४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कॉमी - वाचतोय त्याबद्दल. एक पहिला प्रश्न म्हणजे कोर्टाने "त्याने हे केले" हे कोणत्या लीगल बेसिस वर ठरवले? अजून तो त्यासंबंधी एखाद्या खटल्यात दोषी ठरलेला नाही.

म्हणजे त्याने हे केले हे आपल्याकरता उघड आहे. पण डॉन मधल्या संवादासारखे "ये तुम जानती हो, ये मै जानता हूँ, लेकिन पुलिस नही जानती" सारखी सिच्युएशन आहे. कोर्टाला लीगल बेसिस पाहिजे - एखाद्या खटल्यातील निकाल, तेथे सादर झालेला पुरावा - हे कोठून मिळाले?

बाकी कोलोरॅडो मधे तो बॅलटवर नसला तरी फरक पडत नाही हे खरे आहे. पण एक पायंडा म्हणून कोर्टाने उमेदवारी नाकारणे हे लीगल बेसिस वर नसेल तर कोणावरही उलटू शकते.

ट्रम्प कॅम्पेनला इथे चित भी मेरी पट भी मेरी फायदा होऊ शकतो. युएस सुप्रीम कोर्टानेही हे उचलून धरले, तर सगळी दुनिया त्याच्याविरूद्ध उठली आहे असे म्हणतील - जे मागा पब्लिक ऑलरेडी समजते. युएस सुप्रीम कोर्टाने हे रद्द केले तर बघा ट्रम्प निर्दोष आहे असा एक सोपा मेसेज पसरवला जाईल.

१. जानेवारी ६ कमिटीने त्यांच्या रिपोर्ट मध्ये (विकिपीडिया आर्टिकल मधून)-

  • Trump lied about election fraud for the purpose of staying in power and asking for money.
  • Ignoring the rulings of over 60 federal and state courts, he plotted to overturn the election.
  • He pressured Pence to illegally refuse to certify the election.
  • He tried to corrupt and weaponize the Justice Department to keep himself in power.
  • He pressured state legislators and officials to give different election results.
  • He perpetrated the fake electors scheme.
  • He pressured members of Congress to object to real electors.
  • He approved federal court filings with fake information about voter fraud.
  • He summoned the mob and told them to march on the Capitol, knowing some were armed.

ह्या प्रमुख गोष्टी आहेत, ज्या कमिटी रिपोर्ट ने conclusively सिद्ध केल्या आहेत. काँग्रेशनल कमिटी रिपोर्ट पुरेसा लीगल बेसिस असावा. म्हणजे कायद्याचे माहीत नाही. पण घटना घडल्या त्या खात्रीशीर पणे establish करायचे काम त्या रिपोर्ट ने केले आहे असे वाटते. पुन्हा तोच पुरावा कोलोरॅडो ने पहावा हे गरजेचे वाटत नाही.

तुमचे चीत भी.. म्हणणे बरोबर आहे. Trump चे भक्त इतके सिकॉफंटिक आहेत की त्याने भर चौकात खून केला तरी त्या घटनेने ते ट्रम्प कसा ग्रेट हेच दाखवायचा प्रयत्न करतील. आता ह्या पॉइंट वर ते काय म्हणतात हा विचार सोडून देऊन जे योग्य आहे ते करायची वेळ आली आहे असे मला वाटू लागले आहे.

हो त्याबद्दल वाद नाहीच. मागा क्राउड काय ते रॅशनलायझेशन करायचे ते करतील. त्याचा विचार करायची गरज नाही.

काँग्रेस कमिटीचा रिपोर्ट हा पुरावा म्हणून कोर्टाला ग्राह्य धरता येतो का हे माहीत नाही. माझा अंदाज आहे की कोर्टाला कोर्टाचेच निकाल किंवा कोर्टात सादर केले गेलेले पुरावेच ग्राह्य धरता येतात.

हा एक डिटेल वाचनातून सुटला होता.
The decision reverses an earlier one from a Colorado judge, who ruled the ban did not apply to presidents but found Mr Trump had participated in an insurrection.
आधी एका डिस्ट्रिक्ट कोल. जजनेच ट्रम्प insurrection मध्ये सहभागी होता असा निर्णय दिलेला असे दिसते. फक्त १४ व्या अमेंडमेंट मध्ये "होल्ड एनी ऑफिस" मध्ये राष्ट्राध्यक्ष येत नाही असा निर्णय दिला होता. Happy
म्हणजे तुम्ही राष्ट्रविरोधी बंड किंवा निवडणूक लाटण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस मन आणि ऑफिसर होता येणार नाही. राष्ट्राध्यक्ष झाले तर मात्र चालेल, असा निर्णय होता.

पण त्याचा insurrection मधला सहभाग आधीच स्पष्ट पणे डिस्ट्रिक्ट कोर्टाने मान्य केला आहे असे दिसते. ते याचिकाकर्त्याने सादर केलेल्या पुराव्यांवर आधारित असणार, असा अंदाज आहे. कॉलोराडोच्या सर्वोच्च न्यायालयाने हा नियम राष्ट्राध्यक्ष पदाला सुद्धा लागू आहे असा निर्णय दिला.
https://www.bbc.com/news/world-us-canada-67768873

आता मेन या राज्यानेही ट्रम्पला तेथे निवडणूक लढवता येणार नाही असे ठरवले.

ही एक मजेदार बातमी. कॅलिफोर्नियातील सोशॅलिजम वगैरेंना कंटाळून तेथील निवृत्त झालेले काही रिपब्लिकन लोक आयडाहो राज्यात स्थलांतरित होत आहेत. पण तेथील लोकांना हे कॅलिफोर्नियातून आलेले लिबरल/डेमोक्रॅट्स सारखे वाटत आहेत Happy
https://www.foxnews.com/us/california-retirees-flocking-to-small-idaho-t...

Not enough republican Happy

आता पाण्याने लोहचुंबकाची शक्ती नाहीशी होते हा शोध तात्याने लावला आहे Happy फक्त ग्लासभर पाणी ओता मॅग्नेटवर!

तसेच अब्राहम लिंकन पेक्षा चांगल्या पद्धतीने सिव्हिल वॉर निगोशिएट केली असती असा दावाही केला आहे. आता फक्त जीझसच शिल्लक आहे तात्यापेक्षा भारी गटात.

उद्या पुढचे डिबेट आहे. फक्त हेली आणि डिसॅण्टिस. रामस्वामी का नाही ते माहीत नाही. त्याने माघार घेतल्याचे वाचले नाही. उलट एकवेळ तात्या मॉडरेट वाटेल अशी फेकाफेकी केली होती मागच्या डीबेट मधे.

महा अनुभव (दिवाळी) अंकातील कौमुदी वाळिंबे यांचा 'अमेरिकेत भारतीयांचा डंका?' हा लेख इंटरेस्टिंग आहे. सगळीच माहिती नवी नसली तरी काही मुद्दे माझ्यासाठी नवे होते. अमेरिकेतील भारतीय आणि राजकीय पक्षांना केलें फंडिंग , त्यात ज्यू लोकांची तशी आकडेवारी , भारतीय म्हणून भारतीय वंशाच्या उमेदवारांना पाठिंबा किंवा उमेदवारांची अमेरिकन समाजाला भारतीय वंशाचा म्हणून ओळख असणं वा नसणं , इतर आशियाईच्या तुलनेत भारतीय, इ.इ.
लेखिका मायबोलीकर आहेत असं आठवतं.

इंटरेस्टिंग. नाव माबोवर बघितल्यासारखे वाटते लेखिकेचे.

आज डिबेट आहे. पण फक्त हेली आणि डिसॅण्टिस. हेली म्हणे न्यू हॅम्पशायर मधे सिंगल डिजिट फरकापर्यंत पोहोचली ट्रम्पच्या रेटिंगच्या. बाकी ठिकाणी मात्र मागे आहे.

१५ तारखेपासून अमेरिकेच्या २०२४ इलेक्शनची सायकल सुरू होत आहे. १५ ला आयोवा व नंतर २३ ला न्यू हॅम्पशायर प्रायमरीज आहेत.

२०२० च्या निवडणुकीबद्दल नव्याने पुंगळ्या सोडणे सुरू झाले आहे.

जगाच्या अनेक मोक्याच्या जागी युद्धे खदखदत असताना, अनेक ठिकाणी अमेरिकन बोटींवर, सैनिकी तळांवर द्रोन आणि बॉम्ब हल्ले होत असताना संरक्षण मंत्री गायब असतो. त्याच्या आजारपणाबद्दल, होणाऱ्या शस्त्रक्रियेबद्दल राष्ट्रपती (commander-in-chief!) अनेक दिवस पूर्ण अनभिज्ञ असतो (त्यांच्याच संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने कबूल केले आहे) . संरक्षण मंत्र्याच्या खालची व्यक्ती आणि त्या व्यक्तीखालची व्यक्ती ह्या सुट्टीवर आणि unreachable! थोडक्यात संरक्षण खाते निर्नायकी स्थितीत आणि भ्रमिष्ट, मतिभ्रष्ट राष्ट्रपतीला अनेक दिवस ह्या वस्तुस्थितीचा पत्ताही नाही.

दक्षिणेकडील सीमेवरून जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून कोट्यवधी लोक जथ्याने घुसत आहेत. त्यांची पार्श्वभूमी तपासणी करायची राष्ट्रपतींची इच्छा नाही. किती लोक घुसत आहेत ह्याची गणती नाही. टेक्सस आणि अन्य राज्ये हे घुसखोर तथाकथित सँक्चुअरी सिट्यामध्ये पाठवत आहेत आणि त्या शहरांची पंचाईत होत आहे. हॉटेले, शाळा, सगळ्या ह्या बेकायदा निर्वासितांनी भरू लागल्या आहेत. नागरिकांसाठी होणाऱ्या योजनांना कात्री लावावी लागते आहे. करदात्यांच्या जीवावर ह्या बेकायदा घुसखोरांची चांदी होत आहे.

ही सगळी थेरं दुर्लक्षित करून ट्रम्पला लोहचुंबकाचे गुणधर्म माहीत नाहीत म्हणून आम्ही खिदळणार! छान!

तुम्ही एक सेन्सिबल रिपब्लिकन कॅण्डिडेट द्या. या सगळ्या भोंगळ डेम्स पेक्षा चांगले काहीतरी करेल अमेरिकेसाठी असा. त्याला मत द्यायला काही प्रॉब्लेम नाही.

पण निवडणूक हरला तर सगळी गडबड आहे म्हणून स्वतःच्याच मतदारांना उल्लू बनवून कॅपिटॉल काबीज करायचा प्रयत्न करणारा नको.

ख्रिस्तीचे कालचे भाषण ऐकलेत का? टोटल रिस्पेक्ट! २०१६ मधे ट्रम्पला सपोर्ट करण्याबद्दलचा खुलासा एकदम सिन्सियर वाटला.

बहुधा न्यू हॅम्पशायरमधे हेलीला आणखी चान्स मिळावा म्हणून आत्ताच कॅम्पेन मागे घेतलेली दिसते.

कालचे डिबेट थोडा वेळ पाहिले. बोअर झाले.

शेंडेनक्षत्र, अनुमोदन.
या देशाचे सगळे राजकारणच अगदी फालतू होत चालले आहे.
एका बाजूला इतरांना शिव्या देणे नि निवडणुकीबद्दल रडगाणे, तर दुसर्‍या बाजूला सगळा आनंदीआनंदच! जणू काही त्यांना हा सगळा गमतीचा खेळच वाटतो.
<<तुम्ही एक सेन्सिबल रिपब्लिकन कॅण्डिडेट द्या. >>
डेमोक्रॅटमधे तरी कोण आहे सेन्सिबल? डोके ठिकाणावर असलेला?

एकुण मज्जा आहे नि काय? आपापले पैसे नि कुटुंब सांभाळून रहा नि गंमत बघा. भारताचे ओसीआय काढून ठेवा, वेळ आलीच तर.

म्हातारबाचे सरकार रडीचा खेळ खेळत आहे. ट्रम्पला कुठल्याही आरोपात गोवून आपल्या सोयीचे न्यायाधीश आणि एजी असणाऱ्या भागात खटले सुरु करून त्याचा पैसे आणि वेळ दवडायचा आणि आपले घोडे पुढे दामटायचे असला काहीतरी घाणेरडा राजकारणी खेळ खेळला जात आहे. हा एक अत्यंत वाईट पायंडा आहे. जेव्हा दुसरी बाजू हाच प्रकार करेल तेव्हा त्याविरुद्ध कुठल्या तोंडाने दाद मागणार? निष्पक्ष समजल्या जाणाऱ्या न्याय वगैरे यंत्रणा अशा प्रकारे राजकारण करू लागल्या तर एक स्लीपरी स्लोप निर्माण होणार आहे. ह्यात कदाचित ट्रम्प हुतात्मा बनेलही.

जानेवारी ६ चा प्रकार हा दोन्ही महायुद्धे आणि ९/११ चा हल्ला ह्यापेक्षाही काहीतरी भयंकर हल्ला होता असा जो धादांत खोटा बागुलबुवा उभा केला जात आहे त्याला अनेक लोक बळी पडताना दिसत आहेत. दुसरीकडे बी एल एम आणि अँटिफा अनेक शहरात कित्येक दिवस खरोखरचा विध्वंस करत होते त्यांना मात्र काहीही शिक्षा होताना दिसत नाही.
६ जानेवारी ला कॅपिटॉल पोलीस हे उघड उघड आंदोलकांना उत्तेजन देत होते. त्यांना बिनबोभाट हवे तिथे फिरू देत होते हे व्हिडियोत स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारे सापळ्यात अडकवून (एनट्रॅपमेन्ट) लोकांना भयानक शिक्षा दिल्या गेल्या आहेत. हेही भयंकर आहे.

बेकायदा घुसखोरांचा प्रश्न इतका वाईट बनला आहे की कट्टर डेमोक्रॅट असणाऱ्या सी एन एन वगैरे वाहिन्यांनाही याकडे दुर्लक्ष करता येईनासे झाले आहे. नक्की किती स्ट्रॉबेर्या आणि लेटस पाने तोडायची आहेत? ह्या पिकांची इतकी बम्पर उत्पादने होत आहेत का की कोट्यवधी बेकायदा लोकांना आमंत्रित करून त्यांना नागरिकांनाही न दिल्या जाणाऱ्या सुखसुविधा पुरवल्या जात आहेत? नक्की किती घुसखोर घुसल्यावर डेमोक्रॅटिक सत्तेचे समाधान होणार आहे? की कुठलातरी डोकेफिरू अतिरेकी घुसून काहीतरी उत्पात घडवून आणेपर्यंत हे प्रकार होतच राहणार? सगळे संतापजनक आहे.

कुठल्याही पदासाठी उमेदवार निवडताना त्वचेचा रंग अमुक हवा, लिंग तमुक हवे हा आग्रह प्रथम होतो. मग त्या पदाकरिता ती व्यक्ती किती लायक आहे ह्याचा विचार. हेही घातक आहे. विमानाचे पायलट ह्या क्षेत्रात काळ्या किंवा लेस्बियन बायका दिसत नाहीत. मग वोक हवाई कंपन्या सरसकट काळ्या बायका आणि लेस्बियन बायकांना शोधून शोधून भरती करणार. असल्या कारणाने भरती झालेल्या लोकांना काढून टाकणेही अवघड. कारण मग वर्णद्वेष, समलिंगींद्वेष वगैरे नेहमीचे घोष केले जाणार! अशा प्रकारे अमुक रकाने भरणारी व्यक्ती नोकरीला लावून आपण लोकांच्या जीवाशी खेळत आहोत हेही विसरायला होते आहे. अलीकडे झालेल्या विमानाच्या अपघातामागे, किंवा होता होता वाचलेल्या अपघातामागे हीच विचारसरणी कारणीभूत आहे. हार्वर्ड ची नालायक अध्यक्ष बाई हे एक ताजे उदाहरण. अर्थात ह्या बाईने ज्यू लोकांविरुद्ध संतापजनक निष्क्रियता दाखवली नसती तर ह्या नालायक बाईने बिनबोभाट अनेक वर्षे कारभार चालवला असता ह्यात शंकाच नाही.

निदान वोकनेसचे समूळ उच्चाटन करणारा कुणीतरी सत्तेवर येवो. नाहीतर कठीण आहे. पुन्हा हा भ्रमिष्ट म्हातारा सत्तेवर आला तर काय होईल ह्या विचाराने शहारे येतात. पण तेही शक्य आहे.

निकी हेलीची पॉलिसी आहे रिटायरमेंट एज वाढवणे, का म्हणे तर सोशल सिक्युरिटी बँक्रप्ट होणार आहे. तिला एका फॉक्स टाऊन हॉल मध्ये विचारले की DeSantis ने तुझ्यावर टीका केली की तुला म्हणे रिटायरमेंट एज वाढवायचे आहे. तेव्हा ती लगेच मी असे म्हणलेच नाही म्हणू लागली, तेव्हा त्या फॉक्स वाल्याने तिला थांबवून तिची quote दिली, ज्यात ती हीच exact गोष्ट सांगत होती.
सोशल सिक्युरिटी bankrupt होईल की ज्यासाठी रिटायरमेंट वय वाढवण्याची गरज आहे ? या घडीला सुद्धा ते ६५-६७ दरम्यान आहे. म्हणजे आत्ता सुद्धा कमी आहे अशातला भाग नाही.

१. सोशल सिक्युरिटी ८०% बेनेफिटस रिसेंट गणीतांवर विसंबले, तर देऊ शकते, विदौट एनी ऑडिशन ऑफ टॅक्स. जनरली फिस्कली सावध लोक ह्या फंडात भविष्यात तरुण कामगार जी गंगाजळी वाढवणार आहेत ती जमेची बाजू विसरतात आणि फक्त खर्चाकडे बघतात.

२. सध्या सोशल सिक्युरिटी सीलिंग फक्त $१६८००० आहे. तीही २०२४ मध्ये वाढवली, त्याआधी आणखी कमी होती. म्हणजे, $१६८००० डॉलर कमावणारा व्यक्ती आणि मिलियनेर बिलियनेर व्यक्ती एकाच रकमेचा सोशल सिक्युरिटी टॅक्स भरतात. इथे मॅक्स सीलिंग वाढवून ती गंगाजळी वाढवण्यास खूप खूप खूप स्कोप आहे.

असे असताना, निकी हेली तरुण मुलांना सांगते तुम्ही म्हातारे झाला तरी काम करत रहायचे, आणि हेच रीपबलीकन नंतर गोंधळलेला चेहरा करून विचारतात, "ही जेन z अशी का बुवा आम्हाला सपोर्ट करत नाही ??? काय रहस्य आहे ? शाळांमधून indoctrination असणार. आमची काहीही चूक नाही."

निकी हेली का गांगरली ? तिने तिची पॉलिसी पोझिशन नाकारायचा का प्रयत्न केला ? कारण तिला माहितीये तिची पॉलिसी टेरीबल आहे आणि कोणाला आवडणार नाही. तिची पॉलिसी, ही प्रो अतिश्रीमंत आणि अँटी गरजू, रिटायरी, अँटी तरुण कामगार आहे. Trump सुद्धा असल्या भयंकर योजना अनात नव्हता, कारण त्याचे पॉलिटिक्स किमान दाखवण्या पुरते तरी पॉप्युलिस्ट होते. हेली म्हणजे युध्दखोर, आणि श्रीमंतांसाठी कावड वाहणारी. Worst of them all.

आयुर्मान वाढतंय तसं निवृत्ती वय वाढवावं लागणारच आहे. ३५ आणि ४० वर्षे पेन्शन प्लॅन बेनिफिट घेतले जाऊ लागले आहेत. म्हणजे केलेल्या नोकरी इतके, किंवा नोकरी पेक्षा जास्त वर्षे झाले. निवृत्ती वय वाढवण्यात श्रीमंतांसाठी कावड वाहणे पटले नाही.

आयुर्मान वाढतंय तसं निवृत्ती वय वाढवावं लागणारच आहे
>>> असे असावेच असे नाही. जर सीलिंग वाढवून benefits देता येतात तर का देऊ नयेत ?
आणि श्रीमंतांसाठी कावड हा सब्जेक्टीव विचार झाला. मी असे म्हणले कारण रिटायरमेंट एज वाढवणे हे श्रीमंतांना impact बिलकूल करत नाही, गरीब अथवा मध्यमवर्गीयांना फरक पडतो. तर सोशल सिक्युरिटी टॅक्सची सीलिंग वाढवली तर 168000$ वरील उत्पन्न असणाऱ्या लोकांनाच तोशिष आहे. हा ग्रुप जवळपास टॉप १५-२०% कमाल इन्कम गटात येतो. त्यामुळे, ह्यांना नगण्य टॅक्स contribute करून जर निवृत्ती वय कमी ठेवता येत असेल तर का करू नये ? म्हणून मी श्रीमंतांसाठी कावड उचलणे हे शब्द वापरले.

सीलिंग वाढवलं पाहिजेला अनुमोदन आहेच. वय कमी ठेवता आलं तर प्रॉब्लेम काहीच नाही, ते उत्तमच असेल.
अर्थात माझा स्वतःचा काही अभ्यास नाही, पण वय वाढवावं लागेल असा रिसर्च वाचलेला.

निकी हेली ही मॅकेन आणि चेनी यांच्या माळेतील एक शस्त्रास्त्र लॉबीने पोसलेली उमेदवार आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमे तिचा उदोउदो करत आहेत. ती हळूहळू कशी आघाडी मिळवते आहे वगैरे रंगवून सांगत आहेत. पण बहुधा हा फुगा लवकरच फुटेल अशी आशा करु.
म्हातारबाच्या कुशल परराष्ट्रीय नीतिमुळे आपल्याला दोन मोठी युद्धे कायमस्वरुपी लाभलेली आहेत. युक्रेनसाठी कितीही वर्षे, लागेल तितकी मदत करू असे म्हातारबा म्हणाला आहे. इस्रायलमधे सुरु असलेली रणधुमाळी आता पसरत येमेन, इराण, सिरिया पर्यंत पोचताना दिसत आहे. हे सगळे बघून शस्त्रास्त्र लॉबीच्या तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. त्यामुळे अशा परिस्थितीत म्हातारबा पेक्षाही जास्त युद्धखोर राष्ट्रपती आला तर त्यांची चांदीच होणार आहे.
जर देशाच्या दुर्दैवाने निकी हेली रिपब्लिकन उमेदवार होणार असेल तर मी माझे मत आर एफ के ज्युनियरला देईन. तो बरा!

आयोवा मध्ये हेली, डीसांतिस, रामस्वामी सगळ्यांची धूळधाण. हे सगळे ट्रम्प वर फारसे न बोलता त्याला हरविण्याचा प्रयत्न करत होते. हेली आणि डीसांतिस थोडे तरी ट्रम्प का नको बोलायचे. रामस्वामी तर ट्रम्प २१व्या शतकातला सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष आहे एव्हढी चमचेगिरी करायचा. मग तुला कशाला मत द्यायचे बोवा ?

सगळेच गेले हो आता. Trump एकटाच. कोण माईका लाल असेल तर इंडिपेंडंट लढेल, पण ह्यातले कोणी नाही करणार.

https://www.axios.com/2024/01/13/john-kerry-biden-campaign-climate-2024
सापडला! बायडनच्या निस्तेज, हतबल, हताश पुनर्निवाचन कार्यक्रमाला नवसंजीवनी देणारा सापडला. जॉन केरी!
८१ वर्षाच्या गलितगात्र वृद्धाच्या कॅम्पेनमधे नवचैतन्य सळसळणार, ८० वर्षाचा नवयुवक आता तो पराक्रम करणार!
इतका तेजस्वी, सौंदर्यवान (लिव्हिंग टोटमपोल!) चेहरा बायडनला प्रचारासाठी लाभला हे त्याचे भाग्यच!

ट्रंप नामक झंझावात रिपब्लिकन प्रायमरीवर आदळताना दिसत आहे. आयोवामधे प्रचंड यश मिळाले त्यामुळे कदाचित बाकीच्यांचे स्थान डळमळीत झाले आहे.
काहीतरी सबब पाहून , कायद्याचा कीस काढून, मनाजोगता न्यायाधीश शोधून, रडीचा डाव खेळणार्या डेमोक्रॅटिक लोकांनी ट्रंपला निवडणूक लढवण्यापासून वंचित केले तर डी सांटिस पुढे यावा अशी इच्छा आहे. ट्रंपला तो एक चांगला पर्याय आहे. प्रायमरीत कितीही मोठा विजय मिळाला तरी शेत खाणारे कुंपण अर्थात डेमोक्रॅटिक पक्ष आणि त्यांची यंत्रणा विरोधकाला निवडणूकच लढवू द्यायची नाही ह्या मोहिमेत व्यग्र आहे.
लोकशाहीच्या नावाने उठसूठ गळे काढणारे डेमोक्रॅट आपल्या पक्षाच्या प्रायमरी निवडणूकाही होऊ देत नाहीत. निदान चारपाच लोक तर म्हातारबा ऐवजी राष्ट्रपतीचे उमेदवार होण्यास उत्सुक आहेत पण प्रायमरी निवडणूक ज्यात उमेदवार मतदारांना आपली भूमिका पटवून देतात ती लोकशाही प्रक्रिया ह्या लोकशाहीच्या तारणहारांना मंजूर नाही! छानच!

विवेक रामस्वामी एक चांगला उमेदवार होता पण ट्रंपच्या झंझावातापुढे त्याचा टिकाव लागणे अशक्य होते. पुढच्या वेळेस त्याला संधी मिळावी अशी इच्छा आहे. अन्य कुणाच्या मंत्रीमंडळात वा उपाध्यक्ष म्हणून विवेकला काम करण्याची इच्छा नाही असे आता तरी म्हणतो आहे. बघू या.

डेमोक्रॅटिक मंडळी आता बागुलबुवा उभा करत आहेत. ट्रंप सत्तेवर आला तर लोकशाही नष्ट होणार, समस्त पत्रकारांना तो पहिल्या दिवशी गोळ्या घालणार, सर्व विरोधकांना कोंन्सट्रेशन कॅम्पात डांबणार. तो हिटलरचा जास्त भयानक अवतार असेल वगैरे काहीच्या काही.
ह्या हिटलरी बागुलबुव्याच्या जवळपास कुणी गेले असेल तर तो हा भ्रमिष्ट बायडनच. एकामागून एक अध्याक्षीय अध्यादेश काढून अनेक भयानक निर्णय घेतले. विविध विकासकामे रद्द केली, हौती बंडखोरांना अतिरेकी म्हणून केलेली घोषणा रद्द करणे वगैरे वगैरे.
६ जानेवारीच्या महाभयानक आंदोलनात भाग घेतलेल्या अनेक निरुपद्रवी लोकांना अवाच्या सवा शिक्षा देऊन सूड उगवला.
आपल्या पोराबाळांवरील खटले रखडत रहातील किंवा किरकोळ शिक्षा होऊन सुटका होईल असा प्रयत्न केला.
असा हा जराजर्जर खलपुरुष पुन्हा निवडून आला तर ह्याचा पुढचा जास्त भयानक अध्याय बघावा लागेल.

>>६ जानेवारीच्या महाभयानक आंदोलनात भाग घेतलेल्या अनेक निरुपद्रवी लोकांना अवाच्या सवा शिक्षा देऊन सूड उगवला. >> Rofl Rofl
बायडन आहे तर हसायचे वांधे झालेले वाटायचं. तर असं अजिबात नाही लोकहो!
तात्या गेला, रुडी गेला
स्टँडप झाला पोरका
मागणे धुमकेतू आता
आपल्या द्या पादुका!

अध्यक्षीय अध्यादेश
Trump - २२०.
बायडेन - १३०.
ओबामा -
टर्म १- १४७
टर्म २- १२९

२०२० मध्ये तर ट्रम्प समर्थक ओबामाच्या दोनी टर्मची टोटल ट्रम्पच्या एक टर्म सोबत दाखवून हे बघा ट्रम्प ने कसे कमी अध्यादेश दिलेत म्हणत होते Happy

Pages