४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<<<डाटा चेरी पिकींग केलेला आहे हे सिद्ध करा. >>>
काही गोष्टीत सिद्ध करण्याचा प्रश्नच नसतो.
जसे भारतीय तत्वज्ञान.
त्याची तुम्हाला अनुभूति येते.

तशी अनुभूति त्रंपला झाली की २०२० च्या निवडणुकीत तोच निवडून आला होता, पण ज्याप्रमाणे माया तुमच्या ज्ञानावर पडदा ओढून तुम्हाला सत्य समजू देत नाही तसे डेमोक्रॅटिक पार्टीने केले.
म्हणूनच म्हंटले आहे की ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या.
याची अनुभूति येण्याची पहिली पायरी म्हणजे <<<कॉन्स्पिरसी थियरी च्या आहारी जात आहोत का वस्तुस्थितीच तशी विदारक आहे हे कळेनासे झाले आहे.>>> असे वाटू लागणे.

बायडनच्या रंडीबाज, चरित्रहीन पोराच्या लॅपटॉपवरील रसभरित मटिरियल हे अस्सल होते. पण ते सरकारी यंत्रणा वापरून (डीप स्टेट अ‍ॅक्टर्स) यांनी सोशल मिडियावर दबाव आणून त्यांना प्रकाशित केलेल्या स्टोर्या काढून घ्यायला लावणे.
डझनावारी एफ बी आयच्या लोकांनी काहीही तथ्य नसताना रंडीबाज हंटरच्या लॅपटॉपची बातमी ही रशियन कटकारस्थान आहे असे धादांत खोटे छातीठोकपणे सांगितले आणि सर्व माध्यमांनी ते उच्चरवाने सर्वांपर्यंत पोचवले.
एका उमेदवाराने, म्हणजे ट्रंपने भाषणात हिलरीच्या इमेल प्रकरणाची (ज्यात तथ्य होतेच) वाच्यता करणे आणि सरकारी यंत्रणा वापरून ते करणे ह्यात फरक आहे. पहिला प्रकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. दुसरा प्रकार हा सरकारी यंत्रणा वापरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. आणि तो बदफैली बायडनच्या बाबतीत केला गेला. हा सरळसरळ निवडणूकीतील हस्तक्षेप आहे.
इतरवेळी विनोदबुद्धी ओसंडून वहात असणारे सदस्य ट्रंपने विनोदाने वा उपहासाने काही बोलले तर मात्र त्याचा कीस काढून पार चोथा करून टाकतात (जसे लायसॉल की क्लोरोक्स प्या) हा एक केविलवाणा विनोद आहे!

म्हातारबा ट्रंपला हिटलर, मुसोलिनी वगैरे सगळे म्हणून मोकळा झाला आहे. ह्याच्या निर्लज्जपणाचे उदाहरण हौती बंडखोरांवर केलेला बाँब वर्षाव. एक दीर्घकाळ चालणारी, इराक, अफगाणिस्तानसारखी निष्फळ, शस्त्रास्त्र लॉबीचे उखळ पांढरे करण्याकरता लढल्या जाणार्या युद्धांच्या मालिकेत येमेनविरुद्ध तिथल्या हौती बंडखोरांविरुद्ध म्हटले तर युद्ध म्हटले तर नाही नामक एक प्रकार भ्रमिष्ट हुकुमशाहने सुरू केला आहे. युद्ध हे काँग्रेसकडून संमत करुन घ्यावे लागते ह्याचा सोयिस्कर विसर पडला आहे. अर्थात ह्यालाही मुख्य प्रवाहातील माध्यमे दुर्लक्षित ठेवणार ह्यात शंकाच नाही.

(कोविड मिसइन्फो या विषयी वेगळा धागा काढला मी किंवा अन्य कुणी तर जरूर सर्व मुद्दे मांडीन. पण इथे नको. )

रॉन डिसँटिस शर्यतीतून बाहेर पडला हे थोडे वाईट झाले. एक चांगला उमेदवार होता. सरकारच्या जाचक लॉकडाऊन वगैरे तुघलकी धोरणांना झिडकारून फ्लोरिडा लवकरात लवकर खुला करणे, एकंदरीत उद्योग धंदे ह्यांना चालना देणे, वोकनेसला कोलणे वगैरे अनेक चांगली कामे ह्याच्या नावावर आहे. पण ट्रंपचे ग्लॅमर नसल्यामुळे मागे पडला.
निकी हेली सारखी युद्धखोर, शस्त्रास्त्र लॉबीच्या हातातली बाहुली, उठताबसता वोकनेस दाखवणारी उमेदवार पर्याय म्हणून फारच वाईट आहे.

डेमोक्रॅट पूर्ण प्रयत्न करून ट्रंपला कुठेतरी अडकवणार असे दिसते आहे.
दुसरीकडे ते काहीसे बेसावध होऊ लागलेत की काय असे वाटते. काहीही झाले तरी म्हातारा बायडन ट्रंपला आरामात हरवतो अशा भ्रमात ते दिसत आहेत. महागाई, चलनफुगवटा, असह्य वोकनेस, आंतरराष्ट्रीय युद्धे आणि दक्षिण सीमेची दयनीय अवस्था ह्यातले काहीही लोकांना खटकत नाही आणि ते निमूट भ्रमिष्ट बायडनला मत देणार असे ते गृहित धरताना दिसत आहेत.

दुसरीकडे अक्षरशः अर्धमेला, प्रेतप्रेतवत असणारा जॉन फेटरमन नामक पेन्सिल्वेनियाचा सिनेटर अचानक नॉर्मल झाल्यासारखा वाटतो. तो इस्रायलचा खंदा समर्थक तर बनला आहेच. शिवाय अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर म्हातारबाने जो पोरखेळ चालवला आहे त्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात बोलू लागला आहे.
जे काही औषध, किंवा ऑपरेशन त्याच्यावर झाले आहे त्यामुळे फेटरमन इतका नॉर्मल, सुसंगत बोलणारा झाला आहे की तमाम डेमोक्रॅट आता त्याला वेडसर समजू लागतील इतकी परिस्थिती गंभीर आहे!

आत्तातरी कोल्ड वॉर सुरू आहे दोघांत - ट्रम्प आणि डिसॅण्टिस. एलिस स्टेफनिक एक उगवता तारा आहे. पण ट्रम्प त्याच्यासारखेच फायरब्रॅण्ड घेईल असे वाटत नाही. मागच्या वेळेस नेहमीचा रिपब्लिकन वाटेल असा पेन्स होता. त्यामुळे रामस्वामी, केरी लेक, एमटीजी, बोबर्ट यांचे चान्सेस कमी दिसतात. हेली ने ब्रिज बर्न केले आहेत. एकदम कर्वबॉल टाकून टिम स्कॉट सारखा कोणी? डिसॅण्टिस जरा मधला आहे. पण अजून फ्रिक्शन कमी व्हायला वेळ लागेल. अजून थोडी लॉयल्टी दाखवावी लागेल. कारण ट्रम्प अजूनही त्याच्यावर आडून आडून शेरे मारत असतो. "मी जिंकल्यावर तो मला आवडू लागला" वगैरे.

इतरवेळी विनोदबुद्धी ओसंडून वहात असणारे सदस्य ट्रंपने विनोदाने वा उपहासाने काही बोलले तर मात्र त्याचा कीस काढून पार चोथा करून टाकतात >>> ट्रम्प विनोदाने बोलला असेल तर मीही विनोदच केला आहे असे समजा.

बाय द वे ट्रम्पचा तो व्हिडीओ इथे आहे. ज्याने त्याने ठरवावे हा विनोद होता की सिरीयस बोलला होता.
https://www.youtube.com/watch?v=33QdTOyXz3w

पहिला प्रकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. दुसरा प्रकार हा सरकारी यंत्रणा वापरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे >>> नाही. तुम्ही तिसरीच कसलीतरी तुलना करत आहात.

२०१६ मधे निवडणुकीच्या ८-१० दिवस आधी एफबीआयने "हिलरीच्या बर्‍याच नवीन मेल्स मिळाल्या आहेत व त्याची छाननी सुरू आहे" अशी बातमी जाहीर करून ट्रम्पला मोठा फायदा करून दिला होता.
https://www.cnn.com/2016/10/30/politics/clinton-fbi-investigation-comey/...

जॉन फेटरमन >>> त्याचा जो काही आजार होता तो त्याचा चॉईस नव्हता. त्यावर इतकी विकृत कॉमेण्ट ही तुमची पातळी दाखवते, त्याची नाही. याउलट त्याच्या विरोधात लढलेला तुमचा फेवरिट कॅण्डिडेट होता त्याने स्वतःच्या चॉईसने अनेक वाईट गोष्टी केल्या होत्या. तुमच्या एरव्ही वायसर गळालेल्या विशेषणांच्या नळावर त्याबद्दल मात्र खडखडाट दिसतो.

आणि ट्रम्पला अडकवणार म्हणजे असा कोणता खटला चालला आहे की ज्यात ट्रम्प वरकरणी निर्दोष वाटतो? अर्धेअधिक तर त्यानेच फुशारकी मारून मान्य केले आहे.

सीमेवरच्या प्रकारांबद्दल "म्हातारबा"ला डेम्समधेही १८% सपोर्ट आहे फक्त. तेव्हा ट्रम्पवर टीका म्हणजे म्हातारबाचे सगळे मान्य असे नसते.

आणि ट्रम्पला अडकवणार म्हणजे असा कोणता खटला चालला आहे की ज्यात ट्रम्प वरकरणी निर्दोष वाटतो? >> मला तर पूर्ण खात्री आहे कि "जान ६ च्या वेळी निकी हेलीनेच > मुद्दामहून पुरेसे कॅपिटल पोलिस तैनात केले नव्हते " अशी शेंडे नक्षत्रची खात्री आहे Lol

बायडनचा पोरगा जी काही छानछोकी करतो आहे ती त्याची काही लायकी नसताना, बापाचे पद वापरुन करतो आहे. त्याला मिळणारी लाच ही शेवटी करदात्यांच्या खिशातून जाते. आणि त्याची लफडी दाबून टाकायचा प्रयत्न हा सरकारी पातळीवरून, एफ बी आय वगैरे संस्था वापरून केला जातो.

ह *खोर हंटर आपल्या कष्टाच्या पैशाने वेश्या, ड्रग वा अन्य चाळे करत असता तर कुणाला काही पडलेली नव्हती. पण तसे नाही.
काही महिन्यापूर्वी व्हाईट हाऊसमधे चक्क कोकेन सापडले आणि ते कुठून आले ते सुरक्षा व्यवस्थेला कळत नाही! किती छान! जगातील सर्वात संरक्षित वास्तू जिथे सिक्युरिटी कॅमेर्यांचा सुळसुळात असायला हवा तिथे कोकेन सारखी घातक वस्तू कुठून आली आणि कुणी आणली ते सांगता येत नाही ह्याचा अर्थ हे प्रकरण दाबून टाकले जात आहे. म्हातारबाच्या कुटुंबकबिल्यातील कुणीतरी नग हे उद्योग करत असल्यामुळे बहुधा सुरक्षा यंत्रणा अळिमिळी गुपचुप करुन बसल्या आहेत. नाहीतर खरे तर राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षेचा प्रश्न होता.
ब्रिन्गिंग बॅक नॉर्मलसी टू व्हाईट हाऊस ह्यात कोकेन येत असेल तर धन्य आहे ते सरकार!

म्हातारबाने दक्षिण सीमेवर जो खेळखंडोबा करून देशाची वाट लावायची ठरवली आहे त्याचा नवा अध्याय म्हणजे टेक्सस आणि त्याचा गव्हर्नर ह्याच्याशी वाकड्यात शिरणे.
टेक्सस सरकारने काटेरी कुंपण टाकून बेकायदा घुसखोर लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. लाज कोळून प्यालेले म्हातारबाचे सरकार याविरुद्ध कोर्टात गेले आणि आता ते कुंपण केंद्र सरकार हटवणार आहे. (कदाचित त्या जागी लाल गालिचे अंथरून बेकायदा घुसखोरांचे आदरातिथ्य करावे असाही विचार असेल!) पण टेक्ससचा ग्रेग अ‍ॅबट त्याविरुद्ध उभा ठाकतो आहे. आणि समस्त रिपब्लिकन गव्हर्नर त्याला पाठिंबा देत आहेत. जणू काही देशाच्या सीमा सुरक्षित असणे हा आता केवळ रिपब्लिकन पक्षाचा मुददा आहे.
अशा प्रकारे सीमा नष्ट करून आपली एक मूलभूत जबाबदारी भ्रमिष्ट राष्ट्राध्यक्ष झटकून टाकत आहे आणि बिनडोक डेमोक्रॅट एखाद्या निर्बुद्ध मेंढरासारखे त्याच्या मागे जात आहे. अनेक महानगरात ह्या घुसखोरांनी शिरकाव केला आहे. विमानतळ, शाळा, हॉटेल, अशा अनेक ठिकाणी ते नि:संकोच पाहुणचार झोडत आहेत. करदाते हे सगळे दुराचार पोसत आहेत. पण तरी डेमोक्रॅट पक्षात ह्याविरुद्ध हू की चू नाही.
एक तो फेटरमन नामक फ्रॅ़केन्स्टाईन सोडला तर!

(फेटरमन बद्दल ह्या धाग्यावर अगदी उमाळे येत आहेत त्याबद्दल. एक रुग्ण म्हणून त्या माणसाबद्द्दल सहानुभुती आहे. पण अशा गलितगात्र माणसाला एका राज्याचे प्रतिनिधित्व करायला पाठवणे म्हणजे एखाद्या गरीब बिचार्या आंधळ्या माणसाला सहानुभुती पोटी एखाद्या बसचा, ट्रेनचा
ड्रायवर किन्वा विमानाचा पायलट म्हणून नेमण्यासारखे आहे. जेव्हा फेटरमन सारखा अर्धांग वायू झालेला, धड बोलता वा वाचता न येणारा पंगू माणूस पेन्सिल्वेनिया राज्याचा प्रतिनिधी म्हणून सिनेटमधे बसतो तेव्हा माझी सहानुभुती त्या राज्याच्या नागरिकांसाठी असेल. ह्या मरणासन्न माणसासाठी नाही. अर्थात आता जे काही औषधोपचार चालू आहेत त्यामुळे हा इसम खूपच माणसात आला आहे म्हणजे बहुधा डेमोक्रॅटिक पार्टी त्याला बाहेर हाकलणार!)

बिनडोक डेमोक्रॅट एखाद्या निर्बुद्ध मेंढरासारखे त्याच्या मागे जात आहे >>> कोण मेंढरांसारखे जात आहे?

७०% लोक त्याच्या विरोधात आहेत.

आणि हंटरचा खटला होउ द्या. हाउस अजून रिपब्लिकन्स कडेच आहे ना? आणा प्रेशर. उद्या म्हातारबा त्यात सामील आहे असे निष्पन्न झाले तर त्याला इम्पिच करा. त्याला कोणी मखरात बसवलेले नाही ट्रम्प सारखे. करियरच्या सुरूवातीला एकदम सेन्सिबल असलेली व ६ जाने. २०२१ ला स्पष्टपणे आपला विरोध जाहीर केलेली स्टेफनिक आता व्हीपीपद दिसू लागल्यावर पूर्ण १८० अंशात फिरून ट्रम्पची लाइन पकडून बोलू लागली आहे. तिचे जुने ट्विट तिच्या साइटवरून उडवले आहे. पण इंटरनेटवर एकदा व्यक्त केलेले कधी पुसले जात नाही. तिचे मूळ वक्तव्य सहज सापडते अजूनही.

बाय द वे, बायडेन सध्या हाउस व सिनेट मधे असलेले इमिग्रेशन बिल साइन करायला तयार असताना ते अडवून कोण धरत आहे ते ही पाहा. त्यावर "ते अजिबात पास होऊ देऊ नका" असेही कोण जाहीरपणे म्हणत आहे ते ही पाहा. म्हणजे टेक्सासच्या अमेरिकन लोकांची काळजी वगैरे असलेल्यांचे इंटरेस्ट्स नक्की कोठे आहेत ते ही कळेल. हे पब्लिक १० महिने तो प्रॉब्लेम जसाच्या तसा राहूद्या म्हणत आहेत, बायडेनला श्रेय मिळू नये म्हणून.

फेटरमन त्याच्या कॅम्पेनच्या वेळेस आजारी होता. नंतर बरा झाला. आता तुमच्याच म्हणण्यानुसार सेन्सिबल बोलतोय. मग प्रॉब्लेम काय आहे?

आणि हंटरचा खटला होउ द्या. हाउस अजून रिपब्लिकन्स कडेच आहे ना? आणा प्रेशर. उद्या म्हातारबा त्यात सामील आहे असे निष्पन्न झाले तर त्याला इम्पिच करा. >> इंपिच मेंट बाबत सहा महिने कोळून पुरावा सापडला नाही असे जीओपीच बोलते आहे ना Happy

म्हणजे टेक्सासच्या अमेरिकन लोकांची काळजी वगैरे असलेल्यांचे इंटरेस्ट्स नक्की कोठे आहेत ते ही कळेल. हे पब्लिक १० महिने तो प्रॉब्लेम जसाच्या तसा राहूद्या म्हणत आहेत, बायडेनला श्रेय मिळू नये म्हणून. >> फा असा धोतराला हात घालू नये रे Wink

“इथे सतत म्हातारबा बायडन, म्हातारा म्हातारा वाचून त्याच्यासमोर ट्रम्पसारखा कोणीतरी तरणाबांड गब्रू तरतरीत जवानचा ऑप्शन आहे असे वाटू लागले . म्हणून माहित होते तरी दोन तीनदा ट्रम्प चे वय गुगलून खात्री करून घेतली. आता बायडनपेक्षा ४ वर्षांनीच का असेना पण लहान आहे आणि ऐंशी गाठली नाही ना मग तरुण नेतृत्वच झाले ना….. Biggrin

आरती Biggrin

पर्णिका, तुझे जानेवारी २०, १९:२६ चे कोव्हिड व कोव्हिड लसीबद्दलचे पोस्ट एकदम लॉजिकल व मुद्देसुद आहे. अग पण या बीबीवर काही लोकांचे लॉजिकशी व मुद्द्यांशी वाकडे आहे हे तुला बहुतेक माहीत नाही. अग मी त्या कोव्हीड लशीच्या संशोधनाबद्दल लिहीताना याच बीबीवर जेनेटिक्स क्षेत्र कसे सुरु झाले इथपासुन ते वुहान लॅब/ कोव्हिड लस संशोधन पर्यंत हे क्षेत्र कसे क्रमाक्रमाने प्रगत होत गेले याचा आढावा घेतला होता. पण काही आडमुठ्या व न्युजमॅक्स/ फॉक्स यांची फाल्तुक बरळ ईथे ओकत बसलेल्यांच्या डोक्यात त्यातले काहीच गेले नाही हे तुला माहीत होते का? असो!

गेल्या महिन्याभरातल्या शेंडेनक्षत्रांच्या पोस्टींमधे २-३ गोष्टींशी मात्र मी अंशतः सहमत आहे.

एक म्हणजे हार्व्हर्ड, एम आय टी वगैरे तथाकथित प्रेस्टिजिअस युनिव्हर्सॉटीजनी Diversity, Equity , Inclusion च्या नावाखाली जो उच्छाद मांडलेला आहे त्याला आवरायलाच हवे! त्यामुळे प्लेजरिझम करणारी व्यक्ती हार्व्हर्डची प्रेसीडंट होउ शकते! ज्यु हेट्रेड बद्दलचे साधे उत्तर देता आले नाही या प्रेसिडेंट्सना!

दुसरे म्हणजे सदर्न बॉर्डर वर जे चालले आहेते बघुन इल्लिगल इमिग्रंट्सचे लाड थांबवलेच पाहीजेत हे मलाही वाटते. आता गळ्याशी आल्यावर बायडन म्हणतोय की मी हे थांबवतो! पण आता फारएंड म्हणतोय त्याप्रमाणे ट्रंपच्या मागे लागुन आपली बुद्धी गहाण ठेवणारे रिपब्लिकन कॉन्ग्रेसमन व सेनेटर्स इतके दिवस इल्लिगल इमिग्रेशन थांबवायचे बिल पास करायला हो म्हणत होते ते आता बायडन त्याला तयार झाल्यावर इल्लिगल इमिग्रेशन थांबवल्याचे श्रेय बायडनला मिळु नये म्हणुन ते बिल पास करायला ते आता नाही म्हणत आहेत!

तिसरी म्हणजे हे मान्यच केले पाहीजे की बायडन खरच या १-२ वर्षात् फारच म्हातारा वाटु लागला आहे. त्याचे काही काही व्हिडिओ बघीतलेत व त्यात कधी कधी तो कसा वागतो/चालतो व तो काय बोलतो व त्याचा चेहरा कसा दिसतो हे पाहीले तर खरच डेमोक्रॅट्सना त्याच्या कॉग्निटिव्ह अ‍ॅबिलीटी बद्दल व तो निवडुन आला तर अजुन ४ वर्षे तो प्रेसिडेंट म्हणुन काम करु शकेल का याबद्दल हॉनेस्टली काळजी वाटली पाहीजे. त्याचे काही बरे वाइट झाले तर कमला हॅरीस हा पर्याय खरच भितीदायक आहे! ( अर्थात बायडन हरला व ट्रंप जर निवडुन आला तर तो पर्याय त्याहुनही महा भयंकर आहे ती गोष्ट वेगळी!) थोडक्यात काय तर यंदा मतदारांची परिस्थिती इकडे आड व तिकडे विहीर अशीच होणार आहे Sad

“बिनडोक डेमोक्रॅट एखाद्या निर्बुद्ध मेंढरासारखे त्याच्या मागे जात आहे “ हेच वाक्य.. थोडे बदलुन जास्त उचित होइल…” बिनडोक रिपब्लिकन्स एखाद्या निर्बुद्ध मेंढरासारखे ट्रंपच्या मागे जात आहेत”

एकूण सगळेच अमेरिकन मतदार बिनडोक! नुसती निर्बुद्ध मेंढरे!

<<हाउस अजून रिपब्लिकन्स कडेच आहे ना?>>
हाउसच काय, सिनेट, प्रेसिडेन्सी सगळे रिपब्लिकन असताना काय केले? ओबामाकेअर हटवून दुसरा प्लॅन आणला का? जेंव्हा त्रंप्याची चौकशी चालली होती तशी एफ बी आय ला सांगून हंटर बायडेन, हिलरी किंवा इतर डेमोक्रॅट लोकांची चौकशी केली का?
नालायक या शब्दाचा अर्थ जो/जी कुठलेहि काम करण्यास लायक नाही. तर हे रिपब्लिकन तसे आहेत. नुसते खोट्या बातम्या सांगायच्या, नि रडSत बसायचे. काहीहि करत नाहीत. नुसते दुसर्‍याला शिव्या!

आता टेलर स्विफ्टवर बोंब मारताहेत! काय संबंध? बरे असेल तिचा काही संबंध, तर तुमच्यात नाही का कुणि असे पावरफुल लोक जे काही करू शकतील? नाही, कारण सगळे नालायक! नुसते रडणार नि शिव्या देणार!

धन्यवाद मुकुंद, तुमच्या पोस्ट बद्दल मला माहिती नव्हते, बहुदा तेव्हा बरेच दिवस मी मायबोली वर आले नव्हते त्यामुळे मिस केली. आता शोधुन वाचते.
तुम्ही नियमित पणे लिहित जा असे आवर्जून सुचविन. काही लोक मत बदलणार नाही (च) हे ठरवुन इथे वावरतात हे खरे आहे पण बरेच वाचनमात्र लोक कुठलीच भुमिका न घेता वाचत असतात, ह्या क्षेत्रातील तज्ञ प्रॅक्टिसिंग डॉ. कडून विषय समजून घ्यायला त्यांना नक्कीच आवडेल.

बाकी तुमच्या अंशतः सहमत असण्याशी मी अंशतः सहमत आहे:). बायडन आणि ट्रंप व्यतिरिक्त तिसरा पर्याय द्या नाहीतर नोटा द्या अशी माझी मागणी आहे सध्या.‌

नोटा देणे हे ट्रम्पला मत देणे आहे. म्हणजे द्यायचे तर द्या पण गैरसमज नकोत.
हीलरीचे करीयर पाहता अनेक लेफ्ट लिनिंग लोकांना तिच्याबद्दल नावड होती. बर्नी बरोबर unfair वागणूक झाली असा बऱ्याच डाव्यांचा समज होता. बऱ्याच लोकांनी third party मत दिले. पॉप्युलर व्होट जिंकूनही हिलरी हरली. त्याचा एका टर्म मध्ये रो वी वेड रद्द झाले, अनेक महिलांचे आरोग्य, व्यक्तिगत हक्क धोक्यात आले.

निवडणुका turnover वर ठरतात. जर तुम्ही तुमचा बेस तुम्हाला मत देण्यासाठी मोबिलाईज करू शकला तर तुम्ही जिंकता, नाहीतर समोरचा पक्ष जिंकतो.

२०२४ मध्ये वेगळे नाही. तुम्हाला कितीही नावड असली तरी biden आणि trump हेच पर्याय आहेत. तुम्हाला कितीही चुकीचे वाटले तरी हीच निवड आहे. बायडन सोडून इतर कोणताही पर्याय ट्रम्प साठी मत आहे.

Pages