बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बऱ्याच होतं सिनेमात हे, सिरीयलमध्येही होतं.

त्या वर्षाने सासऱ्यांना त्रास दिला ते मीही वाचलेलं पण डिटेल्स नव्हते माहिती, अशावेळी नवरा काय करत होता, मूग गिळून गप्प होता का.

निक्कि पर्फेक्ट बिबॉ मटेरीअल आहे... पहिल्यच दिवसापासुन सुरु झाली....
निक्की, जान्हवी, वैभव, अरबाझ एकत्र येतील असे वाटते.. वर्षा बद्दल गॉसिप सुरु झालं सुद्धा.. योगिता अजुन तळ्यात मळ्यात.. कोणत्या गटात जाउ अशा विचारात
पॅडी, सुरज, पुरुषोत्तम, तो लहान पुढारी हे लोक एकत्र येतील असं वाटतंय.
कोल्हापुर चा तो माणुस मस्त पंचेस टाकतो आणि भाषा टोन भारीच... पण भोळा वाटतो... काल लगेच तयार झाला निर्णय न घेउ शकणार्‍या यादीत जायला... पक्के पणाचे वागला तर पुढे जाईल.
आर्या कुठेच दिसली नाही काल...
सुरज/ पुरुषोत्तम पहिल्यांदा जातील... सुरज ची स्टोरी ऐकवली काल.. सिंपथी साठी त्याला ठेवतील काही दिवस.. पण काही स्पार्क दिसला नाही त्यात.
वर्षा नक्कीच मिनिमम गॅरंटी वर आल्यात त्यामुळे बिंधास्त आहेत असे वाटले.बोलताना रंगमंचावर वावरत असल्यासारख्या बोलत आहेत

तो मटण खाणारा कोल्हापुरचा धनंजय पॉप्युलॅरीटी पोल्स नुसार नं १ वर आहे , नक्की काय रिल्स बनवतो तो ?
सध्या सोशल मिडिया इन्फ्लुअन्सर्स चा जमाना आहे , व्होट्स द्यायला त्यांचेच फॅन्स येतात, कलर्स फेसेस च्या फॅन्स पेक्षा !
मला कास्टिंग आवडली आहे , रितेशही स्मार्ट वाटला पण रितेश पासून मेजॉरीटी स्पर्धक भयानक मराठी बोलतात Uhoh
कोकण हार्टेड गर्ल , वर्षा उसगावकर, पॅडी हे लोक शुद्ध बोलतात .
वर्षा उसगावकरने पहिल्या सेकन्दापासून डॉमिनेटिंग व्हिलन पोझिशन पक्की केली !
निक्की ड्रामा क्वीन, कॅमेरा अटेन्शन स्वतःवर ठेवण्यात नं. १ आहे.
कोकण हार्टेड गर्ल, अभिजीत , पॅडी सेन्सिबल आणि थोडे इमेज कॉन्शस वाटले.
छोटा पुढारी बडबड करण्यात भारी स्मार्ट आहे .
सूरज चव्हाण जाम फनी आणि साधा , इतरांपेक्षा बिचारा निरागस आहे, ऑलरेडी पब्लिकला अपिल झालाय.
अरबाझ पटेल लव्हर बॉय +टास्क्स साठी आणला असावा , काँट्रोव्ह्॑र्शिअल आहे .
वैभव पण बॉडी बिल्डरच .
आत्ता गेम सुरु होतोय, अंदाज येईल लवकरच !

यांनी आपापले ग्रुप्स नाही पाडले तर मग बहुप्रतिक्षित सिंहासन टास्क बिबॉस लगेच आणेल.तेव्हा कळेलच प्रत्येकाची कुवत.
उसगावकर बाईंना खेळायला लावेल का बिबॉस हा टास्क,की तिथेही नाटकी अभिनयच करणार आहेत काय माहित.
सूरच,कीर्तनकार लवकर जातील.
निक्कीला पहिल्या पाचात खरतर न्यायला नको,कारत आताआताच हिंदी करून टॉप 3 मध्ये आलेली होती.मराठी बिबॉस तिच्यासाठी नर्सरीच असेल.
दामले बाबांच काही कळत नाही.
योगिता,आर्या जातील पुढे.
मागच्या वेळेसारख सोमि वोटिंग फॉलो नाही केल तर मग कोणी कधीही जाऊ शकत,कारण तेव्हा बिबॉसच काढतो.म्हणजे थोडक्यात चँनेल आणि मेकर्सच काढतात.

ओह्ह.. निक्की तांबोळी हिंदी बिबॉ १४ ची सेकंड रनर अप होती असं आत्ताच वाचलं..
हे म्हणजे १० वी बोर्डाच्या परीक्षेत मेरीट मधे आलेल्या विद्यार्थ्याला परत ८ वी च्या वर्गात पाठवण्यासारखं आहे...
हिंदी बिबॉ मराठी च्या फार पुढे आहे.. इतक्या तयारीने ती आली असेल तर टॉप ५ मधे असणारच ना...

पूर्वीच्या बिबॉ मधे बहुतेक सगळे अ‍ॅक्टर्स असायचे. आता नव्या फॉर्मॅट मधे यूट्यूबर्स , इन्फ्लुएन्सर्स चा जमाना आहे. त्यामुळे इतके सरळ अंदाज करता येणार नाहीत एलिमिनेशन चे. तो गुलिगत सूरज, धनंजय पवार वगैरें आपल्याला कसेही वाटले तरी या मंडळींच्या फॅन बेस वर बरेच अवलंबून असेल कोण किती टिकणार ते.
बाकी वर्षा उसगावकर ने चांगली सुरुवात केलेली आहे असे दिसते. म्हणजे पॉझिटिव वगैरे नाही अर्थात पण फोकस स्वतःवर ठेवते आहे. निक्की तर अनुभवी प्लेयर आहे. तिच्या भात्यात अनेक बाण असणार Happy तो अरबाझ उघडच फ्लर्ट करत होता तिच्याशी.
काल ३ लोकांना निवडायला सांगितले तेव्हाच मला वाटले होते की ह्यांच्यावरच उलटवणार बिबॉ. आजच्या प्रोमो मधे तसेच दिसते आहे. त्याच ३ लोकांना घरच्या ग्रोसरीज बद्दल निर्णय घ्यायला दिलेत Happy

यावेळचे बिग बॉस फारच कॅज्युअल दिसतायत..... आधी लोक चिडीचूप असायचे बिग बॉस बोलताना पण यंदा लोक त्यांचीच खेचतायत असे दिसतेय Wink
काल वर्षा उसगावकरच्या कुठल्यातरी अनपेक्षित (आता नक्की कुठला ते आठवत नाहिये) डायलॉगवर जरा गांगरल्यासारखे पण वाटले बिग बॉस!!
डीपीला त्याच्या फॅन फॉलोइंगचा चांगलाच अंदाज असावा.... म्हणून रिस्क घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला काल त्याने Wink तसेही पहिल्या आठवड्यात सहसा इलिमिनेट करत नाहीत कुणाला.
कालचा एपिसोड काही रंगला नाही सुरु झाल्या झाल्या संपल्यासारखा वाटला!!
आता आज घरासाठीचे बजेट वापरायचे असेल त्या तिघांना तर मजा आहे..... बघू ते काय करतात ते Happy

वर्षा उसगावकरने सॉलिड होल्ड घेतलाय शो चा, ऑलरेडी एका गृपची लिडर बनली आहे, डॉमिनेटिंग आहे आणि ‘झुकेगा नै साला ‘ मोड मधे आहे !
दुसर्‍या गृपचा लिड निक्की घेणार, मजा येतेय पहिल्याच दिवसापासून !
बाकी मराठी बिबॉचा या आधीचा आवाज आणि आत्ताचा आवाज दोन्ही बेकार आणि कृत्रिम !
हिन्दी बीबीच्या आवाजा सारखा दरार नाही !
रितेशची सुद्धा पब्लिकला कितपत भीती वाटेल शंकाच आहे, वर्षा उसगावकर सारखी बाई बीबीला ओरडते तर त्यालाही ओरडेल, म्हंटलीच कि त्याने स्टेजवर मिसागाइड केले Biggrin

>>थोडे दिवसांनी कोणीतरी त्यांना उलट सुलट बोलेल आणि मग त्या वयाचा मान.. सिनियोरीटी.. फिल्म इंडस्ट्री मधला मान वगैरे टेप लावतील
थोडे दिवसांनी कशाला? आजच झाले उलट सुलट बोलून पण आता सगळे अभ्यास करुन आल्यासारखे भांडतात, रडतात आणि फुटेज घेतात..... त्या मुद्द्यात काहीच दम नव्हता!!
बिग बॉसला पति वगैरे म्हणणे वगैरे करुन झालय राखीचे..... काहितरी नवीन आणा राव!!
एडिटींगपण कुठेतरी गंडल्यासारखे वाटतेय.
त्यातल्या त्यात डीपीचे पंचेस मजा आणतायत Happy

आजच भांडण म्हणजे,अरे पहिल्या दिवशी नाही भांडलात ,आता तरी भांडा टाईपची होत.कंटाळा आला बघून.टास्क सुरु करा आता लवकर.नॉमिनेशन ड्रिमा कशाला,पहिल्या वीकमध्ये कोणाला काढत नाहीत हे आता सगळ्यांना माहित आहे.
तरी निक्की आणि उसगावकरला भांडणासाठी प्लँटफॉर्म देत आहेत.आता पुरुषांमध्ये जोपर्यत भांडण होत नाहीत तोपर्यंत निक्की /उसगावकर बघाव लागणार.

अरे 'आपला मराठी बिगबॉस' ट्युन नाही का यंदा? काल येता जाता बघितलं तर ऐकू आलेली आठवत नाही.

मी विसरले होते बघायचं पण लगेच दहाला रिपीट करतात हे एक बरं आहे मग लावलं.

वर्षा किती वेळ मेकअप करत बसली, अति वाटलं ते. नंतर निक्की आणि तिच्या भांडणात मात्र तिने माफी मागून निक्कीने जास्त ताणलं असं वाटलं.

मला तो डी पी बरा वाटतोय, काही बघितलं नाहीये त्याचं.

योगिता तशी कमी बोलतेय. इरिना एकादशी उपास करते म्हणजे इस्कॉनशी संबंधित आहे का, बरेच फॉरेनर इस्कॉनवाले असतात म्हणून सहज मनात आलं.

बिग बॉस रत्नाकर तारदाळकर छान वाटायचे, दूरदर्शन पासून ओळखीचा आवाज होता त्यामुळे आवडायचा. नवीन नाही भिडत तेवढा. डिजे म्हणते तसं हिंदी बिग बॉस आवाज, दरारा मात्र सॉलिड, ती मराठीत कोणालाच जमत नाहीये.

"आपला मराठी बिग बॉस" ट्यून नाही दिसत आहे यावेळी. सिंपल पण छान होती ती. मला ते "ओ भाऊ जरा चावडी वर या" गाणं पण फार आवडायचं!

हो! ती ट्युन मस्त होती.
चावडीवर गाणं पण छान होतं.
फारिनची पाटलीण कशाला आहे ती? आणि ती एकादशी करते! Lol

Lol

हो ती सांगत होती.

ती ट्यून छान होती आणि चावडीवर या ही छान होतं.

या season मध्ये सगळे कित्ती english बोलत आहेत...आणि मराठी बोलले तर ते पण अतिशय अशुद्ध बोलतात...खूपच खटकतंय ते..

निक्की वर्षा उसगावकर फुल्टु ड्रामा, आल्या आल्याच वेळ वाया न घालवता सुरु निक्की, बिबॉचे पैसे वसुल Biggrin
वर्षा उसगावकर काही कमी नाहीये तिला उत्तरं द्यायला, पुरून उरली !
बाकी ती रॅपर अनॉयिंग आहे, राखीची कॉपी करतेय , बिबॉची बायको वगैरे बोरींग !
इरीना क्युट वाटली .
उद्याचा प्रोमो , निक्की आणि अंकिता मारामारी , भरभरके कन्टेन्ट, मज्जा आहे हा सिझन Rofl
https://youtu.be/Md3heXwOCvo?si=_bF1Tx-H0_wmscAd
https://youtu.be/Md3heXwOCvo?si=vsXuFAOY109S9gVf

काल निक्की वर्षा भांडणात भरपूर मटेरियल बिग बॉसला मिळाल्याची खात्री झाल्यावर, काहीजण त्यांना शांत करायला उठले, मला जाम हसू आलं.

वर्षा उसगावकर काही कमी नाहीये तिला उत्तरं द्यायला, पुरून उरली !>>> हो उसगावकर तशी आवडली नाहिये पण तिने डोकं थंड ठेवून जी निक्कीला उत्तरं दिली...ते भारी आवडलं....थोडक्यात sensible लोकं verses निक्की, जान्हवी, अरबाज असे group होतील बहुतेक...ती निक्की सगळ्यांना सळो की पळो करून सोडणार...पण मराठी audience ला असे लोक आवडत नाहीत...makers च्या कृपेने राहिली तर राहील ती ..

मेकअप करुन वेळ लावायचा स्टंट वर्षाउ ने मुद्दाम केलेला कळत होतं पण काल चुकुन बेड वर बसली होती बहुतेक.
त्यामुळे बिबॉ शिक्षा करत असताना सॉरी म्हणाली होती ती लगेच...निक्की ने भांडण उकरुन काढलं आणि तंगड्या वर करुन बसला होतात वगैरे म्हणाली ते मराठी प्रेक्षकाला कितपत आवडेल शंका आहे.
वर्षाउ चा लेमन टी मी करुन देणार नाही असं सांगताना पण निक्की ला किडे करुन भांडण काढायचं होतं पन तेव्हा सुद्धा वर्षाउ ने शांतपणे रीप्लाय दिला.
वर्षाउ चं एक बरं आहे की ती स्वत: चं बेअरींग न सोडता शांतपणे भांडते आहे... नळावरच्या भांडणाचा टोन नाहिये अजुनतरी. .. अशीच राहिली तर पब्लिक ला आवडायला लागेल.
आर्या चं काय काल मधेच.. बिबॉ माझे मानलेले "नवरे" आहेत म्हणे...हे कुठलं मराठी ? आणी हे राखी ताईंनी आधी केलेलं आहे.. येडपट आहे.. कॉपी पेस्ट कशाला ? रॅप वगैरे कर ना तिथे बसुन.. जास्त हिट होईल...
पॅडी, अंकीता, अभिजीत सावंत, कीर्तनकार, वैभव दिसतच नाहियेत कुठे.
अरबाज निक्की च्या मागे जाउन नुकसान करुन घेइल असं दिसतय.
काल एकंदर काहीच मजा येत नव्हती म्हणुन भांडणाची फोडणी दिली.. बाकी सगळा एपिसोड सपक...

कोणाच्या नैसर्गिक वैगुण्यावर वर बोलू नये पण हे कृत्रिम रित्या करून घेतलंय म्हणून लिहिते.. निक्की ने लिपजॉब केलाय ते अतिशय घाण दिसतेय.

प्लस, बोलताना सुद्धा बहुतेक या लिप जॉब मुळे काहीतरी प्रॉब्लेम होतोय. उच्चार खूप वेगळे येत आहेत आणि सारखी पच् करून थुंकी गिळावी लागतेय असे काहीतरी.

निकी राखी सावंत छाप वाटते आहे. ती दोन्ही भांडणं उगीच फुटेज साठी तिने उकरून काढली होती, नॉर्मल भांडणात असे कुणी लगेच अक्कल काढणे, तंगडया वर करून बसला होतात वगैरे बोलत नाही. वर्षाने तिला छान हँडल केले.
आर्या आणि तिचे ते "बिबॉ माझे नवरे आहेत" वगैरे महा बोअर वाटले. योगिता आणि ती मिळून इरिनाला बाजूला घेऊन चला आपण अलायन्स तयार करू अशा प्रकारचे बोलत होत्या ते फार पुस्तकी आणि कृत्रिम वाटले. तो पुढारी निकीला वैनी, वाघीण वगैरे म्हणत होता आणि अरबाज ला दादा दादा करत होता. पवार भाऊ बरे वाटले काल. प्रेझेन्स जाणवतो आहे.
बाकी सगळी मंडळी मिसिंग आहेत .

निक्कीला बहुतेक आणलच आहे दुसर्‍यांना हिरो बनवायला , प्रोमो मधे निकी सगळ्यांशीच भांडतेय, आर्याशीही , अरबाझ आणि वैभव हे दोघे तर निकीचे बाउन्सर्स वाटतायेत , डंब बॉडी बिल्डर्स !
मुलां मधे धनंजय पवार सोडून कोणात स्वतःची पर्सनॅ;इटी दिसली नाहीये .

डीपीने आजपण मज्जा आणली Wink ते उलटे पकडलेयस म्हणाला त्या छोट्या पुढाऱ्याला!!
त्याचे वनलायनर्स भारी असतात Wink

बिग बॉसनी खेळ चालू केला आहे..... हळूहळू ग्रूप पडायला लागले आहेत !
व्हिलन ग्रूप स्ट्रॉंग आणि बाकीचे व्हिक्टिम असे चित्र नेहमीप्रमाणे रंगायला लागले आहे!! पण व्हिक्टिम ग्रूपमध्ये कुणीच विनिंग मटेरिअल अजुनतरी वाटत नाहिये!!

नॉमिनेशन एपिसोड बोअर वाटला. गुलीगत किंवा कीर्तनकार जाण्याचे चान्सेस जास्त आहेत.

Btw गुलीगतचा अर्थ काय.

निक्की आणि जान्हवी सतत भांडण mode मधेच असतात. आर्या बोअर करते.

मला सध्यातरी तो डी पी आवडतोय. आल्यापासून आवडलाय, मी लिहिलं आधीही.

इतक्या लवकर voting करेन की नाही माहिती नाही पण केलंच तर डी पी आणि योगितासाठी करेन.

खरं तर bb ने पहिल्या आठवड्यात कोणालाच काढू नये असं मला नेहेमी वाटतं, अंदाज येत नाही आणि दुसरं, बिचाऱ्या स्पर्धकांना निदान दोन आठवडे तरी पैसे मिळूदेत Lol

आज वर्षा कित्ती कृत्रिम बोलत होती...डायलॉग बोलल्यासारखं वाटत होतं अगदी...त्या निक्की आणि अरबाजची मराठी अज्जिबातच ऐकवत नाही हो (अय्या...मी पण वर्षा सारखी बोलायला लागली...बाई....)jokes apart काय ती मराठी, "मी याची बात करते "म्हणे....आणि अरबाज निक्कीबद्दल बोलताना तिलाऐवजी त्याला म्हणत होता...देवा...यांना एक task पूर्ण मराठी बोलण्याचाच द्यावा...बाकी आज nominate झालेल्या सगळ्यांसाठीच वाईट वाटले...या week मध्ये elimination नसावं... totally bulling
चालू होती आज...voting lines सुरू आहेत...म्हणजे elimination राहील का?

Pages