दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केसांच्या घर्षणाने निर्माण होणारी स्थितीक विद्युत (स्टॅटीक इलेक्ट्रीसिटी) ही उडीव बलाविरुद्ध अवरोध वाढवायचं काम करेल असा माझा कयास आहे.

ह पा.. Happy
आम्हीही शालेय जीवनात फिजिक्स इतक्या सिरीयसली घेतलं असतं तर...!!!
ह पा म्हणजे हजरजबाबी पारंगत म्हणायला हवे!!

ह‌पा Lol
मी तर इलास्टिकची गांधी टोपी असेल असं समजून गप बसले होते.‌

मला अनेक दिवसांपासून असा प्रश्न आहे..की विड्याचा शोध कुणी लावला असावा?
म्हणजे पान , चुना, काथ, सुपारी...असे पूर्णतया वेगवेगळे घटक एकत्र वापरुन असा काही पदार्थ तयार करायचं डोकं कुणी चालवलं असेल?

सेम विथ "फोडणी"
तेल तापवायचे ..त्यात मोहोरी, जिरे, हिंग घालून मग भाजीच्या फोडी टाकायच्या.... साधे सगळे घटक एकत्र मिसळून गॅसवर चढविले असे नाही.... हे कुणी शोधले?

खरं आहे. हाच प्रश्न मला स्क्रूबद्दल पडतो. ती वस्तू गोल फिरवली की आत जाईल असं डिझाईन कुणाच्या डोक्यात आलं असेल?

केसांच्या घर्षणाने निर्माण होणारी स्थितीक विद्युत (स्टॅटीक इलेक्ट्रीसिटी) ही उडीव बलाविरुद्ध अवरोध वाढवायचं काम करेल असा माझा कयास आहे. >>>
माझ्या मते  याचा काही ही परिणाम होणार नाही. कारण जरी केसांतील ऋण विद्युतभारीत कणांतील भार टोपीच्या कडेत स्थानांतरीत झाला तरी केसांतील ऋणभार आणि टोपीतील ऋणभार हे रिपल्सिव्ह फोर्स तयार करायला हवेत पण ते तसे होणार नाही कारण टोपी चे मटेरियल म्हणजे  - कापड, हे विद्युत सुवाहक असल्याने तो ऋण भार तेथेच राहणार नाही तो टोपीतील इतर कणांमध्ये वाहून नेला जाईल. 
लहानपणी आपण जेंव्हा प्लास्टिक पट्टी केसांवर घासून कागदांच्या कपट्यासमोर न्यायचो तेंव्हा प्लास्टिक विद्युत दुर्वाहक असल्याने ते ऋण भारीत कण तेथेच स्थिर राहायचे आणि कपट्यांतील धन भारीत बाजूला आकर्षित करायचे जे कापडाच्या बाबतीत होणार नाही. आणि तसेही हा भार इतका क्षीण असतो की वाऱ्यासमोर त्याचा काहीही निभाव लागणार नाही.

... चा शोध कुणी लावला असावा? >>> यामध्ये कोणत्या व्यक्तीने हा शोध लावला असावा याचे कुतूहल नसून तो शोध कसा लागला असावा याचे कुतूहल आहे, असे गृहीत धरून ....
माझ्या मते या गोष्टी सूक्ष्म टप्प्याने घडल्या असाव्यात, व अनेक प्रयोगाअंती त्यांचे प्रचलित स्वरूप निर्माण झाले असावे. उदा. अनेकांनी अनेक वृक्षांची पाने खाऊन त्यापैकी विड्याचे पान चविष्ट लागते असे लक्षात आल्यावर त्याचा वापर वाढला असावा. इतर पदार्थांचेही तसेच. मग, अनेकांनी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी टाकून खाऊन बघितले असेल. त्यापैकी जे चवीला चांगले लागते (किंवा अन्य कोणत्या दृष्टीने उपयुक्त आहे) त्या मिश्रणाचा वापर वाढला असावा व त्यातून आज प्रचलित असलेल्या पान-मिश्रणांपर्यंत येऊन पोचलो असेल. आणि ही प्रक्रिया निरंतर आहे व आजही चालू आहे. एखादा नवीन जिन्नस बाजारात आल्यावर तो अनेक पदार्थांत टाकून ते पदार्थ कसे कसे लागतात ते आपण आजही पाहतोच.
(आता असे प्रयोग मानवाला का करू वाटतात? याचे उत्तर मला माहित नाही. पण उत्सुकता, कुतूहल, प्रयोगशीलता हे गूण मानवात (व अन्य काही विकसित प्राण्यांत) उपजत आहेत. अगदी लहान मुलेसुद्धा अनेक प्रयोग करत असतात.)
जैविक उत्क्रांती सुद्धा याच प्रकारे काम करत नाही का? अनेक मुटेशन्स (प्रयोग) मधून उचित (उपयुक्त) टिकून राहतात. त्याद्वारे घडणारा बदल हा खूप सूक्ष्म असतो. पण कालांतराने ह्या सूक्ष्म बदलांची बेरीज होऊन मोठा बदल निर्माण होतो. या मोठ्या बदलाकडे पाहताना आपल्याला आश्चर्य वाटते व याची निर्मिती कशी झाली असेल असा प्रश्न पडतो. उदा. डोळा.
इतर मानवनिर्मित गोष्टींबद्दल सुद्धा हाच नियम लागू होतो असे मला वाटते. उदा. पानात आणि फोडणीत मूठभर घटक आहेत, पण Boeing-७४७ मध्ये साठ लाख सुटे भाग आहेत. याची सुरवात जेंव्हा मानवाने प्रथम गडगडणारी गोष्ट सहज व वेगात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते हे समजण्यातून झाली. असंख्य चुका, प्रयोग, सुधारणा तुन इथपर्यंत पोचलो.

यामध्ये कोणत्या व्यक्तीने हा शोध लावला असावा याचे कुतूहल नसून तो शोध कसा लागला असावा याचे कुतूहल आहे.. हो हो, बरोबर आहे तुमचे गृहितक!
Happy
खरेच...मानव कुठून कुठे येऊन पोहोचला....!

चांगला मुद्दा, फाविदडि >>> Rofl

काहीही संक्षिप्तरूप, हे तर उद्धव ठाकरेला नवीन दिलेलं नाव वाटावं इतकं जवळ जातंय Biggrin

त्यापेक्षा मला ते पोंनियीन सेलवन २ मधल्या चींनंजिरू नीलवे गाण्यातल्या "अर्थम् अळिंददडी" आणि " रत्मम ओइंतदडी" या शब्दांच्या जास्त जवळ जाणारं वाटलं. गाणं खूप सुंदर आहे, ऐकलं नसल्यास नक्की ऐका.

(तमिळ येत नाही. वरच्या शब्दातली चू भू दे घे.)

<<<<माथेरान मधे एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात जायचा विचार करत आहे. पूर्वी MTDC मधे राहिलो होतो. आता दुसरीकडे 2 दिवस रहायचा विचार आहे. काही पर्याय सुचवा माबोकर हो..

Submitted by धनवन्ती >>
आम्ही हाॅटेल Westend ला राहिलो. खूप छान आहे. प्रशस्त जागा आणि खूप मोठी मोठी जुनी झाडे. स्वच्छ आणि शांत आहे. तरणतलाव आहे. मुलांना खेळणी आहेत. आम्हाला हेरिटेज रूम मिळाली. 160 वर्षे जुना पण मजबूत बंगला. रूमची उंची जवळपास 22 फूट. छान वाटले तिथे रहायला. ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण तिथेच घेतले. चांगले होते.
विकेंडपेक्षा मधल्या दिवसात दर कमी आहेत.

माबोकर, कोरफडीची जास्त आलेली पाने टिकवून कशी ठेवावीत?
झालयं असं की कुंडीत लावलेल्या कोरफडीला खूप पाने आली, ती वापरून संपेनात. आणि त्या वजनाने ते रोपटे तुटूनच पडलेय सकाळी. रसरशीत पाने टाकून देववत नाहीत. शेजापाजारी 3-4 दिलीत पण अजून खूप शिल्लक आहेत.
युट्यूब पेक्षा इथला प्रत्यक्ष अनुभव जास्त मोलाचा आहे.

सबंध पाने माहित नाही पण पानातला गर काढून फ्रीझमध्ये ५-६ दिवस राहतो. फ्रीझरमध्ये अजून जास्त राहील (याचा अनुभव नाही) .

एक माहिती हवी होती.
माझ्या परिचयात एक काका आहेत. खूप सुंदर पेंटींग करतात. त्यांनी त्यांची काही चित्रे फेसबुकवर डकवली होती. तर त्यांना बर्‍याच विचारणा झाल्या की विकाल का ? परदेशातील ही बरेच लोक इच्छुक आहेत त्यांची चित्रे घ्यायला.
त्यावर काका म्हणाले की ते लोक विचारतात की तुमचे एन एफ टी अकाउंट आहे का? त्यावर व्यवहार होईल का?

तर हे एन एफ टी अकाउंट काय आहे? विश्वासार्ह आहे का? ब्लॉकचेन आहे अशी गूगल वर माहिती मिळाली.
भारतात वैध आहे का?
त्यांनी ओपन करावे का?

https://wise.com/in/send-money/

ह्या वेबसाईट वरुन बाहेरुन पैसे मागवता येतात. आपले डिटेल्स द्यायचे आणि परदेशातुन ते डिटेल्स वापरुन पैसे पाठवता येतात. थेट आपल्या अकाऊंटमध्ये रुपयात क्रेडिट येते. यांचे चार्जेस २-३ % आहेत जे पे पॅल पेक्शा कमी आहेत.

नाही, NFT हा नुसता पेमेंट गेटवे नाहीये.
त्यात केलेल्या पेंटिंग चे ( अथवा कोणत्याही कलाकृतीचे) हक्क डिजिटल स्वरूपात एनकोड केलेले असतात. जे फक्त ओनर ट्रान्स्फर करू शकतो. त्यामुळे आपले हक्क सुरक्षित राहतात; आणि अर्थात पैशांची ही देवाणघेवाण करता येते.
ही मला मिळालेली अर्धवट माहिती आहे!

ते क्रिप्टो / बिटकॉइन टाइप काही आहे का..की कसे...
सेफ आहे का? भारतात चालेल का?
हे विचारते आहे.

सध्या पुण्यात अनेक ठिकाणी नवीन इमारतींचे बांधकाम चालू आहे. बरेचदा खाली खोल खणले की पाणी लागते. जे मोटरच्या सहाय्याने उपसून पाईपने खुश्शाल बाहेर रस्त्यावर ड्रेनेज मधे सोडलेले दिसते. चांगले निवळशंख, स्वच्छ पाणी. हजारो लिटर!
उन्हाळ्यात असे पाणी वाया जाताना पाहून जीव हळहळतो . हे पाणी त्याच बिल्डरला बांधकामासाठी वापरायला अनिवार्य केले पाहीजे.
या साठी काय करावे?
कॉरपोरेशन वाले काहीच करत नाहीत का?

हल्ली महाराष्ट्रात Property rent Registration रीमोटली करायची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे अस वाचानात आल , कोणी देशाबाहेरुन आधार thumb scanner वापरून registration केलय का मागच्या एका वर्षात? केल असेल तर त्याची process काय आहे माहिती आहे का कोणाला ?

धागा चुकीचा असेल तर योग्य धागा सुचवा , हा प्रश्न तिथे हलवेन , धन्यवाद .

पुणे, मुंबई, नाशिक अशा शहरांचा ताबा बिल्डर माफियाने घेतलेला आहे. प्रत्येक पक्षात हेच निवडून येतात. नियम दाखवणार्‍या अधिकार्‍यांना गलिच्छ शिवीगाळ होते. शासकीय अधिकार्‍याची सुद्धा तक्रार पोलीस नोंदवून घेत नाहीत. पंधरा वीस वर्षांपूर्वी मनपाच्या अभियंत्याला झालेल्या शिवीगाळीच्या विरोधात सर्व कर्मचारी एकत्र येऊन ठिय्या आंदोलनासाठी बसले होते. आता जी पिढी शासकीय सेवेत आहे ती निवडणुकीत काम केलेले कार्यकर्तेच आहेत. त्यामुळे काही लॉजिकल गोष्ट घडेल याची शक्यता नाही.

मायबोली वर विविध मराठी इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्यासाठी एक धागा होता .त्याची माहिती हवी आहे.

Pages