४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>शेंडेनक्षत्रांच्या बायडनला संबोधलेल्या सगळ्या शेलक्या विशेषणांना काल बायडन जागला.

किंवा असे म्हणू की कालच्या झटक्याने अनेक लोकांचे डावे पुरोगामी चष्मे निखळून पडले आणि म्हातारबाच्या समस्त व्यंगांचा साक्षात्कार झाला. असे काही नाही का हा म्हातारबा इतके दिवस अत्यंत हजरजबाबी, चतुर, कुशल, प्रसंगावधानी नेता होता आणि ह्या वादविवादाच्या आदल्या दिवशी अचानक अफाट वार्धक्याने ग्रासून गेला.
पूर्वग्रहविरहित लोकांना म्हातार्‍याचे भ्रमिष्टपण, मतिमंदत्त्व, शारिरिक अपंगत्व सहज लक्षात आले असते. पण ट्रंप द्वेष्टे लोक त्याकडे जाणूनबुजून काणडोळा करत होते.
अजून एक म्हणजे, केवळ काळी बाईच पाहिजे ह्या हव्यासापोटी म्हातार्‍याने कमलाबाईला (बाकी कुठली गुणवत्ता नसताना) उपाध्यक्षपद देऊ केले तीही एक गळ्यातील लोढणे बनली आहे. म्हातार्‍याला हाकलून अन्य कुणाला बसवावे तर ह्या बाईला प्राधान्य द्यावे लागणार. आणि ह्या बाईंची कर्तबगारी म्हणजे सगळा आनंद आहे! त्यामुळे हे एक दुहेरी दुखणे झाले आहे.

काल डिबेट लाइव्ह पाहिले नव्हते. आज तुकड्यांत पाहिले. मला जॉन स्टुअर्टचीच एक ४-५ महिन्यांपूर्वीची क्लिप आठवली. बायडेनच्या वयावर बर्‍याच कॉमेण्ट्स येऊ लागल्या होत्या व डेम्स मधले, व्हाइट हाउस मधले अनेक लोक त्याला डिफेण्ड करत होते. तेव्हा जॉन स्टुअर्टने एक साधे अपील केले होते की तुम्हाला जर इतकी खात्री आहे तो टुणटुणीत आहे, शार्प आहे व वयाचा परिणाम कोठे दिसत नाही, तर त्याच्या तशा क्लिप्स प्रसारित करा. लोकांना दिसू दे तो शार्प.

डिबेट्समधले त्याचे बोलणे पाहून हेच आठवले. बायडेनची ही अवस्था डेम्स मधल्या जबाबदार लोकांना अनेक महिने माहीत असणार. तरीही त्याला डिबेटला का उभे केले हे अनाकलनीय आहे. मधेच कोव्हिड काय, "बीटिंग मेडिकेअर" काय! सगळ्यात मोठा ब्लंडर म्हणजे अ‍ॅबॉर्शनचा प्रश्न आला तेव्हा त्याच मुद्द्यावर राहण्यापेक्षा तो भरकटत गेला. अ‍ॅबॉर्शनचे कायदे हा डेम्स करता सर्वात मोठा मुद्दा आहे आणि ट्रम्प त्यात कमजोर आहे. त्याचाही फायदा करून घेता आला नाही.

सेल्समधला तोंडाळ माणूस इंजिनियरिंग मधल्या कमालीच्या शाय माणसाशी वाद घालत आहे असे चित्र दिसले.

अहो शेंडेनक्षत्र जरा जमिनीवर या! तुमच्या नगाने सुद्धा काल काही एवढा फुशारक्या मारण्यासारखा पर्फॉर्मंस(?) केला असा गोड गैरसमज करुन घेउ नका हो! त्याच्या तोंडातुन तो एकामागोमाग एक अश्या धादांत खोट्या गोष्टी बरळत होता. अर्थात त्याच्याकडुन तिच अपेक्षा असल्यामुळे कोणी त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. बायडनने स्वतःच स्वतःच्या पायावर काल धोंडा पाडुन घेतल्यामुळे तुमचा नग डिबेट जिंकला असा आभास निर्माण झाला आहे. त्यामुळे इतके हुरळुन जाउन नका. ऑप्टिक्स पेक्षा इश्युज व डेमॉक्रेसी महत्वाची वाटणारे इंडिपेंडंट व्होटर्स त्याला अजुनही फाट्यावर मारु शकतात हे लक्षात असु द्या! Proud

काहीही कारण नसताना ट्रंपला दोष कशाला? डिबेट म्हणजे आपला मुद्दा ठासून मांडणे. ते ट्रंपने केले. अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर झालेला बट्ट्याबोळ हा लोकांसमोर जितका मांडता येईल तितका मांडलाच पाहिजे. मनाने मसणात पोचलेला बायडन निरर्थक बरळत होता म्हणून ट्रंप तोंडाळ सेल्स्मन आणि बायडन हा अबोल पण जिनियस इन्जिनियर हे अजब समीकरण आहे.
बायडन हा कुठल्याही कामासाठी निरुपयोगी इसम आहे. उरलो उपकारापुरता हे तुकारामाचे वचन आठवते! उगीच इन्जिनियर वगैरे ठरवून गौरवायचा हास्यास्पद प्रकार बंद करा.
जिथे जिवंत लोकांचे हाल कुत्रा खात नाही तिथे अर्भकांना ठार मारायचे साग्रसंगीत कायदे चघळून किती लोकप्रियता मिळणार?
बाजारात खाद्यपदार्थ, धान्य, कोंबडी,गाय, मासे हे मांस, अंडी, दूध, चीज, पाव, फळे, भाज्या हे सगळे जीवनावश्यक पदार्थ प्रचंड महाग झालेले आहेत. वीज महाग. पाणी महाग. नोकर्‍यांवर गदा येत आहे. लक्षावधी बेकायदा लोक आयात करून अंगमेहनतीची कामे करणार्यांची वाट लागली आहे.
बेकायदा घुसखोरांच्या आदरातिथ्यासाठी नागरिकांना मिळणार्या मदतीला कात्री लागते आहे.
ट्रंपने बेकायदा घुसखोरीचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेत आणून उत्तम कामगिरी केली आहे. विशेषतः म्हातार्‍याने ट्रंपने केलेल्या उपाययोजना पहिल्याच दिवशी रद्द करून ह्या घुसखोरीला खतपाणी घातले आहे हे विसरताच कामा नये.

शेंडे - उपमा झेपली नसेल तर सोडून द्या हो! Happy ती टीका बायडेनवर होती, ट्रम्पवर नाही! खाली बघत, तोंडातल्या तोंडात पुटपुटत वाक्ये कशीबशी पूर्ण करण्यावर होते ते- इंजिनियरिंग मधे असे लोक चालून जातात म्हणून इंजिनियरिंग. दुसरीकडे काय वाट्टेल ते फेकून "सेल" करणारा ट्रम्प आहे. फारच संत्रे सोलायला लागत आहे.

बायडेनला जीनियस तुम्हीच म्हणताय. मी कधी म्हंटलो Happy

ट्रम्पच्या "इम्युनिटी"च्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने काल दिलेला निकाल वाचला. त्यावर लिबरल सर्कल्समधे जितकी टीका होत आहे तितके त्यात मला काही चुकीचे वाटले नाही. ट्रम्पने त्याच्या ६ जानेवारी २०२१ च्या अ‍ॅक्शनकरता इम्युनिटी लागू होते असा दावा अनेकदा केलेला आहे. त्याच्या वकिलांनी तर प्रेसिडेण्टला "अ‍ॅब्सोल्यूट इम्युनिटी" आहे वगैरेही दावे केले होते - म्हणजे त्याच्या इम्युनिटीला काही अपवादही नाहीत असे. इव्हन वैयक्तिक स्वरूपाचे गुन्हे.

त्यावर निकाल देताना वरकरणी ट्रम्पच्या बाजूने वाटणारा निकाल असला तरी प्रत्यक्षात त्याच्या विरोधातील खटले चालवायला बरीच दारे अजूनही उघडी आहेत. मात्र यातून एक नक्की दिसते, की यातले कोणतेही निकाल २०२४ च्या निवडणुकीआधी लागतील याची शक्यता फार कमी आहे.

सुप्रीम कोर्टाने इम्युनिटी ठरवण्याकरता प्रेसिडेण्ट्सने घेतलेल्या अ‍ॅक्शन्स बद्दल तीन प्रकार सांगितले आहेत:
१. अध्यक्ष म्हणून घटनेतील अधिकार वापरताना केलेल्या "अधिकृत" गोष्टी. याबाबत निर्विवाद इम्युनिटी आहे. याबाबत कोणालाच शंका नव्हती/नसावी. (डीओजेला एखाद्या व्यक्तीविरूद्ध खटला आणायला सांगणे हे ही येते यात हे बहुधा मागापब्लिकला समजलेले नाही)
२. अध्यक्ष म्हणून कामाशी संबंधित गोष्टी पण घटनेनेने दिलेल्या अधिकारातून न आलेल्या. याबाबत इम्युनिटी निर्विवाद नाही, पण "गृहीत" धरली जाईल. हा क्लॉज महत्त्वाचा आहे. इथे एखाद्या कृत्याबद्दल इम्युनिटी लागू होत नाही हे दुसर्‍या पार्टीला सिद्ध करावे लागेल. ६ जाने. ला माइक पेन्सला निकाल फिरवायला सांगणे वगैरे यात येते.
३. अध्यक्षपदावर असताना केलेल्या पण अधिकृत नसलेल्या गोष्टी - म्हणजे सहसा वैयक्तिक गोष्टी. याबाबत इम्युनिटी नाही. इथे ६ जाने. ला लोकांना कॅपिटॉल बिल्डिंग मधे घुसायला सांगणे वगैरे जर सिद्ध झाले तर बहुधा इम्युनिटी लागू होणार नाही. सध्याच्या माहितीवरून हे सिद्ध होण्याची शक्यता कमी आहे.

हे खटले सहसा जेथे चालतात त्या "डिस्ट्रिक्ट" कोर्टांना एखादे कृत्य या तिन्हीपैकी कोणत्या प्रकारात मोडते हे ठरवण्याचे अधिकार आहेत. ही एक महत्त्वाची पुस्ती निकालात जोडलेली आहे. म्हणजे कोणतेही कृत्य जर २ किंवा ३ मधे आहे असे डिस्ट्रिक्ट कोर्टाने ठरवले, तर तेथे पूर्ण इम्युनिटी नाही. ३ मधे अजिबातच नाही व २ मधे विरोधी पार्टीला सिद्ध करायची संधी आहे. इथे विरोधी पार्टी म्हणजे खुद्द सरकार (डीओजे) सुद्धा असू शकते.

यातून ट्रम्पला काहीतरी जिंकल्याचा आव आणायला वाव असला, तरी लिबरल मीडिया जितके "अध्यक्षाला राजासारखे अधिकार दिले आहेत" वगैरे म्हणत आहे तितके काही वाटले नाही.

ट्रम्पच्या टीमचे निर्विवाद इम्युनिटीचे दावे हास्यास्पद आहेत. या लॉजिकने बायडेनने ट्रम्पच्या सभांवर बंदी घालून टाकली व नंतर ट्रम्प निवडून जरी आला, तरी तो बायडेनवर खटला चालवू शकणार नाही.

पण यातून एक चित्र नक्की उभे राहते. अमेरिकेच्या प्रेसिडेण्टच्या अधिकाराला लागणारे चेक्स अ‍ॅण्ड बॅलन्सेस फक्त हाउस/सिनेट या सभागृहांतून (इम्पिचमेण्ट) किंवा निवडणुकांमधूनच (मतदारांनी नाकारणे) येऊ शकतात. कोर्टातून नाही.

२. अध्यक्ष म्हणून कामाशी संबंधित गोष्टी पण घटनेनेने दिलेल्या अधिकारातून न आलेल्या. याबाबत इम्युनिटी निर्विवाद नाही, पण "गृहीत" धरली जाईल. हा क्लॉज महत्त्वाचा आहे. इथे एखाद्या कृत्याबद्दल इम्युनिटी लागू होत नाही हे दुसर्‍या पार्टीला सिद्ध करावे लागेल. ६ जाने. ला माइक पेन्सला निकाल फिरवायला सांगणे वगैरे यात येते. >> सॉरी पेन्सला सांगितलेले " अध्यक्ष म्हणून कामाशी संबंधित गोष्टी " मधे कसे येते हे समजावतोस ?

हो मलाही हा प्रश्न पडला. पेन्सला निकाल फिरवायला सांगणं आणि लोकांना हिलवर घुसायला भडकावणं यांत काय फरक आहे?

>>> पण यातून एक चित्र नक्की उभे राहते. अमेरिकेच्या प्रेसिडेण्टच्या अधिकाराला लागणारे चेक्स अ‍ॅण्ड बॅलन्सेस फक्त हाउस/सिनेट या सभागृहांतून (इम्पिचमेण्ट) किंवा निवडणुकांमधूनच (मतदारांनी नाकारणे) येऊ शकतात. कोर्टातून नाही.
हो, आणि सद्य सुप्रीम कोर्टातून नाहीच नाही!

पेन्सला सांगितलेले " अध्यक्ष म्हणून कामाशी संबंधित गोष्टी " मधे कसे येते हे समजावतोस ? >>>
पेन्सला निकाल फिरवायला सांगणं आणि लोकांना हिलवर घुसायला भडकावणं यांत काय फरक आहे? >>>
अरे मी इथे "निकाल" देत नाहीये Happy कोणते काम "कदाचित" कोणत्या प्रकारात येईल याची उदाहरणे शोधतोय.

पण जर त्याच्या बाजूने आर्ग्युमेण्ट करायचे असेल तर असे होईलः
पेन्सला "तुला हे करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. तो तू वापर व आधीचा निकाल संशयास्पद असल्याने ओव्हरराइड कर" असे अध्यक्षाने सांगणे. एक अध्यक्ष म्हणून "निवडणुकीच्या प्रक्रियेत जर नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर त्यावर वाइस प्रेसिडेण्टचे अधिकार वापर व निकाल होल्ड्/रद्द कर" वगैरे सांगणे हे त्याच्या अध्यक्षपदाच्या कक्षेत येऊ शकते.

इथे दुसरी बाजू ते खोडून काढेल. कोर्टही वाइस प्रेसिडेण्टला असेल काही अधिकार वगैरे नाही म्हणून हे निकालात काढेल. ते सगळे ठीक आहे. पण त्यातून ट्रम्पला दोषी ठरवले जाईल का? मला वाटत नाही. हाताशी चार वर्षे असताना डेम्सना ते जमलेले नाही.

याउलट लोकांना सभागृहात घुसायला सांगणे हे मुळात बेकायदा आहे. असा दोन्हीत फरक एखाद्या इंटरप्रिटेशनने होऊ शकेल.

पुन्हा एकदा - हे असेच आहे असा माझा हट्ट नाही. I am just exploring some "possible" examples.

हो - मुद्दा समजला, उदाहरण पटलं नाही. Happy

एकूण ट्रम्पची योजनाच मुळी अमेरिकन कायदा आणि सुव्यवस्थेतल्या गॅप्स उघड करण्यासाठी झालेली आहे यावर माझी श्रद्धा बसत चालली आहे.
उदा. कन्विक्टेड फेलनला निवडणुकीला उभं राहता येण्याबद्दल फाउंडिंग फादर्सनी काही लिहून ठेवलेलं नाही ही केवढी गॅप आहे! असा माणूस उभा राहील असं त्यांना बिचार्‍यांना स्वप्नातसुद्धा वाटलं नसेल, त्यांची तरी काय चूक?! Proud

(चेक्स अ‍ॅन्ड बॅलन्सेस म्हणजे नुसत्या गफ्फा आहेत हो, गफ्फा! चार वर्षं तुमची! विश्वेश्वराच्या रिष्टवाचातला काटा सेकन्दानसुद्धा सरकत नाही हजार वर्षं ओलांडल्याशिवाय! Proud )

म्हणजे ट्रम्प हा अमेरिकन घटना व कायदे याचा QA lead आहे Happy

पण सिरीयसली - गुन्हा सिद्ध झालेल्याला निवडणूक लढवता येते हे व्यापक दृष्टीने बरोबर आहे. कारण शेवटी लोकांच्या हातात आहे त्याला निवडून द्यायचे की नाही. उद्या समजा ट्रम्प निवडून आला आणि चार वर्षांनी तेव्हाच्या रिपब्लिकन उमेदवाराविरूद्ध जो कोण डेमोक्रॅट उभा असेल त्याला काहीतरी राजकीय खटल्यात गोवून गुन्हाही सिद्ध झाला तर त्याला निवडणूकच लढवता येऊ नये हे बरोबर नाही. अशा बाबतीत एका स्पेसिफिक घटनेवरून पूर्ण चुकीचा वाटणारा अ‍ॅप्रोच व्यापक दृष्टीने बरोबर असू शकतो.

आणि मुळात "निवडून येणार्‍या" व्यक्तीपेक्षा "नेमलेल्या" व्यक्तीचे/संस्थांचे अधिकार लोकशाहीत जास्त असू नयेत हे एक तत्त्व म्हणून पटते.

फा सर्व पोस्ट ना +१
किंबहुना गुन्हा सिद्ध झालेल्याला निवडणूक लढवता येते हे व्यापक दृष्टीने बरोबर आहे याचे ट्रम्पच मोठे उदाहरण आहे. ट्रम्प विरुद्ध न्यूयॉर्क मध्ये चाललेले तीनही खटले केवळ सूडबुद्धीने चालवले गेले होते हे कुओमो सारखे डेम्स ही मान्य करतात.

>>> गुन्हा सिद्ध झालेल्याला निवडणूक लढवता येते हे व्यापक दृष्टीने बरोबर आहे
नाही!!
आरोपी असण्यापर्यंत ठीक आहे - सिद्ध झाल्यावर का?! हश मनी हा राजकीय खटला नव्हता!

न्यू यॉर्कच्या कोर्टात ट्रंपला दोषी ठरवणार हाच उद्देश ठेवून चालवला गेलेला खटला हा एक न्यायालयाला राजकीय हत्यार बनवण्याचा डेमोक्रॅटी अभिनव प्रयोग होता. आता हा राक्षस बाटलीबाहेर आलाच आहे तर पुढे दुसरी बाजूही हाच प्रकार करून "तुमच्या" लोकांवर हेच शस्त्र चालवेल ह्याची खात्री बाळगा.
कुठले कायदे राज्याच्या अख्त्यारीत आहेत कुठले केंद्र सरकारच्या, कुठला गुन्हा गंभीर असतो आणि कुठला किरकोळ, न्यायाधीश किती निष्पक्ष असावा ह्या सगळ्या विषयात प्रचंड घोळ घालून शेवटी ट्रंपला दोषी ठरवले गेले. हा निर्णय सर्वोच्च न्यायालय फिरवणार हे नक्की. पण तोपर्यंत कन्व्हिक्टेड फेलनची निरर्थक जपमाळ जपायला हरकत नाही.
अर्थात ज्या लोकांना ट्रंपचा आधीच तिटकारा होता ते ह्या निर्णयामुळे हुरळून जाणार. जे आधीच समर्थक होते ते ह्या निर्णयामुळे विचलित होणार नाहीत. फक्त कुंपणावर बसलेल्या लोकांना काय वाटते तेच महत्त्वाचे आहे.

जेव्हा न्यू यॉर्कचे कोर्ट ट्रंपला दोषी मानतो तेव्हा ट्रंप विरोधक कोर्ट कसे न्यायी आहे, कोर्टाचा निर्णय कसा शिरसावंद्य मानायला हवा वगैरे ट्यांण ट्यांण सुरू करतात. उलट जेव्हा सर्वोच्च न्यायालय ट्रंपला कायदेशीर कारवाईपासून किंचित (पूर्ण नाही!) संरक्षण देते तेव्हा ट्रंप कसा हलकट आहे. त्याने त्याच्या बाजूचे न्यायधीश नेमून आपली सोय कशी करून ठेवली आहे वगैरे ट्याण ट्याण ट्याण करू लागतात. (विरोधी बाजू ह्याच्या उलट!)
एकंदरीत कोर्टेही राजकीय नेत्यांच्या हातातली बाहुली बनलेली आहेत. आणि अमेरिकेची बनाना रिपब्लिक बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे!

Pages