पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

Submitted by Admin-team on 16 December, 2009 - 13:40

पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेवाळे मिसळ नको.
तिथे मिसळला अजिबात टेस्ट नाही. नुसतीच तिखट आहे.
आणि त्या हॉटेलच वातावरण तुम्हाला स्वातंत्र्यपुर्व काळात घेवुन जाइल.
पुणेरी पाट्या नाहीत पण तुसडेपणात चितळ्याना कॉम्पीटेशन.
त्यापेक्षा जयश्री मिसळ बरी.

मिसळीसाठी "जयश्री"
पत्ता : बजाज अ‍ॅटो मेन गेटसमोर, आकुर्डी.
त्याला ऑर्डर देताना बोलायच कोल्हापुरी दे किंवा तर्री मारुन दे. दणका सहन करु शकत असाल तरच अशी ऑर्डर द्या. नाहितर नॉर्मल ऑर्डर Happy

वडापावसाठी "वासु वडापाव"
पत्ता: भेळ चौकाजवळ एक कॅफे कॅफे डे आहे. त्याच्या जवळ.

फक्त व्हेज हॉटेल्स मध्ये मला आवडणार "रसोई से"

पत्ता: भेळ चौकाच्या थोडस पुढे उजव्या बाजुला रोड टच.
इथे तंदुर पनीर मध्ये बरीच व्हरायटी आहे. टेस्ट छान आहे. सर्विस चांगली आहे.

वासु वडापाव माझ हि फेवरेट ठीकाण आहे :फिदी:... मी प्रोजेक्ट केला होता वासु वडापाव च्या मालकावर "Journey from Road to Restaurant" त्या वेळी त्या मालकांचा मुलगा होता... त्यानेच सगळी माहिती देलेली... अ‍ॅक्सीडेंट मध्ये त्याच निधन झाल Sad ... वासु रेस्टॉरंट माझी मेस होती... माझ एक वेळच जेवण तीथेच असायच Happy

वरच्या ठीकाणां व्यतीरिक्त मला अजुन काही 'शाकाहारी' खाण्याच्या जागां बद्दल माहिती हवी होती ... आभार Happy

.

नेवाळे मिसळ Uhoh त्याला मिसळ म्हणायचं का फोडणी घातलेलं तिखटाचं पाणी म्हणायचं????
मी एकदाच घरी आणली त्यात अर्धा किलो मटकीची उसळ शिजवून घातली तरी त्याचा तिखटपणा कमी होत नव्हता. तिखटाशिवाय दुसरी काहीच चव नसते त्या मिसळीला. नाही आवडली.

त्यापेक्षा मोरया गोसावी मंदीराच्या बाजुला बागेसमोर एक हॉटेल आहे तिथली मिसळ आवडली.

बिर्ला हॉस्पिटलकडे जायच्या रस्त्यावर नवीन झालेलं बे लिफ ब्रिस्टो सह्हीच आहे...इथला पनीर टिक्का म्हणजे लाजवाब.

अन्नपुर्णा अजिबात आवडलं नाही....पण इथे फक्त व्हेजसाठी जवळपास दुसरा चॉईस नाहीये...वरती एक अजून हॉटेल आहे कामिनी ते पण चांगल आहे व्हेज नॉनव्हेजसाठी. जरा बरं असं एवढ एकच हॉटेल दिसलं मला इथे Uhoh

काकडेपार्कमधे एक वडापाववाला असतो फक्त संध्याकाळी ४ तास तो पण मस्त, वड्याचा साईज पुणेकरांना शोभणार नाही एवढा मोठा आणि चव सुद्धा जबरी.

इथल्या माँजिनिजची टेस्ट लैच बेकार Sad

काकडेपार्कमधे एक वडापाववाला असतो फक्त संध्याकाळी ४ तास तो पण मस्त.>>>>>>>>> अगदी मस्तच असतात तिथले वडे Happy
मला कालच कळलेली माहिती, "पंचशील" ला वेज छान मिळतं म्हणुन. मी स्वतः कधी तिथे गेलेली नाहिये, आणि ते कुठे आहे तेही माहीत नाही.. Sad

वा वा ...वासुवडापावाच्या आठवणीनेच गहीवरुन आलं......किती दिवस झाले निगडीला जाऊन! Sad

अजमेरामधे छाया नांवाचे एक हॊटेल आहे. तीथले पराठे खूप सही असतात. मला उत्तर भारतातही तीतके छान पराठे नाही मिळाले अजून कुठे!

एच ए कॊलनीमधे एक कॆंटीन आहे. तीथल्या सामोश्याची, मिसळची आणि ईडलीची चव मी तर कधीच विसरू नाही शकणार!

निगडी भक्ति-शक्ति च्या मागे रामदेव बाबा धाबा - ठिक
चिंचवड स्टेशन रोड वर HDFC ATM च्या बाजूला चायनिज - ठिक
नेवैद्यम आणि मयूर डायनिंग हॉल निगडी-पिंपरी मेन हायवे वर

बिर्ला हॉस्पिटलकडे जायच्या रस्त्यावर नवीन झालेलं बे लिफ ब्रिस्टो सह्हीच आहे>>>>
हायला मला कस काय नाय दिसल अजुन??
नेमक कुठे आहे ते सांगणार का? कुठुन जाताना? मी चाफेकर चौकातुन बर्‍याच वेळा गेलोय पण कधी पाहिल्याच आठवत नाहिये.
<<<काकडेपार्कमधे एक वडापाववाला असतो फक्त संध्याकाळी ४ >>> हे काकडे पार्क शोधायला किती त्रास होइल. चिंचवडात कित्येक बिल्डिंगीची नाव काकडेवरुनच आहेत. Proud
त्यामुळे ह्याचा देखील नीट पत्ता द्याच. Happy
रामदेव बाबामध्ये जावुन जेवायला डेअरिंग पायजेल. ट्रान्सपोर्टनगरमध्ये आहे तो.
मी तिथेही पोटपुजा करुन आलोय तीन चार वेळा.
ठिकठाक आहे. मस्ट आहे अस काहि नाही.
<अजमेरामधे छाया नांवाचे एक हॊटेल आहे>>>>
हे नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे का? सी फुड साठी फेमस??
वासु रेस्टॉरन्तच्या जवळाच दिल्ली स्वाद आहे. तिथे पराठे (मोठ्ठे असतात) , गुलाबजामुन, समोसे, जिलेबी अस बरच काही मिळत.
हे ही ठिक आहे पराठे खायला. Happy
सावली हॉटेलच्या समोर "गोकुळ" स्वीटचा समोसा काहि वर्षापुर्वी अप्रतिम होता. आता बिघडलाय.
मित्र असोत वा कुटूम्बीय व्हेज-नॉनव्हेज एकत्र असणार हॉटेल चालत असेल तर भक्तिशक्तीच्या थोडसच पुढे हायवेला टच दोन हॉटेल्स आहेत. एक गोल्डन पाम्स आणि दुसरं पुणे गेट. गार्डन रेस्टॉरंट आहेत. भरपुर जागा, निवांत बसुन पार्टीची मजा घेण्यासाठी उत्तम. बारदेखील असल्याने पिणार्‍यानादेखील सोयीचे. सीफुड, व्हेज, नॉन्व्हेज, चायनीज असे बरेच ऑप्शन आहेत.
सध्या बहुतेक गोल्डन पाम्स्चा पेशल शेफ हरवलाय. सध्या तरी मी पहिली पसंती पुणे गेटला देइन, Happy
एक लस्सीच दुकान आहे. त्या देअरीच नाव मी विसरलो. थर्मॅक्स चौकातुन साने चौकात जाताना कस्तुरी मार्केटच्या पुढे एक छोटा चौक लागेल. त्याच्या जवळच डाव्या हाताला आहे. अप्रतिम लस्सी. Happy

१. प्राधिकरणआत LIG मध्ये "मणी गंडा राज" कडची इडली आणि डोसे अतिशय स्वस्त आणि मस्त असतात..एकदा नक्की चव बघा
२. चिंचवड गावात गणपती मंदिरा च्या अलीकडे "बालाजी मिसळ" अतिशय चविष्ट असते, बसायची जागा आपण ठीक आहे
३. प्राधिकरण संभाजी चौकात "cakes and cream " नावाचा दुकान आहे तिथे veg patice आणि cakes पण मस्त असतात
४. वासू रेस्तौरांत मध्ये "तंदूर पनीर" एकदम मस्त मिळत

वासु ने non-veg सुरु केले आहे. वडापाव सेंटर शेजारी. बिर्यानी छान मिळते.
हे नेवळे मिसळ कुठ आलं? गांधी पेठेत कां?

चिंचवड-केशवनगर- अरिहंत स्नॅक्स.
मिसळ,उपमा,पोहे,उत्तपा,
भेळ,पाणिपुरी, पावभाजी, पुलाव,

आणि मालक "अमित"

एकदम झकास. एकदा जावेच असे.

मराठा - pune-bombay हायवे वर आहे. तिथे महाराश्ट्रियन जेवन मस्त मीलते. फक्त व्हेज.
पत्ता:
नाशिक फाटा, बस स्टाप पुढे, हायवे वर रोड ट्च , पुण्या कडे जाताना डाव्या हाताला.
जरुर ट्र्याय करा.

रहाटणी जवळ पिंपरी गावात मिसळसाठी प्रसिद्ध अन खुप जुन हॉटेल आहे , माळी आळी मधे सावतामाळी मंदीरासमोर. जनता हॉटेल. आवर्जून जावे अन खावी अशी मिसळ मिळते. हो पण दुपारी १ वाजेपर्यंतच मिळते त्या नंतर नाही.

, माळी आळी मधे सावतामाळी मंदीरासमोर. जनता हॉटेल>>
सुर्यकिरणानो आमच अज्ञान जाणताच तेव्हा पत्ता नीट द्या बॉ Happy

जनता हॉटेल
शिवाजी पुतळाचौकाच्या अलिकडे,
माळी आळी, सावता माळी मंदिरा समोर.
पिंपरीगाव, पिंपरी.

झकासराव पुरे का इतकी डिटेल.

कमाल आहे राव वाल्हेकर वाडी रस्त्यावरचे वाघेरे यांचे "रानमळा " कोणालाच माहित नाही ? गावरान चिकन आणि मटन भाकरीचे हे माहेर घर आहे. ( इथे मात्र त्याच्या आधिचे काहीही मिळत नाही ) रात्री १०:३० ला बंद होते. अशोक सराफ, भरत जाधव जर चिंचवडच्या जवळपास असतील तर त्यांची एकमेव पसंती. आणि हो पांढरा रस्सा, तांबडा रस्सा हवा असेल तर मग संध्याकाळी ७ वा जायला हवे. बघा चाखुन अन कळवा मला.

चंदन आता मालवण समुद्रची एक शाखा नव्या सांगवी मधे पण उघडली आहे. कासारवाडी ब्रिज कडे जाताना ब्रीजच्या अलिकडे.

अन गायत्री भोजनालयाची लज्जात काही ओरचं, आजचं गायत्री बघितलं की पुर्वीचं सुहास भोजनालय आठवतं.

श्रीबालाजी स्नॅक्स सेंटर
प्रेमलोक पार्क कडून बिजलीनगर कडे वळताना डाव्या बाजुला दुकानांच्या गर्दीत आहे.

सगळ्या चाट प्रकारांसाठी स्वस्त आणि मस्त.
यांचा २ वर्षांपूर्वी फक्त एक स्टॉल होता. आता स्वतःच्या जागेत आहे.

लिन्क रोड वर तृष्णा आहे..तिथेही शाकाहारी जेवण उत्तम मिळते.

चाफेकर चौकात करमरकर यांचे स्नॅक्स सेंटर सुप्रसिध्द आहे. माझा एक सिंधी मित्र तेथील स्वच्छ्तेची प्रशंसा करतो. सकाळी नास्ट्यासाठी पोहे, उपमा, इडली, मिसळ हे पदार्थ चांगले मिळतात. पार्सल न्यायचे म्हणले की करमरकरांचा मुलगा एक रुपया जास्त घेऊन कॅरी बॅग देतो. देताना आपण पर्यावरणाचे महानगरपालिकेने गटार नदीत सोडल्यापेक्षा आपण जास्त नुकसान करतो आहोत असा भाव असतो. माझ्या सारखा कोकणस्त भेटल्यावर तर तो हे मला ऐकवल्याशिवाय सोडत नाही. कदाचित कोकणस्तांनीतरी नियम पाळावेत असा आग्रह असावा त्याचा.

नुकतच हॉउस ऑफ रोल्स नावाच नव दुकान पिंपरीचिंचवड नाट्यगृहाजवळ माझ्या चक्रवर्ती नावाच्या मित्राने थाटलय. रविवारी दुपारी तुडुंब जेऊन रात्री फारस जेवायची इच्छा नसते तेव्हा हा रोल बरा वाटतो. ही रोल खाऊन राहण्याची पध्दत प.बंगाल मध्ये जास्त प्रसिध्द आहे. यात नॉनव्हेज रोल सुध्दा असतात. आपल्याकडे लोकांना आवडायला वेळ लागेल.

पिंपरीच्या साई चौकात भेळ पाणीपुरी सॅडविचेसच्या अनेक गाड्या उभा असतात. सिंधी लोकांना भेळ, पाणीपुरीची चव फार आवडते. इथली पाणिपुरी वेगळीच लागते.

चिंचवडगावात संध्याकाळी मशिदीसमोर बटाटा भजी, मिर्ची भजी ची स्पेशल एक गाडी आहे. लांबुन लांबुन याचे प्रेमी येतात.

Pages