भन्सालीची रत्नं : अर्थात हीरामंडी !

Submitted by दीपांजली on 2 May, 2024 - 23:08

तर भन्सालीची स्लो कुक्ड लाहोरी बिर्याणी नेटफ्लिक्स वर वाढली आहे, त्यातल्या कोंबड्या आणि इतरांची पिसे काढायला हा सेपरेट धागा हवाच्ग !
स्पॉयलर्सने भरलेला धागा आहे त्यामुळे आपापल्या जवाबदारीने वाचा Wink
पिसं काढण्या आधी काय आवडले तेही लिहिते :
भन्सालीला साजेशा सुंदर फ्रेम्स, सेट्स, दागिने, कपडे, एपिसोड काहीतरी करून बघायला एन्गेज ठेवेल असा ड्रामा, गाणी, कोरिओग्राफी सगळे भन्सालीच्या मुव्हीज सारखे !
मनिषा कोईरालाचा अभिनय , स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्तं आहे, तिचे गरारे,शरारे सुंदर आहेतच पण साड्या , ज्युलरी पण आवडली.
20240501_203034.jpeg20240502_215348.jpeg20240501_203039.jpeg
संजिदा शेख , आदिती राव हैदरी, सैमाचा रोल करणारी अ‍ॅक्ट्रेस, उस्तादचा रोल करणारा अ‍ॅक्टर सगळ्यांनी चांगला अभिनय केलाय.
पहिले २-३ एपिसोड्स ग्रिपिंग आहेत.
सकल बन, हमे देखनी है आझादी गाणी आवडली, इतरही ठुमरी गाणीही चांगली आहेत .
लज्जोच्या अकाली मृत्यु नंतर जे ‘हमे देखनी है आझादी ‘गाणं पहिल्यांदा येते तो सीन आणि ‘रुदाली’ स्टाइल कोरिओग्राफी, मनिषा कोइरालाचा नशेत नाचणे सीन मस्तं घेतलाय, टिपिकल भन्साली स्टाइल !
गोल्डन बेज भन्सालीच्या पॅलेट मधला आवडता कलर आहेच, तो रंग दिसतोच पण त्याचा अजुन एक आवडता ‘चान्द छुपा बादलमे मधला, देवदास मधल्या ‘मोरे पिया’, मधला लॅव्हेन्डर कलरही येतो,
20240502_222716.jpeg20240502_222645.jpegआता खराखुरा रिव्ह्यु :
*तो नवाब ताज मुशायरा चालु असताना लांबूनच एक पोरगी आवडली कि डायरेक्ट तिच्या आंगचोटीला जाऊन रोमान्सयुक्त फ्लर्टिंग सुरु करतो, मुलीचे नावही माहित नसताना आणि ती मुलगी (आलम) पण लगेच त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरवात करते , काहीच ऑफेन्सिव वाटत नाही तिला.. एरवी हे दोघेही तवायफ-नवाब कल्चरच्या विरुद्ध असतात, पण पोरगी दिसली बसी कि गळ्यात पडला, ट्रिटिंग हर लाइक अ प्रॉस्टिट्युट !
*ताजची आज्जी संस्कार वर्गासाठी नातवाला हिरामंडीत जायची शिकवण देते.
*अधयन सुमन आणि शेखर सुमन अगदीच यक्स नवाब आहेत,.
नवाब कितीही रंगेल असले तरी अध्ययन होणार्‍या बायको समोरच कोठेवाली ठेवल्याचा खुल ए आम गर्व करतो.
* ब्रिटिश अ‍ॅक्सेन्ट मधे उर्दु बोलणारे विनोदी गोरे ऑफिसर्स
* स्वातंत्र्यलढा लढणारे क्रांतिवीर सगळे पुरावे कोणालाही सपडतील, रादर सापडावे असे पुरावे टेबलवर पसरून ठेवतात
* पाण्यातून इकडे तिकडे करणार्‍या, जिन्यावरून पळणार्या, उगीच खिदळणार्या बायका
* इतर सुंदर सेट्स असताना मधेच* अ‍ॅनिमेटेड गंगुबाई रिसायकल्ड सेट्स येतात.
*जिला भरपूर स्क्रीन टाइम मिळालाय ती 'आलम' एकदमच बथ्थड निर्विकार, दगडी चेहर्‍याची बाई आहे
* सोनाक्शी सिन्हा, अजिबात त्या काळातली तवायफ वाटत नाही, एक नंबरची टपोरी साउथ इंडियन मुव्ही मधली आयटेम गर्ल दिसते, रिचा चढ्ढा सुद्धा मुळीच त्या काळातली दिसत नाही, तिला अजिबात नाचता येत नसून सोलो क्लासिक्॑ल डान्स असलेला मुजरा दिलाय तिला, कोरीओग्राफी चांगली असून डान्सर अशी असेल तर मीठाचा खडा पडतोच !
एक अदिती राव हैदरी सोडून कोणामधेही मुजर्‍याच्या अदाए/ग्रेस नाही पण आदिती सुद्धा आता अशा रोल्स महे टाइपकास्ट होतेय !
* ही जरा जास्तं आपेक्षा झाली पण १९२० च्या आसपास अशी बारीक कोनने काढलेली नाजुक मेहन्दी डिझाइन्स नसायची, बरेचदा आत्ता सार्॑खी डिटेल्स असलेली डिझाइन्स येतात सिरीज मधे.
Screenshot_20240502_215539_Gallery.jpeg
* तो ताज अजुन एक दगड, ना त्याला आलम वर प्रेम ना देश्॑प्रेम नीट दाखवता येत !
* सोनाक्षी अचानक मनिषा कोईरालाचा बदला घ्यायचा विसरून आझादीकी जंग मधे सामील होते , शेवट अगदीच गुंडळला.
तरीही भन्सालीला धन्यवाद : मनिषाच्या जागी माधुरीला घेतले नाही यबद्दल थँक्स अ टन.. कलंक मधे सेम हिरामंडी विष्॑य होता, त्यातली मधुरी इतकी खोटी आणि सुमार अभिनय , डॉयलॉग्ज मारते, तिचा विचार न केल्याबद्दल मंडळ आभारी आहे Proud

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत, तुमची इन्डियन एक्स्प्रेसची लिंक चांगली आहे.
तवायफांच्या कितीतरी आधी 'गणिका' ही अशीच कॅटेगरी होतीच की भारतात - वसंतसेना आठवते ना? किंवा मीना कुमारीचा 'चित्रलेखा' सिनेमा (संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे) किंवा वैजयंतीमालाची नगरवधू 'आम्रपाली' आठवा. गणिकादेखील कलानिपुण आणि बहुश्रुत असत, आणि त्यांना समाजात मान असे.
जपानमधल्या गेशांबद्दलही असंच वाचल्याचं आठवतं.

चित्रलेखा- तिच्या क्लॅरिटीमुळे आणि आम्रपाली- तिच्या देशप्रेमामुळे फार आवडत्या नायिका आहेत.
अशोक कुमारला तिच्या आकर्षणामुळे संन्यस्त वृत्तीचे पतन झाल्याची उद्विग्नता येऊन आत्महत्या करायला निघतो आणि वाटेत सर्पदंशाने जीव जाताना किमान आत्महत्येचे पातक लागणार नाही असे समाधान त्याला वाटते, तो सीन मला फार 'लागला' होता.

हो ती लज्जो एक खोक पडताक्षणी प्राणत्याग करते. आमच्या सिनेमांतले व्हिलन बघा... हिरोने कितीही आपटलं धोपटलं, कड्यावरून फेकलं, अंगावर गाडी घातली, छातीत गोळ्याबिळ्या मारल्या तरी ते मेले असं समजून हिरो हिरॉईन जरा एकमेकांची विचारपूस करतायत तर ते न बघवून नरकाच्या दारातून परत येऊन अजून 2-3 मिनिटांचे फूटेज खातात.

सध्या मी मनिषा कोईरालाचा बलात्कार होतो व नंतर जो थयथयाट होतो तिथपर्यंत बघितले आहे. जमलं नाही, ते अंगावर आलं नाही काहीही.

आलमझेब महादगड आहे. सुंदर नाही, चार्मिंग नाही, चटपटीत नाही... निर्जीव वाटते. एकबार देख लिजिये दिवाना बना दिजिये, जलने को है तय्यार हम परवाना बना दिजिये-- तर दगडातून आवाज येतोय असं वाटू लागलं. शायरी तरी काय, दिवाना -परवाना म्हटलं की क्लासच राहिला नाही. डीजेचा टेंपो शायरी पंच आठवला. Lol

>>> जमलं नाही, ते अंगावर आलं नाही काहीही.
सेम!
काहीही भिडत म्हणून नाही, सगळ्या लुटुपुटीच्याच लढाया वाटत राहातात.

>>> आलमझेब महादगड आहे
हो, तिला सोशल मीडियावर त्यावरून इतकी नावं ठेवली गेली की तिने सगळे अकाउंट्स बंद केले असं ऐकलं.
आता ती त्यावरून 'हा आपला प्रांत नाही' हे तरी शिकेल किंवा थोडी थिक स्किन डेव्हलप करेल अशी आशा.
(तिचं अ‍ॅक्टिंग सुधारेल अशी शक्यता माझ्या डोक्यात आली नाही - हे लेकाने पॉइंट आऊट केल्यावर मला कळलं. Proud )

मला ते वाक्य मनात 'आलमझेब नावाचा गडकिल्ला पाकिस्तानात प्रसिद्ध आहे' असं वाचलं गेलं, मग नीट वाचल्यावर कळलं Happy

तो लज्जो त्या जोरावरच्या घरी जाउन नाचते तो सीन म्हणजे पटकथावाल्याने एक "तवायफला अदब व मानसन्मान" वाली स्क्रिप्ट लिहीली असावी व एक "तवायफला तुच्छता" वाली. आणि प्रत्यक्षात दोन्हीतले संवाद मिक्स करून टाकले आहेत>>
आणि तावयाफचा मुलगा असलेल्या नवाबाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही, Boycott meeting मध्ये असतो तो.

टेम्पो छाप शायरी>अगदी

Lol तिचं काहीच होऊ शकत नाही. पण मामाचं दुकानही बसू नये आणि भाचीचंही करिअर बरबाद होऊ नये म्हणून तिने बातम्या द्याव्यात कुठल्यातरी चॅनलवर.

मामा- संलिभ
भाची - शर्मिन सैगल

तो लज्जो त्या जोरावरच्या घरी जाउन नाचते तो सीन म्हणजे पटकथावाल्याने एक "तवायफला अदब व मानसन्मान" वाली स्क्रिप्ट लिहीली असावी व एक "तवायफला तुच्छता" वाली. आणि प्रत्यक्षात दोन्हीतले संवाद मिक्स करून टाकले आहेत.
<<<<<<

लज्जो खोक पडल्याने मरत नाही, ते निमित्त ती दारुच्या आणि आफिमच्या नशेच्या टोटल आहारी गेलेली असते, म्हणून मरते, तसा उल्लेख आहे नंतर.
त्या बग्गीमधे पण तिच्या हातात दारु असते, ब्रेक मारल्याने ती पडते पण आधीपासून मरायला रेडीच असते Happy

बाकी १ च एपिसोड बघून ज्यांना तवायफचा मान सन्मान बघून ग्लोरीफिकेश्॑न म्हणायची घाई होते, त्यांच्या साठी बनवलाय पुढचाच एपिसोड भन्सालीने, तुच्छता सीन Wink

>>> बग्गीमधे पण तिच्या हातात दारु असते, ब्रेक मारल्याने ती पडते पण आधीपासून मरायला रेडीच असते
'म्हणजे घोडा रेडीला ओढत असतो तर!' असा एक महापांचट जोक मारल्याशिवाय राहावत नाहीये या ठिकाणी! Lol

हो. ओपिऑईड ओव्हरडोस!
भाचीजान रडत नसते, झोपत नसते तेव्हा तिची आपा तिला ओपोऑईड देऊ नका सांगते ना. मग सेमेटरीत जाऊन रडते. काय शिकलात याच्यावरुन?

>>> काय शिकलात याच्यावरुन?
आम्ही काय शिकणार? आमचा ओपिऑइड्सशीही संबंध येत नाही आणि सेमेटर्‍यांशीही आणि आपांशीही! Proud

>>> तुच्छता सीन
Lol

मी कश्यावरूनच काहीच शिकत नाही. याच्यावरून सलिभचं काही बघू नये हे पण मी शिकणार नाही.

डिजे Lol
ती दारू पिते, डिल्यूजनल थापा मारते, रडते, जोरावरकडून अपमानित होते आणि बग्गीत एकदमच मरते. पंधरा वीस मिनिटात खेळ खल्लास. एवढे अकस्मात- तडकाफडकी तर आनंदचा राजेश खन्ना पण मेला नव्हता.

बाकी लगेच कोणी तवाएफ बनत नाही हे खरं.
पण ब्लू मेथ बघुन बघुन एकदा ट्राय करावं असा एक सूप्त विचार, किमान चमचा खाली लायटरने गरम करण्याची प्रॅक्टिस तरी करावी, त्या मर्डर अक्रॉस स्ट्रीट सीन थ्रू द विंडो... का काहीतरी प्रचंड मोठ्या नावाची सिरिअल बघुन वाईन कॉर्क ओपनर, बटण प्रेस ईझ वर्जन, सफरचंदांच्या बिया साठवून खून आणि मग प्रेत विरघळवायला बाथ टब नाही तर निळ्या रंगाचा प्लास्टिक कंटेनर, उलटी बाहेर न येता उलटी आता जाऊन (कान्ट हेल्प) माणून मरू शकतो.. असे अनेकोनेक आडाखे माझ्य मनात सिरिअल बघुन बघुन पक्के होतात.

असल्या अनेकानेक आडाख्यांची लिस्टच करायला पाहिजे खरं तर.
कार्पेट = बॉडी गुंडाळण्यासाठी वापरणे, नविन कार्पेट असणे= तिथले आधीचे कारपेट त्या कामासाठी वापरण्यात आले आहे. Lol पोलिस डॉग्ज ना कन्फ्युज करण्यासाठी उलट सुलट पळणे वगैरे Happy

अमितच्या वर्णनावरून ती गेटिंग अवे विथ अ मर्डर सिरीज असावी असे वाटते Happy

घोडा रेडीला ओढत असतो तर! >>> Lol
उलटी आता जाऊन (कान्ट हेल्प) >>> मग "सुलटी" म्हणायला हवे. स्वातीने बार गाडलाच आहे तर आमचाही हातभार.

पंधरा वीस मिनिटात खेळ खल्लास. >>> मिनिटांत नव्हे, सेकंदात. ती ओडी ने मरते ते बरोबर आहे. पण तिला रिव्हाइव्ह वगैरे करण्याचा जराही प्रयत्न न करता मल्लिकाजान लगेच डिक्लेअर करून टाकते.

ती आलमजेब "मलाल" नावाच्या पिक्चर मधे होती! कोठेतरी उल्लेख वाचला. सारखे वाटत होते हिला कोणत्यातरी पिक्चर मधे पाहिले आहे. अर्थात तो ही पिक्चर पाहिलेला नाही. नुसता पोस्टरच पाहिला आहे. तो ही बहुधा पुलंनी खाडिलकर का कोणात्या नाटकातील संवादाचा उल्लेख केला आहे - "नुसतीच दाढी आणि आत ऋषी नाहीच", तसे नुसतेच भव्य सेट्स, भरपूर रंग आणि आत कथा नाहीच कॅटेगरीतला पिक्चर असावा.

बाकी १ च एपिसोड बघून ज्यांना तवायफचा मान सन्मान बघून ग्लोरीफिकेश्॑न म्हणायची घाई होते >>> Happy Happy गिल्टी अ‍ॅज चार्ज्ड. पण इथे माझा पॉइन्ट हा आहे की "चतुर या घोडा, एकपे रहना" Happy

दोन भाग झाले बघून. भंसाली चा आचरट पणा बघत आहोत हे एकदा डोक्यात फिट केले की त्रास कमी होतो. ठीक ठाक होते दोन भाग, सेट्स, कपडेपट भारीच आहे एकदम. मको आवडली, छान बेरींग घेतले आहे मल्लिकाचे उगाच वय लपविण्याचा आटापिटा नाही केला ते बरे वाटले. ऑरंगझेब धन्यवाद आहे. लज्जो मरण सीन अगदीच हा वाटला, कैच्या कैच.. कास्टिंग गंडले आहे, मको सोडून अगदीच भयानक ॲक्टिंग इतर पात्रांची, खास करून रीचा चढ्ढा आणि ती ऑरंगझेब. तो बायांची उतरंड एकमेकींना तेल लावते तसा सीन ते हम दिल दे मध्ये पण आहे ना? बहुदा ह्याच्याच एका सिनेमा मध्ये आहे ते तेल लावणे प्रकरण.

तेच ते हो, तिचा रंग काही ऑरच.. Proud आले भंसाळीच्या मना.. आणि त्या satto फत्तो नाटकात विदूषक पात्र असते तशी पात्र आहेत का??

त्या satto फत्तो नाटकात विदूषक पात्र असते तशी पात्र आहेत का??
<<<<<
कट्यार काळजात घुसली नाटकामधले खाँ साहेबांचे २ चमचे होते ना , ‘चान्द उस्मान’ तशा Happy

हल्ली पार्ट्यांमधे , लग्नात रंगीबेरंगी व्हेज / नॉन व्हेज बिर्याणी असते. ती दिसायला आकर्षक असते. पण जेव्हां ताटात वाढून पहिला घास घेतो तेव्हां कसलीच चव नाही हे जाणवते. मसाला एकीकडे, कांदा एकीकडे, मीठ एकीकडे. ते वाढून घेणार्‍याने ढवळून मिश्रण करून घ्यायचं असतं. केटररची जबाबदारी सर्व केल्यावर संपलेली असते.

संजय लीला भन्साळीचे सिनेमे हे असेच वाटतात. हम दिल दे चुके सिनेमे हा त्याचा १०० गुणांचा माईलस्टोन समजला तर पुढच्या देवदासपासून त्याचे गुण कमी कमी होत आलेले आहेत. हदिदेचुस मधे प्रेमातली उत्कटता, व्याकुळता, आस, घुसमट आणि नंतर बलिदान ( अदे) हे त्याने त्याच्या फिल्म करीयर मधे सर्वात प्रभावी रितीने दाखवले आहे. नंतर मग दहावीला राज्यात पहिला आल्यानंतर आता मला तितका अभ्यास करायची गरज नाही, माझे कौतुक झालेले आहे, लोकांना माझे टॅलंट समजलेले आहे.. परीक्षेपुरता अभ्यास करण्याची कला मला समजलेली आहे अशी अधोगती झालेला हुषार विद्यार्थ्यासारखी त्याची गत झाली आहे.

देवदास मधे शाहरूख खानचा अभिनय दिलीपकुमारच्या देवदास मधल्या अभिनयाच्या जवळपासही नाही. दिकु च्या आवाजात दर्द आहे तर शाखाने सतत अभिनय कसा सजवलेला "दिसेल"याकडे दिलेले लक्ष दिग्दर्शक म्हणून संलीभ ला खटकले नाही. त्यातला शेवटचा प्रसंग अजिबात भिडत नाही. तो ड्रामा अगदीच बटबटीत झाला आहे.

देवदास पासून कपडेपट आणि रंगपट हे त्याचे वैशिष्ट्य झाले आहे. बाजीराव मस्तानी ही प्रेमकहाणी आहे असे त्याने आधी जाहीर केले होते. तसे ते दिसलेच नाही. बाजीरावाच्या अंतिम क्षणाला त्याने एका तरलतेचे आच्छादन दिले आहे. त्याचे ते भास त्याने कितीही बेमालूम दाखवलेले असले तरी एफटीआयच्या हुषार विद्यार्थ्याने मृत्यू या विषयावरचे तीन मिनिटाचे व्हिज्युअलायझेशन म्हणून बनवलेल्या शॉर्ट फिल्म सारखे आहे. चित्रपटाच्या कथेत ते उपरे वाटते. बाजीराव मस्तानी ही प्रेमकहाणी फुललीच नाही.

सांवरिया मधे त्याने वेगळा प्रयोग केला. पण गंगूबाई पाहिल्यानंतर आपण नेमकं काय पाहिलं असा प्रश्न पडला. त्यात तो स्वतः अट्टाहासाने संगीत का देतो ते समजत नाही. सांवरिया आणि गुजारिश सोडले तर प्रत्येक गाणे हदिदेचुस किंवा देवदास मधल्या ट्यूनची तोडमोड वाटते.

गंगूबाई नंतर संलभच्या वाटेला जाऊन आख्खी मालिका पहावी हे धाडस होणार नाही.

सकल बन ची चाल आधी कुठेतरी ऐकली आहे असे सतत वाटत राहते. मुलीमुळे गाडीत अनेकदा ऐकलेय गाणे. Happy

सकल बन ची चाल आधी कुठेतरी ऐकली आहे असे सतत वाटत राहते.

>>> बहार रागातली एक बंदिश आहे त्याची चाल अशीच आहे. https://youtu.be/b_Wu-gce-Sk?feature=shared

सकल बन ही देखिल एक पारंपारिक बंदिश आहे.

आलमजान ठोकळा आहे, पण मराठी आणि बॉलीवूड मधल्या इतर असंख्य ठोकळ्यानपेक्षा माबोकर जरा जास्तच ठोकताहेत.

अजून तर ठोकलंच नाही. सगळ्यांना ठोकायचे आहे.
मनिषा कोईराला अभिनय बरा पण प्रभावी पद्धतीने सादरीकरण नाही. रिचा चढ्ढा ती गुंडछापच बरी वाटते. नाचायला तर ओंडका. आलम हातीमताई मधली दगडी मूर्ती असते ती एक मंत्र ॲक्टिव्ह झाला की वटवटते. तशी वाटली. तिचा मित्र तर रामचरणचा बोटॉक्स+ स्टेरॉईड काढून घेतलेला अवतार आहे. अदिती बरी आहे पण लोक जितकी 'वाह वाह' करताहेत तितकं काही मला वाटलं नाही. तिची गजगामिनी चाल पण जगावेगळी नाही. असे किती ठुमके आले गेले. Lol गोरा साहेब ट्रॅव्हल चॅनलचा होस्ट वाटला. सोनाक्षी डोळे वटारत राहते.

मला यांचं एकही दुःख, उद्वेग, जिव्हारी लागणारे अपमान, कला, दर्द आणि ग्लोरी सुद्धा...काही काही पोचलं नाही. अगदी थंडपणे बघितले यांचे अश्रू. लक्षात सुद्धा रहात नाही. तवायफरूपी निष्काम कर्मयोगी वाटल्या. आल्या तशा गेल्या.

आलम हातीमताई मधली दगडी मूर्ती असते ती एक मंत्र ॲक्टिव्ह झाला की वटवटते >>> Lol

सगळे लोक अंगावर मेक अप सारखा तो काळा रंग का बाळगून आहेत? अजून थोडा असता तर "काला पत्थर" मधे खपून गेले असते. काही कलाकार म्हणून, काही दगड म्हणून Wink

Pages