भन्सालीची रत्नं : अर्थात हीरामंडी !

Submitted by दीपांजली on 2 May, 2024 - 23:08

तर भन्सालीची स्लो कुक्ड लाहोरी बिर्याणी नेटफ्लिक्स वर वाढली आहे, त्यातल्या कोंबड्या आणि इतरांची पिसे काढायला हा सेपरेट धागा हवाच्ग !
स्पॉयलर्सने भरलेला धागा आहे त्यामुळे आपापल्या जवाबदारीने वाचा Wink
पिसं काढण्या आधी काय आवडले तेही लिहिते :
भन्सालीला साजेशा सुंदर फ्रेम्स, सेट्स, दागिने, कपडे, एपिसोड काहीतरी करून बघायला एन्गेज ठेवेल असा ड्रामा, गाणी, कोरिओग्राफी सगळे भन्सालीच्या मुव्हीज सारखे !
मनिषा कोईरालाचा अभिनय , स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्तं आहे, तिचे गरारे,शरारे सुंदर आहेतच पण साड्या , ज्युलरी पण आवडली.
20240501_203034.jpeg20240502_215348.jpeg20240501_203039.jpeg
संजिदा शेख , आदिती राव हैदरी, सैमाचा रोल करणारी अ‍ॅक्ट्रेस, उस्तादचा रोल करणारा अ‍ॅक्टर सगळ्यांनी चांगला अभिनय केलाय.
पहिले २-३ एपिसोड्स ग्रिपिंग आहेत.
सकल बन, हमे देखनी है आझादी गाणी आवडली, इतरही ठुमरी गाणीही चांगली आहेत .
लज्जोच्या अकाली मृत्यु नंतर जे ‘हमे देखनी है आझादी ‘गाणं पहिल्यांदा येते तो सीन आणि ‘रुदाली’ स्टाइल कोरिओग्राफी, मनिषा कोइरालाचा नशेत नाचणे सीन मस्तं घेतलाय, टिपिकल भन्साली स्टाइल !
गोल्डन बेज भन्सालीच्या पॅलेट मधला आवडता कलर आहेच, तो रंग दिसतोच पण त्याचा अजुन एक आवडता ‘चान्द छुपा बादलमे मधला, देवदास मधल्या ‘मोरे पिया’, मधला लॅव्हेन्डर कलरही येतो,
20240502_222716.jpeg20240502_222645.jpegआता खराखुरा रिव्ह्यु :
*तो नवाब ताज मुशायरा चालु असताना लांबूनच एक पोरगी आवडली कि डायरेक्ट तिच्या आंगचोटीला जाऊन रोमान्सयुक्त फ्लर्टिंग सुरु करतो, मुलीचे नावही माहित नसताना आणि ती मुलगी (आलम) पण लगेच त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरवात करते , काहीच ऑफेन्सिव वाटत नाही तिला.. एरवी हे दोघेही तवायफ-नवाब कल्चरच्या विरुद्ध असतात, पण पोरगी दिसली बसी कि गळ्यात पडला, ट्रिटिंग हर लाइक अ प्रॉस्टिट्युट !
*ताजची आज्जी संस्कार वर्गासाठी नातवाला हिरामंडीत जायची शिकवण देते.
*अधयन सुमन आणि शेखर सुमन अगदीच यक्स नवाब आहेत,.
नवाब कितीही रंगेल असले तरी अध्ययन होणार्‍या बायको समोरच कोठेवाली ठेवल्याचा खुल ए आम गर्व करतो.
* ब्रिटिश अ‍ॅक्सेन्ट मधे उर्दु बोलणारे विनोदी गोरे ऑफिसर्स
* स्वातंत्र्यलढा लढणारे क्रांतिवीर सगळे पुरावे कोणालाही सपडतील, रादर सापडावे असे पुरावे टेबलवर पसरून ठेवतात
* पाण्यातून इकडे तिकडे करणार्‍या, जिन्यावरून पळणार्या, उगीच खिदळणार्या बायका
* इतर सुंदर सेट्स असताना मधेच* अ‍ॅनिमेटेड गंगुबाई रिसायकल्ड सेट्स येतात.
*जिला भरपूर स्क्रीन टाइम मिळालाय ती 'आलम' एकदमच बथ्थड निर्विकार, दगडी चेहर्‍याची बाई आहे
* सोनाक्शी सिन्हा, अजिबात त्या काळातली तवायफ वाटत नाही, एक नंबरची टपोरी साउथ इंडियन मुव्ही मधली आयटेम गर्ल दिसते, रिचा चढ्ढा सुद्धा मुळीच त्या काळातली दिसत नाही, तिला अजिबात नाचता येत नसून सोलो क्लासिक्॑ल डान्स असलेला मुजरा दिलाय तिला, कोरीओग्राफी चांगली असून डान्सर अशी असेल तर मीठाचा खडा पडतोच !
एक अदिती राव हैदरी सोडून कोणामधेही मुजर्‍याच्या अदाए/ग्रेस नाही पण आदिती सुद्धा आता अशा रोल्स महे टाइपकास्ट होतेय !
* ही जरा जास्तं आपेक्षा झाली पण १९२० च्या आसपास अशी बारीक कोनने काढलेली नाजुक मेहन्दी डिझाइन्स नसायची, बरेचदा आत्ता सार्॑खी डिटेल्स असलेली डिझाइन्स येतात सिरीज मधे.
Screenshot_20240502_215539_Gallery.jpeg
* तो ताज अजुन एक दगड, ना त्याला आलम वर प्रेम ना देश्॑प्रेम नीट दाखवता येत !
* सोनाक्षी अचानक मनिषा कोईरालाचा बदला घ्यायचा विसरून आझादीकी जंग मधे सामील होते , शेवट अगदीच गुंडळला.
तरीही भन्सालीला धन्यवाद : मनिषाच्या जागी माधुरीला घेतले नाही यबद्दल थँक्स अ टन.. कलंक मधे सेम हिरामंडी विष्॑य होता, त्यातली मधुरी इतकी खोटी आणि सुमार अभिनय , डॉयलॉग्ज मारते, तिचा विचार न केल्याबद्दल मंडळ आभारी आहे Proud

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> अजियो”नी त्यांच्या 'एथनिक कलेक्शन'मध्ये लाहोरच्या 'वेश्यांचा पोशाख' सादर केलाय आणि त्याला 'हिरामंडीपासून प्रेरित' असे म्हंटले आहे.>> बघितलं. पण वेश्याबिश्यांचा पोशाख अजिबात दिसत नाहीये. शरारे, कुर्ते, साडया वगैरे आहेत. जे बाकीच्या साईट्सवर हिरामंडी प्रेरीत न लिहिता कपडे विकत असतील तसेच इथेही आहेत. नाही म्हणायला केसांमध्ये तो छल्ला टाईप दागिना घालतात तसा ऑलमोस्ट सगळ्या बायांनी घातलेला दिसतोय.

हीरामंडी सिनेमा वरून प्रेरीत कपडे/दागिने आहे म्हणून लगेच कोणाचा सन्मान कमी झाला का ?
अनारकली ड्रेसेस कित्येक वर्षांपासून पॉप्युलर आहेत .
तसे तर मग कथ्थक नृत्य , ठुमरी वगैरेलाही मग कमी लेखाल गणिकांची कला म्हणून Uhoh

मी ती मोठ्ठाल्या नथींनी वाकलेल्या नाकपुड्या पाहील्या आणि तत्काळ बंद केला. इतकं वजन नाकाला देउन ठेवलेलं बघवत नाही यार!! कै च्या कै वाटतं, नाक नाजूक, चाफेकळीच हवं अ‍ॅट द मोस्ट चमकी घाला.

मठ्ठ आलमजानची नाडीपरीक्षा करताना बिब्बोला ओल्ड बॉलिवुड स्टाइलने 'दोन धडकनें' जाणवल्या आणि ती प्रेग्नन्ट असल्याचं कळलं!
मग जुळं कन्सीव्ह केलं असेल तर तीन धडकनें ऐकू येत असतील का अशी आपली मला एक शंका.

त्यांना माहित असलेल्या किती गोष्टी आधुनिक सायन्सला कळाय्च्या आहेत अजून!! Proud

ते दो धडकने सीन दाखवायची गरज ही नव्हती खरं तर, का अट्टाहास करतात असली स्टूपिडिटी दाखवायचा. फार तर तिने बहिणीला कानात सांगितलं वगैरे असं काही चाललं असतं की.
ओवरऑल स्टोरी मधे पोटेन्शियल होतं असं मला वाटलं. पण त्या तवायफ्स ना लार्जर दॅन लाइफ दाखवायच्या नादात सुरुवातच हास्यस्पद झाली. मग २ ते ५ मधल्या भागांमधे काही इन्टरेस्टिंग सीन्स होते. २-३ मुजरे स्पेक्टॅक्युलर होता होता राहिले, कारण ते मिळालेत नॉन डान्सर्स आणि दगड अ‍ॅक्टर्सना ! शेवटी तर सपशेल माती खाल्लेली आहे. रोगाची साथ पसरावी तशी लोकांना अचानक देशभक्तीची लागण होते जी आधी कुणाच्या खिजगणतीत नसते! आणि आधीच्या बिल्ड केलेल्या कॅरेक्टरशी पार फटकून वागू लागतात.

ही सिरिअल खालील टेम्प्लेट वापरुन लिहिली असेल का?

विषयः तवाएफ ग्लोरिफिकेशन, आधीच्या सिनेमातली प्रॉपर्टी जसे कपडेपट/ हौद/ रंग यांचा पुर्नवापर. एकेए रिड्युस, रिपर्पज, रिसायकल. येस! #अर्थ (इंग्रजी अर्थ. मराठी न्हवे) केअर
पिरिएड ? १९२० (समजा) : पारतंत्र्य, स्वातंत्र्याची चळवळ, नवाब-तवाएफ रिलेशन्स, जुलमी ब्रिटिश, कीवर्ड : ब्रिटिश. फोडा आणि झोडा. मग झालंच तर स्वातंत्र्यासाठी बलिदान,
सध्याच्या टार्गेट ऑडियन्सची सायकी: काही सर्वधर्मसमभाव वाले. मग हिंदू-मुस्लिम-सीख सगळे इंकलाब ... द्या नारे! काही जहाल ते उत्तम. मग बंदूका, बारुद .. करो या मरो... ठो ठो ठो!
१९२० मधल्या लोकांच्या समजुती : नाडी परीक्षा करुन प्रेग्नंसी हुडकणे,
टार्गेट प्रोटॅगनिस्ट स्टिरिओटाईपच्या: लकबी-सवयी-विश्वास-अंधविश्वास/ त्यांच्या पॉप्युलर कल्चरमध्ये पोर्ट्रे केलेल्या सवयी-लकबी-विश्वास-अंधविश्वास: पेहेला मुजरा, आखरी मुजरा, नथ उतराई, तेहेजीब की पाठशाला इ. इ.

कथा: आता वरील सगळं एका भांड्यात घेऊन मिसळायच.
थोडक्यात, कथेत काय असतं? तर प्रेम, नातेसंबंध, एकमेकांना पाण्यात बघणे, कुरघोडी, नात्यांचे त्रिकोण चौकोन पंचकोन.
तर कथा मधील प्रत्येक बुलेट पॉईंटची वरील सगळ्या बुलेट्सची पर्म्युटेशन करुन किमान एक प्रसंग लिहायचा. एकापेक्षा अधिक गोष्टींशी पर्म्युटेशन करुन काही लिहिता आलं तर बोनस पॉईंट्स.
डन! शूट इट! ....
बाकी ग्राफ वगैरे लोक हुडकत बसतील.

बाकी आम्ही शेवटी शूट इट न म्हणता शिप इट म्हणतो. बाकी दुसरं काय करतो!

नाही, ओरिजनल स्टोरी भन्सालीची नाहीये , मुळ कन्सेप्ट मोईन बेग यांची आहे.
वर मै ने लिहिलय तसं स्टोरी मधे दम होता, एन्टरटेन्मेन्ट होती.. त्यात लव्ह स्टोरी आणि देशभक्ती अ‍ॅड केल्यामुळे ट्रॅक घसरला.
सुरवातीचे एपिसोड्स ग्रिपिंग होते , दुसरा एपिसोड तर खूप भारी होता.

कोणाची का असेना! स्टोरीचा पॉइंटच मला दिसला नाही. त्यातलं आडतल किती आणि पोहऱ्यात कुठले रंग मिसळले आहेत... का सगळं आडातच होतं त्याने काय फरक पडतोय!

वॉक ऑफ शेम बघितला आणि अंगावर आला. भारी घेतलाय हा सीन!
शेवटचे दोन एपिसोड आवडले. शेवट इतका ताणून न करता थोडा आधी, बऱ्याच गोष्टी अध्याहृत धरून सांकेतिक केला असता तर जास्त परिणामकारक ठरता.
वेळ वाया दवडण्याच फिलिंग गेलं. हे ही नसे..

सगळ्यात जास्त राग मला आला जेव्हा माझ्या ऑल time favourate पाकिजा मधला सिन कॉपी केला त्याने... तो कुतुबुद्दीन वाला... पण इथे त्या सिन च पोतेरं केलय..

@mazeman लिंक कशी टाकायची माहित नाही पण पाकिझा मध्ये जेव्हा साहेबजान सलीमच्या लग्नात मुजरा करायला जाते(आज हम अपनी दुवा का असर देखेंगे ), तेव्हा नावाबजान तिच्या वडिलांना ओळखते (सलीम चे काका - अशोक कुमार ) आणि तिला कळतं कि साहेबजान यांची आणि नर्गिस ची मुलगी आहे तेव्हा ती ओरडते "शहाबुद्दीन.. आओ देखो.. अपनी बेअब्रुइका तमाशा देखो

हिरामंडी मध्ये मको जेव्हा सांगते त्या नवाब कि तू माझा मुलगा आहेस तिने तो सिन कॉपी केलाय.. बकवास एकदम

हिरामंडी बघितला... सुरुवात आणि शेवट कशाचा कशाला ताळमेळ नाही. "भाई केहेना क्या चाहते हो ?" असे झाले.
मलीकाच्या दोन्ही लेकी दोन ईंग्रजांना मारुन स्वत: शहीद झाल्या...

पहिला मूल उचलुन देण्याचा सीन आणि नंतर ताजदार ला बघुन आणि त्याची आज्जी आणि मल्लीकाची मैत्री बघुन मला असे वाटलेले की ताज मलिकाचाच मुलगा निघणार. पण पुढे काहीतरी भलतेच घडले. असो...

"हमे देखनी है आझादी" गाणं ऐकुन काश्मिर फाईल्स मधल्या "हम देखेंगे" ची आठवण आली.. चाली साधारण सारख्याच आहेत असं वाटलं...

तेव्हा ती ओरडते "शहाबुद्दीन.. आओ देखो.. अपनी बेअब्रुइका तमाशा देखो >>
https://www.youtube.com/watch?v=rTIHxZK5vDQ
२८:३८ पासून पुढे... फारच परिणामकारक
@ हरिभरि, mazeman
<<<<
वरच्या लिंक मधे २१:४२ पासून पहा, २८ मिनिटाचा व्हडिओच नाहीये तो.
मला पाकिजाचा हा सीन लक्षात नव्हता, पण आवडला मनिषा कोईरालाचा तो सीन सुद्धा.

हा पाकिझा मधला सीन ऑटाफे???
मेरी बेटी- मेरी बाबा. शहाबुद्दीन पेहेचानो... हट जाओ.. ढिशुम! काय तो भडक प्रकार आहे.
मला तर हिरामंडीतला ह्याच्यापेक्षा नक्कीच बरा वाटला.

अमितव +११११
पाकिझा सीन मधे ७० काळातला ओव्हर अ‍ॅक्टिंग ड्रामा आहे नुसता !
हिरामंडी मधला सीन भारी जमलाय, मसालेदार डॉयलॉग्ज आहेत नुसते “ नवान झोरावर अली खान जूता भी मारता है तो सोनेका मारता है '
हीरामंडीकि परवरिश से बडी झिल्लत और क्या हो सकती है ?
मल्लिकाजान : हिरामन्डीकी पैदाइश Happy
https://youtu.be/XcNIiwkEkYk?si=vOx8u2eYRKhlnl_X

मनिषा कोइराला चा सीन मला इन्स्पयर्ड वाटला खरा पण तो मस्त घेतला आहे. पाकिजाचा ओवर ड्रामॅटिक वाटतो आहे. असं बर्‍याच जुन्या सीन्स/ सिनेमांबद्दल होतं. जितके ते तेव्हा गाजलेले असतात तसे आपल्याला आता बघ्ताना नाही वाटत.

नेटाने काही भाग बघितलेच..मनिषाची निवड आवडली नाहीच फारशी...जुही,रविना वैगरेला घ्यायला हव होत...मनिषाचा चेहरा अगदी रिजिड आहे,कुठलेही भाव दिसत नाही, एकदम निस्तेज दिसते...आजही रेखाने चान्गली केली असती हुजुर!
बाकी अन्धारातली शुटिन्ग अत्यत अनएन्गेजिन्ग प्रकार! हवेलीच्या आतली शुटिन्ग चान्गली आहेत बाकी बाहेरचे चौकातले सिन सगळे तद्दन खोटे वाटतात.
यच्चयावत नबाब्,रिचा चढ्ढा,अमानची भुमिका करणारी सगळे अगदी ठोकळे आहेत...फरदिन खानच्या चेहर्यावरची रेषही हालत नाही...इतका मठ्ठोबा आहे.
मधुन मधुन ब्रिटिश ऑफिसर इन्ग्लिश मधे सवाद साधतात ते सगळ हिरामन्डी पब्लिकल कळत असत....व्हिजन प्रो वैगरे टाइप काही होत का त्याच्याकडे जे ट्रान्सलेट होवुन येतात. सोनाक्षी तवायफ वाटत नाही पण रोल चान्गला केलाय आणी अदिती राव हैदरीचा हातखण्डा रोल त्यामुळे तिनेच चान्गला केलाय..गालावर चाकुच निशाण वाली पण बरी आहे.
एकही डान्स बघण्यालायक नाही की गाण लक्षात राहत नाही...भन्साळिचा युएसपीच गन्डलाय.. मनिषाला अजिबात डान्स येत नाही, अगदी दोन मिनिटाच्या येलो ड्रेस कॉमन डान्स मधेही तिच्यात नजाकत दिसत नाही..त्यातही घुमरची सिग्नेचर स्टेप घुसडलीये? रिचा चढ्ढाला का नाचवल असेल?रिचा चढ्ढा अजुनही फुकरे मोड मधे असल्यासारखी वाटते.

बाकी इन्कलाब,स्वातत्र्य लढा वैगरे तोन्डी लावण फसलय.

मनिषाने छान केलाय रोल. आता सगळी बघितल्यावर मल्लिकाजानच्या जागी दुसरं कोणीच नको. अगदी रेखाही नको. मकोच छान आहे.
सोनाक्षी तवाएफ नाहीच आहे. ती न्यू जनरेशन मेमसाब होते. तवाएफ व्हायचं आहे पण मेमसाबच होते ती. फरदीन खान ठोकळा आहेच, पण नवाबाच्या चेहर्‍यावरची माशी कशाला हलायला हवी आहे? पैसा आहे आणि वेळ काढायचा आहे. त्यात लस्ट ही नाही. फक्त वेळ काढायचं ठिकाण आहे हिरामंडी त्यांच्यासाठी.
बाकी गाणी आवडली मला. मनिषा गळा आणि जिस्म गेलेलीच हवी ना? ती हुजुर आहे. नाचणारी असेल एकेकाळी आज तालावर नाचवणारी आहे. ते तिचे डोळे आणि शब्द धारदार आणि बोलके हवे. ते बोलतात.
ती पोलिस स्टेशन मध्ये गाणं गाते तेव्हा तिने सिरियल मध्ये एकही गाणं गायलेलं नसुनही तो चिरका आवाज ऐकुन काळजात तुटतं आपल्या.

मनिषा कोईराला बद्दल पुन्हा एकदा अमितला +११११
तिच्या जागी कोणी इमॅजिन करु शकत नाही, काय बेअरिंग पकडलय कॅरॅक्टरचं , मीनाकुमारी इन्स्पायर्ड आहे पण इतक्या सगळ्या अभिनयाच्या छटा दाखवण्याची , मल्लिकाजानचा अ‍ॅटिट्युड दाखवायची अ‍ॅबिलिटी तिच्या एज गृप अ‍ॅक्ट्रेसेस पैकी कुणाकडेही नाही, अगदी विद्या बालन सुद्धा नसती चालली इथे !
सुंदर दिसणर्‍या बर्‍याच बायका मिळतील पण तवायफ कॅरॅक्टर मधे इतकी घुसणारी कोणी नसती मिळाली .

पाकिजा सीन कुठे आहे ते कळलं म्हणुन ते विचारणारा प्रतिसाद काढला.

मीही सुरू केली चार एपिसोड बघितले. मनिषा कोईरालाचं काम अप्रतिम झाले आहे. तीच लक्षात राहते म्हटलं तरी वावगं ठरू नये. आलम आवडली नाही, त्यापेक्षा सायमा फार बोलक्या आणि गोड चेहऱ्याची आहे. लापता लेडीज मधली जया दिसली पण अजून तिचं काम सुरू झाले नाही. मला ताज राहूनराहून रामचरण सारखा दिसू लागला. रामचरण देखणा नाही वाटत त्यामुळे ह्याला कुणी देखणं म्हटलं की खटकू लागलं. सोनाक्षीचे केस/लूक सिक्स्टीजचे वाटला.

विद्या बालन नो नो. तिचा सात्विक अय्यंगार लूक आहे. इडलीचे कुकर लावून आल्यासारखी वाटली असती इथं.
माधुरी दीक्षित देढ इश्किया/ कलंक मधे तवायफ होती. ती असेल तिथे कॅरेक्टर उरत नाही तीच उरते. तिलाही तेच हवं असतं.

संवाद चांगले आहेत पण न-अभिनयाची नुसती रेलचेल आहे हिरामंडीच्या या सीनमध्ये. 'हिरामंडी' पूर्ण नाही पाहिलाय, पण या सीनमध्ये मनीषा नाही आवडली मला. आणि ती दात चावून का बोलतेय कवळी लावल्यासारखे?

पाकिझाचा शेवट मला सहकलाकारांसाठी आवडतो, इस्पेशिअली वीणा. शहाबुद्दीनला चॅलेंज करताना तिचा करारीपणा, नंतर कोठ्यावर बारात आल्यावर आश्चर्य, अजान का कुराणपठण सुरु झाल्यावर काहीतरी आठवल्यासारखे कानाला हात लावणे, अशोक कुमारचे वडील दाखवले आहेत त्यांनी कोठ्याची पायरी चढताना कोसळणे, एका कुठल्याश्या कोवळ्या तवायफने त्या डोलीकडे आसूसून बघणे हे फार आवडलं मला. मुख्य कलाकार ओटीटी आहेत हे खरं.

हिरामण्डी पाहिला नाही पण youtube ला सारखे त्याचेच shorts येतायेत suggestion मध्ये, कस काय काय माहित. You ट्यूब shorts बघितले त्यात सगळ्या बाया बापड्या सगळ्या दुःख आनंद सगळ्या प्रसंगात चेहऱ्यावर इस्त्री फिरावल्या सारख्या आहेंत. कुणाच्याही डायलॉग दरम्यान त्यांचे ओठ एखाद सूत जाईल मध्यात इतके पण विलग होतं नाहीत. हेलाच बात करनेकी तमीज अन तहजीब का काय ते म्हणत असतील बहुदा

तिचा सात्विक अय्यंगार लूक आहे >>> अस्मिता डर्टी पिक्चर पाहिला नाहीस का? मनात आणले तर ती अज्जीबात सात्विक दिसत नाही.
माधुरी मात्र माधुरीच वाटली असती.

'डर्टी पिक्चर' बघितला आहे Happy .
त्यात मादक दिसली आहे हेही खरं पण वय लहान असताना 'स्लटी लूक' कॅरी करता येतो. बेगमजानचं ट्रेलर बघून मात्र मळमळलं होतं. ती आयुष्यातले अवमान आणि अपेक्षाभंग सोसून निबरलेली, कडवट आणि स्वार्थी 'तवायफ' वाटणं कठीण आहे.

Pages