्पुटर रिपेरिंग चे पेड कोर्से आहेत, तिथे पण तो यायला तयार नाही. काय करावे ते समजत नाही
मुलासाठी वेळ कसा काढावा ते
मुलासाठी वेळ कसा काढावा ते समजत नाही. मुलाबरोबर पूर्ण वेळ राहिल्याशिवाय तो घराबाहेर पडणार नाही अस अस मला वाटतं.>>>>
तुमचा आठवडी सुट्टीचा पूर्ण दिवस मुलाला दया. त्याला घेऊन घराबाहेर पडा.. कुठल्यातरी physical ॲक्टिव्हिटी मध्ये तुम्ही दोघेही भाग घ्या. जसे की छोटे/जवळचे ट्रेकस, मॅरॅथॉन धावणे,. सायकलिंग, पोहणे. त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे असे मला वाटते. अशा ॲक्टिव्हिटी करतां करता हळूहळू गोडी निर्माण होऊन त्याला मोबाईलची आठवण कमी येईल. तसेच तुमच्या दोघांमध्ये आणखी पक्का बंध निर्माण होऊ लागेल.
तुम्हाला एक बाप म्हणून त्याच्या भविष्याची चिंता वाटणे साहजिकच आहे परंतु ते सतत त्याच्यासमोर बोलून न दाखवता त्याला मित्रा सारखं वागवून तर बघा. कदाचित तो स्वतःहून काही बोलेल. त्याची आवड सांगेल. तसे मग पुढचे ठरवता येईल
मृण्मयी,
मृण्मयी,
आमचा आठवडी सुट्टीचा पूर्ण दिवस मुलाला द्यायला तयार आहे, पण तो घराबाहेर पडायला तयार नाही. बाहेर जायचे म्हणाले कि भांडायला लागतो. ईतर दिवशी पण त्याला वेळ देता यावा म्हणुनच मी ऑनलाईन किंवा PartTime काम बघत आहे. त्याला नक्कीच शारीरिक श्रमाची गरज आहे, वजन खूप वाढले आहे.
त्याला कोणीच मित्र मैत्रीणी
त्याला कोणीच मित्र मैत्रीणी नाहीत का? त्याचे कझीन्स वगैरे असतील ना?
त्यांना सांगून पाहिले तर?
घरचं इंटरनेट, TV एकदिवस बंद
घरचं इंटरनेट, TV एकदिवस बंद केलं होत, पण मुलगा दिवसभर घरी झोपून होता, पण घरा बाहेर गेला नाही.
>>>>>>>>>
एका दिवसाने कसा बदल घडेल. २१ दिवसांनी एखादी सवय लागते, बदलते असा काहीतरी नियम आहे म्हणतात. तुम्ही ३० दिवस पकडा आणि जो उपाय कराल तो तितक्या निग्रहाने पाळा.
मी हा धागा वर आला की नेहमी वाचतो. भले नेहमी लिहीत नसेन. पण तुमच्या मुलाचे चांगलेच व्हावे अशी मनापासून इच्छा आहे.
ऋ +११
ऋ +११
हा धागा मी खूप दिवस वाचते आहे
हा धागा मी खूप दिवस वाचते आहे. तुम्ही मुलाला सुधारण्याचे खूप प्रयत्न करत आहात, मार्ग शोधत आहात हे समजते पण मुलाला रूटीनची सवय होण्यासाठी, काही गोष्टी त्याने स्वतः नित्यनेमाने करण्यासाठी त्रयस्थ मदतीची गरज आहे असे मला वाटते.
मुलाला काही दिवस एखाद्या रेसिडेन्शिअल संस्थेत ठेवता येईल का जिथे माईल्ड इंटलेक्च्युअल डिसॅबिलीटी असलेली इतर मुले असतील व त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग दिले जात असेल? हे तुम्हांला टोकाचे वाटेल याचा अंदाज आहे पण सध्या त्याला इम्पार्शल मार्गदर्शन व शिस्त मिळणे गरजेचे वाटते.
मुलगा जेंव्हा शाळेत जात होता
मुलगा जेंव्हा शाळेत जात होता तेंव्हा त्याचे मित्र फोन करायचे, घरी यायचे आणि मुलगा पण त्यांच्या कडे जायचा, तो आणी त्याचे मित्र खेळायला जायचे, ३१st डिसेंबर किंवा मित्राच्या वाढदिवसाला हॉटेल मध्ये पण पार्टी ला जायचे किंवा मुलगा पण मित्राच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीला जायचा किंवा त्याचे मित्र पण घरी यायचे.
आता जीवनाच्या प्रवाहाच्या बाहेर तो पडला आहे, घरी कोणी मित्र येत नाहीत, फोन करत नाहीत, किंवा मुलगा पण त्यांच्या कडे जात नाही, तो एकटा पडला आहे.
नातेवाईक कोणीही मदत करत नाहीत.
हे बरोबर आहे एक किंवा दोन दिवस मोबाईल किंवा इंटरनेट बंद करून काही होणार नाही
तो घराबाहेर पडतच नाही तर त्याला एखाद्या रेसिडेन्शिअल संस्थेत कसं ठेवता येणार, त्याच्या आयुष्याचं नुकसान होत आहे हेच त्याला कळत नाही
राज, राग मानू नका पण असे
राज, राग मानू नका पण असे दिसते आहे की प्रत्येक सल्ल्याला तुमच्याजवळ काहीतरी उत्तर तयार आहे. मुलगा घराबाहेर पडणारच नाही असा तुमचा पक्का समज झाला आहे. अर्थात् यासाठी काही भूतकाळातील घटना कारणीभूत असतील. तुम्ही त्यातून गेले आहात. जात आहात. पण काही ॲक्शन तर घ्यावीच लागणार आहे ना? प्रसंगी थोडे कठोर व्हावेच लागेल. घराबाहेर त्याला जबरदस्ती घेऊन जावे लागेल. तो विरोध करेल, भांडण करेल, रस्त्यात तमाशा करेल. तुम्हाला हे खंबीर पणे हाताळायला हवं. पहिल्या काही वेळेला जमणार नाही पण नंतर जमेल. जमावावं लागेल. तो आक्रस्ताळेपणा करेल, तुम्हाला आवरणार नाही. तर मग असे वाटल्यास त्याला एकट्याने बाहेर नेऊ नका. तुमचे काही जिवाभावाचे मित्र, भाऊ वगैरे असतील तर त्यांची मदत घ्या. पण त्याला चार भिंतींच्या बाहेर काढा.
तुमचे मूळ गाव असेल किंवा शेती असेल तर तिथे त्याला न्या. एकंदरीत त्याचे रूटीन बदलायला हवे आहे.
मला वाटतंय प्रॉब्लेम मुला
मला वाटतंय प्रॉब्लेम मुला मध्ये नाही तर तुमच्या मध्ये आहे.सारखं मुलगा हे करत नाही ते करत नाही जरा कठोर होऊन त्याला दाखऊन द्या की who is the boss? मुलाला मित्र नसतील पण तुम्हाला असतील तर दोन तीन मित्रांना बोलावून जबरजस्तीने डॉक्टर कडे घेऊन जाता येत नाही का? पहिल्यापासून प्रतिसाद वाचले तर तुमच्या मुलाला remedial coching २०१७ साली जायला सुचवलं होत. २०२० पर्यातही तुम्ही गेला नव्हता कारण काय तर डॉक्टरांनी सुचवलेल्या वेळेत शक्य नव्हत. जगातलं कुठल असल ऑफिस आहे महिन्यातून दोन दिवस सुट्टी मिळत नाही. त्यात तुमची बायकोही सरकारी नोकर आहे तर एका वेळेस तुम्ही दुसऱ्या वेळेस त्या गेल्या असत्या. हे असच राहील तर २०५० सालीही तुमचा प्रश्न सुटणार नाही.
इंटरनेट, टीव्ही बंद ठेवणे हा
इंटरनेट, टीव्ही बंद ठेवणे हा प्राथमिक उपाय सोपा आणि सहज करता येण्यासारखा आहे. एक दिवस त्याचा उपयोग नाही झाला म्हणून हा उपाय बंद करू नये. राहू द्या इंटरनेट नी टीव्ही बंद काही दिवस किना एक दोन तासच मुलाला त्याचा access राहील असे करा.
काही शारीरिक आरोग्य समस्या असेल तर कसेही करून वैद्यकीय उपचार करणे जसे भाग आहे तसेच याही प्रश्नाच्या मागे लागून सातत्याने action घेणे आवश्यक आहे. तो जसा मोठा होत जाईल तसा प्रॉब्लेम आणखी complicated होईल
मुलगा घराबाहेर पडत नाही
मुलगा घराबाहेर पडत नाही यासाठी भूतकाळातील काही घटना असतीलही, पण तो आमच्याशी किंवा councillor कोणाशीही बोलायला तयार नाही मग कसं कळणार तो घराबाहेर का जात नाही. त्याला घराबाहेर न्यायला माझे मित्र किंवा नातेवाइक एक दोन दिवस येतील, रोज कोण येणार, councillor सांगतात तेंव्हा तो एक दोन दिवसच घराबाहेर जातॊ नंतर पुन्हा घरी बसून असतो.
Remedial coaching एका councillor कडे वेळे मुळे जाणं जमलं नाही पण दुसऱ्या councillor कडे Remedial coaching आणी Play Therapy करत होतो, ती पण त्याने २-३ महिन्यात ती session पण जाणं बंद केलं त्या session ला मि किंवा माझी मिसेस मुलाला घेउन जात होतो. ऑफिस मध्ये एक दोन दिवस सुट्टी मिळून हा प्रॉब्लेम solve होणार नाही असं मला वाटतं, आम्हाला पूर्ण वेळ त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे
मुलगा घराबाहेर पडत नाही
मुलगा घराबाहेर पडत नाही यासाठी भूतकाळातील काही घटना असतीलही, पण तो आमच्याशी किंवा councillor कोणाशीही बोलायला तयार नाही मग कसं कळणार तो घराबाहेर का जात नाही. त्याला घराबाहेर न्यायला माझे मित्र किंवा नातेवाइक एक दोन दिवस येतील, रोज कोण येणार, councillor सांगतात तेंव्हा तो एक दोन दिवसच घराबाहेर जातॊ नंतर पुन्हा घरी बसून असतो.
Remedial coaching एका councillor कडे वेळे मुळे जाणं जमलं नाही पण दुसऱ्या councillor कडे Remedial coaching आणी Play Therapy करत होतो, ती पण त्याने २-३ महिन्यात ती session पण जाणं बंद केलं त्या session ला मि किंवा माझी मिसेस मुलाला घेउन जात होतो. ऑफिस मध्ये एक दोन दिवस सुट्टी मिळून हा प्रॉब्लेम solve होणार नाही असं मला वाटतं, आम्हाला पूर्ण वेळ त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे
Pages