Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पंत एकटाच तग धरून होता पण
पंत एकटाच तग धरून होता पण त्याच्याही पहिल्या 20. धांवा fortune favours the brave याखालीच खपून जातील. अर्थात, नंतरच्या 22 धांवा नि:संशय हुकमी व प्रेक्षणीय होत्या. अक्षरला वर बॅटिंगला पाठवणं त्याने चुकीचं ठरवलं नाहीं पण तो प्रयोग तितकासा कौतुकास्पदही वाटला नाहीं. पाकने गोलंदाजी व क्षेत्ररक्षण छान केलं. वेगवान चेंडू किंचित खाली राहतोय असं मला तरी जाणवलं.उदा. अक्षरची विकेट. असो. बघू बुमरा आणि कं काय करते.
बहुधा विकेट
बहुधापहिली विकेटपाकिस्तानी पण महंमद भरोसे
पाकिस्तानी पण महंमद भरोसे खेळत आहेत.
पाकिस्तान खेळत असताना, खास
पाकिस्तान खेळत असताना, खास करून इंडियाच्या विरूद्ध, वासिम, वकार वगैरे कॉमेंट्री सोडून कोचच्या भुमिकेत का जातात कुणास ठाऊक? समोर जे चाललंय त्यापेक्षा पाकिस्तानी प्लेयर्सने काय करायला हवं होतं, काय नाही ह्याविषयीच जास्त बोलतात.
दुबे - गरिबांचा पंड्या / आयपीएल स्टार. त्याला आयर्लंड वगैरे मॅचेसमधे खेळवणं ठीक आहे. आज त्याने सोडलेला कॅच महागात पडू शकतो.
बॅटिंग अगदीच ‘ढ’ केलीय इंडियानं. शांतपणे विकेट्स टिकवून १५० चा स्कोअर करायला हवा होता.
मला वाटतंय इंडीयाने मॅच
मला वाटतंय इंडीयाने मॅच जिंकली. रिझवान आउट.
19 ओव्हर्स 102-६ !
19 ओव्हर्स 102-६ !
पाकला 6 चेंडूत 18 हव्यात. भारताची कमाल झुंज !!!
जिंकला भारत !!!!! अभिनंदन.
जिंकलो जिंकलो जिंकलो...
जिंकलो जिंकलो जिंकलो...
सगळीकडे किती निराशाजनक पोस्ट पडत होत्या. पण हा पीच खेळायला सोपा नव्हता. कोणालाच जमत नव्हते. तो तर आपला एक चुम्मा ऋषभ पंत होता. त्याची खेळी दोन संघातील फरक ठरली आज.
हुश्श, जिंकलो एकदाचे.
हुश्श, जिंकलो एकदाचे.
अरे एकदम भारी! मी आपले ७ आउट
अरे एकदम भारी! मी आपले ७ आउट झाल्यावर लाइव्ह बघणे सोडून दिले. फक्त अधूनमधून स्कोअर बघत होतो
हरलेली मॅच लाइव्ह बघून वेळ घालवून आणखी मूड खराब करून घेण्यापेक्षा जिंकलेली मॅच नंतर हायलाइट्स किंवा इव्हन काही भाग रिप्ले करून बघितलेली बरी असा माझा आजकाल अॅप्रोच आहे
कधीकधी अशा भारी मॅचेस निसटतात त्यातून.
Bumrah was amazing.
Bumrah was amazing.
जिंकलो
जिंकलो जिंकलो!!
बुम बुम बुमराह.. काय बॉलिंग काय बॉलिंग
आजच्या पोस्ट
आजच्या पोस्ट
_____
[09/06, 22:22] Abhishek Naik: दहा ओवर ८१ झाले
या पिचवर टॉस हरून पहिली फलंदाजी असताना हा स्कोर खूप आहे..
[09/06, 22:54] Abhishek Naik: इतके निराश व्हायची गरज नाही. १३०-१३५ वगैरे काही विचार करू नका. २० ओवर खेळून जे काही धावा जमतील त्या सुद्धा पुरतील कदाचित. मागच्या सामन्यात तरी कुठे काय स्कोअर झालेत इथे.
[10/06, 00:15] Abhishek Naik: दुसरी विकेट.. ५७-२
[10/06, 00:23] Abhishek Naik: ७३-३
[10/06, 00:33] Abhishek Naik: ८०-४
[10/06, 00:45] Abhishek Naik: पाचवी
[10/06, 00:56] Abhishek Naik: २ ओवर २१
बूमराह क्लोज कर मॅच
______
आणि बूमराह ने क्लोज केली..
What a बॉलर !!
पोरगी आज थिएटरला मॅच बघायला
पोरगी आज थिएटरला मॅच बघायला गेली होती. पण एका इनिंग नंतर काहीतरी तिथे बिघाड झाला आणि परत आली. घरी आल्यावर तिची मॅच बघायची इच्छा नव्हती. पण ५७-२ पडल्यापासून तिला जबरदस्ती मॅच बघायला सोबत घेतले. कारण विश्वास तर होताच पण भारत पाक सामना सुद्धा रोज रोज होत नाही
बाकी आज चांगल्या सुरुवातीनंतर
बाकी आज चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा भारत जसे गडगडला तिथे धोनीची आठवण आली.
रिंकू सिंगची गरज आहे शिवम दुबे ऐवजी.
जबरदस्त जिंकली मॅच. बुमराह
जबरदस्त जिंकली मॅच. बुमराह अँड को. ने कमाल केली आज.
(No subject)
Respect _/\_
अरे कसे काय जिंकलो आपण? मी
अरे कसे काय जिंकलो आपण? मी पहिल्या चार ओव्हर बघून झोपलो. सकाळी उठलो तर 7 रन्स ने जिंकलो. हायलाईट बघून पण समजत नाही पाकिस्तान कशी हारली ते. मॅच आवाक्यात असताना अचानक 19 ओव्हर 102 स्कोअर येतो.
मी आपल्या इनिंग नंतर झोपलो
मी आपल्या इनिंग नंतर झोपलो अन् रात्री अडीच ला जाग आली तेंव्हा स्कोअर पाहण्यासाठी मोबाईल चेक केला तर जिंकलो होतो. मग नीट झोप लागली...
काल टीव्हीवर ऐकलं की अक्सर पटेल चा २० हा भारताकडून पाक विरुध्द टी २० सामन्यात ४थ्या क्रमांकावर च्या फलंदाजांचा टॉप स्कोअर आहे.
मॅच परत पहायची असल्यास कुठे
मॅच परत पहायची असल्यास कुठे पाहता येईल? हायलाइटस् मध्ये काही कळत नाही.
मॅच परत पहायची असल्यास कुठे
।
रोहितचे अर्धे आयुष्य गेले आहे
रोहितचे अर्धे आयुष्य गेले आहे बुमराह सोबत.. त्याला नेमके माहीत आहे बूमबूमला कसे केव्हा वापरायचे.
बाकी कॉमेन्ट्रीवाले नेहमी आणा बेस्ट बोलर बुमराहला, स्लीप लावा, अटॅक करा, विकेटच हव्यात, सामना वीस ओवर नाही तर १८ ओवरचा आहे असे समजून खेळा.. हेच बोलत राहतात. पण स्लो डबल पेस पीच वर खेळ असा चालत नाही. तो लास्ट ओवरला जातोच.
बुमराह आणि ऋषभ पंत...... Hats
बुमराह आणि ऋषभ पंत...... Hats off
।इम्म्म्मइम
....
गेल्या दोन्ही (वॉर्म-अप धरून
गेल्या दोन्ही (वॉर्म-अप धरून तीन) मॅचेसमधे, चौथा सीमर म्हणून पंड्याने जबरदस्त कामगिरी केलीय. काल सुद्धा दुसर्या एंडने त्याने काढलेल्या दोन विकेट्स महत्वाच्या होत्या.
+७८६
+७८६
हेच लिहायला आलो होतो.
पांड्या चा परफॉर्मन्सच नाही तर त्याची बॉडी लँग्वेज सुद्धा बदलली आहे. तो रिलॅक्स वाटत आहे. संघापासून वेगळा नाही तर संघाचा भाग वाटत आहे. आणि यामागे नक्कीच रोहितचा मोठा वाटा आहे.
इंग्लंड सुद्धा धोक्यात आहे.
इंग्लंड सुद्धा धोक्यात आहे.
इंग्लंड दोन्ही सामने जिंकले तर पाच गुण होतील.
स्कॉटलंडचे पाच आहेत.
जर पावसाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांचा सामना झाला नाही तर स्कॉटलंड आत आणि इंग्लंड बाहेर. जे दुर्दैवी ठरेल.
अन्यथा इंग्लंडला सामने मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत. दोन्ही संघाच्या रनरेट मध्ये मोठा फरक आहे.
पाकच्या प्रत्येक फलंदाजाला
पाकच्या प्रत्येक फलंदाजाला कशी गोलंदाजी करायची , हे डावपेच नीट आंखले गेले होते हे स्पष्ट होतं. रोहित ज्या प्रकारे गोलंदाजांना खुणा करत होता व त्यांच्याशी बोलत होता, तें अर्थपूर्ण होतं. सिराजने त्याच्या पहिल्याच ( बहुतेक) षटकात एक नो बॉल व एक वाईड टाकला; पण तो ठरल्यानुसारच गोलंदाजी करत होता म्हणून रोहितने न वैतागता उलट त्याला संमतीपूर्वक प्रोत्साहन दिलं. छोटं लक्ष्य असताना कशी गोलंदाजी करायची याचे अभ्यासपूर्वक डावपेच रचून विश्र्वसपूर्वक काल अंमलात आणले, ही बाब खूप महत्त्वाची !
Submitted by ऋन्मेऽऽष on 2
Submitted by ऋन्मेऽऽष on 2 June, 2024 - 21:47
>>>>>
वरची पोस्ट वाचून या...
आपल्या सुपर एट ग्रुपमध्ये न्यूझीलंड श्रीलंका बाद होऊन त्या जागी अफगाण आणि बांगलादेश येण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया आपल्या सुपर एट ग्रूप मध्ये असल्याने ते आपल्याला सेमीला नाही तर फायनलला भेटतील.
@ भाऊ,
@ भाऊ,
सिराजने पीचची मदत घेऊन विकेट साठी न जाता वाईड लाईन ठेवावी आणि ती ओवर काढावी, बुमराहने मात्र गेम क्लोज करायला बघावे हा डावपेच असावा.
बुमरा निवृत्त होईल तेंव्हा
बुमरा निवृत्त होईल तेंव्हा त्याच्या विकेट्स इत्यादी न बघता तो क्रिकेट खेळलेला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाईल नि त्याला भारताच्या हॉल ऑफ फेम मधे सचिन, सुनिल, कपिल, पतौडी बरोबर इंडक्ट केले जाईल. फॉर्मॅट काहीही असो, मॅच सिच्युएशन, पिच रीड ह्याचे अचूक निदान करून बॉलिंग करणे ह्यात त्याला सध्या तुलना नाहिये.
Pages