पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

Submitted by Admin-team on 16 December, 2009 - 13:40

पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकासराव, मी पुना गेट आणि गोल्डन पाम दोन्हीकडे नॉनव्हेज खाल्लं आहे. पण मला पुना गेट पेक्षा गोल्डन पाम मधील नॉनव्हेज जास्त आवडलं

धनवन्ती, "मालवण समुद्र" बद्दल बरंच ऐकलं आहे. नक्की ट्राय करेल

भोज ..राजस्थानी थाळी चांगली असते .. १९० रु. पुर्ण शाकाहारी ..
आकुर्डिला वासू चे हॉटेल आहे त्यच्या शेजारीच आहे ..दाल बाटी असते ..

भोज ..राजस्थानी थाळी चांगली असते .. १९० रु. पुर्ण शाकाहारी ..>>> इथेच आधी चौधरी दा धाबा होतं.
चांगलं होतं पण चाललं नाही (ह्या दोन्हीचे मालक सेम आहेत)
. त्याच जागेत आधी वासुज बिर्याणी होतं ते ही बंद पडल.
आता हे चांगल आहे असं म्हणताय तर निदान हे तरी नीट चालावं बॉ..

हे पिंची एरियात येतं का?
कासारवाडीमधलं आमंत्रण हॉटेल माझं ऑल टाईम फेव्हरेट आहे Happy

मालवण समुद्र अपडेट : चिंचवड मधील जुन्या हॉटेल मालकांचे नवे हॉटेल कामिनीच्या बिल्डिंगमधे चालू केले आहे. खरी चव तिथे आहे. (पहिली जागा भाड्याची होती वाटते)

नवीन काही अपडेट्स ??

रामदेव धाबा आता अधिक प्रशस्त आणि अधिक नीटनेटका झालाय.
आधी टिपिकल धाबा होता.

तिथे रबडी आणि गुलाब जामुन दोन्ही भारी.
पापड चुर्मी, मसाला खिचिया, राजस्थानी पिज्झा भारी.

भाज्यांमध्ये काही पन्जाबी आयटम्स आहेत. एव्हरेज टेस्ट.
काही राजस्थानी सिजनल भाज्या मिळतात.
माहितीगार सोबत असेल तर उत्तम.
गव्हाचा रोटला एक खाल्ला तर चार पाच चपात्या खाल्ल्याच फिलिन्ग येतय.
दाल फ्राय आणि दाल तडका भारी आहे.
दाल बाटी देखील चांगली.

मिसळ मध्ये जयश्रीची चव उतरल्यासारखी वाटली मागच्या वेळी. Sad

खंडोबा चौकातच काळभोरनगर मध्ये पिटर इन्ग्लन्डच्या शोरुमच्या वर , अन्नपुर्णा (नावाच कन्फ्युजन आहे) डायनिन्ग हॉल आहे.
महाराष्ट्रियन पद्धतीचं जेवण देणारा.
त्यांनीच अनलिमिटेड नाश्ता करण्यासाठी त्याच बिल्डिन्ग मध्ये जवळच एक नाश्ता सेन्टर सुरु केलय.
उत्तम चव, भरपुर व्हरायटी, माफक दर.
एका व्यक्तीचे १०० रु.
आम्ही गेलेल्या रविवारी खालील नाश्ता बुफे होता.

पोहे, उपमा,(बारीक शेव), शिरा, साबुदाणा खिचडी, दुध, केलॉग्ज, मिसळ पाव, पुरण पोळी, चहा , कॉफी, दोन टाइपचे ज्युस, खारी शंकरपाळी, गोड शंकरपाळी, ब्रेड बटर.....

काहीही घ्या, कितीही घ्या आणि एन्जॉय करा.
चव अत्यंत उत्तम.
उपमा, शिरा, मिसळ पाव, सा खि सर्वच भारी होतं.
पुरण पोळीला जागा उरली नाही त्यामुळे नाही खाल्ली. Wink

सांगवी मधे एक मिसळ १९४९/१९५० (नक्की आठवेना) का काय आहे तिथे मिसळ मस्त आहे Happy
डॉ. सातीसोबत माझं तिथे गटग झालेलं Wink ती मिसळ नंतर २ वेळा खाऊन आले.

सिद्धीविनायकवाल्यांनी सांगवीत एक छोटेखानी हॉटेल टाकलंय ते फारच बेक्कार आहे Sad

औंध मधे कढाई मधे चाट आयटम्स मस्त मिळतात.
सांगवी आणि औंध मधेही आता सुजाता मस्तानी आलीये.
चिंचवडच्या कामाक्षी हॉटेलचा उल्लेख आधी केलाय का मी? एक नंबर हॉटेल आहे Happy

विश्रांतवादी मधे एक दिल्ली स्वाद आहे तिथे पराठे आणि छोले भटुरे ऑसम मिळतात.

निगडीत प्रदिपच्या समोर पौर्णिमा भेळची गाडी आहे त्यांची शेवपुरी मस्त असते

पौर्णीमा भेळची पाणी पुरी मला कधी नव्हे ते आवडलेली. Happy

आकुर्डीत मन्डैच्या अलिकडे वेन्कटेश हॉटेलच्या समो (लक्ष्मि राइस वर्ल्डच्या बाजुला फोटो स्टुडिओ आहे त्याच्या समोर) एक गाडी लागते त्याच्याकडे शेवपुरी, भेळ, पानीपुरी असे सर्वच आयटेम भारी आहेत.

आबा, चिंचवडला मोरया गोसावी मंदीराजवळ चांगले मिळतात चाट.. भेळ, पापु, कच्छी दाबेली इ. वडापाव मात्र काकडे पार्कातच

पिंपरीत अशोक थिएटर जवळ एका गल्लीत कच्छी दाबेली मिळते. तिथली टेस्ट अप्रतिम अस्ते ,मी तरी अजुन इतरत्र कुठेच नाही अनुभवली अशी

आबा, चिंचवडला मोरया गोसावी मंदीराजवळ चांगले मिळतात चाट.. भेळ, पापु, कच्छी दाबेली इ. वडापाव मात्र काकडे पार्कातच
>>>>
+११११११११११११११११११११११११११११११

आसा Proud Wink

इकडे गप्पा काय मारताय फक्त खादाडी ठिकाणं लिहा.

कामाक्षी बर्ड व्हॅली समोर, भोला हॉटेल शेजरी, केएसबी चौकात आहे.

शेगावची कचोरी चिंचवडला दररोज संध्याकाळी तानाजीनगरला महाकाली मंदीरासमोर मिळु लागली आहे तशीच ती साने चौकातही मिळते म्हणे.

nonveg साठी एखादे चांगले restaurant आहे का जवळपास?

मटण / चिकन भाकरीसाठी आम्हाला सदाशिव पेठेत आवारेमधे जावे लागते.

चाट आयटेम्स्च काय तर वडापाव देखील चिखली रोडला फारसे चांगले नाहियेत.>>>> मिळतो कि..
बर्ड वॅलीच्या मागच्या गल्लीत.. भावेश्वरी वडापाव.. खावूनच बघा एकदा

Pages