
तर भन्सालीची स्लो कुक्ड लाहोरी बिर्याणी नेटफ्लिक्स वर वाढली आहे, त्यातल्या कोंबड्या आणि इतरांची पिसे काढायला हा सेपरेट धागा हवाच्ग !
स्पॉयलर्सने भरलेला धागा आहे त्यामुळे आपापल्या जवाबदारीने वाचा 
पिसं काढण्या आधी काय आवडले तेही लिहिते :
भन्सालीला साजेशा सुंदर फ्रेम्स, सेट्स, दागिने, कपडे, एपिसोड काहीतरी करून बघायला एन्गेज ठेवेल असा ड्रामा, गाणी, कोरिओग्राफी सगळे भन्सालीच्या मुव्हीज सारखे !
मनिषा कोईरालाचा अभिनय , स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्तं आहे, तिचे गरारे,शरारे सुंदर आहेतच पण साड्या , ज्युलरी पण आवडली.


संजिदा शेख , आदिती राव हैदरी, सैमाचा रोल करणारी अॅक्ट्रेस, उस्तादचा रोल करणारा अॅक्टर सगळ्यांनी चांगला अभिनय केलाय.
पहिले २-३ एपिसोड्स ग्रिपिंग आहेत.
सकल बन, हमे देखनी है आझादी गाणी आवडली, इतरही ठुमरी गाणीही चांगली आहेत .
लज्जोच्या अकाली मृत्यु नंतर जे ‘हमे देखनी है आझादी ‘गाणं पहिल्यांदा येते तो सीन आणि ‘रुदाली’ स्टाइल कोरिओग्राफी, मनिषा कोइरालाचा नशेत नाचणे सीन मस्तं घेतलाय, टिपिकल भन्साली स्टाइल !
गोल्डन बेज भन्सालीच्या पॅलेट मधला आवडता कलर आहेच, तो रंग दिसतोच पण त्याचा अजुन एक आवडता ‘चान्द छुपा बादलमे मधला, देवदास मधल्या ‘मोरे पिया’, मधला लॅव्हेन्डर कलरही येतो,
आता खराखुरा रिव्ह्यु :
*तो नवाब ताज मुशायरा चालु असताना लांबूनच एक पोरगी आवडली कि डायरेक्ट तिच्या आंगचोटीला जाऊन रोमान्सयुक्त फ्लर्टिंग सुरु करतो, मुलीचे नावही माहित नसताना आणि ती मुलगी (आलम) पण लगेच त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरवात करते , काहीच ऑफेन्सिव वाटत नाही तिला.. एरवी हे दोघेही तवायफ-नवाब कल्चरच्या विरुद्ध असतात, पण पोरगी दिसली बसी कि गळ्यात पडला, ट्रिटिंग हर लाइक अ प्रॉस्टिट्युट !
*ताजची आज्जी संस्कार वर्गासाठी नातवाला हिरामंडीत जायची शिकवण देते.
*अधयन सुमन आणि शेखर सुमन अगदीच यक्स नवाब आहेत,.
नवाब कितीही रंगेल असले तरी अध्ययन होणार्या बायको समोरच कोठेवाली ठेवल्याचा खुल ए आम गर्व करतो.
* ब्रिटिश अॅक्सेन्ट मधे उर्दु बोलणारे विनोदी गोरे ऑफिसर्स
* स्वातंत्र्यलढा लढणारे क्रांतिवीर सगळे पुरावे कोणालाही सपडतील, रादर सापडावे असे पुरावे टेबलवर पसरून ठेवतात
* पाण्यातून इकडे तिकडे करणार्या, जिन्यावरून पळणार्या, उगीच खिदळणार्या बायका
* इतर सुंदर सेट्स असताना मधेच* अॅनिमेटेड गंगुबाई रिसायकल्ड सेट्स येतात.
*जिला भरपूर स्क्रीन टाइम मिळालाय ती 'आलम' एकदमच बथ्थड निर्विकार, दगडी चेहर्याची बाई आहे
* सोनाक्शी सिन्हा, अजिबात त्या काळातली तवायफ वाटत नाही, एक नंबरची टपोरी साउथ इंडियन मुव्ही मधली आयटेम गर्ल दिसते, रिचा चढ्ढा सुद्धा मुळीच त्या काळातली दिसत नाही, तिला अजिबात नाचता येत नसून सोलो क्लासिक्॑ल डान्स असलेला मुजरा दिलाय तिला, कोरीओग्राफी चांगली असून डान्सर अशी असेल तर मीठाचा खडा पडतोच !
एक अदिती राव हैदरी सोडून कोणामधेही मुजर्याच्या अदाए/ग्रेस नाही पण आदिती सुद्धा आता अशा रोल्स महे टाइपकास्ट होतेय !
* ही जरा जास्तं आपेक्षा झाली पण १९२० च्या आसपास अशी बारीक कोनने काढलेली नाजुक मेहन्दी डिझाइन्स नसायची, बरेचदा आत्ता सार्॑खी डिटेल्स असलेली डिझाइन्स येतात सिरीज मधे.
* तो ताज अजुन एक दगड, ना त्याला आलम वर प्रेम ना देश्॑प्रेम नीट दाखवता येत !
* सोनाक्षी अचानक मनिषा कोईरालाचा बदला घ्यायचा विसरून आझादीकी जंग मधे सामील होते , शेवट अगदीच गुंडळला.
तरीही भन्सालीला धन्यवाद : मनिषाच्या जागी माधुरीला घेतले नाही यबद्दल थँक्स अ टन.. कलंक मधे सेम हिरामंडी विष्॑य होता, त्यातली मधुरी इतकी खोटी आणि सुमार अभिनय , डॉयलॉग्ज मारते, तिचा विचार न केल्याबद्दल मंडळ आभारी आहे 
अत्यंत समयोचित, संतुलित आणि
अत्यंत समयोचित, संतुलित आणि माहितीपूर्ण पोस्ट. 'वाल्मिकीचा वाल्या' -विदाऊट हेड ॲन्ड शोल्डर्स >>>
यातले पहिले वाक्य जास्त लोल आहे की दुसरे विचार करतोय
बाय द वे हेड अॅण्ड शोल्डर्सचा संदर्भ काय आहे? 
पुरुषांना, करून दाढी भारी परफ्यूम मारून आलोया... आहे की. >>> टोटली
हे निसटले होते.
आठवला शब्द जनानखाना म्हणत असत
अस्मिता, आठवला शब्द. जनानखाना म्हणत असत, तो जास्त फेमस शब्द आहे, अजून काही शब्द आहेत का आठवत नाहीये, राणीवसा कशाला म्हणतात. उर्दू शब्द (जनानखाना उर्दूच आहेना, माझं नॉलेज जरा कमी पडते भाषेबाबत) फेमस व्हायच्या आधी कुठला शब्द होता काय माहिती.
फार्सी असावा. कारण उर्दू
फार्सी असावा. कारण उर्दू विकसित व्हायच्या आधीपासून प्रचलित होता बहुतेक. आपल्याकडे "अंतःपूर" ऐकलेले आहे. पण तेथे फक्त राणी किंवा त्यातही पट्टराणी असते की जनानखान्यासारखेच असते हे माहीत नाही.
यावरून आठवले पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे स्पेलिंग ते Jnana Prabodhini असे करतात. ते पाहून आम्ही त्याला जनाना प्रबोधिनी म्हणायचो ते आठवले
पी एस काय असतं?
पी एस काय असतं?
फारएन्ड धन्यवाद.
फारएन्ड धन्यवाद.
अंत:पूर म्हणजे राणी चिडली, रुसली की जाऊन बसायची तिकडे, असा माझा समज आहे (वाचलेलं इथे तिथे).
पी एस काय असतं?>>ponniyin
पी एस काय असतं?>>ponniyin selvan
अंत:पूर म्हणजे राणी चिडली,
अंत:पूर म्हणजे राणी चिडली, रुसली की जाऊन बसायची तिकडे, असा माझा समज आहे (वाचलेलं इथे तिथे).>>> ते कोपग्रुह ना? अंत:पुर म्हणजे मास्तर स्विट किवा क्विन रुम असाव
कोप:गृह का, हेच योग्य असेल.
कोप:गृह का, हेच योग्य असेल. मे बी माझं चुकत असेल.
ते क्रोधागार
ते क्रोधागार
अर्थात हे खरोखर पारिभाषिक शब्द होते तेव्हा वापरात की नंतरच्या लेखकांनी मनातून लिहीले आणि इतरांनीही वापरले कोणास ठाऊक.
MazeMan, कभी फिरसे आओ स्वाती
MazeMan, कभी फिरसे आओ स्वाती या मेरे पी एस धागेपर. तुम्हाला मानाचं आमंत्रण आहे. हा केसांचा मुद्दा फार भारी आहे, तिथे आधी कुणी मांडला नाहीये.
करून दाढी भारी परफ्यूम >>

वाल्मिकीचा वाल्या >>
अच्छा सिनेमा. पाहिला नाहीये
अच्छा सिनेमा. पाहिला नाहीये म्हणुन लक्षात नाही. थँक्स प्राजक्ता.
फक्त एकच गोष्ट वरचढ आहे ते
फक्त एकच गोष्ट वरचढ आहे ते म्हणजे सौन्दर्य. ती ते वापरते. कुंदवैच्या इतर प्रिव्हिलेजमुळे तिला सौन्दर्य वापरावे लागत नाही किंवा तिचा तो स्वभाव नाही. (पुस्तकानुसार कुंदवैही तोडीस तोड सुंदर आहे.)
<<<<<
सौंदर्याच्या बाबतीत सुद्धा मला कुंदवैच वरचढ वाटली सिनेमात (त्रिशा जास्त सुन्दर दिसते ऐश्वर्या पेक्षा.)
परंपरेला मुकुल आनंदने इथे छेद
परंपरेला मुकुल आनंदने इथे छेद दिला होता Happy
राजकारणावरच्या सर्व चर्चा कधीतरी गांधी/नेहरूंवर पोहोचतात तसे चित्रपट्/सिरीजवरच्या सर्व चर्चा कधीतरी पीएसवर पोहोचतात >>
अंतःपूर म्हणजे राजवाड्यातला
अंतःपूर म्हणजे राजवाड्यातला राणीमहाल.

मुघल शैलीतील चित्रात त्यात बगिचा आसतो. बगिचाच्या मधोमध चबुतरा, त्यावर जाळीची कॅनॉपी, झुला दिसतात. बरेचदा बादशहाच्या हातात गुलाब असतो. पिंजोर गार्डन मधे रंगमहाल आणि बाग आहे. त्याच्या मधे राजा राणीला झोके खेळण्यासाठी जागा आहे.
असं काही तरी अंतःपूर असाव. ( 2BHK च्या पुढे कल्पना शक्ती गुंगते)
पिंजोर मोठं आहे.
अंतःपूर शब्दामुळे राणीच्या
अंतःपूर शब्दामुळे राणीच्या अंतःकरणाला पूर आल्यावर त्यात वाहत वाहत राजा जिथे पोहोचतो ती जागा हा अर्थ मलाही पटतो.
तुम्हाला मानाचं आमंत्रण आहे.
तुम्हाला मानाचं आमंत्रण आहे.
@हर्पा >>> धन्यवाद. छान धागा आहे तो, संदर्भासहित स्पष्टीकरण देणारा. पुस्तक न वाचलेल्या, पी एस आत्तापर्यंत न पाहिलेल्या आणि पाहू इच्छिणाऱ्या लोकांनी पी एस फॉर डमीज जरूर वाचावा. स्वातीचा क्षणचित्रांची आतषबाजी धागा पण मस्त आहे.
वाल्मिकीचा वाल्या' -विदाऊट हेड ॲन्ड शोल्डर्स

करून दाढी भारी परफ्यूम मारून आलोया
>>>
धन्यवाद र.आ.
धन्यवाद र.आ.
2BHK च्या पुढे कल्पना शक्ती गुंगते >>>
पुलंचे "इतका मोठा हॉल होता. शंभर एक पान सहज उठलं असतं" आठवले
त्या शार्मिन सेह्गलला लोकं
त्या शार्मिन सेह्गलला लोकं झोडताहेत पण तिचा 'मलाल' मूवी चांगला होता. अभिनय बरा जमलाय.
हे इतक्या दिवसांनी आठवलं...
कुठेतरी पाहिलय तिला कुठल्या तरी चित्रपटात... लक्षात येत न्हवते.
बिचार्या चिन्मयीला एकदमच मराठी चाळकरी म्हणजे अडाणी बनवलय.
Pages