डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ती बरंच काही काही होत असते.कधीकधी गाड्या समोरून येत असताना ढिम्म हलत नाही तेव्हा गाढव पण असते.
यातली जो कॅमेरा कडे बघतेय ती सेनापती. काळं उंच मांजर सेलेब्रिटी मांजर आणि ते विचित्र गोंधळलेल्या रंगाचं आहे ते चेस.ही सोसायटीतल्या मुलांनी दिलेली नावं.
शी बहुतेक चेस करतो.म्हणजे तोच कुत्रा.गंगाधर ही शक्तिमान है.
MixCollage-09-Aug-2024-09-31-AM-4134.jpg

गंगाधर ही शक्तिमान है >>> Rofl
सेनापतीचा फोटो सॉलिड खंग्री आलाय!
ढिम्म हलत नाही तेव्हा गाढव पण असते >>> मल्टिपल पर्सनॅलिटीज! Lol

अनु आता तुझी भीती वाटायला लागलीय Wink , तू मांजरीची कुत्री आणि नंतर पोपट करतेस, गाढवही करतेस, तरी त्या तुला त्रास द्यायला येतातच, काय डेरींग आहे त्यांचं.

बाकी फोटो भारीच.

अनुचे प्रतिसाद धमाल असतात ( तिला त्रास होतो हे माहीत असूनही ती ज्या प्रकारे लिहिते त्यामुळे हसू येते )
मांजराची नावं फारच भारी.
हल्ली ही मांजरं म्हणजे कुणी एलियन लोकांनी पाठवलेत काय हेरगिरी करायला ?
आमच्याही सोसायटीत अचानक 4 मांजरं आली आहेत.
( अनुच्या आयटी सेरीज मधली मांजरं नव्हेत, खरीखुरी मांजरं )

कुठे भेटतील ही लोकं?आमच्या घरातल्या, आजूबाजूच्या, सोसायटीत भिंतीवरच्या सगळ्या पाली घेऊन जा म्हणावं पाळायला. अगदी फुकट.प्रवास खर्च पण देईन.

>>>>>>>>>>.आणि माझ्यासाठी गिफ्ट आणल्यासारखी समोर समोर करत टाकायची
चो च्वीट!!

पाल चर्चा आणी अनुच्या कॉमेन्ट तुफानी आहेत...आमच्या गॅलरित मात्रोश्रिनी इतकी झाड लावली होती की त्याच्यात लपुन खुप प्राणी विश्व घरात यायला बघायच..मग एकदा सगळी झाड काढुन फक्त ५ कुड्या ठेवल्या तेव्हा बरच कमी झाले

मी_अनु , अगं अलुमिनिम फॉईल पसरून ठेव ना खिडकीत.. म्हणजे खिडकीच्या कट्यावर ..
गॅलरीत हि ठेऊ शकतेस पण अशी किती ठेवणार सगळीकडे गालिचा पसरल्यासारखी ?
मी स्वतः पहिले आहे ऍल्युमिनिअम फॉईलला बघून मांजर दूर जाते .. तुनळी वर तू बघ अनेक व्हिडीओस दिसतील.

आमच्या शेजारची मांजर आमच्याकडे येते मला खूप आवडते, पण ती मध्यंतरी रोज पहाटे साडे ३ वाजता येऊन खिडकी बाहेर म्यावम्यावाट सुरु करायची पंजे मारायची .. घरात घेण्यासाठी.. तेव्हा तिथल्या खिडकीत आम्ही ते अलुमिनिम फॉईल पसरून ठेवले .. तेव्हापासून यायची बंद झाली.. आता नॉर्मल मार्गाने ते हि दरवाजा उघडा असेल तर येते

बघते करून, खिडकीचा प्रश्न मोठा नाही.ती खिडकीत कधीकधीच येते.
ड्राय बाल्कनीत शी चा प्रश्न मोठा आहे.काल पतंजली फिनेल ओतून ठेवलं आहे बरंच, कंटेंट साफ केल्यावर.आज चेक केलं नाही.

यातली जो कॅमेरा कडे बघतेय ती सेनापती. >>>>>>>>> हा माझा बायको पार्वती Lol
अनुचे स्पेशल स्किल्स Lol

गंगाधर ही शक्तिमान है>>>> :हहपुवा:

https://www.instagram.com/reel/C-Z9HeJJgiA/?igsh=MWJsMzY5YXd0YTU1aA==>>>>>>>>>> हाहा ते बाळ किती क्यूट मळकं आहे... या लोकांना फार कौतुकं असतात बेडकं, पाली, सरडे.. अंगाखांद्यावर खेळवतात काय, पाळतात काय?? इथे येऊन बघा आपण कसे ट्रीट करतो त्यांना Lol

अनु Lol

सेनापती "ती" आहे आणि चेस "तो" आहे का?

हो चेस तो आहे.सेलेब्रिटी मांजर तो आहे का ती हे कळायचा योग आला नाही Happy
चेस ची बरीच नाजायज मुलं पण आहेत सोसायटीत.

यावर्षी आमच्याकडे (विशेषतः आता पाऊस संपताना) एक विचित्र प्रॉब्लेम आहे.खूप बेडकांची पिल्लं येतायत.मागच्या सिक्युरिटी डोअर आणि फ्रेम मध्ये जी गॅप आहे तितकी पुरते.पाली झुरळं मी निर्दयपणे हिट मारून मारते.पण बेडकांची लहान पिल्लं मारायचा जीव झाला नाही.काल 3 पिल्लं वर प्लास्टिक ग्लास ठेवून बाहेर नेऊन सोडली.आता दोन्ही दारं लावून तिथे फटीला मोठी सतरंजी ठेवली आहे.मदतनीस मावशी मॉप चं पाणी बदलायला बाहेर जातात.त्यांना काही दिवस हे सर्व आतच करा सांगावं लागणार आहे.
बेडूक पिल्लं घरात येणं हा कसला संकेत आहे का?
(मांजरींना 'तो बघा तिकडे बेडूक आहे त्याला घाबरवून पळवा' सांगता येतं का)

तुझ्या राशीला आता बेडूक Lol एनिवे मला भीती वाटते सर्वांचीच, लाल पाठीचा असेल तर लक्ष्मी समजतात कोकणात. तुझा त्रास संपुदे प्राणी पक्षी कीटकांचा.

इथे लिहायचं राहिलं, महिनाभरापूर्वी अनेक वर्षांनी पाल किचनमध्ये दिसली, चांगली धष्टपुष्ट होती, माझी घाबरगुंडी उडाली, नवरा म्हणाला मंत्र लिही, म्हटलं त्यावरून आरामात फिरायला लिहू का, लाल हिट मारूनही काही फरक पडलाच नाही, ती लपली माळ्यावर कुठेतरी. एकदा पहाटे ओट्यावर दिसली, मी परत लाल हिट मारलं मग तिथून सरसर बाहेर पळाली, खिडकी बंद असून जाळी बंद असून, अशी जादू झाली. एकदम हुश्श वाटलं.

जादू बिदू काही नाही, पाईपलाईन गॅस बाहेरून आत कनेक्शन आलं तिथे होल पाडलेलं, त्यापुढे गोल चकती होती, त्यामुळे किती मोठं आहे ते समजलं नव्हतं, आता तिथे मी कागदाची गुंडाळी करून घालून ठेवलीय.

पळालेली डोळ्यांना दिसली हे बरं झालं.शंका नको.
आता सध्या तरी बेडकांना झाडूने हाकलले आहे बाहेर.लवकर पाऊस आणि या वर्षीचा बेडूक सिझन संपू दे.

पालींसाठी नवा उपाय इंस्टा वर पाहिला.
कापूर पूड करून, त्यात पाणी & डेटॉल घालून स्प्रे बॉटल मधे घालून जिकडे पालीचा इलाका असेल तिकडे स्प्रे करायचे. वासामुळे फिरकत नाही.

ओके.
आता सध्या मी गॅलरी मध्ये जिथे पाल दिसते तेथे फुल कंपनी चा मॉस्किटो रिपेलन्त सिट्रोनेला ऑइल धूप लावते आहे.कापूर पण आहे बराच, डेटॉल आणलं की हे पण ट्राय करेन. कापूर डेटॉल दोन्हीचा वास आवडतो.

कीटक (डास वगैरे) असतील तर पाठोपाठ पाली येतात. त्यामुळे जिथे जिथे पालींची पॉसिबल एन्ट्री होऊ शकते तिथे खिडकीच्या आसपासच्या भिंतींवर/चौकटीला वगैरे झुरळांचा लाल हिट स्प्रे मारतो मी अधूनमधून. म्हणजे किमान त्या भिंतीला तो दर्प राहून त्यामुळे तरी त्या येणार कीटक/पाली नाहीत हे लॉजिक. बहुधा यशस्वी होत असावे कारण लास्ट पाल घरात दिसली त्याला काही महिने झाले असावेत.

याशिवाय पाली येऊ नयेत म्हणून एक हर्बल स्प्रे मिळतो अमेझॉन वर तो सुध्दा मध्यंतरी वापरत होतो.

तो हर्बल स्प्रे मारून संपवला.हिट पालीवर मारायला मुद्दाम जपून ठेवतो आम्ही.पाल दिसल्याशिवाय वापरत नाही.(हसू नका, एकदा पाल दिसली की मग ती मरे किंवा बाहेर जाईपर्यंत आम्ही काहीही करत नाही त्या एरियात.त्यामुळे हिट एकदम जपून वापरतो.)
आजूबाजूला बरीच झाडं आहेत.त्याच्यावरून पाली येत राहतात.
एन्ट्री सर्व बंद केल्या आहेत.एक्झॉस्ट ची विंडो बुजवून तिथे लाकडी चौकोन, सर्व खिडक्यांना नेटलॉन, दारं उघडी ठेवत नाही.सिंक पाईप च्या आसपास हिट मारते.

परवा झालं असं की ते इन्फ्रारेड युनिट जे 1 मिनिटांचा ऑफ ब्रेक देऊन बाकी अखंड चालू ठेवलेलं असतं त्याच्या समोर गॅलरी बंद केली आहे त्या काचेवर आतल्या बाजूला 2 पाली होत्या. Sad त्यातली एक झाडूने हाकलल्यावर वर गेली.दुसरी जायला तयार नाही.तिच्यावर मारून पाव बाटली हिट संपलं.मग तडफडत डुलत डुलत वर निघून गेली.

मला फार राग येतो.स्वयंपाकघरात ओटा स्वच्छ, फिनेल ने बरेचदा धुतलेला.बोरिक पावडर कोपऱ्यात.कोळी दिसला की लगेच मारते.इतकं करून वन्स इन या व्हाईल एखादी मोठी पाल येऊन घाबरवते. उंचावर राहत नसल्याचा परिणाम.10 व्या मजल्यावर राहत असतो तर त्यांना चढायला कंटाळा आला असता.

पाल दिसल्यावर काहीही न करण्याचा आणि हिट जपुन वापरायचा परस्पर संदर्भ जोडायचा प्रयत्न करतोय.

म्हणजे, पाल दिसल्यावर स्वयंपाक/अभ्यास/काम ही सर्व डेली ऑपरेशन थांबवून लक्ष द्यावे लागते.बाकी काहीच करता येत नाही.इथे जे पालींना घाबरतात त्यांना या भावना एक्झाक्ट कळतील.पाली झाडू पोहचेल अश्या जागी नसतात, किंवा मला भीती वाटते झाडू मारायला.त्या धावून माझ्या दिशेने येऊ शकतात.मग मी सोडून कोणीतरी हिट मारतं.आणि त्या मरतात किंवा पडतात, मग कोणीतरी झाडूने मारून टाकतं.मी मेलेली पाल केरभरणीत उचलून बाहेर टाकते.
या सगळ्यात पाल दिसली की लगेच इझीली मरावी म्हणून हिट चा सप्लाय कायम घरात भरलेला असावा लागतो.

10 व्या मजल्यावर राहत असतो तर त्यांना चढायला कंटाळा आला असता. >>>
१५ व्या मजल्यावर पण मोठ्या पाली येतात. बहुतेक लिफ्टमधून येत असाव्यात. पण येतात Sad

पाल फारच उंचावर असेल तर थोडं लांब खुर्चीवर उभं राहून तिच्यावर हिट मारायचं भरपूर. ती झिंगली आणि खाली आली की मग तिला फटकवायचं. साध्या केरसुणीपेक्षा खरंतर खराटा इफेक्टिव आहे असं म्हणेन मी. पण आपल्याकडे मिळतात ते खराटे टिपिकली बुटके असतात. आईकडे परसात नारळ आहे त्यामुळे बरेच हीर निघतात आणि त्यांचा जरासा उंच खराटा बांधता येतो. तसा कुठून प्राप्त करता आला तर पहा, आयुष्य सोपं होतं. कारण मग पाली जरा अंतरावरून एका फटक्यात गारद करता येतात Happy

ती पाल हिट मारल्यावर झिंगून छतावर चढली आणि आपल्या अंगावर पडली तर?खुर्चीवर असल्याने पटकन पळता पण येणार नाही.पाल छतावर चढू शकते हा मुख्य इश्यू असतो.नाहीतर तिच्यापेक्षा आपला आकार आणि वेग जास्त असतो.

ओक Lol मग किराण्यात दरमहिन्याला साखर चहा मीठ आणि हिट अशी लिस्ट देऊन टाका. वाणी संशयाने बघायला लागेल.
किंवा हिट बाटलीचं भरलेलं वजन आणि रिकामं झाल्यावरचं वजन मोजून ठेवा. तसंच एका पालीला मारायला सरासरी किती स्प्रे हिट्स लागले होते ते नोट करुन ठेवलं की उरलेल्या मालात किती पाली मरतील याचा अंदाज येईल. मग त्याप्रमाणे किराणा लिस्ट ट्विक करा. हा जेनेरिक प्रॉब्लेम वाटत असेल तर हिट बाटली ठेवायला आयोटी कनेक्टेड वजन मापक डिझाईन करा. की वजन खाली गेलं की एक मेल तुम्हाला दुसरी वाण्याला. दुपारी हिट घरी.

Pages