Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भवसागर लो हँगिग फ्रुट!
भवसागर लो हँगिग फ्रुट!

जहाँ से तुम मोड मुड गये थे वो मोड अब भी वही पडे है -
आता रामदासीबुवाची कफनी झाली तर झाली. आणलं की ते परत करणार नाही हा बाणा अंगिकारला आहे. >>>>
मी सादा च्या एव्हरी डे पँट्स
मी सादा च्या एव्हरी डे पँट्स मागवल्या होत्या. पण त्याचे फिटिंग मला विचित्र वाटले. म्हणजे बेल्ट लूप ते crotch पॉईंट चे अंतर तोकडे वाटले खूप.
त्यामुळे परत केल्या. शर्ट मात्र छान बसला जो मला नेहमी साईज लागतो त्याचा. पण सेम मापाचा सदरा मात्र थोडा घट्ट वाटला, आणि नेमका धुतल्यावर आटला तर? म्हणून तो हि परत दिला.
आजकाल ऑनलाईन शॉपींग मधे
आजकाल ऑनलाईन शॉपींग मधे साईझेस गंडलेल्या असतात. साईझ चार्ट प्रमाणे मागवले तरी तोकडे किंवा विचित्र कुठे तरीच घट्ट्/शोल्डर ला लुज असे काहितरी कपडे येतात.
मी मागे लिहिले होते. या वर्षी माइंत्रा शॉपींग नाही करणार. दुसरं काही बघेन..
दक्षिणा , सादा ब्रँडची
दक्षिणा , सादा ब्रँडची क्वालिटी कशी आहे ?
हो मलाही उत्सुकता आहे
हो मलाही उत्सुकता आहे
सादा ची ad सारखी येत असते
आमच्या ऑफिसमध्ये एकजण सादाचे
आमच्या ऑफिसमध्ये एकजण सादाचे नेहमी कौतुक करत असते. पण रिव्ह्यू मध्ये फार विचित्र ठिकाणी फाटलेल्या पँटचे फोटो बघून मी घ्यायचे कॅन्सल केले आहे.
इथल्या प्रतिक्रिया आणि
इथल्या प्रतिक्रिया आणि बायकोचा सल्ला लक्षात घेऊन आधीची ऑर्डर रद्द केली. दुसरे प्रॉडक्ट बरेच स्वस्तात मिळाले. क्वालिटी पण चांगली आहे. भिंतीत फिक्स पण झाले.

छान दणकट वाटतंय
छान दणकट वाटतंय
आत डांबर गोळ्या पण ठेवा बऱ्याच, पाली येऊ नयेत म्हणून(आमच्या गॅलरीत बरेच दिवस बंद राहिल्याने शिडीवर पाल होती.त्यामुळे माझ्या डोक्यात कोणतेही भिंतीवरचे घड्याळ, फ्रेम काढताना, कोणतीही भिंतीला टेकलेली वस्तू उचलताना तेच असते हल्ली.)
बाहेरच्या पॅसेजमधे पण येईल का
बाहेरच्या पॅसेजमधे पण येईल का पाल ?
(डां गो च्या सूचनेचं स्वागत)
बाहेरच्या पॅसेजमधे पण येईल का
बाहेरच्या पॅसेजमधे पण येईल का पाल ? >>> पालीला काय कळतंय कपाट बाहेर आहे की आत!
अश्याच ठिकाणी येतात.पॅसेज
अश्याच ठिकाणी येतात.पॅसेज दिवा->किडे->ते खायला कोळी->ते खायला पाल.काल पहाटे 5.3० ला(रात्री ठेवता येत नाही, मांजरी विस्कटतात.शॉर्टस घालून सकाळी नंतर बाहेर ठेवता येत नाही, लोक मॉर्निंग वॉक ला येत जात असतात.आणि त्याच्या नंतर आंघोळ आणो ऑफिस कपडे त्यामुळे ठेवत नाही.त्यानंतर कचरेवाला स्लॉट निघून जातो.) बाहेर कचरा ठेवताना हातावरून पाल गेली
हे वेगळ्या बीबी वर लिहायला हवे पण पाल म्हटले की पूर्ण ट्रॉमा चालू होतो आणि अवधान सुटते.ती शिडी वर पाल असलेली गॅलरी परत सुरक्षित करायला रात्रंदिवस इन्फ्रारेड मशीन, गॅलरी भरपूर फिनेल ने धुणे, अमेझॉन वरून आणलेला पाल रिपेल स्प्रे मारून ठेवणे हे केलंय.मला तिथे बसून परत न घाबरता पाऊस बघायचाय.(सॉरी विषय खूप हायजॅक होतोय, पालीवर हा या ठिकाणी शेवटचा प्रतिसाद)
पालीवर हा या ठिकाणी शेवटचा
पालीवर हा या ठिकाणी शेवटचा प्रतिसाद >>> बोल गं बिनधास्त!
ती कुत्री असलेली मांजर नाही ना येत आता?
कुत्री मांजर एकदा शी करून
कुत्री मांजर एकदा शी करून गेली होती.तिला हवेत लाथ घातली.अजून कधीकधी येते.
तिला हवेत लाथ घातली >>>
तिला हवेत लाथ घातली >>>
अनु.. कचरा स्लॉट!
अनु.. कचरा स्लॉट!
पालीला काय कळतंय कपाट बाहेर आहे की आत..
अनु
अनु

पालीला काय कळतंय >>
पालीला काय कळतंय >>

हे प्रकरण मिसलेलं दिसतंय.
तिला हवेत लाथ घातली.अजून >>
कुत्री असलेली मांजरी >>
आमच्याकडे वर नाहीत येत कुत्री किंवा मांजरी. जुन्या घरी मात्र ही काळजी घ्यावी लागेल.
पुढची प्राणीचर्चा इथे
पुढची प्राणीचर्चा इथे करा
https://www.maayboli.com/node/64886
त्या धाग्यावर लिहीतो ,पण
त्या धाग्यावर लिहीतो ,पण बहुधा इथे काहीतरी प्राणीबाधा (भूतबाधा प्रमाणे) असावी.
पालीला काय कळतंय
पालीला काय कळतंय
तिला हवेत लाथ घातली
>>>
बाई!!! पालीला हवेत काय
बाई!!! पालीला हवेत काय मनातल्या मनातही लाथ घालायला हिंमत लागते. फार सूडी प्राणी आहे तो. खुनशी याईक्स!!!
>>>>>>>पालीला काय कळतंय
>>>>>>>पालीला काय कळतंय
तिला हवेत लाथ घातली
आपल्या शौर्याची सद्दी आली.हाहाहा

पालीला नाही, मांजराला हवेत
पालीला नाही, मांजराला हवेत लाथ घातली.खरी घालण्यापूर्वी पळून गेली ना ती
(बिंदू नही गुरू, अनुराधा, अनुराधा!)
अनुराधा उर्फ राजमाता.
अनुराधा उर्फ राजमाता. (राजम्याचा ref सोडत नसते मी )
मेरी लाथ ही है मेरा शासन!
कुणीतरी रात्री माझ्या Amazon
कुणीतरी रात्री माझ्या Amazon अकाउंट मधे घुसण्याचा प्रयत्न केला आहे. लिंक दिल्याने झाले असेल का?
Amazon कडे तक्रार दिली आहे. त्यांनी संबंधित IP address शेअर करू असे आश्वासन दिले आहे.
कुणी चेष्टा करत असेल तर विनंती - अशा प्रकारची चेष्टा मस्करी सायबर क्राईम मधे मोडते. यात आर्थिक फसवणूक सुद्धा समाविष्ट असल्याने गंभीर आहे. दोन वेळा मला ओटीपी आला आहे. त्यामुळे ज्या काही स्टेप्स घ्यायच्या त्या घेतल्या आहेत.
कुणीतरी रात्री माझ्या Amazon
कुणीतरी रात्री माझ्या Amazon अकाउंट मधे घुसण्याचा प्रयत्न केला आहे. लिंक दिल्याने झाले असेल का?..
लिंक दिली म्हणजे नेमकी कसली लिंक दिली?? कोणते तरी product आवडले त्याची लिंक कोणासोबत शेअर केली होती का? अशा लिंकचा वापर करून तुमच्या account मध्ये घुसणे (किंवा तसा प्रयत्न करणे) शक्य नाही.
ओके.
ओके.
एकदा तुम्हीच चुकून लॅपटॉप
एकदा तुम्हीच चुकून लॅपटॉप किंवा वेगळ्या फोनवरून लॉगिन केलंय का बघा.नाहीतर पासवर्ड बदला.
मला वाटले इतक्या पोस्टी आल्या
मला वाटले इतक्या पोस्टी आल्या, नव्या खरेदी साईट्स आल्या का काय. ईथे तर अनू हवेत लाथा मारतेय
धागा पालजॅक झाला.चला आता परत
धागा पालजॅक झाला.चला आता परत शॉपिंग वर वळू. रिलायन्स ने शेन.कॉम घेतली म्हणे.
Pages