पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

Submitted by Admin-team on 16 December, 2009 - 13:40

पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महादेव पॅटिस: इंस्टा वरचे पेड रिव्ह्यू पाहून गेलो आणि पस्तावलो. ह्यांच्याकडे जाताना चौकात एक गाडी आहे. (शगुन कडून येऊन महादेव पॅटिस च्या गल्लीत वळतो तो चौक) त्याच्याकडे रगडा पॅटिस अशक्य चविष्ट मिळतं. दहिवडा, दाल पक्वान्न वगैरे पण छान आहे. पॅटिस खाल्लं की लगेच शेजारी खरवसवाला आहे, तो खा.. मिल्क केक देखील मस्त.

तिथून जरा पुढे या. एक खूप मोठं फर्निचर मॉल आहे त्या गल्लीत 2,3 आईस्क्रीम मस्तानीवाले आहेत, त्याच्या विरुद्ध बाजूला shawrma फॅक्टरी नावाचं छोटा स्टॉल आहे. चांगला मिळतो.

सिरिअसली?
आता खराब झाली असेल quality कदाचित किंवा तुमचं बॅड लक त्या दिवशी खराब मिळालं असेल पण महादेव पॅटिस इज लव.

नॉनव्हेज प्रेमींना कोल्हापुरी पाहुणचार हे हॉटेल अजून कसे गवसले नाही आहे? मी चांगलं ऐकलंय पण मला मायबोलीकराचा फीडबॅक ऐकायचा आहे.

अजिंक्यराव ,
महादेव पॅटीसवाला फार जुना आणि फेमस आहे.
खूप अपेक्षा घेउन गेलो की ओमफुस होतेच.
त्याच्या समोरच slice of heaven आहे, त्याच्याकडे खूप व्हरायटी सँडविच आहेत, चांगली चव आणि फ्रेश.

रॉय कुठला area वै सांगाल तर माहितगार लोकं काही सांगतील की.
मी तर प्रथमच ऐकले हे नाव.

शगुन कडून येऊन महादेव पॅटिस च्या गल्लीत वळतो तो चौक) त्याच्याकडे रगडा पॅटिस अशक्य चविष्ट मिळतं

>>> मी ही इथेच खातो Happy

कुणाल आयकॉन रोडवरच्या जोधपूर स्वीट्सची जिलेबी आणि मिठासच्या बंगाली मिठाया
सांगवीमधल्या 'आम्ही पोहेकर'चे दडपे पोहे मस्त, त्यांचे कांदापोहे मात्र फार तिखट असतात
पिं चि नाही पण औंधमधले 'तारीफ' आणि तिथले 'मुर्ग मकराना'

सांगवीमधल्या 'आम्ही पोहेकर'चे दडपे पोहे ~~तिथे जवळच डनका पाणीपुरी आणि चाट चालू झाला आहे
इंस्टावर तर चांगले रिव्ह्यू आहेत प्रत्यक्ष माहीत नाही

<<<महादेव पॅटिस: इंस्टा वरचे पेड रिव्ह्यू पाहून गेलो आणि पस्तावलो.>>> सेम पिंच.. 3-4 वेळेस असेच झाले.. आता चुकून पण जात नाही तिथे.

Slice of heaven +1

आज एक ठिकाण असे मिळाले की हा धागा खणून वर काढतेय.
मणीरामस् इडली- प्राधिकरणातील नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन हाॅल शेजारी.
इडली उपलब्ध वेळ तर चितळेंना पण तगडे आव्हान देणारी- 6.30am to 11 am and then 6 pm to 8 pm!!!
तरी खूप गर्दी कारण चव आणि दर्जा आणि तत्पर सेवा.
फक्त इडली आणि चटणी मिळते. तिथेच खाणारे 10% तर पार्सल नेणारे 90%. किंमत वाजवी वाटली.
पिंचिंकर बघा एकदा जाऊन.

हो हा मणी इकडे फेमस आहे. रविवारी अगदी प्रचंड गर्दी असते, सगळे प्राधिकरण रविवारी फक्त इडली चटणी खाते की काय अशी शंका येण्या इतपत Happy तो विकतो पण इडली दहा पटित. लोक अगदी पन्नास पन्नास नेतात एका वेळी. चटणी जहाल तिखट असते. ह्याच्या पेक्षा २७ सेक्टर मधलं रुची स्नॅक्स चांगल आहे. केरळी. Medu वडा, उत्तपा, पोंगल, कॉफी बेस्ट मिळते.

धनवंती पिंचीत असाल तर पुढल्या महिन्यात होळी आसपास पिंपरी मध्ये घेवर/ घियर जिलेबी मिळते नक्की ट्राय करा, सिंधी जलेबी प्रकार आहे, फक्त दोन आठवडे मिळतो ओव्हर द काउंटर होळीच्या वेळी. इतर वेळी ऑर्डर देऊन करून घ्यावा लागतो. मोठ्या कुठल्याही हल्वाया कडे मिळेल.

मणिरासम इडली नोंद घेतली
धन्यवाद

शाहूनगर, पिंची मध्ये एक तामिलियन डोसा नामक स्नॅक्स सेंटर आहे. बहिरवाडे ग्राउंड गेट समोर. उत्तम आहे.
शिवाय बजेट फ्रेंडली.
त्या डोसावाल्याच्या समोरच त्रिमूर्ती वडापाव छान आहे, भजी देखील मिळतात. हा फक्त संध्याकाळी असतो.
शाहूनगर मध्ये DY पाटील कॉलेज जवळ south delight नामक सेंटर आहे. सकाळी स्नॅक्स, दुपारी south meal असते संध्याकाळी परत स्नॅक्स.
तिथे घी पोडी इडली आणि अप्पम कोकोनट मिल्क सोबत हे दोन्ही गोष्टी छान. इतरत्र हे सहजी न मिळणारे पदार्थ.

बऱ्याच दिवसात इकडे लिहिले नाही..

स्लाइस ऑफ हेवन try केलं, उशिरा हि जागा try केल्याचं वाईट वाटलं. आवडत्या जागांमध्ये add झालंय आता.
तिखट आंध्रा जेवणासाठी- महेश आंध्रा मेस. चिकन फ्राय विशेष आवडले. बिर्याणी जरा तेलकट आहे.
शुद्ध शाकाहारी- रामदेव बाबा ढाबा निगडी. पनीर मराठा विशेष आवडली, बाकी जेवणाचा दर्जा देखील उत्तम आहे.
मराठी कोल्हापुरी चिकन मटण थाळी- हॉटेल गावकरी थाट, रावेत पम्पिंग जवळ तुकाराम महाराज ब्रिज क्रॉस करून मुकाई चौकाकडे जाताना डाव्या हाताला आहे. चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही, अळणी सूप, पांढरा रस्सा, सोलकढी. ज्वारी/बाजरी भाकर/ चपाती/ रोटी, इंद्रायणी/ अळणी भात.. चिकन/मटण अंडे सोडून बाकी सगळे अनलिमिटेड. चव अप्रतिम, दर पण परवडण्यासारखे. पांढरा रस्सा सगळ्यात बेस्ट. इतर हॉटेलात पांढरा रस्सा घ्यावासा वाटत नाही, इथे वाट्या भरभरून पिल्या जातो.
चहा: आकुर्डी- थाटात चहा. चांगला आहे, पण स्मोकर खूप असतात. येवले आताशा लै गार चहा द्यायला लागलेत.
या चहाच्या जवळच एक त्रिमूर्ती बिर्याणी आहे. किमतीच्या मानाने खूप चांगली बिर्याणी.
इडली- नादब्रह्म
डोसा- महादेवा- आकुर्डी चौकात

Slice of heaven पिंपरी मार्केट
साई चौकातून उजव्या हाताच्या गल्लीत, गुरुद्वाराच्या अलिकडे, महादेव पॅटिस च्या समोरच्या बाजूला.
खूप उत्तम चव.

अजिंक्यराव धन्यवाद भर घातल्याबद्दल
महादेव डोसा शोधतो चौकात कुठेय ते.

धनवंती Happy

इथे लिहिलंय का माहीत नाही.
तळबीडकर वडे आकुर्डी चिखली रोड, साने चौकाच्या पुढे डावीकडे. उत्तम चवीचा गरमागरम वडा फार छान.

वर आकुर्डीतील जो थाटात चहा सांगितलंय, त्याच्या शेजारी एक वडेवाला आहे, बरेच मोठे दुकान आहे. त्याच्याकडे सामोसा छान होता.

वाकड खाऊ गल्ली- दत्त मंदिर रोड. इथे खाऊ गल्लीच्या टोकाला एक अंडीवाला आहे, त्याच्याडे बॉईल एग भुर्जी छान आहे. नि अंडा घोटाळा पण.. खाऊ गल्लीच्या अलीकडे पंजाबी अम्रीत्सरी छोले कुल्चे.. चव छान आहे आणि पोट भरतं एकाच कुलच्याने.. सोबत कुणी असेल तर एखाद प्लेट सोया चाप पण घ्यायला हरकत नाही. पण कधीतरीच खायला ठीक.. महिन्यात दुसऱ्यांदा खाल्लं तर बोर होतं. याच भागात इंदोरी चाट खूप छान मिळतात. एक मोठे दुकान आहे तिथे दत्त मंदिर रस्त्याला.. ह्या इंदोरी च्या अलीकडे एक ढोकळा खमण चे दुकान आहे. *गरम आणि ताजे* असतील तर इथले पांढरे ढोकळे खूप छान लागतात. एकदा दुपारी गेलो तेव्हा गार ढोकळे घश्याखाली जात नव्हते.

>>>>>>>>>सामो, ती इम्रती असेल उडदाच्या डाळीची असते.
नाही मंजूताई देवळात मेन्युवरती लिहीलेले असते ना 'घेवर' म्हणुन.

>> शाहूनगर, पिंची मध्ये एक तामिलियन डोसा नामक स्नॅक्स सेंटर आहे. बहिरवाडे ग्राउंड गेट समोर. उत्तम आहे.
शिवाय बजेट फ्रेंडली. >> हे अजिबातच आवडले नाही.
याच्यापेक्षा HDFC कॉलनीकडून काका हलवाईकडे जातानाचा रोडवर डाव्या बाजूला 'कन्नन'ने गाडी लावलेली असते सकाळी ६ पासून. इडली वडा सांबार चटणी ती भारी लागते.
काका हलवाई ला लेफ्ट घेऊन थोडेसे पुढे गेलात तर डाव्या बाजूला 'सिध्देश्वर' छोटेसे हॉटेल आहे तिथले वेगवेगळ्या प्रकारचे डोसे अगदी मस्त आणि उत्तपा, टोमॅटो ऑम्लेट छान आहे.

महादेव पॅटिस वाला अतिशय बोअर झाला आहे हे मी कन्फर्म करते.
लहानपणापासुन तिथे खाल्लं आहे त्यामुळे बिघडलेली चव नीट लक्शात येते आहे.

पिम्परी चौकात एक इडली दोसा वाला आहे . बालाजी नाव आहे बहुदा. एकदम कोपर्यात आहे दुकान. दारुच्या एका दुकानाशेजारी. फार मस्त इडली दोसा मिळतो.
मी जन्मायची होते तेन्व्हा म्हणजे ८९ साली ते त्या जागी गाडी लावायचे. तेन्व्हा दिड रुपयांना डोसा मिळायचा आता चाळीस ला आहे एवढाच फरक आहे. इतके वर्ष झाले चवीत काडीचाही बदल नाही. मस्ट ट्राय जागा आहे. जाउन बघा.

मोशी डुडुळगाव मधे पुणेरी स्वीट्सच्या समोर एक दावणगिरी डोसा वाला आहे. त्यांची क्वालिटी देखील छान आहे.

Pages