Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेम नावाचा ब्रँड चांगला आहे >
हेम नावाचा ब्रँड चांगला आहे >>> टोटली. याचा प्रिमियम चंदन आणि गुलाब उत्तम आहेत. फार धूर होत नाही आणि मंद दरवळ आहे. प्रिमियम चंदन माझा ऑटाफे आहे.
आम्ही धुपटण्याला परीघ साईड ने
आम्ही धुपटण्याला परीघ साईड ने थोडी बारीक भोके पाडलेली त्यामुळे हवा खेळती राहून कोळसा/ शेणी आणि त्यावर धूप बराच वेळ न विझता मंद मंद घरभर पसरत राहायचा. खिडकीच्या कठड्यावर ठेवून दिले की आत येणाऱ्या हवेसोबत छान काम व्हायचं.

Hi try reed diffuser apple
Hi try reed diffuser apple cinnamon perfume available on Amazon
किती भारी भारी उपाय आहेत!
किती भारी भारी उपाय आहेत!
इलेक्ट्रिक धूपदाणी आहेच, शोधून काढली पाहिजे
हेम वापरून बघते.
खूप वर्षांपूर्वी मराठी मधे एक
खूप वर्षांपूर्वी मराठी मधे एक पुस्तक वाचलं होत ज्यामधे लेखक हा फ्रान्स मधे ग्रानोबल ह्या गावी जाऊन तिथल्या एका परिवारासोबत राहतो, ह्या पुस्तकाचं नाव आणि लेखक कुणाला माहिती असेल तर सांगा.
मला आधी व्यकंटेश माडगूळकर किंवा ग दी माडगूळकर ह्यांचं आहे अस वाटत होत पण पुस्तकाचं नाव आणि लेखक दोन्हीही नीट आठवत नाहीये .
आपल्या आरोग्यासाठी मसाला
आपल्या आरोग्यासाठी मसाला अगरबत्ती चांगली की साधी ?
व्यकंटेश माडगूळकरच असतील ते.
व्यकंटेश माडगूळकरच असतील ते. त्यांचं फ्रान्स मधल्या वास्तव्यावरचं लिखाण वाचलंय मी. त्यांची रेखाटने सुद्धा आहेत त्यात बहुतेक.
२ वगैरे वर्षांसाठी फर्निचर
२ वगैरे वर्षांसाठी फर्निचर स्टोअरेज मध्ये ठेवणे कितपत सेफ असते ?
अग्रवाल पॅकर्स वगैरे ह्या सुविधा देतात.
इथे कोणी युएस ईमिग्रेशन लॉयर
इथे कोणी युएस ईमिग्रेशन लॉयर किंवा जाणकार आहेत का? मला एक मदत हवी आहे!
वाण सामानात चुकून जाडे मीठ
वाण सामानात चुकून जाडे मीठ आणले गेले आहे.
त्याचे काय फायदे तोटे असतात? चवीत फरक पडतो का?
Less refined असतं म्हणून
Less refined असतं म्हणून चांगलं असतं असं म्हणतात. चवीला जरा जास्त खारट असतं असा माझा अनुभव. किंवा मोठ्या खड्यांमुळे अंदाज न आल्याने जास्त टाकलं जातं. पटकन विरघळत नाही. माझी सासू ते मिक्सर मधून बारीक करून वापरते.
खाण्यापलिकडे थोडा फार मुका मार लागल्यास किंवा सूज आल्यास गरम करून एका पुरचुंडीत बांधून शेक घेतल्यास आराम मिळतो.
Less refined असतं म्हणून
.
बारीक करून जेवणात वापरता येईल
बारीक करून जेवणात वापरता येईल.
ते वाटून बेकिंगसाठी कढईत वापरता येईल का?
नवीन कापड/ड्रेस/कुर्ता, रंग
नवीन कापड/ड्रेस/कुर्ता, रंग जाणार असे वाटत असतील तर पहिल्यांदा नॉर्मली धुण्याआधी जाड मीठाच्या पाण्यात दहा मिनटं बुडवून ठेवावा.. पिळून सुकवावा..रंग जात नाही..मी करते असं..खास त्यासाठी जाड मीठ आणून ठेवते...
)
(आणि द्रुष्ट काढायला उपयोगी
चवीत नाही पण अंदाजात फरक पडतो
चवीत नाही पण अंदाजात फरक पडतो.
नेहमीच्या अंदाजाने न घेता आधी थोडे घालुन चव बघुन पुढे ठरवा.
ते वाटून बेकिंगसाठी कढईत >>
ते वाटून बेकिंगसाठी कढईत >> बेक्ड मिठाची रेसिपी होऊन जाऊ दे इथे.
नवीन कापड/ड्रेस/कुर्ता, रंग
नवीन कापड/ड्रेस/कुर्ता, रंग जाणार असे वाटत असतील....
माझे एक निरीक्षण:
मुलांच्या/ पुरुषांच्या कपड्याचे रंग जात नाहीत, अगदी ते साधे D-MART मधून घेतलेले 99 रुपयांचे t-shirt असले तरीही!
पण हेच मुलींच्या/ बायकांच्या कपड्यांचा मात्र भरपूर रंग जातो, जणूकाही पाण्यात नीळ/ उजाला घातले आहे असे वाटावे इतपत! आणि कपडे अगदी branded (Pantaloons) असले तरी!!!
असे का???
थँक्यू लोकहो!
थँक्यू लोकहो!

हो, जाडे मीठ कमी रिफाइंड आणि आयोडीन नसलेले असावे.
ज्याप्रकारे वापरून बघेन. विशेषत: रंगीत कपडे धुण्याची आयडिया मस्त.
एम्प्लॉइ चा Mediclaim असतो
एम्प्लॉइ चा Mediclaim असतो त्याप्रमाणे वार्षिक हफ्ता न भरता मंथली हफ्ता भरायची सोय कोणतीही पॉलिसी किंवा Mediclaim कंपनी देते का??
चवीत फरक पडतो का?...... मला
चवीत फरक पडतो का?...... मला तरी चवीत फरक वाटला.मिरचीचा ठेचा,जाडे मीठ घातल्यावर जास्त छान लागतो.एकदा मात्र अंदाज साफ चुकला.ठेचा खूप खारट झाला होता.
>>इथे कोणी युएस ईमिग्रेशन
>>इथे कोणी युएस ईमिग्रेशन लॉयर किंवा जाणकार आहेत का? मला एक मदत हवी आहे!>>
पुंबा, नवा धागा काढून लिहा. लोकं माहिती देतील किंवा लॉयर सुचवतील.
Cloud server/workstation
Cloud server/workstation/desktop साठी कुणी AWS (Amazon)EC2 किंवा Microsoft Assure वापरत आहात का?
मला एक virtual windows server आणि एक virual desktop घ्यायचे आहे. Azzure ला सुरवातीचे प्राइसेस कमी दाखवल्या पण मग शेवटी धक्का दिला की यात storage space नाही, ती इथे बघा. तिथे पाहिले वेगवेगळे SSD, Bursting, HDD option आणि त्यांचा भाडे, + transactions charges + Per mount, per month charchecho, snapshot charged असे मारुतीच्या शेपटी सारखे लांबणारे वाटले.
मध्येच आपणच सर्व्हर आणि लायसन्स विकत घेऊन colocation service घ्यावी का विचार ही चाललाय.
Deployment ला वेळ आहे अजुन दोन आठवडे तरी.
कुणाला अनुभव असल्यास सांगा.
मानव, आजकाल डिप्लॉयमेंटसाठी
मानव, आजकाल डिप्लॉयमेंटसाठी बहुतेक कंपन्या (छोट्या वा मोठ्या) क्लाऊड सर्विसेसच वापरतात. प्रोव्हायडर कोणता घ्यावा यासाठी मात्र अझ्युर आणि ऍमेझॉन यामध्ये त्या त्या वेळी त्यांचे रेट्स आणि' ऑफर्स पाहून ठरवावे लागते. त्याला पर्याय नाही. हल्ली मायक्रोसॉफ्टचे प्रोडक्टस त्यांच्या स्लो स्पीड आणि बकवास युजर एकस्पिरीयंस मुळे डोक्यात जाऊ लागलेत, त्यामुळे थोडे जास्त पैसे गेले तरी चालतील असा विचार करून माझा व्यक्तिगत प्रेफरन्स गुगल क्लाऊड किंवा ऍमेझॉन ला असेल. पैकी गुगल क्लाऊडची आजकाल फारशी चलती नसली तरी माझ्याकडे निर्णय असेल तर मी गुगल क्लाऊड आणि एडब्ल्यूएस मध्ये निवड करेन. मायक्रोसॉफ्ट BIG NOOOO. पण तरीही आजकाल अनेक कंपन्या मायक्रोसॉफ्ट अझ्युर घेत आहेत. कारण, पैसे कमी पडत असावेत हे एकच कारण दिसून येते. मग त्यावर प्रत्यक्ष काम करणारी प्रोडक्ट डेव्हलपमेंट टीम मरेना का तिकडे!
असो. पण स्वत:हून हॉस्टिंग करणे हे भविष्यातील मेंटेनन्स आणि इतर कटकटी (लोड बॅलन्स, सेक्युरिटी वगैरे) पाहता शक्यतो कंपन्या करत नाहीत.
तरीही होस्टिंगचा निर्णय हे सगळे पर्याय समोर ठेऊन त्यावर रिसर्च करून सगळे प्रोज व कॉन्स मुद्दे टेबलमध्ये मांडून व ते समोर ठेऊन घ्यावा लागतो. त्याला इलाज नाही.
>> Less refined असतं म्हणून
>> Less refined असतं म्हणून चांगलं असतं असं म्हणतात
Are we sure on this? कारण "जाडं मीठ" हे प्रोसेस न केलेलं आयोडीन नसलेलं अशुद्ध मीठ असतं व ते खाण्यासाठी वापरणे योग्य नसतं. माझी व्यक्तिगत समजूत तरी अशीच आहे. पण आजकाल जाड्या मिठाबाबत काही नवीन ट्रेंड किंवा काही असेल तर माहिती नाही.
इथे मुळात windows server
इथे मुळात windows server घ्यावा लागणे, ही समस्या जास्त गंभीर आहे.
कारण "जाडं मीठ" हे प्रोसेस न
कारण "जाडं मीठ" हे प्रोसेस न केलेलं आयोडीन नसलेलं अशुद्ध मीठ असतं व ते खाण्यासाठी वापरणे योग्य नसतं....
प्रोसेस केलेलं मीठ हे जास्तीतजास्त गेल्या 100 वर्षात आलं असेल, त्याआधी खडे मीठ/ जाड मीठच वापरत होते लोकं!
शंभरही नाही. चाळीस- पन्नास.
शंभरही नाही. चाळीस- पन्नास. आधी खडे मीठ विकणारे दारोदार फिरत.
अनप्रोसेस्ड अन्नं खा असं
अनप्रोसेस्ड अन्नं खा असं म्हटलं जातं ना? मग खडे मिठ बरं असणार.
आई, मावशी लोणच्यात वगैरे खडे मीठ घालताना पाहिलेत. पातळ पदार्थात खडे मीठ घालताना पाहीले. पोहे, कोरडी भाजी ह्यांत नाही.
मला आठवतंय की लहानपणी घरात
मला आठवतंय की लहानपणी घरात खडे मीठच असायच. तेव्हा प्रोसेस्ड मीठ पाहील सुध्दा नव्हत. भरत म्हणतात तसे आधी खडे मीठ विकणारे दारोदार फिरत. कधी कधी थोडे मीठ पाट्यावर वाटून बारीक करून ठेवायची आई.
अजूनही मी काही पदार्थात जाडे मीठ वापरते. चव आवडते मला जाडे मीठ घातल्यावर त्या पदार्थांची.
@ खडे मीठ
@ खडे मीठ
आयोडीन न्यूनतेने होणाऱ्या विकारांच्या (गलगंड, थायरॉइड, स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात, आईच्या आयोडिन कमतरतेमुळे नवजात बाळामध्ये तिरळेपणा, हायपोथायरॉडीझम, मेंदूची वाढ खुंटणे, शारिरीक वाढ खुंटणे,मूकबधिरता, बुध्यांकाची 10 ते 15 अंशानी घट असे प्रॉब्लेम्स वगैरे ) नियंत्रणासाठी भारतात मिठामधे आयोडीन मिसळणे सरकारने सक्तीचे केले आहे. त्याचा फायदा होत असल्याचा सरकारचा दावा आहे.
कधीतरी खाण्यासाठी खडे मीठ ठीक पण दीर्घकालिक वापरासाठी आयोडीनयुक्त मीठ योग्य वाटते मलातरी.
Pages