Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बूम बूम बद्दल +७८६
बूम बूम बद्दल +७८६
आज मनात विचार आला की त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार व्हायची इच्छा व्यक्त केली. अन्यथा मी सोडून जातो म्हणाला तर...
त्याला कर्णधारपद द्यावेच लागेल.
जिथे स्टार्क कमिन्स या बाहेरच्या खेळाडूंना इतके पैसे मिळतात तिथे बूमबूमला ३०-३५ करोड मिळायला हवेत
बूम्राने बाबरला बॉल टाकला तो
बूम्राने बाबरला बॉल टाकला तो बॉल जरा खाली राहिला आणि बाबरने लॉफ्टेड फोर मारला. बुम्राच्या जागी दुसरा कोणी असता तर घाबरुन लेंथ चेंज केली असती पण बूम्राने त्याच जागी बॉल जोरात आपटला आणि बाबरला बोलला अब मार के दिखा घंटे के किंग आणि लगेच मागे कॅच गेली.
[10/06, 23:13] Abhishek Naik:
21st Match, Group D
BAN 94-4 (17)
RSA 113-6 (20)
Towhid Hridoy*: 37 (33)
Mahmudullah: 16 (21)
Anrich Nortje 4-0-17-2
Bangladesh need 20 runs in 18 balls
कालचा आपला सेम पीच आहे
अंपायरने छान मारली
अंपायरने छान मारली बांगलादेशची.
चुकीचा एल बी डब्ल्यू देऊन फोर घालवला...
आणि मग अंपायर कॉल वर बाद सुद्धा केले.. तो सुद्धा महत्त्वाचा प्लेअर
हे चित्र बोलके आहे
हे चित्र बोलके आहे
ते दोघे एकाच फ्रॅंचाईजीसाठी
ते दोघे एकाच फ्रॅंचाईजीसाठी खेळत आहेत. गेल्या वर्षी वेगळे होते.
ते दोघे एकाच फ्रॅंचाईजीसाठी
ते दोघे एकाच फ्रॅंचाईजीसाठी खेळत आहेत.
>>>>>
तेच तर.. त्याच फ्रॅंचाईजीने डीवाईड केले होते.
क्रिटिकल मॅच हायलाईट देखील
क्रिटिकल मॅच हायलाईट देखील एडिट करणारा मख्ख मनुष्य दिसतोय
भारत पाक मध्ये फारच विचित्र हायलाईट्स
लास्ट वर 18 पाहिजेत आणि नंतर डायरेक्ट 1 बॉल8 पाहिजेत
अरे कात्री आहे की कुऱ्हाड
मुळात रिप्ले बघावा शेवटच्या
मुळात रिप्ले बघावा शेवटच्या काही ओवरचा.. कारण मजेशीर तर डॉट बॉल होते.
आणि यामागे नक्कीच रोहितचा
आणि यामागे नक्कीच रोहितचा मोठा वाटा आहे.
>>
कशावरून??
व्यवस्थापनाचा कशावरून नाही
अन् पांड्या ला इतकी बेसिक अक्कल असेल ना की इथे खेळाला नाही तर फ्रंचाइजी पण सीरियसली घेणार नाही...
आणि यामागे नक्कीच रोहितचा
डबल अप..
एरॉन जॉन्सनने खोलला
एरॉन जॉन्सनने खोलला पाकिस्तानला.
कशावरून??
कशावरून??
व्यवस्थापनाचा कशावरून नाही >> राहुल च्या मुलाखती सातत्याने वाचणार्याला लक्षात येईल कि एखाद्याला सातत्याने बॅकअप करणे ह्याबद्दल राहुल नेहमीच बोलत आला आहे. रोहित्नि त्याच्यात ह्या बाबती मधे अॅनॉयिंगली एकवाक्यता आहे असे जाणवते. रोहित च्या झक्कास ऑन फिल्ड टॅक्टीक्स बद्दल बोलणे एक गोष्ट आहे पण झालेली प्रत्येक गोष्ट रोहित नेच घडवून आणली आहे हे रोहित सुद्धा म्हणणार नाही. " यामागे नक्कीच रोहितचा मोठा वाटा आहे." अशा विधानांची आयपीलपर्यंत नेलेली कॉरलरी रोहित साठी किती वाईट आहे ह्याची कल्पना करवत नाही. पाकिस्तान ७०/२ होते तो पर्यंत कोणालाच रोहित च्या मूव्ह ब्रिलिअंट वाटत नव्हत्या
अन्यथा मी सोडून जातो म्हणाला तर...
त्याला कर्णधारपद द्यावेच लागेल. >> हे ब्लॅक मेलिंग होईल असे वाटत नाही का तुला ? अशा तर्हेने कर्णधारपद मिळवण्याची इच्छा असलेला खेळाडू फ्रॅम्चाईजीने ठेवावा असे तुला वाटते का ? पांड्याबरोबर बुमराच्या नावानेही बू करणार का मग रोहित चे ओव्हरझिलीयस भक्त ? ह्या प्रश्नांची उत्तरे तुलाच माहिती वेताळा
पाकिस्तान ७०/२ होते तो पर्यंत
पाकिस्तान ७०/२ होते तो पर्यंत कोणालाच रोहित च्या मूव्ह ब्रिलिअंट वाटत नव्हत्या
>>>
मला खात्री होती. अगदी भारतीय विजयाची नसली तरी शेवटपर्यंत लढण्याची, सामना लास्ट ओवराला जाण्याची आणि तिथे मग काहीही होऊ शकते याची कल्पना होती. मी शर्माचा चाहता आहे तसेच धोनीचा सुद्धा चाहता आहे. त्यामुळे गेम कसा शेवटपर्यंत न्यायचा हे याना माहीत आहे याची कल्पना आहे. धोनी चेस करताना वन टू वन ला नेऊन स्वतः फिनिश करायला बघतो. इथे आपण टारगेट डिफेनड करत असल्याने सामना वन टू वन ला नेऊन बूमराहच्या जीवावर क्लोज करायला बघणार रोहीत याची कल्पना होती. म्हणून उलट मी निराश झालेल्यांना धीर देत होतो.
हे ब्लॅक मेलिंग होईल असे वाटत
हे ब्लॅक मेलिंग होईल असे वाटत नाही का तुला ? अशा तर्हेने कर्णधारपद मिळवण्याची इच्छा असलेला खेळाडू फ्रॅम्चाईजीने ठेवावा असे तुला वाटते का ? पांड्याबरोबर बुमराच्या नावानेही बू करणार का..
>>>>>>
चला असामी.. पांड्या बाबत असे का झाले याची उत्तरे तुम्ही स्वतः दिली
आणि मी सुद्धा मुद्दाम यासाठीच म्हटले की असे उद्या बुमराहने केले तर मुंबई मॅनेजमेंट तुम्ही काय कराल
चला असामी.. पांड्या बाबत असे
चला असामी.. पांड्या बाबत असे का झाले याची उत्तरे तुम्ही स्वतः दिली >> पांड्याने स्वतःहून टायटन ते मुंबई ही बदली घेतली नाहिये. मुंबई ने इनिशियेट केली होती. एकदा त्यानंनी तसे केल्यावर स्वतः कप्तान असलेल्या पांड्याने तशी मी कप्तान असायला हवे हि अट ठेवणे चुकीचे होते असे तुला का वाटते ? तू आज अमका अमका म्हणून जॉब करतोयस, तुला दुसर्या कंपनी ने जॉइन कर असे स्वतः येऊन सांगितले तर तू त्याच पदावर जॉइन होणे पसंत करशील कि काही वेगळे ? उगाच वेड पांघरून पेडगावाला जाणे कधी थांबणार ?
107 च्या टार्गेट समोर पाक 6
107 च्या टार्गेट समोर पाक 6 ओव्हर मधे 28/1
आजही हरले तर धमाल...
आजही हरले तर धमाल... >> आज
आजही हरले तर धमाल... >> आज हरले तर पाकिस्तान मधे लगेच परत जाणार नाहित एव्हढे नक्की
पांड्याने तशी मी कप्तान
पांड्याने तशी मी कप्तान असायला हवे हि अट ठेवणे चुकीचे होते असे तुला का वाटते ?
>>>>
अरे वाह..
मग बुमराह करे तो कॅरेक्टर दिला आहे कश्याला?
भारताचे कर्णधारपद सुद्धा त्याने निभावले आहे. आयपीएल मध्ये आयुष्यभर खेळाडू म्हणूनच खेळत राहायचे का..
आज मी बघतोय की कॅनडाने 106
आज मी बघतोय की कॅनडाने 106 मारताच पाकिस्तान आजही हरू शकते असे बरेच लोकांना आज वाटत आहे..
पण भारताने ११९ मारल्यावर बरेच जणांनी आशाच सोडली होती
पाकिस्तानला युएस ने सुद्धा हरवले होते. तरीही लोकांना आशा नव्हती..
आपण आपल्या संघाला अंडर एस्टिमेट का करतो.?
तिन्ही फॉरमॅटमध्ये आज आपण नंबर वन आहोत.. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये टॉपला आहोत.. गेल्या वर्ल्डकप ला फायनलला हरलो पण आधी 10 सामने जिंकलो आहोत.. या सगळ्याची काहीच व्हॅल्यू नाही का असे वाटते.. उलट 90 च्या दशकात कित्येक सामने हरतानाच पाहिले आहेत. आपण मला कुठल्या स्पर्धेत कधीच फेवरेट वाटलो नव्हतो.. पण हा संघ वाटतो.. म्हणून लोकं त्यावर जास्तीच्या अपेक्षा लादतात का हा प्रश्न पडतो..
पाकिस्तानने आज रन रेट
पाकिस्तानने आज रन रेट वाढवायचा फार प्रयत्न केला नाही..
आयर्लंड ने अमेरिकेला हरवल्यानंतर त्यांना याची गरज पडेल..
अर्थात फरक जास्त नाही त्यामुळे चिंता नसावी..
तरीही स्वतः प्रयत्न करणे केव्हाही चांगले.. त्यातून बॉडी लँग्वेज कळते...
सर, तुम्ही म्हणाल ते अगदी
सर, तुम्ही म्हणाल ते अगदी परफेक्ट कसे काय असते? अशी पॉवर इतरांना कशी मिळू शकेल, शिकवाना जरा? उगीचच "कशावरून??" सारखे बालिश प्रश्न विचारणार नाहीत मग.
Rohit Sharma - First batter
Rohit Sharma - First batter to hit a six against Shaheen in the first over in ODIs.
Rohit Sharma - First and only batter to hit a six against Shaheen in the first over in T20Is.
..
THE GREATEST SIX HITTER EVER .. HITMAN!
हे खूप वायरल होत आहे.
तरी पाकिस्तानशी आपण फक्त आयसीसी स्पर्धात खेळतो.
अन् पांड्या ला इतकी बेसिक
अन् पांड्या ला इतकी बेसिक अक्कल असेल ना की इथे खेळाला नाही तर फ्रंचाइजी पण सीरियसली घेणार नाही...
>>>>>
आणि खुद्द फ्रेंचायसी मध्येच नाही खेळला तर चालते का... हे काय लॉजिक आहे.
असो,
रोहितला श्रेय द्यायचे तुम्हा लोकांना इतके जीवावर का येते. वरच्या फोटोमध्ये सुद्धा उघड दिसत आहे की त्याचा पांड्या सोबत व्यवहार कसा आहे, यारोंका यार आहे तो.. आणि त्याचे परीणाम दिसत आहे. भले इथून पुढच्या सामन्यात पांड्या फ्लॉप जाईल, हिट जाईल, गेम आहे हा.. पण आता कुठल्या दडपणाखाली तो खेळणार नाही, आपले शंभर टक्के देईल.. आणि याला म्हणतात लीडर.. कॅप्टन काय कोणालाही करू शकतो. पण लीडर सारेच नसतात
जेंव्हा फिनिक्स थक्क होतो.
जेंव्हा फिनिक्स थक्क होतो.
द्वारकानाथ संझगिरी
ऋषभ पंतने राखेतून जन्मणाऱ्या काल्पनिक फिनिक्स पक्षाला कॉम्प्लेक्स दिलाय.
त्याचं पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे काल्पनिक वाटावं इतकं अचाट आहे.
त्याचं भयाण कार अपघातातून वाचणं जेवढं अविश्वसनीय होतं तेवढं पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं.
नव्या वर्षाच्या संध्येला आईला भेटायला निघालेल्या पंतला डेहराडून दिल्ली रस्त्यावर रूरकी जवळ अपघात झाला. त्याला रात्री डुलकी लागली आणि त्याने गाडी ठोकली. पुढे आधी डेहराडून आणि नंतर मुंबईच्या हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार झाले .
पुढे, त्याला डॉक्टरांनी सांगितलं, " तू जिवंत आहेस हाच चमत्कार आहे"
त्या मती गुंग करणाऱ्या क्षणीही त्याच्या लक्षात आलं की त्याचा उजवा पाय उलट्या दिशेला काटकोनात वाकडा झालाय. त्याने त्याला मदत करणाऱ्या तिथल्या माणसाच्या आधाराने तो चक्क सरळ केला.
पुढे डॉक्टर त्याला म्हणाले, " तुला तसं करणं सुचलं ते बरं झालं, नाही तर तो कापावा लागला असता."
गुडघ्याच्या लिगामेंट्सचं त्याचं ऑपरेशन केलं गेलं. त्याच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली गेली.
पण त्या अपघाता नंतरच्या पहिल्या काही दिवसात, त्याला मैदान, क्रिकेट खेळणे आता इतिहासजमा झालं असं वाटलं असावं.
सुरवातीला त्याला गादीवर बसून खाली पाय टेकवता येत नव्हता. मग त्याने आधाराने उभ रहाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी १५- २० सेकंदात त्याला कसोटी सामना खेळल्यासारखा दम लागायचा.
अनेकांना त्यानंतर क्रिकेट खेळणे ही पुढच्या जन्मीची गोष्ट वाटली असती . पण प्रचंड इच्छाशक्ती, आणि मेहनतीच्या जोरावर त्याने पुन्हा मैदानात पाय ठेवला.
डॉक्टरांना वाटत होतं की त्याला बरं व्हायला किमान २ ते ३ वर्ष लागतील . तो १४ महिन्यात खेळायला लागला.
नुसतं नाही तर भारतीय संघात त्याने प्रवेश केला.
एकदा संघातून बाहेर गेल्यावर पुन्हा स्थान मिळवणं कठीण असतं. अलीकडे तर टी २० मध्ये भारतात स्पर्धा मोठी आहे. तो तर जणू हॉस्पिटल बेडवरून मैदानावर आला.
नुकत्याच संपलेल्या आय पी एल मध्ये त्याने २५३ षटकं याष्टिरक्षण केलं. जवळपास १५८ च्या स्ट्रायिक रेटने ४४६ धावा केल्या. १६ बळी याष्टिमागे घेतले. २५ षटकार ठोकले.
फिनिक्स पक्षालाही स्फूर्ती मिळाली असती!
आणि परवा भारत पाकिस्तान ह्या मानसिक शक्तीचा कस पाहणाऱ्या सामन्यात त्याने सर्वाधिक ४२धावा केल्या, ३ झेल घेतले, शारीरिक दृष्ट्या कुठेही कमी वाटला नाही. जणू अपघात त्याच्या आयुष्यात झालाच नव्हता असं वाटलं. बस ते एक दुस्वप्न होतं!
पूर्वी अनेक मोठे खेळाडू अशा अपघातातून जिद्दीने बाहेर येऊन मोठं क्रिकेट खेळले आहेत.
टायगर पतौडीचा एक डोळा गेला होता. पुढे आयुष्यभर तो मोठं आंतरराष्ट्रीय क्रिकेट एका डोळ्याने खेळला.
इंग्लंडच्या ब्रायन क्लोज ह्या फलंदाजाच्या मते टायगरचे दोन डोळे शाबूत असते तर तो विव
रिचर्ड्स एव्हढा मोठा फलंदाज झाला असता.
आणि एका डोळ्याने तो उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक होता.
१९५७ साली गॅरी सॉबर्स
ला कारचा अपघात इंग्लंडमध्ये झाला. तो इतका भीषण होता की वेस्ट इंडीजचा एक अत्यंत गुणवान खेळाडू कॉली स्मिथ त्यात गेला.
गॅरी वाचला. त्याचे सर्व विक्रम आणि त्याचं इतिहासातला सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू होणं हे त्या नंतरचं आहे. स्मिथ त्याचा जिवलग मित्र
गॅरी म्हणतो, " कॉलीचा आत्मा माझ्यात शिरला त्यामुळे मी विक्रम करू शकलो."
अशा अपघातातून आलेला माणूस अधिक कणखर बनतो. त्याने मृत्यू जवळून पाहिलेला असतो. वेदना सहन केलेल्या असतात.
पंतला अपघातातून सावरताना कुणीतरी विचारलं, " तू अपघातामुळे मैदानावरचं काय मिस करतोस?"
तो म्हणाला, " षटकार ठोकणे "
आक्रमकता त्याच्या नसानसात आहे. आक्रमक ,बेडर फलंदाज हे वरदान आहे. पण आक्रमकतेलाही थोडी शिस्त पाळावी लागते. साहसी असावं पण साहसाच रूपांतर बेदरकारपणात होऊ नये.साहस आणि बेदरकारपणा ह्यातली रेष महत्वाची. ती अस्पश्ट होऊ नये.
पांच खेळीत २ अपयश साहसात स्वीकारली जातात. पण ३ नाही.
लहानपणी मी एक वाक्य वाचलं होत. कुणी लिहिलं ते आठवत नाही. त्याकाळी फक्त वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज आक्रमकपणे खेळत.
" A strokemaker may fail once ,he may fail twice, he can not fail always. And success of the strokemaker is the greatness of the game,,
तो मॅच विनर आहे. त्याने कसोटी जिंकून दिल्या आहेत.
त्याची दुसरी खेळी अधिक यशस्वी आणि चमकदार व्हावी.
ताजा कॉलम
वेगाची हौस असेल तर खेळीचा वेग वाढवावा
गाडीचा नको.
यम नेहमीच चुकीच्या फटाक्यांचा झेल सोडत नाही.
"यारोंका यार आहे तो" - उबो,
"यारोंका यार आहे तो" - उबो, मिळालं उत्तर? पर्सनल ओळख असल्याशिवाय हे होणं नाही.
"मी शर्माचा चाहता आहे तसेच धोनीचा सुद्धा चाहता आहे" - एव्हढ्या क्वालिफिकेशनवर क्रिकेटमधली यच्चयावत सगळी पदं भुषवायला हवी खरं तर. पण मॉडेस्टी म्हणून फक्त मायबोलीवरच्या अज्ञानी लोकांना शहाणं करून सोडण्याचं व्रत, सर 'सतीचं वाण' घेतल्यासारखं चालवतात हे आपलं परमभाग्य.
"रोहितला श्रेय द्यायचे तुम्हा लोकांना इतके जीवावर का येते" - सर, कशाला लाजवता सर......रोहितला? खर्या श्रेयाचे मानकरी तुम्ही आहात हे
सत्य सूर्यप्रकाशाप्रमाणे लख्ख सत्य आहे.
ऋषभ पंत वर चर्चा करायला खालील
ऋषभ पंत वर चर्चा करायला खालील धागा वापरा
https://www.maayboli.com/node/71667
कशाला लाजवता सर......रोहितला?
कशाला लाजवता सर......रोहितला? खर्या श्रेयाचे मानकरी तुम्ही आहात हे >>
मग बुमराह करे तो कॅरेक्टर दिला आहे कश्याला? >> कांदा सोलतो परत एकदा - एका केसमधे फ्रॅम्चआईजीने बाहेरून आणलेले आहे प्लेयरला - जो बाहेर कप्तान आहे तर दुसर्या केसमधे प्लेयर आधीच संघामधे आहे नि डीमांड करतो आहे. ह्या दोन गोष्टींमधला शाहरुख वि. कमाल खान सारखा फरक कळत नसेल तर समजून घ्यायची इच्छा नाही हे उघड आहे.
रोहितला श्रेय द्यायचे तुम्हा लोकांना इतके जीवावर का येते. >> वर लोक रोहितला श्रेय द्यायचे नाकारत नसून प्रत्येक गोष्टीचे श्रेय ताणून ओढून रोहित्/धोनी ला देण्याबद्दल बोलले आहेत हे समजणे अशक्य आहे हे लक्षात येऊनही ..... ह्याउलट भाऊंनी दिलय ते श्रेय बद्दलचे पोस्ट बघ.
कुठले श्रेय ओढून ताणून दिले
कुठले श्रेय ओढून ताणून दिले आहे जरा सांगाल का बरे
119 चा बचाव करणे यात कप्तान रोहितचे श्रेय नाही का?
रोहित पांड्या वांदामुळे संघाचे वातावरण बिघडू शकते अशी जी भीती होती ती निकालात निघाली यात एक लीडर म्हणून रोहितचे श्रेय नाही का?
भारत आज तिन्ही फॉर्मेट मध्ये नंबर एक आहे, टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये टॉपला आहे, गेल्या वर्ल्डकप ला फायनल हरणे आणि दहाच्या दहा सामने जिंकलो, या सगळ्या सांघिक यशात कर्णधार म्हणून रोहितचे श्रेय नाही का?
क्रिकेटच्या इतिहासात आजच्या तारखेला कप्तानीमध्ये त्याचा विनिंग रेशियो सर्वाधिक आहे यात त्याचे श्रेय नाही का?
मुंबई त्याच्या कप्तानीत पाच वेळा आयपीएल जिंकली यात त्याचे श्रेय नाही का?
रोहितचे जे वैयक्तिक धावांचे, शतकांचे, द्विशतकांचे, सिक्सचे, सामनावीराचे, रेकॉर्ड ब्रेक पराक्रम मी इथे शेअर करतो त्यात रोहितचे श्रेय नाही का?
कुठले श्रेय त्याला ओढून ताणून दिले समजेल का?
आता तो काही मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, संजू सॅमसन नाही जे ठराविक गोष्टीचे कौतुक केले आणि विषय संपला.
रोहितच्या पराक्रमाचा आवाका एवढा मोठा आहे तर केलेले कौतुक जास्त वाटणारच.. फक्त काय ओढून ताणून केले आहे तेवढे दाखवा आणि वर्ल्डकपचे तिकीट मिळवा..
कुठले श्रेय ओढून ताणून दिले
कुठले श्रेय ओढून ताणून दिले आहे जरा सांगाल का बरे >> तुला खरच स्वतःचे नि भाऊंचे पोस्ट किंवा स्वतःचे कालची पोस्ट्स नि आत्ताची बदलत्या स्वरुपाची पोस्ट्स वाचून फरक कळत नसेल तर तुला कळून घ्यायची इच्छा नाही हे समजण्याइतके श्रेय मला मिळायला हरकत नसावी
Pages