Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या निक्कीला बिबॉसने आणल
त्या निक्कीला बिबॉसने आणल प्रचंड कंटेंट द्यायला,जो ती बिचारी देतही आहे पण सोमिवर व्हिलन ठरत आहे.आता खरतर तिचा यात काहीच दोष नाही.पहिल्या एपिसोडपासूनच जर मराठी बिबॉसला कंटेंट साठी हिंदीतले लोक लागत असतील आणि त्याचा चालू सिझनमधल्या कंटेस्टंटवर विश्वासच नसेल तर मग यांची क्रीएटिव्ह टीम नक्की काय रिसर्च करते?
मग जस मागच्या सिझनमध्ये राखीला आणि सिझन 2मध्ये शिव वीणाला कंटाळल्यानंतर बिचुकल्यांना अधूनमधून आणि नंतर शिवानीला बिबॉसने आणल तसा पराग,आदिश वैद्य,अशा बाहेर गेलेल्या लोकांनाच आणायच.
त्या अरबाज आणि निक्कीला आणून पेअर जुळवली आहे,त्यांना मराठी प्रेक्षक 10आठवडे सहन करेल का,सारख त्या निक्कीच भांडण किती काळ मराठी प्रेक्ष सहन करेल,हे मेकर्सना अजून पर्यंत कळल नाही का
मराठी बिबॉस नर्सरीत असला तरी पहिल्या सिझन मध्ये श्रुंगारपुरे आणि रेशम आणि दुसर्या सिझन मध्ये शिव वीणाने बिबॉसला हवी असलेली जोडी दिली होतीच ना.ःतस तर सिझन 3मध्ये पण सोनाली आणि विशाल वरून अख्खी शनिवार ,रविवारची चावडी पेटली होती.
म्हणजे मराठी बिबॉस मध्ये मर्यादेत राहूनही या लोकांनी बिबॉसला भरपूर कंटेंट दिलाच होता .मग मराठी कंटेंस्टंट्सवर जर मराठी मेकर्सचाच विश्वास नसेल तर मग शो बंद होता तेच चांगल.
तःया हिंदीतल्यांना इथे आणायच,हिंदीसारख खेळायला लावायच ,कंटेंट घ्यायचा आणि बाहेरचा रस्ता दाखवायचा,याला काय अर्थ आहे.
आणि त्या निक्कीला तरी असा किती पैसा मिळणार आहे मराठीमधून.तो खतरों के खिलाडी होता की तिकडे जायच.
हे तरी कसे काय तयार झाले.
या वेळी तर चक्क पहिल्या आठवड्यात एलिमिनेशन आहे.तो सूरज किंवा पुरुषोत्तम बाहेर जातील.
त्या सूरजला बिचार्याला नॉमिनेशन पण नीट म्हणता येत नव्हत, गेम तर माहितच नाही,कुठला रिसर्च आहे हा टीमचा.
त्यांच ग्रुमिंग करतात अस ऐकल होत.हेच का ते ग्रुमिंग.
आता खरा कस रितेश भाऊंचा आहे.बघू काय करतात भाऊच्या धक्क्यावर.
निक्की त्या वर्षाला काळे मन,
निक्की त्या वर्षाला काळे मन, काळे मन करून एकच उगाळत बसतेय, तोच तोच पणा वाटतो भांडणात. अशाने सिपंथी पलीकडे जाईल की, आतून स्पर्धक म्हणून घाबरतेय का.
तिसरा सिझन फार आवडलेला मला.
तिसरा सिझन फार आवडलेला मला. कारण विकास, विशाल, मीनल आणि सोनाली हा गट फार छान जमला होता. विशेषकरून विकास खुपच भारी होता, त्याने केवळ बोल बोल बोलून स्ट्राँग ग्रुपला जेरीस आणले आणि ह्या चौघांच्या ग्रुपने सगळे विरोधी गँगचे लोक बाहेर काढले. हा डिपी विकाससारखा वाटतो थोडा. युएसमध्ये कसा पाहता बिगबॉस लोकहो?
मला मीनल जाम आवडायची तेव्हा.
मला मीनल जाम आवडायची तेव्हा.
बराच ड्रामा होता आज ग्रुप्स
बराच ड्रामा होता आज
ग्रुप्स पडलेले दिसत आहेत आता. निम्मं घर निक्कीच्या मागे मागे आहे. आणि निकी सिंगलहँडेडली सगळ्यांना कन्ट्रोल करते आहे. तिचे ते दोन बैल लोक ताकदीच्या जोरावर सगळी टास्क डॉमिनेट करणार असे दिसते. बाकीचे दिसतच नाहीयेत. अंकिता आणि वर्षा निदान निक्की शी फाइट करत होत्या. आर्या आणि सीरियल मधल्या मुली तिला सरळ घाबरलेल्या आहेत. त्यांना एक आपला आपला ग्रुप बनवायचा आहे आणि निक्कीचे अप्रूवल पण हवंय, त्यात पण आर्या डेस्परेट दिसते. ती बालिश आहे हे खरंच आहे पण तिला तसे म्हटले तर भोकाड पसरले.
सगळे एक जात भयाण मराठी बोलतात. ऐकवत नाही अगदी. त्या रमा माधव हिरो ला लिहून दिलेले ही धड वाचता येत नव्हते! निकष ला निषक म्हणत होता.
त्या गुलीगत ला काही म्हणजे काहीच सुधरत नाहीये. अजिबात काही न बघता आलेला आहे का?!!
>>गुलीगतचा अर्थ काय.
>>गुलीगतचा अर्थ काय.
गुलीगत म्हणजे गोळी गत म्हणजे गोळीसारखे!!
>>आज वर्षा कित्ती कृत्रिम बोलत होती.
आज?
>>सगळे एक जात भयाण मराठी बोलतात. ऐकवत नाही अगदी. त्या रमा माधव हिरो ला लिहून दिलेले ही धड वाचता येत नव्हते! निकष ला निषक म्हणत होता.
१००% खरय!! अगदी कसतरी होते यांचे धेडगुजरी मराठी ऐकताना!!
हो ते निषक मला पण ऐकल्यासारखे वाटले पण टीव्हीवर बघत होतो त्यामुळे परत मागे जाऊन कंफर्म करता आले नाही.
गुलीगत म्हणजे गोळी गत म्हणजे
गुलीगत म्हणजे गोळी गत म्हणजे गोळीसारखे!! >>> ओहह, थँक्स. गुलीगत धोका काहीतरी आहे ना ते म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखं का.
हे फार फेमस झालेलं म्हणे, मी कधी ऐकलंच नव्हतं.
मी बघणार नव्हते सिझन पण आता
मी बघणार नव्हते सिझन पण आता जिओ सिनेमा अॅप वर फॉलो करते आहे. त्यात जो लेटेस्ट एपिसोड अनलॉक झाला तो म्हणजे डिपि, सुरज एरिना ने भाजी घेतली, आणि निक्कि आणि वर्षाचा वाद. तोच एपिसोड काल म्हणजे ३१ ला दाखवला आहे का टिव्हिवर? मी किति एपिसोड मागे आहे ते समजावं म्हणून विचारते आहे.
मस्तं ड्रामा होता , निक्की
मस्तं ड्रामा होता , निक्की शिवाय हा सिझन झीरो आहे, पूर्ण कंट्रोल घेतलाय तिनी
ड्राम्यामधे निक्की आणि टास्क्स मधे अरबाझ यांना काही काँपिटिशनच नाहीये !
वर्षा उसगावकर आणि अन्किता चांगला स्टँड घेतायेत पण अंकिता उगीच रडते मधेच , योगीता मधेही पोटेन्शिअल आहे पण थोडी दबली आहे !
जान्हवी सुंदर आहे सर्वात पण एकदमच नागिण इमेज , व्हिलन, निक्कीची चमची !
पुरुषोत्तम चांगला पेटला होता आज, छोटा पुढारी पण एक नमुनाच आहे, भारी बडबड करतो !
बाकी मराठी म्हणजे इतके वाईट एकेकाचे, शब्दा शब्दाला भातात खडे .. वर्षा उसगावकर एकटी शुद्ध स्पष्ट बोलते.
अभिजीत सावन्त कसला लुझर आहे , सगळे निकीपुढे कापतात !
दक्षे तो एपिसोड 30 ला
दक्षे तो एपिसोड 30 ला दाखवलेला, काल 31 ला नॉमिनेशनस होती, बोअर होता कालचा एपिसोड.
निक्की वर्षा वाद रोजचा असेल मात्र. निक्की भांडत बसणार, ह्याच्याशी नाहीतर त्याच्याशी.
तुमच्या कोपुचा डी पी भारी मस्त आहे.
घ्या, सुरजला बिबॉने काडी
घ्या, सुरजला बिबॉने काडी टाकून पेटवलय, बघु राडा क्॑रतोय का
https://youtu.be/i8yXU1IItvQ?si=3EFkxmj6dqFucAYW
आज वर्षा कित्ती कृत्रिम बोलत
आज वर्षा कित्ती कृत्रिम बोलत होती.
आज? Wink >>> तशी ती रोजंच नाटकी बोलते पण किमान वाक्य तरी प्रमाण बोलीभाषे नुसार असतात....काल तर काय 'हा अन्याय आहे..आम्ही अन्याय सहन करणार नाही,आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारच ' अरे काय हे...ही bigg बॉस मध्ये आली आहे की एखाद्या मोर्चामध्ये...खरंतर इतकं नाव कमावल्यावर ते गमावण्यासाठी bigg boss मध्ये येणं हा स्वतःच स्वतःवर केलेला अन्याय आहे हे समजावावं कोणीतरी हिला...
सूरज प्रोमो बघितला मी, तो
सूरज प्रोमो बघितला मी, तो बरोबर बोलत होता, नॉमीनेट झालाय त्यामुळे जास्तच
निक्की स्वतः नियम तोडते ते चालतं का, एनिवे ती राखीची कॉपी करते असं वाटतं.
निक्कीला जे काम मेकर्सने
निक्कीला जे काम मेकर्सने नेमून दिल आहे ,ते ती बिचारी जीव तोडून करत आहे.पण मागच्या सिझनसारखे थंड गोळेच राहिले तर काही दिवसातच निक्की पण कंटाळेल आणि या शो मध्ये आल्याचा पश्चाताप करत बसेल.
एखाद दुसरा एपिसोड बघून काहीच झाल नाही ,तर बहुतेक बिबॉस त्याचा तो सिंहासन टास्क आणेल.
तिथेही निक्की आणी ते दोन पैलवान,फारफार तर योगिता सोडून सगळ्यांनी माती खाल्ली तर मात्र या सिझनच काही खर नाही.
बिबॉ "मराठी" असं नाव बदलुन...
बिबॉ "मराठी" असं नाव बदलुन... "मराठीचा खून" असं नाव द्या...
... मुद्दे पकडुन .. इथे नुसताच आरडाओरडा...
वर्षाउ रंगमंचावरचं मराठी बोलतेय ते पण आता बरं वाटतंय असलं मराठी अरबाझ, आर्या, निक्की बोलतायत... अरे काय भाषा, काय भाषा...
धनंजय चं कोल्हापुरी मराठी, अंकिता चं कोकणी मराठी हे सगळं कधी ऐकायला मिळणार ?
निक्की ला रोज भांडलीस तरच पैसे देउ असं सांगितलंय का ? अरबाझ काहीही अभ्यास न करता आलाय.. नाहितर निक्की त्याच्या ताकदीचा फायदा करुन घेतेय हे त्याला कधीच कळलं असतं...
अभिजीत सावंत, काहीही करत नाहिये... पिकनिक ला आलाय नुसता...
अंकिता कोकणी झटका दाखवेल असं वाटलेलं पण अजुनतरी तसं दिसत नाहिये... निक्की काल अडवत होती तेव्हा रडायचं काय ? उलट मस्त चान्स आलेला , कांगावा करायचा की कसा त्रास देते आहे ती...
कालचा एपिसोड पळवत पाहिला...
मराठी भाषा, कर्ता, कर्म, क्रियापद कसेही वापरल्यामुळे भांडणं बघायला पण मजा येत नाहिये..
आमचे मेघा, आस्ताद, पुष्कर, सई कसे भांडायचे
अंकिता कोकणी झटका दाखवेल असं
अंकिता कोकणी झटका दाखवेल असं वाटलेलं पण अजुनतरी तसं दिसत नाहिये...>> ती जास्त काही करू शकेल असं नाही वाटत...physical task मध्ये पण कमीच पडेल ती....
>>आमचे मेघा, आस्ताद, पुष्कर,
>>आमचे मेघा, आस्ताद, पुष्कर, सई कसे भांडायचे Wink ... मुद्दे पकडुन
ज्जे बात!!
त्या सीझनच्या लेव्हलला कुणालाच जायला जमलेले नाही अजुन
>>वर्षाउ रंगमंचावरचं मराठी बोलतेय
तिला कधी चित्रपट/नाटका व्यतिरिक्त इतर मुलाखतीत ऐकलय का कुणी? म्हणजे हा तिचा नॉर्मल टोन आहे का बिग बॉससाठी पकडलेले बेअरिंग आहे?
त्या सीझनच्या लेव्हलला
त्या सीझनच्या लेव्हलला कुणालाच जायला जमलेले नाही अजुन >> +१२३
हा वर्षा उ चा मुलाखत वगैरेसाठीचा टोन आहे.
नॉर्मल मुलाखत बोलणे ऐकताना पण विचित्र वाटते तिचे.
निक्की त्याच्या ताकदीचा फायदा
निक्की त्याच्या ताकदीचा फायदा करुन घेतेय >> त्याला ते माहित असेल पण तो ही उपयोग करून घेतोच आहे तिचा.
इतर त्याला नॉमिनेट करत आहेत म्हणून लोकांना पुळका येतो आहे बहुतेक. पण त्याला स्वतःला गेम सुधरेल तेव्हा खरं. बिबो ने ही त्याला आज उचकवलेले दिसते एक प्रोमोवरून.
दोन पैलवानांनी खरं तर ऑपोजिट ग्रुप्स मधे जायला पाहिजे.
गुलिगत ला बाहेर सपोर्ट मिळायला लागलाय असे दिसते
अरबाझ वाटला तितका डंब नाहीये.
अरबाझ वाटला तितका डंब नाहीये.
इतरांच्या तुलनेत मुलां मधे त्याला डोकं , रिअॅलिटी शो एक्सपिरीयन्स आणि ताकद तर आहेच, दिसायलाही हॅन्डसम आहे त्यामुळे त्याला सुपिरियॉरीटी कॉम्प्लेक्स आहेच !
निक्की तर काय बिगबॉस हिन्दी मधेही राडा केला होता, ग्रँड फिनालेच्या स्टेज वर सुद्धा सलमान खानचे बोलणी खात होती म्हणे, सल्लुच्या ओरडण्याने तिला कधी फरक पडला नाही तर रितेशला कुठून घाबरणार !
खतरोंके खिलाडी मधेही होती ती.
एकतर शो एक तासाचा केला आहे
एकतर शो एक तासाचा केला आहे आणि आजतर पाच मिनिट लवकरच संपवला.
त्यात सगळी भांडणच होती ,ती ही निरर्थक.
सुरु होतो आणि लगेच संपतो अस वाटत.
पहिल्या आठवड्यातच गचकला की काय टीआरपी मध्ये.
निक्कीला आणण्याचा जुगार नाही चालला ,तर नऊ आठवडे काय करणार आहे बिबॉस?
भांडणाने फुटेज मिळतं म्हणून
भांडणाने फुटेज मिळतं म्हणून आज आर्या उगाच भांडत होती.
इरिना तूप प्रेमी दिसतेय, दामले तुपाला लक्झरी आयटेम म्हणत होता. इरिना शाकाहारी असेल तर तूप द्यायला हवं तिला, बाकी लोकं अंडी वगैरे खाणार ना.
एनिवे आज नीट बघितलं नाही, अर्धा एपिसोड भांडणात गेला म्हणून कंटाळा आला.
पॅडी, पुढारी, डीपी हुशार वाटतायेत. योगीतालाही स्वतःची बुद्धी आहे असं वाटतंय पण ती आक्रमक नाहीये म्हणून दिसत नाही.
अरमान का अरबाझ काही गोष्टी चांगल्या सांगतो (हाच नाहीतर शेवटी शो जिंकायचा म्हणजे मेकर्स जिंकवायचे). कोकण गर्ल महाराष्ट्र जनता, संस्कृती उगाच काढतेय, तिच्यासह कोणी इतर संस्कृती जपायला आलं आहे असं वाटत नाही. कीर्तनकार आणि इरिना जपतील बहुतेक संस्कृती.
डीपी आपल्यासारखाच महाराष्ट्राचा लाडका दिसतोय, वोटिंग मध्ये पुढे आहे.
भांडणाने फुटेज मिळतं म्हणून
भांडणाने फुटेज मिळतं म्हणून आज आर्या उगाच भांडत होती.>> हो ना...ती कधीकधी वेगळीच वाटते...मुद्दाम दिसण्यासाठी भांडते...त्यामानाने आज अंकिता छान वाटली..उलट निक्की आणि अरबाझ तिच्या मागेपुढे करत होते...कालच्या game बद्दल निक्कीलाच वाईट वाटत होते...अंकिताने छान उत्तरं दिली तिला...योगिता दिसत नसली तरी ठाम वाटते....घनश्याम स्वतःला खूप हुशार समजतोय पण त्यालाही game अजिबात समजला नाहिये.. उगाच कुबड्या घेऊन चालतोय...खरी मजा चावडीवर येईल..सगळ्यांचे भ्रमाचे भोपळे फोडले पाहिजे रितेश देशमुखने.. BTW वर्षा आज without make up एकदम छान दिसत होती..make up फारच भडक करते ती...
एलिमिनेशन असेल तर किर्तनकार
एलिमिनेशन असेल तर किर्तनकार जातील असं वाटतंय. वारकरी संप्रदाय कितीही मोठा असला तरी बिग बॉस बघत असेल असं नाही, वोटींग करतील की नाही काय माहीती.
निक्की जर जास्तच निकनिकली तर
निक्की जर जास्तच निकनिकली तर जाईल बाहेर. मे बी हाच तिचा प्लॅन असेल (कंटाळल्यामुळे?)
निक्की कशी जाईल बाहेर ? ती
निक्की कशी जाईल बाहेर ? ती एकटी शो चालवतेय , मारामार्या नाही केल्या तर फिनाले मधे नक्की असणार.
आज आर्या उगीचच आली मधे पण त्या निमित्ताने कोणात तरी दम आहे निकी आणि तिच्या २ बैलांच्या लेव्हलला जाऊन पंगा घ्यायला हे दिसलं , दम है बन्दीमे
वर्षा उसगावकर निकीच्या लेव्हलला नाही जाऊ शकत .
गुलीगतने मज्जा आणु देत आता, बिबॉने कॉन्फिडन्स दिलाय !
निक्की दुसरी येईल, पाचात तरी
निक्की दुसरी येईल, पाचात तरी नक्की असेल.
कीर्तनकार सर्वात कमी votes, डी पी सर्वात जास्त. सूरज खूप खाली होता, आता एकदम दुसऱ्या नंबरवर गेला.
यावेळी तिघींच्या नावात शेवटी ता आहे. निकिता, अंकिता, योगिता.
सूरज ला सिंपथी वोट्स मिळत
सूरज ला सिंपथी वोट्स मिळत असतील, सोमि वर बर्याच पोस्ट दिसल्या. बघू काय करतो आता.
आर्यानेही असेच स्ट्राँग ग्रुप शी पंगा घेत राहिल्यास पब्लिक चा सपोर्ट मिळू शकतो. आधी वाटले वर्षा चांगली फाइट देईल पण तसे वाटत नाही आता. ती स्वत:साठी स्टँड घेते पण लीडरशिप आणि घरात इतर लोकांशी बाँडिंग वगैरे करण्याची वृत्ती नाहीये.
निक्की जात नाही बाहेर.....
निक्की जात नाही बाहेर..... लोकांना आवडो किंवा न आवडो तिच्यासारखे कंटेंट देणारे राहतात फिनालेपर्यंत.
फक्त मराठी बिग बॉसमध्ये यायची तिला का भिती वाटत होती याचे तिने जे कारण दिले काल ते लोकांना चांगलेच खटकू शकते.
आर्याने काल चुणूक दाखवली पण तिची लिडरशिप बाकीचा ग्रूप मान्य करेल का नाही यावर सगळे आहे.
तसाही अभिजीत, पॅडी, पुढारी, गुलिगत तिला फार हवा देणार नाहीत आणि निक्की आणि गॅंगशी उघडपणे पंगा घेणार नाहीत असे वाटते.
वर्षा उसगावकर स्वताच्याच तंद्रीत असतात.
आर्या, अंकिता, योगिता, डीपी असा ग्रूप होऊ शकतो पण शक्तीच्या टास्क मध्ये ते कायमच मार खाणार पण त्यामुळे सिंपथी घेऊ शकतात.... फक्त ते एकमेकांशी किती जुळवून घेतात यावर आहे सगळे.
व्हिलन गॅंग मात्र आता पुरेशी पक्की झालेली आहे.... पुढे कधीतरी वैभवचे त्यांच्याशी वाजू शकते पण अजुन काही आठवडे तरी तो त्यांना लटकूनच खेळेल.
आज काहीतरी मारामारी झाली असे दिसले प्रोमोमध्ये..... नक्की कुणी कुणाला मुस्काडले ते काही कळले नाही!! पण या केसमध्ये जो कुणी असेल तो बाहेर जायला पाहिजेल
बिग बॉस मात्र यावेळी सुधीर गाडगीळांकडे क्लास लाऊन आल्यासारखे वाटतायत.... किती ते प्रेमाने बोलत होते त्या सूरजशी.... अगदीच अनलाईक बिग बॉस!!
हाय फाय ललनांच्या नळावरच्या
हाय फाय ललनांच्या नळावरच्या भांडणाने सुरु झालेला एपिसोड, नळावरच्या भांडणानेच संपला.
निक्की फक्त वर्षाला टारगेट करते असं दिसतंय. वर्षा कधी कधी छान उत्तरं देते पण फार कृत्रिम वागते. किती वेळा माईक विसरते ते अति वाटलं. चुका मात्र बऱ्याच जणांनी केल्या त्यातल्या इरीनाला फक्त लगेच पश्चाताप झाला. निक्कीचे शब्द खटकणारे आहेत. चाटते वगैरे काय अतिच. जान्हवी आणि निक्की झोपताना मुद्दाम वर्षाला त्रास देत होत्या. दुसऱ्या दिवशी टॉयलेट रूममध्ये काहीजण बरोबर सुनावत होते जान्हवीला. याने फार काही होणार नाही वर्षाताईंना सहानुभूती मिळेल.
बिग बॉसला मागच्या सीझनपासून कोणीच घाबरत नाही. या बिग बॉसला तर गुंडाळून ठेवणार आहेत सगळे. बरेच जण पिकनिकलाच आलेत. सावंतला म्हणालेही bb तसं.
Pages