Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
अवघड आहे. लिटरली फेक
अवघड आहे. लिटरली फेक इलेक्ट्रर नेमून इलेक्शन सर्तिफिकेशन थांबवण्याचा प्रयत्न केला तरी "कसे सिद्ध झाले".
कोर्टात ट्रम्पला बाजू मांडायला दिली नाही हे पण मनाचे. सगळे मनाचे लिहून, लाडक्या नेत्याच्या विरुद्ध निर्णय आला की कोर्ट पण कांगारू. सगळे असे सरक्युलर असेल तर धन्य आहे.
कोल्ररॅडो सर्वोच्च
कोल्ररॅडो सर्वोच्च न्यायालयाचे थोबाड केंद्रीय सर्वोच्च न्यायालयाने ९-० असा एकमताने विरुद्ध निकाल देऊन फोडले आहे. त्तरी धडा शिकायला तयार नाहीत लोक. अहो, त्या केंंद्रीय सर्वोच्च न्यायालयातील वोकप्रतिनिधी केतान्जी जॅक्सन (स्त्री म्हणजे काय हे सांगता येत नाही फेम!) यांनीदेखील विरुद्ध निकाल दिला आहे. राज्याच्या सुप्रिम कोर्टाला केंद्राच्या निवडणुकीत ढवळाढवळ करायचा अधिकार नाही असे सांगून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. असा काही कायदा असतो हे माहित असूनही आपल्या वोक विचारांच्या आहारी जाऊन कोलरॅडो सुप्रिम कोर्टाने दडपून आपला निर्णय घेतला असेल तर ते कोर्ट धन्य आहे!
सुप्रीम कोर्टाने कायद्याचे
सुप्रीम कोर्टाने कायद्याचे इंटरप्रिटेशन दिले आहे. ट्रम्प ने insurrection केले की नाही ह्यावर काहीही नाही. उगाच न वाचता न समजता लिहू नका.
शेंडेनक्षत्र, एव्हढ्यात खूष
शेंडेनक्षत्र, एव्हढ्यात खूष होऊ नका. जर त्रंप्याला इम्म्युनिटि नाही असे जर याच सुप्रिम कोर्टाने सांगितले तर?
तुम्ही सुप्रिम कोर्टाला पण शिव्या द्याल. ते तर त्रंपनेच नेमलेले कोर्ट आहे.
मागे त्रंपनेचनेच निकी हेलीला युनो मधे नेमले होते, आता तिलाच शिव्या. आधीहि बरेच लोक स्वतःच नेमले होते, त्यांना शिव्या.
असे करता करता एक दिवस त्रंपलाच शिव्या द्यायची वेळ येइल तुमच्यावर.
मग काय कराल?
नेहेमीचेच.
कसलेहि आरोप सिद्ध झाले नसताना बायडेन नि इतर डेमोक्रॅट्स ना शिव्या.
द्सर्यांना शिव्या देण्यापलीकडे रिपब्लिकनांना काहीहि जमत नाही. नालायक शब्दाची व्याख्या रिपब्लिकन.
कोलरॅडो कोर्टाने ट्रंपने
कोलरॅडो कोर्टाने ट्रंपने इन्सरेक्शन केले ह्यावर कधी केस चालवली आणि त्याचा निकाल दिला ह्याची जरा लिंक द्यावी.
ट्रंपला इम्युनिटी नाही असा सुप्रिम कोर्टाचा निर्णय येणे अगदी शक्य आहे. कदाचित तसा निर्णय देता यावा म्हणून हा ९-० निर्णय दिला असू शकेल.
कुठलीही यंत्रणा नि:पक्ष उरलेली नाही.
तीन टप्पे -
तीन टप्पे -
१. नोव्हेंबर २०२३- कोलोरॅडो डिस्ट्रिक्ट कोर्ट -
ट्रम्प ने इन्सरेक्षन केले पण राष्ट्राध्यक्ष कायद्यातल्या "ऑफिसर" ह्या संज्ञेत येत नाही. (ट्रम्पने इंसरेक्षन केले हे सिद्ध होऊन सुध्दा कायद्याच्या तांत्रिक बाबीमुळे ट्रुंपच्या बाजूने निर्णय.)
२. डिसेंबर २०२३ - कोलोरॅडो सुप्रीम कोर्ट
कोलोरॅडो सुप्रीम कोर्टाने कायद्याचे वेगळे इंटरप्रिटेशन देत, राष्ट्राध्यक्ष सुद्धा "ऑफिसर ऑफ युनायटेड स्टेटस" ह्या कायद्यातल्या संज्ञेत येतो असा निर्णय देत ट्रम्पला बार केले.
३. मार्च २०२४- सुप्रीम कोर्ट, युएसए
सुप्रीम कोर्टाने कोलोरॅडो कोर्टाचा निर्णय ह्या ग्राऊंडवर बदलला की राज्य सरकार फेडरल ऑफिस साठीच्या निवडणुकीवर हा कायदा लावू शकत नाही. फक्त सिनेट हा कायदा फेडरल इलेक्शन बाबत लावू शकते.
We conclude that states may disqualify persons holding or attempting to hold state office. But states have no power under the Constitution to enforce Section 3 with respect to federal offices, especially the presidency," the unsigned opinion for the court stated.
इथे, हे स्पष्ट दिसते की सुप्रीम कोर्टाने ट्रम्पने इन्सरेक्षन केले नाही असे अजिबात कुठेही म्हणले नाही. उलट असे म्हणले आहे की जर निवडणूक गव्हर्नर पदासाठी असती तर ट्रम्पला बार करता आले असते.
जो कोलोरॅडो डिस्ट्रिक्ट कोर्टाने ट्रम्पच्या इन्सरेक्शन बाबत निर्णय दिला आहे तो पुढे कोणीही repudiate केला नाहीये.
कॉमी, धन्यवाद डिटेल्स बद्दल.
कॉमी, धन्यवाद डिटेल्स बद्दल. तुम्ही बहुधा पूर्वी ते इन्सरेक्शन बद्दल लिहीले होते पण इथे अगदी क्लिअर होते. बाय द वे, डिस्ट्रिक्ट कोर्टात तात्याच्या लॉयरने जे आर्ग्युमेण्ट केले ते त्याच्यच चाहत्यांना वाचायला दिले पाहिजे. बिचारे स्वतःचा कामधंदा सोडून स्वखर्चाने डीसीला गेले आणि अनेक खटल्यात अडकले, त्यांना पूर्ण डिसओन केले आहे त्याने. "मी कुठे कोणाला म्हंटलो तुम्ही जा म्हणून". अर्थात ते पुरते कल्टमधे आहेत सध्या. ते त्याचेही रॅशनलायझेशन करतील.
बाय द वे, युएस सुप्रीम कोर्टाने स्टेट सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवणे ही अगदी नॉर्मल प्रोसेस आहे. त्याला जर थोबाड फोडणे म्हणत असतील तर २०२० नंतर सुमारे ९१ खटले विविध कोर्टांनी "पुरावा नाही" पासून ते "तुम्हाला मुळात केस कशी उभी करायची तेच समजत नाही" असे शेरे मारून निकालात काढले त्याला काय म्हणता येईल? त्याला बहुधा "हर हर भलाई का जमाना रहा नही" म्हण्तात
<<कुठलीही यंत्रणा नि:पक्ष
<<कुठलीही यंत्रणा नि:पक्ष उरलेली नाही.>>
अगदी बरोब्बर. ज्यात त्यात राजकारण!
आणि आजकालचे राजकारण म्हणजे पॉलिसीवर चर्चा, समस्यांवर उपाय वगैरे नसून नुसते एकमेकांना शिव्या.
खोटे बोलणे, कायदे मोडणे सर्व॑ काही माफ.
आज रास्त्राध्यक्षाला इम्म्युनिटि, उद्या काँग्रेसमनला, त्याच्या नातेवाईकांना आणि सरकारातल्या सर्वांनाच इम्म्युनिटी!
पुनःम एकदा वाइल्ड वेस्ट!
फारएण्ड, कॉमी.. मानल पाहीजे
फारएण्ड, कॉमी.. मानल पाहीजे तुम्हाला! तुम्ही या ब्रोकन रेकॉर्ड सारखे वाजणार्या व तेच तेच डिबंक केलेले मुद्दे असलेल्या टकळीवजा पोस्टींना मुद्देसुद , लॉजिकल व स्कॉलरली उत्तरे देत तुमचा बहुमुल्य वेळ वाया घालवता? मी असल्या फाल्तुक पोस्टींकडे दुर्लक्ष करायचे शिकलो आहे. तुमचे जे सगळे लॉजिकल व स्कॉलरली मुद्दे तुम्ही ज्यांना उद्देशुन लिहीत आहात ते त्यांच्या आकलनापलीकडे आहेत व त्यांच्या डोक्यावरुन जात आहेत याची खात्री बाळगा!
बाय द वे, स्टेट ऑफ द युनिअन अ
बाय द वे, स्टेट ऑफ द युनिअन अॅड्रेस मधे बायडनने दिड तास न अडखळता व एकदम आक्रमक भाषण केले. त्यात त्याने सुप्रिम कोर्ट जजेस पासुन त्यांनीच स्पॉन्सर केलेले इमिग्रेशन बिल नापास करणार्या भंपक रिपब्लिकन्सपर्यंत सगळ्यांचाच खरपुस समाचार घेतला. त्याला म्हातारबा म्हणणार्यांच्या एक साणसणीत चपराकच ठेउन दिली त्याने इतके मस्त स्पिच देउन!
मुकुंद
मुकुंद

बाय द वे, तात्याच्या टिक टॉक बद्दल १८० डिग्री टर्न बद्दल काय मत लोकहो? तो सत्तेवर होता तेव्हा बरेच पोश्चरिंग करून प्रत्यक्षात लॅरी एलिसनला एक डील देण्याव्यतिरिक्त त्याने फारसे काही केले नव्हते. नंतर डेम्स नी विशेष लक्ष घातले नाही. आता ते जागे झाले व कधी नव्हे तो बायपार्टिसन सपोर्ट मिळत होता. तेवढ्यात तात्या फिरला. का तर म्हणे त्याने फेसबुकला फायदा होईल.
आता बाकी रिपबलिकन्स तरीही लावून धरत आहेत की सपशेल लोटांगण घालत आहेत ते दिसेल.
TIKTOK जो बंद करेल त्याची जेन
TIKTOK जो बंद करेल त्याची जेन झी ( आणि मिलेनिअल्स पण काही) मतं गेलीच समजा.
'झुक्या ' पेक्षा 'शो झी च्यो' रिलायबल, जेन्यूअन आणि अमेरिकन राजकारण्याच्या कृपेने खूपच प्रसिद्ध झालेला आहे.
<<< रिपबलिकन्स तरीही लावून
<<< रिपबलिकन्स तरीही लावून धरत आहेत>>>
त्रंप्या म्हणेल तसे सगळे रिपब्लिकन करणार. सुनुनु, मकॉनेल सगळ्यांनी आधी त्याला शिव्या दिल्या, पण आता सगळे त्यालाच एंडोर्स करताहेत. खात्री आहे, २०१६ मधे टेड क्रुझ ने केले तसे. टेडच्या बापावर त्रंप्याने खोटे अरोप केले, त्याच्या बायकोची निंदा केली तरी ज्यांना अजिबात स्वाभिमान नाही, दुतोंडी पणा करण्यात लाज वाटत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्ष करणार?
मला वाईट एव्हढेच वाटते की डेमोक्रॅट्स नी बायडेनला रिटायर करून २०२० पासून नवा उमेदवार का जोपासला नाही?
नंद्या७५, अश्या लोकांना
नंद्या७५, अश्या लोकांना निर्लज्ज व बुटचाटे असे म्हणतात. लिंडसे ग्रॅहॅम हा अजुन एक निर्ल्लज्ज प्राणी! मॅकॉनलच्या बायकोने तर राजीनामा दिला होता जानेवारी ६ प्रकरणामुळे! तिला ट्रंपने चायना लव्हींग कोको स्पाय/ (चायनीज स्पाय व गोरीला माकडीण ) असे काहीतरी म्हटले होते तेव्हा! टेड क्रुझच्या बायकोलाही असच काहीतरी कुरुप माकडीण का काहीतरी बोलला होता व क्रुझच्या बापाला केनेडी असॅसन का काहीतरी!
पण तरीही आता सगळे त्याचे बुट चाटत आहेत!
धन्य आहे रिपब्लिकन पार्टी व त्याची री ओढणारी ही सगळी निर्लज्ज/लाळघाटी/पाठीचा कणा नसलेली ट्रंपप्रेमी बुटचाटी माणसे!
म्हणतात ना, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये!
इथे अजून कोणी केटी ब्रिट्स
इथे अजून कोणी केटी ब्रिट्स बद्दल लिहीले नाही? एक महान मनोरंजन आहे.
"म्हातारबा" च्या स्टेट ऑफ द युनियन ला रिपब्लिकन्स चा रिस्पॉन्स द्यायला हिला निवडले. ही तिची मूळ क्लिप.
https://www.youtube.com/watch?v=hzmKa73egxA
तुम्हाला जर ही हॉलमार्क चॅनेल ची, किंवा एखाद्या अतिमधाळ सोप सिरीजची ऑडिशन वाटत असेल तर बरेच रिपब्लिकन्स सुद्धा तुमच्याशी सहमत आहेत. ती जे बोलत आहे त्यावेळेस चेहर्यावर जे भाव हवेत किंवा हास्य हवे की नको याच्यात कोठेही संगती लागत नाही. पूर्वी इंटरनेट स्पीड्स कमी असताना कधीकधी नेटवर्क गंडले की व्हिडीओ क्लिप मधला आवाज व त्यावेळचा अभिनय यात काही सेकंदाची गॅप पडे ते आठवले.
आता डेम्स, एम एस एनबीसी, एस एन एल यावर तुटून पडतील यात काय विशेष नाही. ही कालची एसएनएलची क्लिप. स्कार्लेट जोहानन्सन ऑल्मोस्ट ओळखू येत नाही.
https://www.youtube.com/watch?v=cCfLpuLdF8Q
पण खुद रिपब्लिकन्सनीही सुद्धा यावर जबरदस्त टीका केली आहे. इथे एक पाहा
https://www.youtube.com/watch?v=iqxURf4EiKw
यावरची एक कॉमेण्ट फार चपखल आहे
"her comment gave a 'if you break up with me, I will hurt myself' vibe "
पण
<<<ट्रंपला इम्युनिटी नाही असा
<<<ट्रंपला इम्युनिटी नाही असा सुप्रिम कोर्टाचा निर्णय येणे अगदी शक्य आहे.>>>
आणि हा निर्णय लवकरात लवकर यावा. म्हणजे बायडेन ला हि त्याचा फायदा घेता येईल.
म्हणजे तो त्रंपला ताबडतोब तुरुंगात पाठवायची व्यवस्था करेल.
वाटरगेट नि इराण- काँट्रा हे धंदे फक्त रिपब्लिकनांनाच करता येतात असे नाही. डेमोक्रॅट्स करत नाहीत कारण त्यातल्या बहुतांश लोकांना थोडी तरी लाज आहे. पण इम्म्युनिटी मिळाली तर तेहि काहीतरी करू शकतील, जसे मिलिटरी पाठवून त्रंप नि त्याच्या सगळ्या कुटुंबाला अटक करून त्याचे सगळी मालमत्ता जप्त करणे. देशाच्या भल्यासाठी हे कारण सांगून.
पण हे सगळे झाल्याबरोबर सुप्रिम कोर्ट म्हणेल नाही नाही, ते फक्त त्रंपला इम्म्युनिटि! निर्लज्ज लोकांना सुप्रिम कोर्टात नेमले आहे, त्यांच्याकडून कसली न्यायाची अपेक्षा!
राजकारण म्हणजे काही मुठभर लोकांनी (दोन्ही पक्षातल्या) चालवलेला खेळखंडोबा आहे. आपण फक्त एसेनेल, किम्मेल बघायचे.
बायडेनच्या स्टेट ऑफ द युनियन
बायडेनच्या स्टेट ऑफ द युनियन भाषणात त्याने जॉर्जिया युनिव्हर्सिटीतील खुन्याचा उल्लेख "इल्लिगल" असा केला. त्यावर डेम्स मधल्या वोक्स नी राळ उडवली. शेवटी त्याला खुलासा करावा लागला.
https://www.youtube.com/watch?v=VqB3QEwGl0I
विक्टिम बद्दल बोलायचे सोडून खुन्याचे वर्णन अचूक करायला लावणारी वोक मंडळी ट्रम्प निवडून येण्यात हातभार लावणार आहेत. बायडेनने ज्या संदर्भात तो उल्लेख केला होता त्यावरून इतके रान उठायची काही गरज नव्हती. आणि इव्हन बायडेनच्या खुलाशात इल्लिगल इमिग्रंट्स आणि इमिग्रेशन प्रोसेस मधून अमेरिकेत आलेले इमिग्रण्ट्स हे दोन्ही एकत्र करून टाकले आहे. बायडेन स्वतः खरा वोक वगैरे नाही. पण त्याला अंतर्गत प्रेशरपुढे झुकावे लागलेले दिसते. यातून डेम्स मधल्या एस्टॅब्लिशमेण्टचा फोकस नक्की कोठे आहे व कोणती विचारधारा डॉमिनंट आहे ते दिसते. इव्हन या मुलाखतीत खास त्याला तो खुलासा करता यावा म्हणून तो प्रश्न प्लॅण्ट केल्यासारखा वाटला.
ट्रम्पने याचा पुरेपूर फायदा करून घेतला आहे नॅरेटिव्ह मधे. तो घेणारच. यांनी असला वोकपणा करायची गरज नव्हती. मुळात हे एका खुन्याबद्दल चालले होते, सर्व इमिग्रंट्सबद्दल नाही.
इल्लिगल नाही, अनडॉक्युमेण्टेड म्हणे. मग त्या लॉजिकने अनडॉक्युमेण्टेड तरी कोठे खरे आहे. सीमेवर त्यांची नोंदणी होतच असते की.
एकतर या खुलाशाची गरज नव्हती.
एकतर या खुलाशाची गरज नव्हती. वोक लोक्स बायडेन ला एवितेवी मत देणारच होते, या वाक्यानेही त्याची मते गेली नसती. पण या वाक्याचा ट्रंप उपयोग करून घेइल व त्याला स्विंग स्टेट्स मध्ये फायदा होईल.
तात्या कन्व्हिक्टेड फेलन झाले
तात्या कन्व्हिक्टेड फेलन झाले की.
दोषी आहे असा निर्णय
दोषी आहे असा निर्णय झाल्यानंतर, २४ तासांत ५४ दशलक्ष $ डोनेशन्स मिळाले. डोनेशन गोळा करण्यासाठी असणारी पक्षाची वेबसाईट पण क्रॅश झाली होती.
https://www.usatoday.com/story/news/politics/elections/2024/05/31/donald...
भास्कराचार्य, तात्याच्या
हरी ओम! हरी ओम! काय मांडुन ठेवले आहे पुढची चार वर्षे हे परमेश्वरच जाणो!
"२००० म्यूल्स" पिक्चर वरची
"२००० म्यूल्स" पिक्चर वरची चर्चा आठवते का? मागा पब्लिक मधे सतत त्याचे उल्लेख होत असत. त्यात चित्रण केलेल्या एका व्यक्तीने केस दाखल केल्यावर तो प्रदर्शित करणार्या कंपनीने सर्व प्लॅटफॉर्म्सवरून तो पिक्चर काढून घेतला आहे - माफी मागून. अर्थात मागा पब्लिकच्या डोक्यात तो फिट्ट बसला आहे ऑलरेडी.
फेक न्यूज
फेक न्यूज
कालची चर्चा बघितली का?
कालची चर्चा बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
२०२४ निवडणूक या विषयासाठी नवीन धागा काढला आहे.
माझी हिंमत झाली नाही काल
माझी हिंमत झाली नाही काल डिबेट बघायची!
इतकी अवस्था दोन्ही पार्टीजची की एक प्रॉमिसिंग कॅन्डिडेट सापडू नये?!
मी ही नाही बघितली.
मी ही नाही बघितली.
मी थोडा वेळ पाहिली. दोघेही
मी थोडा वेळ पाहिली. दोघेही कँडिडेट भयाण , पथेटिक. बायडन इथे शेंडे नेहमी म्हणतात त्या विशेषणांना अगदी १००% पात्र वाटत होता.
त्याला बघणे, ऐकणे म्हणजे शिक्षा होती. ट्रंप नेहमीप्रमाणे लूज कॅनन, खोटे दावे वगैरे. पण किमान फिजिकली बराच फिट आणि मेन्टली अवेअर दिसला ( म्हणजे आहे मैन्टल च पण जसा आहे तसा "प्रेझेन्ट" तरी होता) हेही लिहावे लागावे यापेक्षा दुर्दैव काय!
कालचा शो बघून जे कोणी कुंपणावरचे लोक असतील त्यांना बायडन ने स्वतः लाथ घालून पलिकडे ढकलून दिले असे म्हणता येईल. मी कुंपणावर कधीही नसले तरी आता या अनफिट माणसाला सपोर्ट नाही करू शकत
शिवाय दर चार वर्षांनी ट्रम्प
शिवाय दर चार वर्षांनी ट्रम्प उभा राहील हे टेन्शन घेण्यापेक्षा एकदाच काय ते होऊन जाऊ दे असंही वाटतंय आता मला. (Can't believe I just said that!)
मै +१
मै +१
https://youtu.be/3SJr44m-w1Y
https://youtu.be/3SJr44m-w1Y?feature=shared
जॉन स्ट्युअर्ट चे हे कालच्या डिबेटचे अॅनॅलिसीस बघाच! व्हेरी फनी यट व्हेरी ट्रु!
मैत्रेयीच्या पोस्टशी व स्वातीच्या पोस्टशी सहमत. मला स्वतःला ट्रंप अजिबात आवडत नसुनही मी कालच्या बायडनकडे व त्याने जो काल घोळ घातला त्या पर्फॉर्मंस(?) कडे बघुन मीही त्याला मत देउ शकत नाही. काल जसा चुकुन भ्रमिष्ट अवस्थेत जाउन तो म्हणाला की ही बीट द मेडिकेअर ( त्याला कदाचित म्हणायचे होते की शोअर अप द मेडिकेअर) तस चुकुन अणुबाँबचे बटन भ्रमिष्ट अवस्थेत दाबायचा व जगाचा नायनाट करुन बसायचा!
त्याचा आवाज कोल्ड झालेल्या माणसाचा वाटत नव्हता तर खुपच खंगलेल्या वृद्ध माणसाचा वाटत होता. बोलताना शब्द न सापडणे, मंबलींग करणे, चेन ऑफ थॉट्स कंटिन्यु न करता येणे हे सगळे सिटींग अमेरिकन प्रेसिडंट ( जो अजुन ४ वर्षे सत्ता मागत आहे! गो फिगर!) करतोय हे बघुन डोके गरगरले! कधी कधी तो काय मंबल करतोय हे कळतच नव्हते! अजुन ४ वर्षे तर सोडाच पण ही त्याची कंडिशन ४ महिन्यात काय असेल याचाही विचार करवत नाही.
शेंडेनक्षत्रांच्या बायडनला संबोधलेल्या सगळ्या शेलक्या विशेषणांना काल बायडन जागला.
स्वाती म्हणते तसे एकदाच ट्रंपची ४ वर्षे काय ती होउन जाउ देत याच्याशीही सहमत.
कांट वेट फॉर टुमॉरोज सॅटरडे नाइट लाइव्ह स्किट!
Pages