दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग बकरा व शेवटी चक्क गेंडा बळी द्यावा लागेल व आसामात जाऊन गेंड्याची शिकार करणे जोखमीचं असतं सांगून तिच्याकडून १५ लाख वगैरे उकळले होते या बाबाने::
Are you serious, हसावे की रडावे हेच कळत नाहीये

Are you serious, हसावे की रडावे हेच कळत नाहीये>>>
ही खरी गोष्ट आहे. मटा की लोकसत्ता पेपरमध्ये बातमी आली होती. आधी विअर्ड वाटलं पण नंतर त्या स्त्रीविषयी खूप वाईट वाटलं.

लहान बाळ झालं आहे मैत्रिणीला, मुलगी. काय gift द्यावं भेटायला जाताना?
अजून दोन -तीन बाळे due आहेत पुढच्या काही महिन्यात( इतर वेगवेगळ्या मैत्रिणींना ). Happy gifts घेऊन ठेवावे असा विचार आहे. सुचवा. नेहमीचं कपडे, गादी खुळखुळा वगैरे नको कारण आता माझ्या मैत्रिणींना २ रे बाळ होत आहेत. हे सगळं आधीच असतं म्हणून Lol

मानव Lol

हेहे Happy डायरेक्ट 5 किंवा 10 वर्षांची बाळं झाली असती तर काय मजा.
लहान बाळाला:
मऊ पातळ स्लीव्हलेस स्वेटर(फर्स्ट क्राय वर चांगली मिळतात)
मऊ स्लीव्हलेस उन्हाळी शर्टस, फ्रंट ओपन.
डायपर पॅन्ट
(बेबी कॅरी किंवा बेबी बॅग अजिबात देऊ नका.खूप येतात.ब्लॅंकेट दिले तर बेबी ला ती/तो 5 फुटाचा होईपर्यंत वापरता येईल असे द्या.)
(संस्कारदृष्ट्या घरी वापरणे इन लॉज ना चालत असल्यास) चांगल्या कॉटन चे बेबी बाथरोब
उन्हाळी टोपी एखादी,डेनीम किंवा कॅनव्हास ची
(कपडे गादी खुळखुळा नको हे आता वाचलं)

डायपर बॅग ज्यात बॉटल्स, नॅपीज, टिश्यू, एखाद ब्लॅंकेट, एक चेंजिंग सेट असे सगळे ठेवता येईल. कापडी बॅग्स फार बोअर असतात. या बॅग्स स्मार्टही दिसतात. त्यामुळे बाबा लोकांनी पकडल्या तरी ऑकवर्ड दिसत नाहीत. बाहेर गेलं की अगदीच मॅटर्नल लूक येत नाही Wink

नर्सिंग पिलो

बाळासाठी कॉटन नीटेड किड्स ब्लॅंकेट जी किमान ४ वर्षापर्यंत वापरता येतात. मी बऱ्याच जणांना दिली व सगळ्यांना आवडली होती

मस्लिन - मुलांना बांधून ठेवायचे असेल तर. अलीकडे काही पालकांना आवडत नाही आणि मुले पण हात सोडवून घेतात. पण एकंदरीत हे कपडे आंघोळीनंतर टॉवेल म्हणून, खूप उन्हाळा असला तर अंगावर टाकायला वगैरे उपयोगी ठरतात.

स्लीप सॅक - बांधून ठेवायच्या ऐवजी फक्त झोपण्यापुरती वापरायला योग्य

बाळासाठी भरपूर कोणी कोणी काही काही देणारच असते. बाळाच्या आईला गिफ्ट म्हणून नुट्रिशन्स संबंधी / बेली फॅट कमी होण्यासाठी / तत्सम काही सुयोग्य प्रॉडक्ट किंवा सर्विसेसचे पॅकेज देणे रुचेल पटेल तर देण्याबाबत विचार करता येईल का !!

बाळाच्या आईला गिफ्ट म्हणून नुट्रिशन्स संबंधी / बेली फॅट कमी होण्यासाठी / तत्सम काही सुयोग्य प्रॉडक्ट किंवा सर्विसेसचे पॅकेज देणे रुचेल पटेल तर देण्याबाबत विचार करता येईल का
>>>> ही सूचना चांगली आहे. पण यावरून रामायण महाभारत होऊ शकते घरात. शिवाय सुरुवातीचे ३-४ महिने आईने एकटीच घरातून बाहेर पडण्याची शक्यता अतिशय लिमिटेड असते.

कुठल्या ब्रँडचे डायपर वापरतात ते विचारा आणि ते द्या. किती मिळाले तरी कमीच असतात. चावी देऊन वाजणारी खेळणी असतात बघा. कर्णकर्कश नव्हे, खूप छान मंद आवाजात म्युझिक वाजतं (टिंग टिंग वालं). काही मुलं ते ऐकून छान झोपतात पण.

वेगवेगळी स्तोत्र रेकॉर्ड केलेले एक डिवाइस मिळते. ते देऊ शकाल. मंद आवाजात लावुन ठेवता येईल बाळाच्या शेजारी. प्युर इसेन्शिअल ऑइल आणि बर्नर देऊ शकता. लव्हेंडरच्या वासाचं. बाळ आणि आई छान झोपतील. घरी येऊन ब्युटी ट्रीटमेंट करायचं पॅकेज. आईलाही जरा फ्रेश वाटेल. बेसिकली पॅम्पर द मॉम अँड पॅम्पर्स फॉर द बेबी. Happy
अजून एक - फॅमिली फोटो शूटचं पॅकेज ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असेल. मेक मेमोरीज
सॉरी सॉरी पण अजून एक - बाळाच्या ताई / दादाला अजिबात विसरू नका. त्याला एक खेळणं नक्की द्या दादा / ताई झाल्याबद्दल. हे सर्वात महत्वाचं आहे.
आता थांबते. Happy

>>आता माझ्या मैत्रिणींना २ रे बाळ होत आहेत.>> नव्या बाळासाठी आणि आईसाठी दुकान्/मॉलचे गिफ्ट सर्टिफिकेट द्या म्हणजे आई-बाबा काय हवे ते खरेदी करतील. जोडीला दादा/ताई झालेल्या बाळासाठी गोष्टीचे पुस्तक आणि खाऊ.
आम्ही इथे मध्यम प्राईस रेंज असलेल्या सुपरमार्केट + गॅस स्टेशन प्रकारातल्या चेन्स आहेत त्यांची गिफ्ट सर्टिफिकेट देतो म्हणजे डायपर, फॉर्म्युला पासून ताजी फळे - सुकामेवा पर्यंत गरजेनुसार खरेदी करता येते. आम्हाला एकांनी सॅम्स क्लबची दोन वर्षांची मेंबरशिप दिली होती गिफ्ट म्हणून.

अजून दोन -तीन बाळे due आहेत पुढच्या काही महिन्यात( इतर वेगवेगळ्या मैत्रिणींना ) >> ते कंसात शब्द लिहिलेत ते बरं झालं, नाहीतर मी म्हटलं होतं की काय चाललंय काय या जगात! आत्ता तर बाळ झालं ना?

माथेरान मधे एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात जायचा विचार करत आहे. पूर्वी MTDC मधे राहिलो होतो. आता दुसरीकडे 2 दिवस रहायचा विचार आहे. काही पर्याय सुचवा माबोकर हो..

मान १.५ आणि कमाल ४ सेल्सियस अशी तापमान वाढ अपेक्षित आहे, या एव्हढ्याशा वाढीने पृथ्वी फुटणे शक्य नाही.>>>>>>

नाही फुटणार. पण फळे/भाज्या/धान्य वगैरे खाद्यान्न्याला अन्कुरण व्हायला, फुले यायला, फलधारणा व्हायला, त्यात सुगंध साठायला, पिकायला विशिष्ट ऋतुत विशिष्ट तापमान लागते. हवे त्यापेक्षा दोन तिन डिग्रीने जरी ते जास्त असले तरी काम होत नाही. याचाच अर्थ जसे तापमान वाढणार तसे काही फळे/भाज्या/धान्ये कायमची नष्ट होणार.

धनवंती, हॉटेल पॉईंट व्हू म्हणून हॉटेल आहे माथेरानला. जिथून घोडयांचा तळ सुरु होतो तिथेच आहे हॉटेल.. चांगलं आहे .. आम्ही प्रत्येकवेळी तिथेच राहिलोयं.. त्या हॉटेल पासून बऱ्याच पॉईंटची सुरुवात होते.. मार्केट पण तसं जवळ आहे हॉटेलपासून..!

टू व्हीलर वर डोक्यावर गांधी टोपी घालून जाणाऱ्या लोकांची टोपी उडून कशी जात नाही? >> चांगला पश्न आहे. भौतिक शास्त्राच्या साहाय्याने सांगायचा प्रयत्न करतो.

टोपी का उडून जाते? तर तिच्यावर वार्‍यामुळे येणार्‍या एकूण बलाचा काही भाग हा वरच्या दिशेने लागतो. त्याला ऊर्ध्व बल म्हणू. त्यासाठी वारा खालूनच यावा याची गरज नसते. प्रवाह विलगीकरण (फ्लो सेपरेशन)मुळे वस्तूच्या दोन बाजूला हवेचा वेगवेगळा दाब तयार झाल्यास वस्तूवर कमी दाबाच्या दिशेने बल लागते. टोपी डोक्यावर घातलेली असते तेव्हा टोपी आणि तिच्या संपर्कातला डोक्याच्या त्वचेचा/केसांचा भाग यामध्ये घर्षण होत असल्यामुळे ते ऊर्ध्वबलामुळे होणार्‍या टोपीच्या उडून जाण्याला अवरोध करतं, म्हणजेच टोपी उडून जाण्यापासून रोखतं. हे ऊर्ध्व बल त्या वस्तूचा आकार, क्षेत्रफळ, वेग, वेगाची दिशा इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतं. जर वाहनाचा वेग वाढला तर ऊर्ध्व बल हे घर्षणाच्या अवरोधी बलापेक्षा वरचढ ठरून टोपी वर उडते. (शिवाय ड्रॅग = वेगाच्या दिशेने लागणारं आणखी एक बल टोपीवर कार्य करत असल्यामुळे केवळ वर उडत नाही, तर मागेही उडते.)

आता गांधी टोपीचं काय वैशिष्ट्य आहे? मी वर म्हटल्याप्रमाणे ऊर्ध्व बल त्या वस्तूच्या आकारावरही अवलंबून असतं. गांधी टोपीचा आकार बराचसा एयरोडायनॅमिक आहे. म्हणजे काय आहे, की त्यावरून वाहणारा हवेचा प्रवाह (जर समोरून येत असेल तर) टोपीच्या दोन्ही बाजूंना चिकटून जातो, पण प्रवाह वस्तूपासून फारसा विलग होत नाही. या उलट आपल्या उन्हाळी टोपीला जो पुढे अर्धचंद्र असतो , त्याच्या पुढच्या कडेवरून प्रवाह सहजच विलग होतो व त्या टोपीच्या खाली आणि वर हवेच्या दाबांमध्ये फरक घडवून आणतो. गांधी टोपी घालून गाडी चालवताना समोर न बघता बाजूला पाहिल्यास त्या टोपीच्या सापेक्ष प्रवाह समोरून न येता बाजूने येईल आणि तेव्हा तो टोपीच्या पुढच्या टोकावरून बाजूला विलग होईल. अश्या वेळी टोपी उडून बाजूला पडण्याची शक्यता वाढते. याशिवाय वळणावरही वेगाची दिशा बदलत असल्याने पुन्हा प्रवाह विलगीकरण - दाब असमतोल - टोपीउडीव बल असं लॉजिक आहे, त्यामुळे तिथेही टोपी उडून बाजूला पडण्याची शक्यता वाढते. या टोपीवर वरच्या दिशेने लागणारं बल फारसं नाही (त्याच्या आकारामुळे). जे काही उडीव/पाडीव बल आहे, ते तिरकं, बाजूच्या दिशेने लागतं. त्या बलाचा बराचसा अंश हा टोपी-त्वचेमधील घर्षण बलाने अवरोधित होतो, त्यामुळेही सहसा ही टोपी उडणं सोपं नाही. फक्त इथे ही गांधी टोपी ही आपल्या उन्हाळी टोपीइतकीच घट्ट बसवली आहे डोक्यावर असं गृहीत धरलं आहे. टोपी सैल असल्यास ती उडणारच.

थोडक्यात वाहत्या वाऱ्याची दिशा राजकारण्यांना पक्षी गांधीटोपी वाल्याना का लगेच समजली पाहिजे ते समजलं असेल. नाहीतर टोपी उडते.

Lol अमितव चरण कहां है Lol
हर्पा भौतिक शास्त्राच्या तासाला मी भौतेक दांडी मारली होती Lol

वांधा नाय!

धनुडी, भौतिक - भौतेक >> Lol

अमित, जबरी! इथे पक्षी ३ अर्थांनी आणले आहेस.

वाह हपा _,/\_
फक्त एक शंका/प्रश्न
गांधी टोपी घालणाऱ्यांची हेअरस्टाईल सुद्धा गांधी असेल तर टोपी उडून जायची शक्यता वाढते की कमी होते?

Pages