दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आयडिया आहे वारकरी ड्रेस, अमेरिकेत पण ट्रॅडिशनल इव्हेंट्स होत असतातच, त्यांना उपयोगी पडेल.(ही मैत्रिणीची जाहिरात वगैरे नाही,सहज पाहण्यात आलं, आठवलं म्हणून.) फेसबुकवर साराज क्राफ्ट म्हणून पेज आहे, मायबोलीवरही आहे.तिचे क्रोशाकाम सफाईदार असते आणि आता वारकरी ड्रेसवर लावयाचे ब्रूच विकते, टिळयाच्या डिझाईन चे, तेही घेऊन पाठवता येतील ड्रेस बरोबर)

इथे आळंदीत मोरपीस,टिळा, विठ्ठल असं नाव लिहिलेलं कापड मिळतं ते घेऊन हवं तसं शिवून घेता येतं, designer वारकरी dress. शिवाय readymade सुद्धा मिळतात.
माझ्यासाठी ४०० मीटर अंतर आहे फक्त.
.
छान idea अनु. ब्रुच आपणही ढापू शकतो साडी किंवा कुर्तीवर लावायला

याला म्हणतात खरी बहीण.
अजून भावाला ब्रूच दिले नाही त्याआधी ढापण्याचे प्लॅनिंग सुरू !!
किल्ली Light 1

अरे हो, किल्ली आळंदीत राहते.विसरलेच होते.हे म्हणजे तामिळनाडू मध्ये राहणाऱ्या माणसाने लखनौ मध्ये राहणाऱ्या माणसाला 'अमुक तमुक ऑनलाइन शॉप मध्ये लखनवी ड्रेस चांगले मिळतात' सांगण्यासारखं झालं माझं Lol

Lol
पियू Proud
तेवढी एकच गोष्ट जवळ आहे आम्हाला
बाकी मॉल बिल काही नाही.
तसं आता ऑनलाईन चा जमाना असल्यामुळे अडत नाही फार

अनु तिचे सर्वच क्राफ्ट एकसे एक आहेत, ती पूर्वी होती इथे, मला आयडी तिचा आठवत नाहीये, मी बरेच कानातले घेतले तिच्याकडून, गिफ्ट्स दिले नातेवाईकांना, माझ्यासाठीही घेतले, त्याचे फोटो टाकलेले दागिने का काही bb होताना तिथे.

किल्ली आळंदीला रहाते, मस्त. मला नव्हतं माहिती. इथली देवश्री म्हणजे गौरी अनासपुरे आळंदीची, आता जर्मनीत असते, तीही येत नाही इथे.

माझ्या भावाची मुंज आळंदीत केलेली, तेव्हा अनेक वर्षांपूर्वी मी गेलेले तिथे, तिसरीत होते.

@मुनमुन>>>व्हायलिनसाठी
सिंहगड रोडला स्वप्ना दातार शिकवतात. त्यांचे युट्युब चॅनल.
www.youtube.com/@swapnadatar

मॉडेल कॉलनी शिवाजीनगर इथे श्रीकांत सोमण शिकवतात.
https://madovermusic.in/courses/violin/

माझी मैत्रिण बाणेरमध्ये शिकते. ती गंधर्व विद्यालयाच्या परीक्षा देते आहे. चालणार असेल तर तिला तिच्या क्लासच्या डिटेल्स विचारेन.

पावसाळ्यात चष्म्याच्या काचांवर पाणी जमा झाल्याने गाडी चालवताना (टू व्हीलर) भयंकर त्रास होतो आणि बरेच वेळा दिसेनासे होते.

यावर काही उपाय आहे का? माझ्या आठवणीप्रमाणे मी दर वर्षी कुठे ना कुठे कोणाला ना कोणाला यावर उपाय मागतेच आहे. जीव मुठीत घेऊन गाडी चालवण्याचा कंटाळा आला आहे. पण लेन्स ची सवय नाहीये.

तो टाटा ब्रँडचा एक महाग चष्मा आहे त्याच्या काचांवर नाही राहत का पाणी?

काहीच उपाय नसेल तर या वर्षीपासून लेन्स वर शिफ्ट व्हावे का? :दुःखी भावली:

Helmet लावायचं. >> Biggrin
हेल्मेट न वापरायच्या, पुणेकरांच्या जाज्वल्य अभिमानाला चारीमुंड्या चीत केलं किल्लीताईनी. एकदम झकास.

मी विना हेल्मेट जात नाही दुचाकी घेऊन कधीच. पुणेकर असले तरी.
हेल्मेट च्या कचेवरच पाणी हाताने पुसता येत.

पुणेकर असूनही विना हेल्मेट जात नाही? म्हणजे नक्कीच बाटलेली पुणेकर असणार, मूळची खरीखुरी पुणेकर नाही.

ओ मी हेल्मेट वापरते. अगदी १० मिनिटाच्या अंतरासाठी सुद्धा हेल्मेट घालतेच.

पण त्याच्या फटीतून पाणी आत येऊन चष्म्यावर ओघळते.

Water Repellent Coating / Glass काय असतं?

आणि हेल्मेटच्या काचेवर सुद्धा पाणी नको पडायला तर मग...... हा उपाय आहेच >> हे ट्रॅफिक मध्ये टिकेल का? फारसं कोणी वापरताना दिसत नाही.

इतक्या भयाण पावसाच्या दिवसात शक्यतो रिक्शा बस वगैरे ने प्रवास बरा पडेल पियु. २ व्हीलर ना यकःचित मानणार्या ट्रकवाल्यांची भिती वाटते.
anti dust anti uv पा>>> ते युसलेस असतं काचांसाठी काय काय लेबलं लाऊन पैसे ऐठतात, पण नसतो उपयोग. ते मायोपिया कंट्रोल तर अगदीच भंपक, लगेच पुढ्च्या २ महिन्यात नंबर वाढतो.

फारसं कोणी वापरताना दिसत नाही.>> जी स्त्री पुरुष मंडळी स्कुटी आणि तत्सम दुचाकी ३० पेक्षा कमी स्पीड मध्ये चालवतात ते आवर्जून लावतात (मुंबई ठाणे मध्ये तरी) आणि त्याचा उपयोग अतिशय छान होतो
धूम ४ खेळणाऱ्या लोकांसाठी अर्थातच त्याचा काही उपयोग नसतो

पावसाळ्यात चष्म्याच्या काचांवर पाणी जमा झाल्याने गाडी चालवताना (टू व्हीलर) भयंकर त्रास होतो आणि बरेच वेळा दिसेनासे होते.
यावर काही उपाय आहे का?
मग हा उपाय करून पहा!!! Proud
https://www.youtube.com/watch?v=Efwg1Mz8LH0

Hahahaha. हे बनवून पण बघितलं असतं पण मला वाटत नाहीये की त्याने काच नीट साफ होतेय. त्याने काचांवर पाणी ठेवून वाईप करून दाखवले तेव्हा बघा.

मी ट्राय केले तर इकडे फोटो / व्हिडिओ नक्की टाकेन.

पण मला वाटत नाहीये की त्याने काच नीट साफ होतेय. त्याने काचांवर पाणी ठेवून वाईप करून दाखवले तेव्हा बघा....
ते होणार पण नाही, कारण त्याने स्पंज वापरला आहे. त्या स्पंजची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपली (म्हणजे तो पूर्ण ओला झाला) की काहीच काम होणार नाही. तो खरे पाहता 'वायपर' नाही तर 'absorber' झाला आहे! तुम्हाला बनवायचे असेल तर जसे गाडीच्या वायपरला रबरी पट्टी असते तशी वापरून पहा!

आणि दुसरे म्हणजे त्याचा चेहराच मुळी थोडा funny असल्याने त्याला हा प्रकार विचित्र दिसत नाही. पण माझ्यासारख्या गंभीर चेहऱ्याच्या मुलाने असले काही प्रकार केले तर ते खूप विचित्र दिसेल!!!

व्हिडीओमधले Thinking outside the box आवडले. प्रॉडक्ट प्रोटोटाईपपण छान बनवले आहे.

मूळ प्रश्नाचे अजून एक उत्तर. Lasik surgery करून डोळ्याचा नंबर कायमचा जाऊ शकतो.

Pages