डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कत्याच हाती आलेल्या माहितीनुसार म्यांवबोली.कॉम वर एका मांजरीने पोस्ट टाकली आहे - 'माझ्या संडासात एक बाई रोज फिनेल, दालचिनी, काकड्या आणून टाकते, तिचे काय>> Lol बेस्ट ए हे !! Lol Lol

सध्या आमच्या पत्रपेटीच्या आसपास मोठ्या प्रमाणात गोगलगायींची पैदास झालेली आहे आणि त्यातल्या काही गोगा मातीतून बाहेर पडून वरती वरती सरकत आमच्या (आणि इतरांच्याही) पत्रपेटीत जाऊन बसतात. कुठलीही पत्रं आली की ती कुरतडत बसणे हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यामुळे ती पेटी उघडली की पत्रांसोबत गोगांच्या शीतून बाहेर पडलेले कुरतडीचे अवशेषही बाहेर पडतात. त्या गोगा तिथे बहुधा रात्री येऊन जात असाव्यात; मला एकदाच एक जिवंत सापडली होती त्यात - रंगेहाथ (रंगेपाय म्हणावं का? पण ते त्यांच्या पोटात असतात.). त्यामुळे येणारी सगळीच पत्रं आता निराळ्या अर्थाने स्नेल मेल्स झाली आहेत.

गोगलगायींना कुरतडता पण येतं?
ऍग्रो दुकांनामध्ये गोगलगायी मारणारं एक विचित्र जांभळ्या रंगाचं औषध मिळतं. ते वापरून बघा.

ओके अनु. मोठ्या गोगा आहेत. एक इंचभर.

अस्सल गावरान सातारी जर्दा पाणी झाडांवरील अळ्यांवर पण खूप चांगले काम करते.फक्त विकत घ्यावे लागते पानाच्या दुकानावर.

अस्सल गावरान सातारी जर्दा >>> हा चारचाकीत उंदीर शिरू नये म्हणून पण वापरतात म्हणे. एकदा माझी मावशी त्यासाठी गेली होती गादीवर. आत्तापर्यंत फक्त पूजेसाठी विड्याची पाने नेणारी पन्नाशीतली मध्यमवर्गीय बाई जर्दा मागते म्हणून पानवाला आणि आजूबाजूचे पंटरपण दचकले.

अनुच्या हिंजवडी चावडीतल्या जर्दावाल्या ताईंचा गगनभेदी आवाज आठवला Lol
पूजेसाठी विड्याची पाने नेणारी पन्नाशीतली मध्यमवर्गीय बाई जर्दा मागते Happy

मध्यमवर्गीय बाई जर्दा मागते म्हणून पानवाला आणि आजूबाजूचे पंटरपण दचकले. >>> हाहाहा.

आमच्या कारमधेही तंबाखू ठेवायला लागतो, मागे उंदरानी वायरी कुरतडून फार नुकसान केलेलं आणि खर्च फार झाला. नवरा आणतो जाऊन.

हिंजवडीताई ची कल्पना आमच्या कडेच भरपूर सातारी जर्दा विकत घेतला जायचा जास्वंद वरच्या अळ्या मारायला तेव्हाच सुचलीय Happy

एवढ्या उन्हाळ्यात गोगलगायी येताहेत म्हणजे जवळपास कुठेतरी पाणी / ओल आहे. ते पाणी / ओल तिथून दूर हटवता आली तर काहीही न करता गोगलगायींचा प्रश्न सुटेल.

गोगलगायी चालताना श्लेष्मा (नाम नामेति) स्रवतात. त्यात खूप प्रमाणात पाणी वापरले जाते. त्यामुळे त्यांचा वेग बघता त्यांना पाण्यापासून जास्त दूर जाणे शक्य नसते.

परवाच बॅकयार्डात उंदीर दिसलाय.>>>याने की पीस्तॉल जेल मे आ चुका है! भाउ बन्द कधिच तुमच्या अ‍ॅटिक मधे पाहणी करत असतिल... पेस्ट कन्ट्रोल लगेच करुन घ्या!

आज पहाटे मुलीचा डबा बनवायला उठले आणि स्वयंपाकघराजवळच्या वॉशरूम मध्ये गेले तर खिडकी जाळीच्या बाहेर सरडा किंवा पाल सदृश प्राणी होता. आमच्या मध्ये एक जाळी असली तरी त्या जाळी च्या वेलक्रो ला गॅप असण्याची दाट शक्यता होती.मग एक मोठा पडदा रॉड होता बाहेर, तो अगदी हलके हलके जाळीवर मारून त्याला तोंडाने आपण गाय बैल हाकलायला करतो तसं हट, हट केलं.मग गेला निघून.नाहीतर पहाटे आरडा ओरडा करणं फारच वाईट दिसलं असतं.पण सरडा(लांबून) दिसणं गुडलक वाटतं.
बाथरूममध्ये तो लिंबू वासाचा अमेझॉन वरून आणलेला पाल रिपेलर स्प्रे मारून ठेवलाय आता.
IMG_20240612_083607_0.jpg

डास, झुरळे, पाली, मुंग्या, उंदीर, चिमण्या इ. घरात येणार्‍या प्र्राण्यांचे खायचे पदार्थ अश्या पाकक्रिया कोरिया, चीन इ. देशातील पाकक्रियांच्या पुस्तकात सापडतात.
उत्साहि लोकांनी करून पहाण्यासारखे असावेत.

त्या दुसर्‍या धाग्यावर पालींचा उल्लेख झाला आणि आमच्याकडे पालबाधा झाली.
पलिकडच्या विंगेतल्या काकूंनी त्यांची कुंडी बाहेर आणून ठेवली होती. त्यात त्यांनी ओला कचरा मुरवला आहे. त्यात पालीची पिल्लं झाली होती. ती संपूर्ण मजल्यावर बागडू लागली. आम्ही हवेसाठी घराचं दार उघडं ठेवलेलं होतं. त्यातून एक पिल्लू आत आलं..

बापरे ओला कचरा कायम पक्कं झाकण लावून ठेवायचा असतो, अगदी शेतात बितात असेल तर बिना झाकण ठीक.•
त्यात कीटक अळ्या बऱ्याच होतात.पाल झुरळं पण.
पाल असलेल्या गॅलरी चं पुनर्वसन चालूं आहे.इन्फ्रारेड लॅम्प नंदादीप लावल्यासारखा अहोरात्र थोडी थोडी विश्रांती देऊन लावला आहे.कुठेही भिंतीला टेकून वस्तू ठेवली असेल तेथे लेमन पाल स्प्रे मारला. आणि वावर जास्त असेल तिथे पाल दिवसा येत नाही हे ऐकून वावर पण वाढवलाय.कोपऱ्यात डांबरगोळ्या टाकून ठेवल्यात.

त्यांना सांगितले समजावून. आमच्या भू भू ने एक पाल मारली.
हिंसा आवडत नसल्याने वाईट वाटले पण पालीपासून सुटका झाली.
आज्जी म्हणायची पाल मारू नये, लक्ष्मी असते. Proud

.इन्फ्रारेड लॅम्प नंदादीप लावल्यासारखा अहोरात्र थोडी थोडी विश्रांती देऊन लावला आहे. >>> Lol
वॉटेज लो असेल म्हणा पण इन्फ्रारेडने तिथले तापमान वाढत नाही का? झाडं वगैरे मरायची जास्त वाढले तर.

अमावस्या पौर्णिमा पाक्षिक एक सुट्टी देणं गरजेचं आहे त्या दिपाला अन्यथा इन्फ्रारेड मध्ये अमानवीय वगैरे काही दिसायचे पाली आणि इतरांना. Light 1

परवा असंच सकाळी सकाळी 6.3० ला डबा देऊन घरातला मेंबर बसला रवाना करून आरामात चहा पोहे खात मोबाईल बघत बसले होते.ताटली ठेवायला स्वयंपाकघरात गेले तर उघड्या खिडकीतून सेनापती माऊ आली होती आणि दूध शोधत होती(तिचा पोपट झाला, दूध संपलं होतं आणि नवं काढलंच नव्हतं.)
तिला बघून मी इतक्या जोरात दचकून ओरडले की ती दचकून सिंक मध्ये तडफडली, आणि मग खिडकीतून पळून गेली.
त्या ड्राय बाल्कनीत लाल फरशीवर एक उंचवटा आहे.तिथे परत कोणत्या तरी मांजराने शी करायला चालू केली आहे.आज काही सुकलेले अवशेष झाडले, एक ताजा पण होता.
मुलीचं म्हणणं आहे की हे शी करणारं मांजर सेनापती नाहीये.दुसरं एक येऊन शी करतं.सेनापतीच्या सवयी चांगल्या आहेत.

धमाल धागा आहे...
>>>आमच्या भू भू ने एक पाल मारली.>>>>>
माझ्या घरची माऊ नेहमीच पाली,सरडे इ. बाहेरून मारून आणायची आणि माझ्यासाठी गिफ्ट आणल्यासारखी समोर समोर करत टाकायची... या करतुतीसाठी माऊ ला शाबासकी द्यावी लागायची नाहीतर तोपर्यंत पायात घोटाळत सतत म्याऊ म्याउ चालायचं.

तिचा पोपट झाला >>> तीच कुत्री होती ना? तिचा पोपट कसा झाला? Proud ( मला चाची ४२० चा कन्व्हर्ट हो गया वाला सीन आठवतोय इथे )

Pages