पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

Submitted by Admin-team on 16 December, 2009 - 13:40

पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्ड व्हॅली चिखली रोडला कधी पासून गेली? Uhoh

सुशांत दादा, बर्‍याचदा येते फॅमेली सोबत पण अजुन रस्ता लक्षात रहात नाहीये Sad
माझं मला पण जायचंय एकदा Sad

वक्रतुंडने चाट आयटेम्स हल्लीच सुरु केलेत.
वक्रतुंड मध्ये आइसक्रीम मस्त आहे.
तो बास्कीन रॉबेन्स आइसक्रीम ठेवतो.
साबु वडे देखील मला आवडलेले तिथले.
जेवण मात्र तितकस आवडत नाहिये.

भावेश्वरी, नेमकं कुठे आहे?
रिया तिने आम्ही जाउ शकु ५-१० मिनिटात असं ठिकाण सांगितलय.
चिखली रोडला आहे अं नव्हे.

साने चौकात शेगाव कचोरी?? (हमारे जेलमे सुरन्ग) च्या चालीवर वाचा.
लवकरात लवकर नेमकं ठिकाण सांगा.

प्रथम, जवळपास पण कुठल्या एरियाच्या.
याअगोदरच्या पोस्ट वाचल्यात का ??

ट्रेनिंगसाठी हत्ती गणपती चौकाजवळ राहायला होतो महिनाभर. तेव्हा आवारेत चिकनथाळी रू.२६ ला होती

जेवण मात्र तितकस आवडत नाहिये.

>>> एव्हढ्यात गेलेलास का?
मला तरी छान वाटली जेवणाची क्वालीटी Happy

नॉनव्हेजसाठी पहिली पसंती गोल्डन पाल्म… काही दिवसांपूर्वी आकुर्डीमध्ये बजाज समोर असलेल्या "सिल्वर सेवन" मध्ये गेले होते. फिश छान होते. शिवाय तिथे शांत आणि सुंदर वातावरण आहे.

संभाजी चौकाजवळच्या पेट्रोलपंपाच्या शेजारी "संग्रीला" नावाचे छोटे हॉटेल आहे. इथले वातावरण बहुतेक लोकांना आवडणार नाही. पण इथे मिळणाऱ्या चायनीज पदार्थांची चव उत्तम आहे. शिवाय रेट कमी आहेत. इथली चिकन दम बिर्याणी मला प्रचंड आवडते. अमेरिकन चॉपसुई आवडत असेल तर इथली ट्राय करा.

आकुर्डी स्टेशनला श्वार्मा किंग मध्ये श्वार्मा चांगला मिळतो.

भेळ चौकात गणेश भेळ आणि ओम स्वादिष्ट भेळ इथे चांगले चाट मिळते. तसेच प्रदीपच्या समोरील पोर्णिमा मध्ये सुद्धा चांगले चाट मिळते. ओम स्वादिष्ट भेळच्या शेजारीच महावीर नावाचे खाऊचे दुकान आहे. त्यांच्याकडची मिनी बालुशाही खूप खुसखुशीत असते.

संभाजी चौकामध्ये पुजारी वडापाव चांगला मिळतो. आणि कॅफे कुल जवळ दाबेली मस्त मिळते.

पिंगारा मध्ये वेज चांगले मिळते. चीज केक आवडत असेल तर भेळ चौकाजवळ Sweet Chariot ट्राय करून बघा

आता आमच्या घराजवळ लोकमान्य हॉस्पिटल समोर काका हलवाई यांची ब्रांच सुरु झाली आहे. चितळेंची आणि जोशी वडेवाल्यांची यांनी पिंपरी-चिंचवड मध्ये ब्रांच सुरु करावी असे मला सतत वाटतं

संभाजी चौकाजवळच्या पेट्रोलपंपाच्या शेजारी "संग्रीला" नावाचे छोटे हॉटेल आहे. >>>> डिटेलमध्ये पत्ता द्या ना

zomato वर पूजा क्लासिक कॉम्प्लेक्स एवढाच पत्ता दिला आहे. Sad निगडी प्राधिकरण मधील संभाजी चौकातून आकुर्डी-चिखली रोड ने जायचे. ब्रिजच्या अलीकडे उजव्या बाजूला १ इंडिअन ऑईलचा पेट्रोल पंप आहे. त्याच्याच शेजारी आहे ते. संभाजी चौकामध्ये कोणालाही विचारा पेट्रोल पंप कुठे आहे. तिथून अगदी जवळच आहे. फक्त राँग साइड ने गाडी न्यावी लागते

पिंपरीच्या शगुन चौकात सुगंधालया शेजारी वैष्णूज म्हणून नवीन झाले आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही. तवा सबजी मस्त बनवतात. करेला मसाला भन्नाट होता. रोट्या युपी साईड स्टाईलने बाहेर बनवतात.

चिंचवड आप्पाची मिसळ खाल्ली आहे का कोणी ??
चाफेकर चौक मध्ये डांगे चौक बस स्टॉप आहे तेथे रिलायन्स मार्केट जे अजुन सुरु झालेले नाही
त्याच्या शेजारच्या बोळात
भारी वाटली
त्यांची दूसरी शाखा कालेवाडी रोडवर आहे

शर्मा पावभाजी, संत ज्ञानेश्वर चौक (अन्ऑफिशिअली कॉल्ड अ‍ॅज् भेळ चौक), पेठ क्रमांक २५, पिंपरी-चिंचवड नवनगर (अन्ऑफिशिअली कॉल्ड अ‍ॅज् प्राधिकरण), निगडी, पुणे - ४११०४४ येथील जैन पावभाजी आणि ग्रीनपिस पुलाव आजच खाल्ला. फारच चविष्ट आहे. दरही वाजवी - प्रत्येक रू.५०/- फक्त.

मालवण समुद्र - गुणवत्ता खालावली आहे एकदम (कामिनी शेजारी शिफ्ट झालेय मागच्या वर्षी)

ओम स्वादिष्ट भेळच्या शेजारीच महावीर नावाचे खाऊचे दुकान आहे. त्यांच्याकडची मिनी बालुशाही खूप खुसखुशीत >>> हो खाल्ली आहे.
मागच्या दिवाळीला आणली होती.
त्यांच्याकडुन दिवाळीला बरेच जण फराळाच घेउन जातात.

नॉनव्हेजसाठी पहिली पसंती गोल्डन पाल्म… काही दिवसांपूर्वी आकुर्डीमध्ये बजाज समोर असलेल्या "सिल्वर सेवन" मध्ये गेले होते. फिश छान होते.

>>>>>>> गोल्डन पाम रेग्युलर झालयं, चेंज म्हणुन आता "सिल्वर सेवन" ट्राय करणेत येइलं

पिंपरीच्या शगुन चौकात सुगंधालया शेजारी वैष्णूज म्हणून नवीन झाले आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही. तवा सबजी मस्त बनवतात. करेला मसाला भन्नाट होता. रोट्या युपी साईड स्टाईलने बाहेर बनवतात.
>>>>>>
डीविनिता, ते नॉनव्हेज पण आहे का? मी व्हेजच खाल्लंय फक्त. मस्त होतं ते पण. नेक्स्ट टाईम नॉनव्हेज ट्राय करेन.

शर्मा पाभा नाय आवडत.. गीता पाभा बरी असते.
संभाजी चौकाजवळच्या पेट्रोलपंपाच्या शेजारी "संग्रीला" नावाचे छोटे हॉटेल आहे. इथले वातावरण बहुतेक लोकांना आवडणार नाही. >> बापरे तिथे जाण्याचे कधी धाडस होईल असे वाटत नाही.

ओम स्वादिष्ट भेळच्या शेजारीच महावीर नावाचे खाऊचे दुकान आहे. त्यांच्याकडची मिनी बालुशाही खूप खुसखुशीत असते.>> +१
काका हलवाईची सुरु झाली ब्रांच १५ तारखेपासून हे बरे झाले. पण प्राधिकरणात हाटेल, ब्रांच सुरु होतात आणि न चालल्यामुळे बंद पडतात. ते कॉर्न क्लब आहे का अजून?

Pages