Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02
प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Hit ची डासांची रॅकेट चांगली
Hit ची डासांची रॅकेट चांगली टिकते. फक्त बार्बेक्यू डास वास येतो त्याकडे कठोर मनाने दुर्लक्ष करावं लागतं. डासांचा मागोवा घेताना शिवाय आपसूकच एकटीने बॅडमिंटन (टप्पाटप्पा खेळावं तसं) सुद्धा खेळून होतं, जरा नजर सूक्ष्मदर्शी होते आणि चापल्य (पाल मारण्यापेक्षा जरा कमीच) वाढतं, इ. फायदे पाचशे रुपये खर्चून मिळतात.
:फिदी
इति रॅकेट माहात्म्य समाप्त. (रॅकेट चालवणे ही जबाबदारी माझी असल्याने जरा जिव्हाळ्याचा विषय आहे. लेकाला हातात रॅकेट दिली तर तो घराबाहेर जाऊन डास मारायची सुरुवात करतो त्यामुळे मीच ही जबाबदारी घेणं परवडतं)
मी_अनु मस्त झालाय पालोलॉग.
मी_अनु
मस्त झालाय पालोलॉग. पाली फक्त खराट्याने मरतात अस स्वानुभव आहे. आईकडे दारच्या नारळाचे हीर काढून लांबच्यालांब खराटे तयार करून घेण्यात येतात. मग पाल घरात आली की एका हातात हिट आणि दुसर्या हातात खराटा अशी मोहिम काढली जाते. पाल दिसली की लांबूनच ती झिंगेपर्यंत तिच्यावर हिटचा मारा करायचा आणि आपल्या खराट्याच्या टप्प्यात आली की एकाच फटक्यात विषय संपवायचा. मी फार लहानपणीच माझ्या बाबांकडून याचं प्रशिक्षण घेतलं आहे
आधी आधी फक्त हिट मारून पाल मारायचे प्रयोग करून पाहिले होते. पण पाली परफ्युमचा स्प्रे असावा तसं हिट मारून घेतात असं एक निरीक्षण आहे. शिवाय त्यानंतर त्या एखाद्या दारूड्यासारख्या कुठेही पडायला किंवा पळायला लागतात आणि मग अजूनच प्रॉब्लेम होतो.
भाग्यश्री 123, मांजर पाळा. ते
भाग्यश्री 123, मांजर पाळा. ते शिकार करतात पालीची>>>> धन्यवाद धनवन्ती. पण एक ब्याद घालवण्यासाठी दुसरी नकोय. पेस्ट कंट्रोल ने जातात का? कुणी केले आहे का पालींसाठी ? सध्या कोरोनामुळे तेही रिस्की च वाटतंय लोकांना घरी बोलावणे.
मांजरीला ब्याद म्हणल्यामुळे
मांजरीला ब्याद म्हणल्यामुळे तुमचा निषेध !!!
मांजरीला ब्याद म्हणल्यामुळे
मांजरीला ब्याद म्हणल्यामुळे तुमचा निषेध>>>yesss अशा त्रासदायक मांजरीना कुत्री म्हणायचं असतं इतकं पण ठावूक नाही याचा निषेध
अनु, मस्त Biggrin >>>
अनु, मस्त Biggrin >>>
आमच्याकडेही दोन पाली घरात घुसल्या आहेत त्यातली एक नवरोबाने चोपून बाहेर हाकलून लावली पण एक छोटी अजून आहे तर काल रात्री अचानक पाणी पिण्यासाठी जागी झाले तेव्हा ती शिशुपाल चक्क नवऱ्याने सिंक खाली ठेवलेल्या बियरचा बाटलीत स्वतःचे प्रतिबिंब पाहून त्या प्रतिबिंबाबरोबर लपाछपी खेळत होती मला तिचा तो खेळ फारच गंमतीशीर वाटला मी तिला डिस्टर्ब नाही केले (सहसा कोणी प्राणि/पक्षी पाणी किंवा अन्न खात पीत असतील आणि आपल्या अचानक तिथे गेल्याने ते जर उडून जाणार असतील किंवा पळून जाणार असतील तर मी सहसा त्यांना डिस्टर्ब करत नाही मांजर जरी आडवी जात असली तरी तिला आधी जाऊ देते)
<< मला तिचा तो खेळ फारच
<< मला तिचा तो खेळ फारच गंमतीशीर वाटला मी तिला डिस्टर्ब नाही केले >>
Ajnabi तुम्ही फारच धाडसी आहात. .
मी अनु मांजर कुत्री झाली आता
मी अनु
मांजर कुत्री झाली आता पाल म्हैस
किती तो संताप
अनु, भारीच ग.
अनु, भारीच ग.
डासांसाठी रात्री झोपताना मच्छरदाणी लावणे यासारखा सुरक्षित आणि बिनकटकटीचा उपाय दुसरा नाही.
निधी अगदी सहमत
निधी अगदी सहमत
डासांसाठी रात्री झोपताना
डासांसाठी रात्री झोपताना मच्छरदाणी लावणे यासारखा सुरक्षित आणि बिनकटकटीचा उपाय दुसरा नाही. >>> पार्शली असहमत. कारणं दोन - एक म्हणजे डास हुशार असतात आणि ते मच्छरदाणीच्या दाराच्या फटीतून आत घुसतात. दुसरं म्हणजे चुकून शरीराचा कुठलाही भाग जाळीला टेकलाच तर डास त्या भागाची युद्धभूमी करतात.
आम्ही लहान असताना आईने त्या मच्छरदाणीच्या दारांना मधून कापड लावून पहिला प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न केला होता. पण त्यातून पडायलाच व्हायचं जास्त वेळा
Rmd, अगं मच्छरदाणी लावताना
Rmd, अगं मच्छरदाणी लावताना अजिबात फट राहून चालतच नाही. डास हुशार असतात याबाबत सहमत. एक डास आत आला की पाठोपाठ बाकीचे पण येतातच.
जाळीला शरीराचा कुठलाही भाग टेकला जाणार नाही ही काळजी मात्र घ्यावी लागते. माझा मुलगा लहान आहे तर मी कडेला जास्तीच्या उशा आणि लोड लावून ठेवते.
निधी पण दारं व्यवस्थित
निधी
पण दारं व्यवस्थित लागतील अशी मच्छरदाणी मिळत नाही ना!! 
निधी Happy पण दारं व्यवस्थित
निधी Happy पण दारं व्यवस्थित लागतील अशी मच्छरदाणी मिळत नाही ना!!> हि घेवून बघा.
Classic Mosquito Net Double Bed King Size Polyester Foldable - Blue
Learn more: https://www.amazon.in/dp/B00JD8EA1U/ref=cm_sw_em_r_mt_dp_66F6RQB7FQRGK0S...
तीन वर्ष वापरते आहे.
आमच्या कडे बर्गे यामिनी आहे
आमच्या कडे बर्गे यामिनी आहे.मध्ये मध्ये लावायचो.पण ती लावून अगदी व्यवस्थित आतले डास बॅट ने मारावे लागतात. शिवाय सारखं रात्री उठून अमुक घे, तमुक पाणी पी, पुस्तक घेऊन ये अशी सवय असेल तर डास घुसतात आत.
सध्या आम्ही काळे सुगंधी किंवा सुगंधालय मध्ये मिळणारी होमाची गोवरी जाळून धूर करतोय झोपायच्या आधी.एक देवीप्रसाद सोहनी आहेत त्यांचे गोशाळेचे धूप घेतलंय काल ते पण लावतोय.गोवरी धुराने बराच फरक पडतो.
गुड नाईट ने डास अजिबात मरत पळत नाहीयेत.ती कवी कल्पना झाली आहे.डास म्यूटेट झालेत.
गुड नाईट ने डास अजिबात मरत
गुड नाईट ने डास अजिबात मरत पळत नाहीयेत>>>सहमत
मच्छरदाणी लावल्यावर डास मारायची बैट घेऊन झोपावे लागते. उन्हाळा सुरू झाला की खूप गरम होते मच्छरदाणीत.
पाली घालवण्यासाठी उपाय:
पाली घालवण्यासाठी उपाय:
https://www.esakal.com/image-story/how-to-get-rid-of-lizards-home-remedy...
इथे सगळे त्या हिट झुरळ
इथे सगळे त्या हिट झुरळ इंजेक्शन ची इतकी स्तुती करतायत.मला काहीच जाणवलं नाही.अत्यंत घाणेरड्या रंगाचे चिकट मेणचट पिवळे डाग पडणे,त्यावर झाडू लागल्यास ते पसरून अजून घाण दिसणे सोडून.छोट्या झुरळांवर नेहमीचा पेस्ट कंट्रोल, खाणं सांडू न देणं आणि लाल हिट इतकेच उपाय कामी आले.लाल हिट अतिशय लवकर संपतं.
अधून मधून गोनील चे जरा स्ट्रॉंग द्रावण पण वापरतो.
त्या हिट किंवा इतर बाजारात मिळतात इंजेक्शन तसेच ड्रॉप पण पारदर्शक रंगाचे कुठे मिळत नाहीत का?त्या घाण पिवळ्या, किंवा गुलाबी रंगाने किचन झुरळं असल्या पेक्षा जास्त बेकार दिसतंय.
झुरळांसाठी लाल हीट प्रभावी हे
झुरळांसाठी लाल हीट प्रभावी हे मी डेफीनेटली सांगू शकते. फक्त नाकाला रुमाल, मास्क लाऊन फवारा (मी नाही लावत पण भावाला त्रास झालेला, म्हणून सांगते) .
Lemongrass oil किंवा
Lemongrass oil किंवा peppermint oil dilute करून ते फवारा किंवा त्यातेलाचे छोटे बोळे कपाटात, कोपऱ्यात ठेवा. फरक पडेल.
<<<इथे सगळे त्या हिट झुरळ
<<<इथे सगळे त्या हिट झुरळ इंजेक्शन ची इतकी स्तुती करतायत.मला काहीच जाणवलं नाही.अत्यंत घाणेरड्या रंगाचे चिकट मेणचट पिवळे डाग पडणे,त्यावर झाडू लागल्यास ते पसरून अजून घाण दिसणे >>
कबूल कबूल कबूल...
तो चिकटा काढणे हे झुरळे काढण्यापेक्षा चिकट काम आहे.
या धाग्यावर मी डासां ना पळवून
या धाग्यावर मी डासां ना पळवून लावण्या)साठी गुडनाइटच्या मशीनमध्ये मॅट ऐवजी कापराच्या वड्या लावतो, असं लिहिलं होतं.
अन्य एका धाग्यावरही कापराचा वेगळ्या प्रकारे वापर काहींनी सुचवला आहे.
इथे तर त्या कापराच्या वाफांचा फोटोही आहे ( अतिथंड प्रदेशातला असावा)
आज फेसबुकवर CamPure Camphor Liquid Vaporiserची जाहिरात दिसली. (आता इथेपण सगळ्यांना दिसेल)
<तो चिकटा काढणे हे झुरळे
<तो चिकटा काढणे हे झुरळे काढण्यापेक्षा चिकट काम आहे. >>
Abro tape* आणुन जिथे ती पेस्ट लावायची तिथे आधी ती टेप चिकटवून त्यावर ती पेस्ट लावायची. काढताना टेप ओढून काढायची.
Abro tape म्हणजे सुतार लोक सनमाईका शीट बसवताना ती जागीच रहावी म्हणुन जी चिकट पट्टी लावून ठेवतात आणि दुसऱ्या दवशी काढतात ती. ही सेलो टेप पेक्षा अधिक चांगली चिकटते, हाताने चटकन फाडता येते आणि पृष्ठभाग गुळगुळीत नसल्याने त्यावर लावलेली पेस्ट घसरून पडत नाही
हार्डविअर आणि प्लायवूडच्या दुकानात मिळते.
हे टेप चं चांगलं मिळालं
हे टेप चं चांगलं मिळालं सोल्युशन.ती सुतार वापरतात ती पांढरी टेप खूप आहे घरात सध्या.हे करून बघेन.
आम्ही सध्या झुरळं घालवायला नुसती बोरिक पावडर वापरतोय.थोडा उद्योग होतो पण अजून झुरळं दिसली नाहीत, एक बाथरूम जाळीवर मेलेलं दिसलं म्हणजे काम करत असावी.(आत्मधून मायबोलीकर ने सांगितलेली ट्रिक. बऱ्याच जणांना माहिती असेल, मला नव्हती)
मांजर सुदैवाने आता शी करत नाहीये.(मध्ये एकदा जुनं पायापुसणं दारात ठेवलं होतं त्यावर मात्र भरपूर प्रमाणात शी केली होती.)हे असं काही मेडस ना सांगत नाही, त्यामुळे अलगद टोकाला पुसणं उचलून ड्राय एरियामध्ये नेऊन धुतली.बरंच पाणी खर्च झालं.
मांजरीचा 'कशावर शी करायची' हा थिंकिंग अल्गोरिदम कळायला हवा.
हे खूप विनोदी आहे वाचायला, पण अक्षरशः शी करू नये म्हणून दालचिनी पावडर, मिरेपूड, फिनेल वेगवेगळ्या वेळी पसरणे,काकडी ठेवणे,मुद्दाम पाणी टाकून ठेवणे(ओल्यावर विधी करायला आवडणार नाही म्हणून) असे अनेक उपाय करून झाले आहेत.
झुरळ महाराजांसाठी बोरीक पावडर
झुरळ महाराजांसाठी बोरीक पावडर + साखर काही कण असे अधिक उपयुक्त ठरते.
आता थोडं मांजर मावशी बद्दल -
मार्जार कुळ (बहुधा) आपल्या टेरीटरीत आलेल्या नवीन गोष्टीवर विष्ठा करून त्या विविक्षित गंधाने
स्वतःचे स्वामित्व दर्शवण्यासाठी असे करत असावेत. मांजर आवडत नाही त्यामुळे कधी पाळली नाही पण गावी काकांकडे घरात भरपूर मनिम्याऊ (3 पिढ्या एकत्र) नांदत असतात तेव्हा नोंदवलेले निरीक्षण आहे. हीच गोष्ट माझ्या फार्मवर असलेलं ग्रेट डेन कपल सू सू करून दर्शवत असते.
आमच्याकडच्या झुरळांनी हिट
आमच्याकडच्या झुरळांनी हिट इंजेक्शन पचवलं आहे .. महिन्याभरात ते एखादे वेळी , कधी हिटचा फवारा .. आणि उरलेला वेळ दृष्टी आड सृष्टी , जिओ और जीने दो .. नाहीतर त्यांचा निःपात करता करता तोंडाला फेस येईल एवढी संख्या आहे
मुळापासून स्वच्छतेची आवश्यकता आहे आणि ते सध्या तरी अशक्य आहे .....
ढीगभर अडगळ , जुनी कधीही वापरली जाणारी नाहीत अशी भांडी - बॅरल मध्ये भरून ठेवली आहेत .. त्यात झुरळं जाणार नाहीत असं वाटलं होतं पण त्यांना सेफ हाउस मिळल्यासारखं झालं . जुने डबे , खोके , अडगळ , टेबलं , एक दोन कपाटं सगळं घराबाहेर काढावं कुणालातरी देऊन टाकावं आणि मोकळी रिकामी स्वच्छ जागा करावी असं मला खूप वाटतं पण बाबा ऐकत नाहीत , कधी काळी यातली काही भांडी किंवा वस्तू लागतील असं त्यांचं मत आहे ... मोठ्या हौसेने यांनी ओट्याखाली ड्रॉवर वगैरे करून घेतले तेही सगळे जुन्या निरुपयोगी वस्तूंनी भरले आहेत ...
फुकट वादात शक्ती खर्च करण्यापेक्षा दृष्टी आड सृष्टी हे बरं आहे .
जर पुढे कधीतरी स्वतःचं घर घेता / बांधता आलं तर तिथे टेबल - कपाटच काय बसायला एक खुर्चीसुद्धा मी घरात ठेवणार नाही इतका तिटकारा आला आहे सामानाचा आणि अस्वच्छतेचा ... सगळं स्वच्छ मोकळं रिकामं हवं .. कुठे अंधारे कोपरे , अडगळ खोके नकोत .
अगदी खरं.जितके कोपरे तितक्या
अगदी खरं.जितके कोपरे तितक्या लपायला जागा.
मध्ये एकदा जुनं पायापुसणं
मध्ये एकदा जुनं पायापुसणं दारात ठेवलं होतं त्यावर मात्र भरपूर प्रमाणात शी केली होती>>> हे काय जुनं पायापुसणं टाकलंय म्हणून रागाने केली असेल.
एखादे हुबेहुब कुत्र्यासारखे दिसणारे सॅाफ्टटॅाय ठेवून बघा. हालचाल हेरून आवाज करणारे असेल तर उत्तम.
हो, आता तेच करावं लागेल
हो, आता तेच करावं लागेल.कबुतरांसाठी कुत्रे ठेवतात लोक हे पहिले आहे.
आमची एक गॅलरी आहे.त्यात हिरवे
आमची एक गॅलरी आहे.त्यात हिरवे लॉन कार्पेट टाकले होते.सर्व नीट चालू होते.पण आता मध्ये घराच्या काढलेल्या कामात तिथे बरंच सामान ठेवावं लागलं.आणि वावर पण कमी होता.तर एक काळी एकदम ढोली पाल राहायला आली तिकडे.आता परत सगळं स्वच्छ धुवुन, लॉन कार्पेट टाकून तिला भिंतीवरून घालवावी लागेल.(पडली तरी लॉन कार्पेट वर तिला चालता येणार नाही आणि आम्हाला मारता येईल तिला.) हे सगळं न करता आपोआप गॅलरी बाहेर गेली तर उत्तम.
घरात रंग नवा आहे, उग्र वासाने पाली येणार नाही असं वाटलं होतं.पण आता 4 महिने झाल्यावर एक पिल्लू सोफ्यावर दिसलं.मग परत झाडू, मारामारी हे सर्व मी सोडून बाकीच्यांनी केलं.ते मेलं.पण आता त्याचे आईबाप घरात कुठेतरी दिसतील हि भीतीआहेच.
हा स्प्रे मागवलाय. कसा आहे सांगेन वापरल्यावर.
https://www.amazon.in/gp/aw/d/B0CYTJ825Z?ref=ppx_pt2_mob_b_prod_image&th...
Pages