दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाड्यांची टोकं एकमेकांना बांधायचा उपाय करून पाहतो. >>> नाड्यांची टोके अशीही बांधावीतच. नेफ्यात जाऊन बसत नाहीत नाड्या ऐनवेळेला Lol

धनुडी, सेमी ऑटो मॅटिक मशीन मध्ये असं होणं निदान मोठ्या कपड्यांच्या बाबतीत टाळता येतं. ड्रायर मध्ये टाकतानाच एकेक कपडा सोडवून टाकायचा. वॉशरमध्ये पाणी असताना हे तितकं कठीण जात नाही. बाकी हूक, नाड्या बांधणे हा उपाय आहेच.

किचन ची चिमणी साफ करण्याचा घरगुती सोपा उपाय आहे का काही?
मला अजून ती नेमकी साफ करायची कशी तेच उमगलेलं नाहीये.

किंवा अर्बन कंपनी तून वगैरे लोक येऊन साफ करून देतात का?

तुमच्या कडे जी चिमनी आहे त्या मॉडेल क्लिनिंगचे युट्युबवर व्हडिओ शोधून पहा, सापडतील.
अर्बन कंपनीवालेप ण करून देतात साफ 590 मध्ये.
त्यांना बोलावून एकदा करून घ्या व ते कसे करतात ते पहा. पुढच्या वेळे ला तेवढे सारे नाही तरी oil tray, mesh साफ करणे स्वतःला सहज जमेल.

आज नाड्यांची टोकं बांधून कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकले. गुंता झाला नाही. थँक्स अस्मिता आणि इतर मंडळी.

आधी एक साधी गाठ मारून नंतर दोन्ही टोकांची घट्ट गाठ बांधली तर दरवेळी मशीनला टाकताना टोके सोडवावी बांधावी नाही लागणार. वेळ वाचेल. चुकून टोके बांधायला विसरले तर मशीन मध्ये गुंता नाही होणार.

शक्यतो असं नाही करता येणार.ते 'तुम्ही वेगळ्या देशाचा पत्ता वापरताय, त्या देशाच्या अमेझॉन वर जा' असा मेसेज देऊन त्या देशाचं अमेझॉन उघडतात.कधीकधी वस्तू दोन्ही देशीय अमेझॉन बवर असली(सेलर ने इंटरनॅशनल शिपिंग घेतले असेल तर) त्या देशाचे सेम वस्तू चे पेज उघडेल आणि तिथून नेहमीच्या पद्धतीने ऑर्डर होईल.

<< अ‍ॅमेझॉन ईडिया वरुन ऑर्डर >>
अ‍ॅमेझॉन ईडियाचा अनुभव नाही, पण मी अ‍ॅमेझॉन जपानवरून बऱ्याचदा खरेदी केली आहे.

सगळे विक्रेते परदेशात शिपिंग करत नाहीत, पण काही जण करतात. इंटरनॅशनल शिपिंग आणि कस्टम ड्यूटी लक्षात घ्यावी लागेल.

आज नाड्यांची टोकं बांधून कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकले. गुंता झाला नाही. थँक्स अस्मिता आणि इतर मंडळी. >>> यावरून "जीवनाचंही असंच असतं" वाली एखादी पोस्ट कोणीतरी सहज लिहू शकेल Happy

दडपून वाटेल तेवढे न्या >>> Lol

याचे संत्रे सोलतोय. कारण सर्वांना माहीत असेलच असे नाही. तो सगळा सिक्वेन्स इथल्यासारखाच आहे Happy
https://www.youtube.com/watch?v=U7mBqJsBL3w&t=408s

ज्यांची शेती आहे, ज्यांना शेतीतले ज्ञान आहे त्यांनी जरा मला मार्गदर्शन करा.

मला खालील झाडे लावायची आहेत.

आंबा, डाळींब, चिक्कू, पेरू, नारळ, चिंच, जांभुळ,
लिंबू, आवळा, शेवगा, केळी, पपई.

जिथे लावायची आहेत ती जागा मुळशी मधे आहे. भातशेतीची आहे. पुर्वेच्या बाजूला उतार आहे.

वर पैकी कोणती झाडे (ज्यांना पाणी कमी लागेल अशी) वरच्या बाजूला लावावी व कोणती झाडे खालच्या बाजूला (जिथे पाणी जास्त वेळ असते) लावावी ?

ओव्याची पाने, ज्याची भजी करतात, त्याचा अजून काय उपयोग करतात? खूप छान भरपूर पाने आलीत पण मला भजी नाहीत करायची.

ओव्याच्या पानांचा ग्रीन राईस दांडे लीच्या होम स्टेमध्ये खाल्ला होता. हिमि व पाने वाटून भाताला लावून फोडणीला घालायचा व तळलेले अशी पाकृ सांगितली होती. करून बघायचीये...

मी पण करून बघेन
ती पाने सुकवून चुरून ठेवली तर वास राहिल का बघते.

https://youtube.com/shorts/iVnOkVVIs7Q?si=WYogfkpzDjFL8RuI

आजी कडून शिकले मी असं सार,ती शिर्शी ची होती. थंडीच्या दिवसात चविष्ट आणि आरोग्यदायी
आम्ही ताक वापरतो आणि मिरे थोडे जास्त
असंच कच्चा टोमॅटो चं सार पण करतात

Risotto rice आणि boiled rice - उकडीचे तांदूळ (इडली डोसा साठी वापरतो ते) दोन्ही काचेच्या बरणीत सोडुन ठेवले होते. मधे प्रवास आणि इतर कामे यामुळे दुर्लक्ष झाले. आता दोन्हीतील फरक कळत नाही. कसे ओळखु?

अतरंगी, शेतात सर्वप्रथम पश्चिम व दक्षिणेस झाडे लावणे गरजेचे आहे कारण गरम हवा तिथुन येणार ज्याचा शेतपिकावर परिणाम होणार. तर वृक्षभिंत या दोन बाजुंना उभी करायचा प्रयत्न करा. त्यानंतर उरलेल्या बाजु कव्हर करा. आता दरवर्षी तापमान वाढतेय, वाढलेले तपमान जास्त पाऊस घेऊन येणार व हा पाऊस आधीच्याच वेळेत पडणार म्हणजेच कमी वेळात पडणार. म्हणजेच तो पडताना वादळाच्या रुपातच पडणार.

हे लक्षात घेऊन झाडांची निवड करा. तुम्हाला आवडतात ती झाडे लावण्यापेक्षा तुमच्या परिसरात वाढणारी झाडे निवडा. आणि नर्सरीतुन आणत असाल तर लहान झाडे आणा. मोठ्या झाडांनी जास्त वेळ नर्सरीत पिशवीत काढलाय. त्यांच्या मुळांची क्षमता तितकी कमी झालेली आहे हे लक्षात असुद्या. झाडे विकत आणुन लावण्यापेक्षा बिया लाऊन उगवलीत तर जास्त मजबुत होणार, वादळात, पावसात टिकणार हे लक्षात घ्या. येणारा काळ सगळ्यांचीच परिक्षा घेणारा आहे.

शेतीत रस असेल तर यु ट्युबवर निसर्ग मित्र - बदलापुर चॅनेलचे राजेंद्र भट यांचे विडिओ बघा. शेतीत कोणती झाडे हवीत यावरही विडिओ आहेत.

वर पैकी कोणती झाडे (ज्यांना पाणी कमी लागेल अशी) वरच्या बाजूला लावावी व कोणती झाडे खालच्या बाजूला (जिथे पाणी जास्त वेळ असते) लावावी>>>>>>. झाडे बाल्यावस्थेत असताना कायम बारा महिने पाणी द्यावे लागते. नारळ, आंबे यांना नंतरही पाणी द्यावे लागते, नाहीतर फळांवर परिणाम होणार. पाणी साचुन राहात असेल तिथे झाडे लावली तर मुळे कुजुन झाडे मरणार. हा विचार करुन झाडे लावा.

विडिओ माहिती देणार. तुमच्या जागेत काय योग्य अयोग्य, काय करायचे व टाळायचे ह्याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार. Happy

कच्चा तांदुळ दाताने चावल्यस तट्कन तुटेल, उकडीचा तुटणार नाही, थोडा कडक लागेल. हातात घेऊन बघितला तरी फरक कळेल असे वाटतेय.

रिझोतो राईस कसा दिसतो पाहिला नाही.उकडा दिसायलाच मळकट, अर्ध पारदर्शक दिसेल. शिवाय रिझोतो राईस चे दाणे उंचीला मोठे लांब असतील.उकडा ला लॉंग ग्रेन बासमती कोणी जास्त वापरत नाही, दाणे टोकाला राउंडेड असतील(आता मला 'दोन्ही तांदळाचा फोटो टाक' म्हणण्याचा मोह होतो आहे Happy )

साधना,

पश्चिमेस झाडे लावली आहेत. दक्षिणेस थोडीच लावली आहेत. तिकडे आता जास्त लावतो.

हो. मी लिहिलेली सगळी झाडे आजुबाजूला आहेत.

आत्ता सगळी मिळून २४ झाडे लावली. त्यात काही छोटी रोपे आहेत तर पाच सात मोठी (नर्सरीतून तीन ते चार वर्षांची) झाडे आहेत.

झाडे लावताना ॲालमोस्ट सगळी झाडे जमिनीपेक्षा दोन ते तीन फुट वर लावली आहेत. पाण्यासाठी ड्रिप लाईन टाकणार आहे.

निसर्गमित्र चॅनल पाहतो.

रिसोटो राइस चा दाणा बुटका , जाडसर आणि पांढुरका असतो. उकडा तांदूळ थोडासा ट्रांसलुसंट असतो, आणि त्याला विशिष्ट दर्प असतो.

ओव्याची पाने तुपावर जराशी परतून खोबर्‍याच्या चटणीत घालता येतील. ( हिरवी मिरची, खोवलेले खोबरे वाटून घ्यायचे., शेवटी ओव्याची पाने घालून मिनिटभर वाटायचे. आल्याचा तुकडा घालायचा आवडत असल्यास. मग मीठ आणि मोहरी-कढीपत्ता- हिंग - सुकी मिरची फोडणी घालायची वरून )

Risotto vs boiled rice बद्दल विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या प्रतिसादांसाठी आणि माहितीसाठी सर्वांचे आभार. आता अजुन इथे फार काही लिहिण्याचा सांगण्याचा मुड नाही.
(माबो उघडल्यावर पहिलीच बातमी अकु बद्दल वाचली, तिला एकदाच भेटले आहे, पण तरी फार जवळचं कोणी गेल्याचं दुःख होत आहे. Sad )

साधना, Rice grain दाताने तोडून पाहिला, पण फार काही फरक वाटला नाही.
अनु आणि मेधा, दोन्ही rice grains बरेच सारखे दिसतात. किंचित जास्त पांढरा वाटणारा grain risotto असावा.
मेधा, नाही, वास तर वेगळा वाटत नाही.
सोनाली, तुझ्या टीप प्रमाणे आता दोन्ही rice एकेक चमचा शिजवून पाहते.

पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार. Happy

रिझोतो बेताला गुडबाय म्हणून दोन्ही तांदूळ मिक्स करून इडलीत वापरून टाकावे.उकडा तांदूळ रिझोतो मध्ये टाकला तर रिझोतो बिघडेल.पण रिझोतो राईस इडली साठी भिजवला तर इडली बिघडणार नाही.फार तर थोडे उडीद जास्त/पोहे हासत/मेथीदाणे असं करावं लागेल.

रिझोतो बेताला गुडबाय म्हणून दोन्ही तांदूळ मिक्स करून इडलीत वापरून टाकावे.उकडा तांदूळ रिझोतो मध्ये टाकला तर रिझोतो बिघडेल.पण रिझोतो राईस इडली साठी भिजवला तर इडली बिघडणार नाही.फार तर थोडे उडीद जास्त/पोहे हासत/मेथीदाणे असं करावं लागेल.

Pages