४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पर्णीका, २ पार्टी अमेरिकन पॉलिटिकल सिस्टिम मधे थर्ड पार्टी म्हणजे इंडिपेंडंट कॅण्डिडेट हा फक्त ( कॉमी) म्हणतो तस दोन्हीकडचे थोडे थोडे व्होट्स फोडण्याचे काम करतो. उदाहरणार्थ १९९२ व १९९६ मधला रॉस पेरो.

पण खरी गोष्ट अमेरिकेत ही आहे की प्रेसिडेन्शिअल कँडिडेटच्या जिवनाची मिडियात सखोल छानबिन होते व त्याचे/ तिचे संपुर्ण आयुष्य चव्हाट्यावर येते. हा ट्रेंड १९८८ च्या गॅरी हार्ट या डेमोक्रॅटीक उमेदवारच्या पासुन जास्तच वाढत गेला.त्याचा डॉना राइसबरोबरचा विवाहबाह्य संबध चव्हाट्यावर आल्यामुळे त्याने त्याची प्रेसिडेंशिअल कँडिडेसी मागे घेतली.

मग क्लिंटनने त्याच्या बाइलवेडेपणामुळे पुढची ८ वर्षे गाजवली. पण तो मिडियाला पुरुन उरला कारण त्याचा चार्म व त्याचे पॉलिटिकल भांडवल जे त्याने बजेट डेफिसीट शुन्यावर आणुन सामान्य अमेरिकन माणसाच्या जिवनात आर्थिक सुधारणा घडवुन मिळवले होते.

पण असे क्लिंटनसारखे पॉलिश्ड( स्लिक विली) फारच थोडे असतात. बहुतेक लोक अशी आपल्या आयुष्याची छानबिन व्हायला कचरतात. बहुतेक पॉलिटिशिअनच्या आयुष्यात भरपुर क्लॉजेट्स असतात. ते जगासमोर येऊ नये म्हणुन अशी लोक प्रेसिडेंशिअल कँडिडेट व्हायला पुढे येत नाहीत. मग ट्रंप सारखे कॅण्डिडेट पुढे येतात व त्याच्यासारख्याचे फावते. कारण या माणसाला कसलीच लाज, लज्जा, शरम नसल्यामुळे याच्या आयुष्यात कितीही जळमटे असलेली क्लॉजेट्स असली तरी तो खुशाल उजळ माथ्याने कँपेनिंग करतो!( व प्रेसिडेंट म्हणुननिवडुनही येतो!).या माणसावर रेप पासुन प्रॉस्टिट्युशन हश मनी ते बिझिनेस फ्रॉड व इन्सेरेक्शन पर्यंतचे खटले चालु आहेत पण याला व याच्या मॅगा क्राउड्ला( डिप्लोरेबल्स.. हिलरीच्या शब्दात!) काहीही फरक पडत नाही. डेमॉक्रेट्स कडे एवढा निगरगट्ट कँडीडेट सापडणे मुष्किल आहे.

म्हणुन मग असे (निर्लज्ज) ट्रंप - (जर्जर म्हातारा) बायडन हे दोनच पर्याय अमेरिकन मतदारांसमोर शिल्लक राहतात! सॅड बट ट्रु! Sad

>>डेमॉक्रेट्स कडे एवढा निगरगट्ट कँडीडेट सापडणे मुष्किल आहे.<<
आय्ला, शेंनंना हा फुल्टॉस आहे..

शेवटि प्रेसिडेंट किंवा कुठल्याहि नेत्याची निवड हि "लेसर ऑफ टु इविल्स" या तत्त्वावर होते. नोबडि इज पर्फेक्ट, अँड नोबडि कॅन बी पर्फेक्ट - नो मॅटर हौ हार्ड दे ट्राय...

<<मिळणारी लाच ही शेवटी करदात्यांच्या खिशातून जाते. >>
अहो करदात्यांचे पैसे कुठे द्यायचे हे हाउस नि सिनेटच ठरवतात ना? तिथे तर बरेच रिपब्लिकन बसले आहेत ना? कुणिच आक्षेप घेतला नाही? त्यांचे काहीच चालले नाही?
बाकी रिपब्लिकन लोक म्हणजे एकजात नालायक. कुठलेहि काम करायची लायकी नाही ते सध्या रिपब्लिकन पार्टीत आहेत. ते काय करणार?
नुसते रडणार, काहीतरी खोटे नाटे सांगून निर्बुद्ध लोकांची मते मिळवणार!
दुसर्‍या पार्टीत तरी काय? यांना बायडेन शिवाय दुसरा कुणी तरुण (निदान६० वर्षाचा तरी) माणूस सापडत नाही? मान्य आहे, बायडेनला बराच अनुभव आहे, मग सल्लागार म्हणून रहावे. निर्णय घेण्याचे, पॉलिसी ठरवण्याचे काम कुणि डोके ठिकाणावर असलेल्या माणसाच्या हाती द्यावे.

गेली ५३ वर्षे अमेरिकेत आहे. जगात बर्‍याच काही काही उलाढाली झाल्या, स्टॉक मार्केट वर खाली गेले, माझ्यावर काही परिणाम झाला नाही.
त्यामुळे राजकारण म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा विनोद एव्हढेच मला त्याचे महत्व. त्यांचे विनोद समजावून द्यायला किमेल, कॉर्बे, नि आता जॉन स्टुअर्ट सारखे लोक आहेतच.

काहीही करून ट्रम्प ला बॅलट वर येऊच द्यायचे नाही असे डीप स्टेट ने ठरवले आहे की काय अशी परिस्थिती आहे, नुकताच झालेला ८६ मिलियन दंड, त्या आधी ते दुसरे प्रकरण वगैरे वगैरे.

शेवटि प्रेसिडेंट किंवा कुठल्याहि नेत्याची निवड हि "लेसर ऑफ टु इविल्स" या तत्त्वावर होते. >> माझ्या मते निवड सामान्य जनतेला जवळचा कोण वाटतो त्यावर होते.

सध्या लेसर इव्हिल हे बरोबर आहे. ट्रम्पचे बहुतांश सपोर्टर्स त्याच्या या लफड्यांचे समर्थन करत नाहीत. पण त्यांच्या बबल मधे असे चित्र उभे आहे की लिबरल्स, डावे ई पब्लिक "अमेरिकेचा द्वेष करतात" व देश बुडवायला निघाले आहेत. त्यामुळे त्यापेक्षा वैयक्तिक काहीही लफडी करत असला, तरी "यांना असलाच कोणीतरी पाहिजे". एकदा अशी खुंटी पकडली की मग ६ जानेवारी, सिक्रेट डॉक्युमेन्ट्स, फेक इलेक्टर्स, बिग लाय सगळ्याचे रॅशनलायझेशन केले जाते.

दुसरी बाजू टोटल इव्हिल आहे असे चित्र एकदा ठसवले की कसलेही समर्थन करता येते.

इथे उगाच फॉल्स इक्व्हिव्हॅलन्स नाही - ६ जाने सारखे काही इतर कोणी केल्याचे माहीत नाही. पण सध्या डेमोक्रॅट्स सर्कल्सच्या दृष्टीने विचार केला तर पब्लिकला बायडेन तरी कोठे हवा आहे? पण "ट्रम्प पेक्षा बरा" या एकाच कारणाने लोक चालवून घेतायत.

ओबामा असताना जवळचा कोण हे बरोबर असेल. पण सध्या ट्रंप नको दुसरा कोणीही चालेल हेच तत्त्व ठेवा सांगायची वेळ आलेली आहे. आणि स्ट्रॅटेजिक व्होटिंग करा. ट्रंप नको आणि बायडन नको म्हणून तिसर्‍याला अशी अक्कल चालवलीत तर भोआकफ!
>>सरी बाजू टोटल इव्हिल आहे असे चित्र एकदा ठसवले की कसलेही समर्थन करता येते. >> Lol डेम्स आणि कुंपणावरच्यांनी तेच करायला हवंय. Lol

हे प्राऊड बॉइज वगैरे इव्हिल ग्रुप्सना खतपाणी मिळू नये मात्र. ट्रंप या सार्‍याला आळा घालेल असे वाटत नाही.

ट्रंपला व्होट द्या आणि बघा चंमतग!
लोकांच्या पैशातुन सेक्स ऑफेंडरचा दंड भरताहेत महाशय! लोकांची तीच लायकी असेल तर लीडरही तसाच मिळणार!

>>.."यांना असलाच कोणीतरी पाहिजे". एकदा अशी खुंटी पकडली की..<<
हे खूप जनरलाय्ज्ड, निव्वळ स्पेकुलेशन किंवा गेला बाजार कोबेर, नोवाच्या स्किटमधे खपेल या लेवल्चं स्टेटमेंंट आहे. ट्रंपचा वाढता बेस, एलेक्टेबिलिटि इ. मागची गणितं अभ्यासली तर या वाक्यातली फोलता(?) समजेल. देश डबघाईला आलेला असताना, सध्याची प्रेसिडेंसी सॉर्ट ऑफ क्लस्टरएफ्ड असताना, या मेसमधुन बाहेर काढणारा नेता "यांना असलाच पाहिजे" या क्रायटेरियावर निवडला जात असेल तर माफ करा, वि डोंट डिझर्व ए डिमाक्रसी...

राज, माफ कर, पण मग मला सांग की ट्रंप प्रेसिडेंट हवा असणारे डेमॉक्रेसी डिझर्व्ह करतात? गेला बाजार जानेवारी ६ ला या महाभागाने काय राडा करुन ठेवला होता तेवढे जरी समजले तर डेमॉक्रेसी कोणामुळे संकटात जाइल हे समजायला कठिण जाणार नाही! अजुनही २०२० इलेक्शन फ्रॉड होती फ्रॉड होती अस बोंबलतोय तो!

फारेंड, ट्रंपचा खरा मास्टरस्ट्रोक काय असेल तर तो डेमॉक्रेटिक पार्टी ही अमेरिकेला डबघाइला/ रसातळाला घेउन जाणारी पार्टी आहे अस सांगण्यात नाही. त्याचा खरा मास्टरस्ट्रोक तर हा आहे की तो रिपब्लिकन पार्टीच्या बेसला असे सांगुन उल्लु बनवण्यात यशस्वी झाला आहे की फॉक्स/ न्युजमॅक्स व स्वतःची ट्रुथ सोशल मिडिया सोडुन अमेरिकेतल्या सगळ्या मेनस्ट्रिम मिडिया एकजात सगळ्या न्युज “ फेक न्युज“ देत असतात!

एकदा असे मेनस्ट्रिम मिडियाबाबत लोकांना उल्लु बनवले की झाले.. मग मेन स्ट्रिम मिडिया याच्या सगळ्या चुका/ हिडन अजेंडा/ याचे बिभित्स/ फ्रॉड लाइफ लोकांपुढे आणायला लागले की याने नुसते एवढेच बोलायचे, “ फेक न्युज“! धिस इज रिअली हिज मास्टरस्ट्रोक!

मग यात तो यशस्वी झाल्यांवर त्या मास्टरस्ट्रोकची पुढची पायरी म्हणजे न्युजमॅक्स, ट्रुथ सोशल मिडिया( काय हास्यास्पद व आयरॉनिक नाव आहे त्याच्या स्वतःच्या सोशल मिडियाचे!) असल्या “ आल्टरनेट” रिअ‍ॅलिटीच्या साइट्स/ सोशल मिडियामधुन त्याच्या स्वतःच्या आल्टरनेट" रिअ‍ॅलिटीच्या बातम्यांमधुन काय वाट्टेल ते बरळत / स्वतःच्या " फेक" बातम्या व " फेक" स्टेटमेंट्सनी त्याच्या ब्लाईंड फॉलोअर्सचा, जो काही उरला सुरला ब्रेन उरला असेल, त्याचाही " त्याच्यावरचे, रेप, प्रॉस्टिट्युटला दिलेले हश मनी, बिझिनेस फ्रॉड, इन्झरेक्शन वगैरे त्याचे खरे गुन्हे नसुन कसे " ही सगळी डीप स्टेट् कॉन्स्पिरेसी" आहे अश्या तद्दन भोंगळ "की " वर्ड्सनी पुर्ण ब्रेनवॉश करायचा! दॅट्स हिज जिनिअस!

देश डबघाईला आलेला असताना, सध्याची प्रेसिडेंसी सॉर्ट ऑफ क्लस्टरएफ्ड असताना, या मेसमधुन बाहेर काढणारा नेता "यांना असलाच पाहिजे" या क्रायटेरियावर निवडला जात असेल तर माफ करा, वि डोंट डिझर्व ए डिमाक्रसी... >> येस येस्स वी टोटली डिझर्व या मेसमधुन बाहेर काढणार्‍या नेत्याची अरीस्टोक्रसी ! Lol

हे खूप जनरलाय्ज्ड, निव्वळ स्पेकुलेशन किंवा गेला बाजार कोबेर, नोवाच्या स्किटमधे खपेल या लेवल्चं स्टेटमेंंट आहे >>>

"यांना असलाच पाहिजे" हे खूप ढोबळ झाले हे खरे आहे. पण अनेक रिपब्लिकन लोकांकडून हे ऐकले आहे. त्यांना तो करतो ते आवडत नाही, मान्य नाही. पण तो देश बुडवायला निघालेल्या लिबरल व डाव्यांना आणि डीप स्टेट वगैरे जे काही आहे त्यांना कोलतोय म्हणून तो हवाय.

बाय द वे डावे व लिबरल हे एकच कधी झाले या सगळ्यात ते माहीत नाही. तो ही एक मोठा जोक आहे.

काल एसएनएल मधे निकी हेली आली होती. स्किट बर्‍यापैकी इव्हन हॅण्डेड होते. तिने ट्रम्पला उद्देशून काही प्रश्न विचारले पण तिलाही तिच्या सिव्हिल वॉरच्या कॉमेन्टबद्दल उत्तर द्यावे लागले.
https://www.youtube.com/watch?v=EwPQn7i-6JQ

<<असे डीप स्टेट ने ठरवले आहे>>
असे नुसतेच ठरवले नाही पण कोर्टात साक्षिदारांसकट पुरावा सादर केला आहे.

याच्या उलट रिपब्लिकन. नुसतेच निवडणूक चोरली म्हणायचे, कोर्टात चालतील असे पुरावे शून्य. कित्येक कोर्टात तर रिपब्लिकन न्यायाधीश होते तरी!! उगीचच रडले, खोटे बोलले म्हणजे आपला मुद्दा खरा ठरत नाही!
बाकी ज्यांचा या राष्ट्राच्या घटनेवर, एफ बी आय, सी आय ए, लष्कर प्रमुख नि न्यायव्यवस्था या कशावरच विश्वास नाही, असल्या लोकांशी काय वाद घालायचा? तरी आपले डीप स्टेट, फेक न्यूज म्हणून बोंबलतच असतात.

काल स्टेबल जिनियसची मुलाखत सेमी फेक चॅनेल वर पाहिली. "मी नेहमी स्मार्ट नि यशस्वी लोकांनाच हायर करतो" नि "मी लोकांना फायर करतो" ही दोन्ही वाक्ये तेव्हढ्याच निर्विकारपणे (शेंडेनक्षत्राच्या हब्दात निर्लज्जपणे) एकाच मुलाखती मधे फक्त तात्याच बोलू शकतो. ज्याच्या जवळजवळ प्रत्येक स्मार्ट नि यशस्वी हायर चा शेवट 'यू आर फायर्‍ड' मधे झाला आहे (असे मी नाही तर सेमी फेक चॅनेल म्हणाले) तो विश्वविधाता तात्या - ह्या देशाला "सॉर्ट ऑफ क्लस्टरएफ्ड - मेस" मधून बाहेर काढणार असे अजूनही लोकांना वाटते ह्याबद्दल गम्मत वाटते.

दक्षिण सीमेवर म्हातारबाने जो बट्ट्याबोळ करून ठेवला आहे आणि कुठूनही कुणी घुसावे आणि पाहुणचार झोडावा हे किती वेळ चालणार? २०२४ ची निवडणूक म्हातारबा जिंकणे अशक्य नाही. मग आणखी कोट्यावधी लोक घुसवणार? आणि आणखी वाट लावणार? डेमोक्रॅटिक समर्थक ह्याची वाट पहात आहेत? कमाल आहे.
नुकतेच काही घुसखोरांनी न्यूयॉर्क शहरात भक्कम पाहुणचार झोडल्यावर (प्रिपेड डेबिट कार्ड, हॉटेलमधे वास्तव्य, खाणेपिणे रहाणे फुकट इ.) एका पोलिसाला लाथाबुक्क्यांनी तुडवून काढले. कारण तो त्यांना कुठलीशी चोरी करण्यापासून परावृत्त करत होता. फारच अन्यायकारक! मग ह्या झोडपणार्या लोकांना अटक झाली. ट्रंप सोडून अन्य सगळ्या गुन्हेगाराला मोकाट सोडण्याबद्दल ठाम असणार्या न्यूयॉर्कच्या परमदयाळू अ‍ॅटोर्नी जनरलने त्यांना तात्काळ सोडून दिले (बेल रिफॉर्म झाले आहेत ना!) नंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांना दोन्ही हाताची मधली बोटे उंच करून एक अश्लील शिवी देऊन आपली कृतज्ञताही व्यक्त केली. नंतर कुठल्याशा एन जी ओ ने त्यांना तिकिट काढून दिली आणि हे नरपुंगव मोठ्या ऐटीत कॅलिफोर्निया की अरिझोना की आणखी कुठे गेले. कदाचित न्युसन्स त्यांना फुकटात आरोग्य सेवा, लिंगबदल शस्त्रक्रिया वगैरे देतो ते ट्राय करायचे असावे! तर आता पोलिसाला मारण्याची सत्कृत्ये करणारे हे शूरवीर कुठे आहेत हे कुणाला माहित नाही. आणि सगळी मारहाण व्हिडिओत दिसल्यामुळे बोंबाबोंब झाली. इतकी की न्यूयॉर्कची गवर्नरबाईही ह्याच्या विरुद्ध भूमिका घेऊ लागली. मग लाजेकाजेस्तव अ‍ॅटोर्नी जनरलला पुढे येऊन आम्ही गुन्हे सहन करत नाही वगैरे थापेबाजी करावी लागली. खूपच गंमतशीर प्रसंग घडले. पण आता ह्या पराक्रमी वीरांना शोधण्याचा एक कार्यक्रम करावा लागणार आहे.
अशा गमतीजमती जेव्हा बेकायदा घुसखोर लाखाच्या संख्येने तुमच्याही शहरात येऊन दाखल होतील तेव्हा बघायला मिळतील.

इकडे म्हातारबाचा भ्रमिष्टपणा वाढतच चालला आहे. त्याने असा दावा केला की त्याने निवडणूक जिंकली आणि अध्यक्ष झाला (२०२०) तेव्हा म्हातारा युरोपला गेला आणि मित्तरॉ नामक फ्रेन्च राष्ट्रपतीला भेटला. (पहिल्यांदा जर्मनीचा राष्ट्रपती म्हणाला. मग चूक सुधारली.) गंमतीची गोष्ट म्हणजे मितरॉ हा १९९६ साली मरण पावला. मग म्हातारबा त्याच्या कबरीपाशी जाऊन त्याच्याशी बोलला की कसे हे कळू शकलेले नाही. कदाचित अर्ध्या गोवर्या मसणात गेल्यामुळे मेलेली मंडळी त्याच्याशी बोलतही असतील. कुणी सांगावे?

नेवाडा राज्याची प्रायमरी जरा विचित्र असते. प्रायमरी आणि शिवाय कॉकस दोन्ही असते. नेवाडाच्या प्रायमरीत ट्रंप नव्हता. तो कॉकसमधे होता. प्रायमरीत निकी हेली होती. त्यात तिच्याबरोबर अन्य उमेदवार (जे आता गळाले आहेत) ते होते. आणि शिवाय वरीलपैकी कुणीही नाही म्हणजे नोटा हा पर्याय होता. आणि ह्या नोटाने निकी हेलीला दणदणीत पराभूत केले! आता साउथ कॅरोलिनात काय होते ते बघू या.
बाईसाहेब सॅटरडे नाईट लाइव्ह वगैरे कार्यक्रमात उपस्थिती लावून आपली बाजू लावून धरत आहेत. पण किती रिपब्लिकन तो कार्यक्रम बघत असतील हा एक मोठाच प्रश्न आहे! असो. ट्रंपविरोधी असल्यामुळे निकिताई लिबरल मंडळींच्या गळ्यातील ताईत बनली आहे,

<<<अशा गमतीजमती जेव्हा बेकायदा घुसखोर लाखाच्या संख्येने तुमच्याही शहरात येऊन दाखल होतील तेव्हा बघायला मिळतील.>>>
<<<इकडे म्हातारबाचा भ्रमिष्टपणा वाढतच चालला आहे. >>>
संपूर्ण सहमत.

>>>>>>एका पोलिसाला लाथाबुक्क्यांनी तुडवून काढले. कारण तो त्यांना कुठलीशी चोरी करण्यापासून परावृत्त करत होता.
हा व्हिडिओ भयंकर आहे.

अमेरिकेत बेकायदा घुसखोरी करणार्यात रशियन, चीनी, भारतीय, अफगाणी असे लोकही भरपूर संख्येने येत आहेत. काही दिवसानी केसरी ट्रॅवल्स, वीणा वर्ल्ड वगैरे मंडळी अशी पॅकेजेस विकू लागतील की एकेरी तिकिट घ्या. ग्वाटेमाला किंवा मेक्सिकोत योग्य स्थळी सोडणार. नामांकित कायोटी कंपनीशी संपर्क करून दिला जाणार आणि मग पुढचे तुम्ही बघा आणि अमेरिकेत पोचा.
कॅलिफोर्नियात घुसणार्या लोकांचा एक व्हिडियो पाहिला. त्यात कुण्या परोपकारी घुसखोराने टिकटॉक व्हिडियो बनवून सीमेवरील घुसण्यासाठी सोप्या जागा सांगितल्या होत्या. त्यानुसार हजारो घुसखोर त्या जागेतून येताना दिसत होते. अमेरिकेच्या बाजूला ज्या माणसाची जमीन आहे तिथे प्रचंड नासधूस होते. लोक सगळा कचरा, मलमूत्रविसर्जन करून त्याच्या रांचचा पार कचरा करून टाकताना दिसत होते. संबंधित मालकाने स्वतःची पिस्तुल दाखवून त्यांना परावृत्त करायचा प्रयत्न केला तर न्युसन्स कृपेने त्यालाच अटक करून पोलिस घेऊन गेले!
हे काय घडते आहे ते कळण्याच्या पलीकडे चालले आहे. चोर कोण साव कोण ह्याच्या व्याख्या पार उलट्या पालट्या करायचा चंग डेमोक्रॅट आणि डाव्या पाठिराख्यांनी बांधला आहे.
इतकी खाज आहे तर सगळ्या सीमा खुल्या का नाही करत? विमानाने येणार्या लोकांची कागदपत्रे, व्हिसा तरी का तपासतात?तीही यंत्रणा रद्द करा. निदान काही पैसे वाचतील. नुसते विमान तिकिट काढा आणि या अमेरिकेत.
देशाच्या सीमेचे इतके वाभाडे म्हातारबाने काढले तितके एखाद्या अराजक असणार्‍या देशातही होत नसतील. ज्याची आयुष्यातील चार पाच वर्षे
फारतर उरली आहेत तो इसम असले शेख महंमदी उपद्व्याप करून पुढील पन्नास वर्षे अमेरिकेतील नागरिकांचे जीवन वाईट होईल ह्याची तरतूद करत आहे. लोकशाहीत बहुसंख्य लोकांची लायकी असते त्याच दर्जाचे सरकार लाभते हेही खरे.

पण घुसखोरांना थांबवायला, कोणी काय करु शकतं? तारा लावल्यात. किती मैलोन मैल तारा लावायच्या? उंदीर यायचे ते येणारच.

>>लोकशाहीत बहुसंख्य लोकांची लायकी असते त्याच दर्जाचे सरकार लाभते हेही खरे. >> याबाबतीत सार्वभौम चराचराचे एकमत होईल. Lol

>>
किती मैलोन मैल तारा लावायच्या? उंदीर यायचे ते येणारच.
<<
यापूर्वी इतक्या संख्येने, जगभरातून घुसखोर येत नव्हते.

म्हातारबाने जवळपास जाहीरपणे सांगितले आहे की या, आमच्या देशात घुसा, आमच्या सीमा पूर्ण खुल्या आहेत. सीमा सुरक्षा विभागाला कडक सूचना दिलेल्या आहेत की घुसखोरांना फक्त मदत करायची. अटक, प्रतिबंध वगैरे करायचा नाही. आंणि दयेचा पाझर फुटलेली डेमोक्रॅटिक राज्ये सॅक्न्चूयरी सिटी, स्टेट, काउंटी वगैरे जाहीर करून ह्या समस्त घुसखोरांसमोरे करदात्यांच्या खर्चाने पायघड्या घालून आगतस्वागत करायला तयार आहे. कितीही गुन्हे करा आम्ही तुम्हाला सोडून देऊ. आणि जीव गेला तरी इमिग्रेशन विभागाला तुमची माहिती देणार नाही. तुम्हाला कुणीही देशाबाहेर काढणार नाही.
इतक्या सुखसोयी मिळत असतील तर घुसखोरी का वाढणार नाही?

<<काही दिवसानी केसरी ट्रॅवल्स, वीणा वर्ल्ड वगैरे मंडळी अशी पॅकेजेस विकू लागतील की एकेरी तिकिट घ्या.>>
का नाही करावे? बोलून चालून धंदाच आहे तो!!
भरात जेंव्हा अहिंसा नि इतर भानगडीत गुंतला होता तेंव्हा मुस्लिम नि युरोपिअन लोकांना भारताचे वाटोळे केलेच ना? मग आता अमेरिकेच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन इतर देशांतील लोकांनी का न यावे?
एके काळी भारत जगात सर्वात जास्त श्रीमंत देश होता - त्याचे वाटोळे झाले. आता अमेरिकेची पाळी.

म्हातारबाने जवळपास जाहीरपणे सांगितले आहे की या >> बरं मग उशिराने का होईना ते सीमाविषयक बायपार्टीसन बील कोणी रिजेक्ट केले म्हणे ? म्हातारबाने कि अजून कोणी ?

हे जे काही बिल ज्याचा नको इतका गाजावाजा केला जात आहे ते निव्वळ धूळ्फेक आहे.
१. युक्रेन, इस्रायलचा निधी आणि सीमा सुरक्षा हे एका बिलात घुसडायचे काय तर्कशास्त्र आहे? वेगवेगळी बिले आणुन ती स्वतंत्रपणे का पास केली जात नाहीत?
२. नको तिथे एक्जिक्युटिव ओर्डर चा सपाटा लावणार्या मुडद्याला ह्या विषयावर अशी ऑर्डर काढून असायलम चा निकाल लागेपर्यंत मेक्सिकोतच रहा असा वटहुकूम काढता येत नाही का?
३. बेलगाम पद्धतीने सीमा ओलांडायला बंदी घालणारे कायदे असताना नव्या बिलची गरज काय? आहेत ते कायदे का राबवले जात नाहीत?

कितीही आकांडतांडव केले तरी ट्रंप आणि काँग्रेस, सिनेट नाही तर केवळ राष्ट्रपती आणि त्याचे मंत्रीमंडळ ह्या भयानक प्रकाराला जबाबदार आहेत. हे बिल कधीही पास होऊ नये अशी प्रार्थना.

वेगवेगळी बिले आणुन ती स्वतंत्रपणे का पास केली जात नाहीत? >> हे नवीन आहे का ? बहुतांशी बिल्स अशीच पास होतात.

"आहेत ते कायदे का राबवले जात नाहीत?" बील बायपार्टीसन होते. मुद्दे योग्य होते. जॉह्न्सन ने सरळ बिलाला विरोध नसून डेम्स ना क्रेडीट मिळू नये म्हणून विरोध करतो आहे हे म्हटलय. मिच काय म्हणालाय ते वाच.

प्रत्येक पोस्ट मधे सीमा इश्यू आहे अशी बोंब करणार्‍या व्यक्ती ला जर खरच सीमेचा ईश्यू सॉल्व्ह व्हावा ही खरी कळकळ असती तर हे "हे बिल कधीही पास होऊ नये अशी प्रार्थना." हे लिहायची गरज भासली नसती.

ट्रंप आणि बायडनच्या कारभाराची तुलना केली तर काय दिसते?
बेकायदा घुसखोरी:
ट्रंप
ट्रंपने भिंत बांधायचे वचन दिले ते पूर्ण केले नाही. परंतु रिमेन इन मेक्सिको ह्या धोरणाचा उत्तम वापर करून बेकायदा घुसखोरीला खूपच आळा घातला होता.
बायडन
काहीही नियंत्रण नाही. कितीही लोक, कुठुनही, काही पात्रता असो वा नसो सीमेवरून महिन्याला लाखोच्या संख्येने घुसत आहेत. अनेक शहरातील शाळा वगैरे सरकारी वास्तू ह्या रिकामटेकड्या लोकांना रहायला दिल्या जात आहेत. ह्या घुसखोरांच्या पाहुणचारात नागरिकांना मिळणारे लाभ, सोयी, व्यवस्था ह्यांना कात्री लावायला लागत आहे.
खरे तर ६ जानेवारीच्या नावाने ठणठण बोंब मारणारे ह्या अराजकाबद्दल खवळून का उठत नाहीत हे एक कोडेच आहे. कॅपिटॉलवर मोर्चा नेऊन तिथे खिडकीची दोन चार तावदाने फोडली, बाकी कुठल्या निवडणूकीचा निकाल ना बदलला ना सत्तांतरात काही बाधा आली. तरी ते महासंकट, पहिल्या दुसर्या महायुद्धापेक्षा भयंकर संकत. मात्र देशाच्या सीमेची पूर्ण धूळदाण करणार्या राष्ट्रपतीला फक्त भ्रमिष्ट म्हातारा समजायचे? हे तर अ त्यंत खुनशी वागणे आहे. देशाची एका मूलभूत ओळखीला, त्याच्या सीमेला सुरुंग लावून तो नष्ट करणे हे भ्रमिष्टपणाचे नाही तर दुष्टपणाने केलेले काम आहे.

आंतरराष्ट्रीय युद्धे
ट्रंप
ट्रंपने ना कुठले युद्ध सुरु केले ना कुठल्या युद्धाला खतपाणी घातले. एखादा सुलेमानी सारखा माणूस मारला पण अन्यथा शांतता. इस्रायल आणि सौदी हे हाडवैरी समजणारे देश एकत्र येऊन चर्चा करताना दिसले. इराणवर बंधने घालून त्या देशाची डोकेदुखी कमी केली होती. चीनही बर्यापैकी निवळलेला वाटत होता. जेरुसलेम ला अमेरिकन वकिलात हलवली. त्याचा कुठलाही भयंकर परिणाम झाला नाही.
बायडन
अफगाणिस्तानमधून पाय काढता घेतला तिथे अंदाधुंद होती. अब्जावधी डॉलरची शस्त्रास्त्रे बिनबोभाट तालिबानी अ तिरेक्यांच्या ताब्यात. अमेरिकेची विमाने अफगानिस्तानमधून निघत असताना लोक एखाद्या लोकलप्रमाणे त्याला लटकून त्या विमानात घुसु पहात होते. अनेक लोक खाली पडून मेलेही. बाकीही अनेक वाईट गोष्टी घडल्या. सगळ्या बायडनच्या देखरेखीखाली.
रशिया आणि युक्रेन युद्ध. हेही बायडनच्या सरकारमधेच सुरु झाले आणि आणखी अनंतकाळ चालणार असे दिसते आहे. बायडन अ ट्टाहासाने अब्जावधी डॉलर ओतून ते युद्ध आणखी भडकते राहिल असे बघतो आहे. रशियाशी वाटाघाटी वगैरे त्याला साफ नामंजूर आहे. पण रशियाची बाजू आज तरी भक्कम दिसते आहे. लाखो युक्रेनियन मरत आहेत आणि आणखी लाखो मरणार आहेत. पण युद्ध संपायचे नाव घेत नाही. बायडनचे हे एक अपयशच आहे.
मध्यपूर्व. इस्रायल आणि गाझा/हमास वगैरे मधले युद्ध आता जास्त व्यापक रुप धारण करते आहे. इराण, हौती, हेजबुल्ला, हे सगळे युद्धात उतरले आहेत असे दिसते आहे. बोटींच्या वाहतूकीची मोक्याची जागा हेरून हौती बंडखोर हल्ले करत आहेत. ह्याचा समस्त जगावर परिणाम होऊ शकतो. मग अमेरिका अनधिकृतपणे युद्ध छेडून सहभागी होत आहे. इथेही बायडनचे अपयश आहे. सीआयए वगैरे गुप्तचर संस्थेने जर त्या संभाव्य हल्ल्याची कल्पना दिली असती तर कदाचित तो हल्लाच होऊ दिला नसता. पण समस्त सरकारी यंत्रणा वोक अजेंडा उराशी कवटाळून बसलेल्या आहेत. त्यांना आपली नेहमीची कामे दुय्यम वाटू लागली असावीत.

वोकनेस
ट्रंप
ट्रंप वोकनेसच्या विरुद्ध होता आणि आहे. सैन्य वा अन्य कुठल्या सरकारी विभागात गे आहे, लेस्बियन आहे, ट्रान्स आहे म्हणून भरती करा असे धोरण त्याने कधी बाळगले नाही.
बायडन
जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आयडेंटिटी पॉलिटिक्स. न्यायाधीश, प्रवक्ता, सेनापती, संरक्षण मंत्री सगळ्या जागी त्वचेचा रंग, लैंगिक वैविध्य ह्याच्या नावाखाली सगळा अनाचार चालू आहे. त्या पदाला लायक आहे यापेक्षा या गोष्टींना महत्त्व.
विमानदलात पायलट म्हणून गे आणि लेस्बियन ट्रान्स पुरेसे नाहीत म्हणून त्यांच्याकरता प्रवेश सुलभ करा असले मूर्ख प्रकार चालू आहेत.
बायडन कृपेने अनेक सरकारी विभागात विकृत लोकांचा बाजार भरलेला आहे. हेच प्रकार आता डेमोक्रॅटिक राज्यात बोकाळताना दिसत आहेत. अशा लोकांवर टीका केल्यास लगेच रेस कार्ड, जेंडर कार्ड, होमोफोबिया, ट्रान्सफोबिया असली कार्डे काढून कांगावखोरपणा केला जातो आणि आपल्या ढिसाळ कारभारावर पांघरूण घातले जाते.

अर्थव्यवस्था
ट्रंप
सगळे काही सुरळित चालू होते. पेट्रोल स्वस्त होते. अन्नधान्य स्वस्त होते.
बायडन
सगळा बट्ट्याबोळ आहे. दुकानात अन्नपदार्थ प्रचंड महाग झाले आहेत. मांस, अंडी, फळे, भाजीपाला, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, धान्ये आणि धान्याचे पदार्थ सगळे सगळे महाग. कित्येक पदार्थ काही पट जास्त महाग झालेले आहेत.
लाखो बेकायदा घुसखोर ड्रग आणत आहेत. गुन्हे करत आहेत. जर ह्या लोकांनी कामे करणे सुरु केले तर अमेरिकेतील गरीब आणि निम्नमध्यम वर्गीय लोकांच्या पोटावर पाय आणला जाणार आहे.

आणि तरी बायडन आणि ट्रंप सारखेच वाईट बरका!

अफगाणिस्तानमधून पाय काढता घेतला >>> हे सगळे ट्रम्पच्याच राज्यात त्याने तालिबानशी चर्चा करून निश्चित केले होते. बाकी गंमत चालू द्या

Pages