पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

Submitted by Admin-team on 16 December, 2009 - 13:40

पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौ. बोर्लीकर. आकुर्डी गुरुद्वारापाशी. ह्यांच्याच पुपो सर्व दुकानात असतात चितळे, पाटणकर आणि इतर बरेच ठिकाणी..

गुरुद्वारा म्हणजे रेल्वेलाईन क्रॉस करायला हवी >> गुरुद्वारा कमानीतून आत चालत रहायचे. तिथे डाव्या हाताला तुम्हाला एक नंदनवन सोसायटी असा बोर्ड दिसेल. तिथे विचारा.

पेट्रोल पंपासमोरच्या गल्लीत.. अन्नपूर्णी होते त्याच जागी. एवढ चांगल अन्नपूर्णी होत त्याठिकाणी चितळे Sad सध्या तिथे फक्त पेढे, बर्फी आणि ईतर थोडा कोरडा खाऊ मिळतो.

चितळे खरे पुणेरी आहेत, आजिबात त्याना स्पर्धेची भिती नाही, अन्यथा पिंचिं मध्ये काका हलवाई आले, गाडगीळ आले (ज्वेलरी) अनेक लोक आले, पण चितळे यायचे नाव घेत नव्हते

अहो, तो वैश्णू शुद्ध शाकाहारी आहे आणि क्वालिटी काही इतकी खास नाही. आता त्याची एक शाखा डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज जवळ सुरू झाली आहे. सं. तु. नगरमध्ये.

मालवण समुद्रमध्ये कालच जाऊन आलो. तद्दन भिकार क्वालिटी. मासे किमान चार दिवसांपूर्वीचे असावेत. अगदीच बेचव!!

मी सी फूड साठी सिल्वर सेवनलाच जाते. महागडे हॉटेल आहे त्यामुळे जास्त जात नाही. सी फूड साठी अजून काही चांगली हॉटेल्स आहेत का?

<<डीविनिता | 19 March, 2015 - 10:07
पिंचिंमध्ये पुपो कुठे रेडिमेड मिळतात का चांगल्या नि चविष्ट? >>

एम्पायर एस्टेट मधे कृपा फूड्स मधे असतात. २ वेळा खाल्यात...
बघा ट्राय करुन...

अहो, तो वैश्णू शुद्ध शाकाहारी आहे आणि क्वालिटी काही इतकी खास नाही.>> पिंपरीत फक्त तवा भाज्या चांगल्या आहेत. सुरुवातीला दालफ्राय बरी असायची. एकदा बिर्याणी आणली तर फक्त प्लेन राईस आणि उकडलेल्या भाज्या होत्या. तुकारामनगरच्या दुकानात तर माज एवढा एकच आयटम जबरी आहे.

पिंपळे सौदागरला पिंचित म्हणायचे का?

सौदागरला हैद्राबाद हाऊस आलंय. बिर्याणी अप्रतिम
टिम लक लक बोगस!
औंधच्या शिवसागरची पावभाजी पण आलीये सौदागरात त्यामुळे आम्ही टिमवाले सध्या वाढवा वजन मोडात

औंधच्या शिवसागरची पावभाजी पण आलीये सौदागरात > म्हणजे औंधच्या शिवसागर हॉटेलवाली का? का ही दुसरी? सौदागरात exact कुठे सुरू झालीयये?

सौदागरात त्यादिवशी हैद्राबाद हाऊस शोधत होतो, काही सापडले नाही. मग हिंजवडी मधेच गेलो होतो.ती बिर्याणी पण अप्रतिम.

औंधच्या शिवसागरची पावभाजी पण आलीये सौदागरात > म्हणजे औंधच्या शिवसागर हॉटेलवाली का? का ही दुसरी? सौदागरात exact कुठे सुरू झालीयये?

+१ कुठे आहे सुरु?

हैद्राबाद हाउस, कोकणे चौकात आहे. आधी साशंक होतो, पण इथले प्रतिसाद बघून एकदा जाऊन यायला हरकत नाही अस वाटतय.

ट्युलिप, कोकणे चौकात आहे हैद्राबाद हाऊस.बिर्याणी बद्दल +१

रंगाशेठ जाऊन या. नॉनव्हेज खाणारे असाल तर चांदीच तुमची Happy

शिवसागर वाल्यांनी ब्रांच उघडलीये वाकडला
हिंजवडी वरून विशालनगरचा जो टर्न लागतो तिकडे कुठेशी आहे.
पत्ता नीट विचारून सांगते.

याच एरियात एक काशी चाट भंडार आहे. चाट ऑसम मिळतंय तिकडे.आजकाल पनीर कुल्चा सूरू केलाय तोही मस्त.
इंदोर स्वीट्स पण मस्तय. इतके अप्रतिम पोहे/ढोकळा मी कुठेच खाल्लेला नाही कधी.

रच्याकने, फेज १ ला कॉग्नि/ सींबॉयसीस पाशी गाड्या लागतात त्यावरही सगळंच फार मस्त मिळंत.

मोरया गोसावी मंदिर रोडवर गोखले हॉल समोर खवाय्येगिरी छान हॉटेल चालू झाले आहे
मिसळ मस्त संध्याकाळी वेज क्रिस्पी व क्रिस्पी सीपीसी सारखे एकदम नविन खाद्यप्रकार नक्की जावे असे ठिकाण

रच्याकने, फेज १ ला कॉग्नि/ सींबॉयसीस पाशी गाड्या लागतात त्यावरही सगळंच फार मस्त मिळंत.>>>>>
रीया...हजारो मोदक तुला.

चांगली थाळी कुठे मिळेल पिंचिंमध्ये... पेंटिंगचे काम चालू आहे, किचनमध्ये राडा आहे दोन-तीन दिवस तरी!

Pages