पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

Submitted by Admin-team on 16 December, 2009 - 13:40

पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुष्यात काही गोष्टी अश्या येतात की खूप झळाळणाऱ्या आग ओकणाऱ्या उन्हाळ्यात येणारी पहिली वहिली संततधार.. आणि त्या सुगंधात, त्या सुंदर वातावरणात उन्हाने लकलकलेला जीव शांत होतो, अश्याच एका उन्हाच्या तलखीने भाजून काढलेल्या दिवसात ती माझ्या आयुष्यात आली, पण पावसाआधी दूर पडलेल्या पाण्यामुळे सुगंध जसा आपल्यापर्यंत पोहचतो तसाच तिचाही सुगंध येत होता, तशीच ती आली.. नाजूक, साजूक सुंदर... चिकन रान..

आमचं मिलन झालं ते म्हणजे पठारे मंगल कार्यालय सॉरी सॉरी, पठारे खानावळ, मोशी..

मी खाल्लेलं हे पहिलं चिकन रान. एखादा पदार्थ पहिल्यांदा वाईट लागला तर आपल्या आयुष्यात कायमचा बाद होतो, तसे होऊ नये म्हणून भरपूर रिसर्च करून पठारे कार्यालय निवडले आणि त्याचे चीज झाले. चिकन रान तर अफलातून होतेच, पण सोबत जे काळ्या मसाल्यातले जबरदस्त चिकन खाल्लं तेपण उत्कृष्ठ! चिकन मटण प्रेमींनी नक्की जा...

बाणेरच्या जवळपास highway ला लागुनच हॉटेल रंगीला पंजाब आहे. बैठक व्यवस्था, साफसफाई व्यवस्थापन आणि चव चांगली आहे. काही बाबतीत rates थोडे अवास्तव वाटतात.

अजिंक्यराव
पठारे खानावळ मध्ये आमच्या ऑफिसची एक।पार्टी झालीय.
तिथे veg मध्ये कोथिंबीर वडी देखील छान होती. बाकी टिपिकल पंजाबी भाजी स्टार्टर वै चव चांगली होती.
नॉनव्हेज प्रेमी लोकांनी चिकन रान आणि बिर्याणी वर ताव मारला. तिथे पावणेआठ पर्यंत पोहचले पाहिजे म्हणजे जागाही मिळते आणि सुरवातीला फार गर्दी नसल्याने तबियत मध्ये बनवलेले उत्तम चवीचे खाणे मिळते.
नंतर किचनमध्ये घाई होते. सुरवताची कोथिंबीर वडी इतकी छान होती की नॉनव्हेज प्रेमी लोकांनी एक डिश परत मागवलेली. त्यांना घाईत बनवलेली आली Happy

सुर्या, महाग वाटले ते
आता आहे की अतिक्रमण मध्ये पाडले आहे?

कमलनयन बजाज स्कुल समोर धनश्री हॉस्पिटल लगत हॉटेल ओंकार pure veg.
स्नॅक्स साठी बरा option आहे.
पोहे उप्पीट मिसळ वै
वरच्या मजल्यावर जेवण मिळते.
मेस सारखे थाळी आणि काही इतर मेन्यू
Ok आहे
त्याचे स्टफ पराठे चांगले वाटले. घरगुती असतात तसे पण जाड आणि मोठे. बटर तूप असले नखरे नाहीत. पनीर आणि आलू पराठा आवडला.

2 update

1) शाहूनगर तामिलीयन डोसा
कवालिटी उतरली असे जाणवत आहे
2) शाहूनगर मधील काका हलवाई ब्रँच बंद पडली. त्याच्याकडे कंदी पेढे ( सातार्यापेक्षा वेगळ्या चवीचे होते मात्र ) आणि मँगो मलाई बर्फी मला आवडलेली.

>> 2) शाहूनगर मधील काका हलवाई ब्रँच बंद पडली. त्याच्याकडे कंदी पेढे ( सातार्यापेक्षा वेगळ्या चवीचे होते मात्र ) आणि मँगो मलाई बर्फी मला आवडलेली. >> ते स्पाइन रोडवर शिफ्ट झालेत/होतील.
---
बादवे आम्ही आजकाल बऱ्याचदा साऊथ डिलाईटला जातो. कुर्मा-अप्पम, आप्पे, साऊथ मिल्स वगैरे चांगले आहेत.
आता परवा तमिळ नवीन वर्ष म्हणून ३२०/- ला साद्या पार्सल आणलं. केळीच पान वगैरे दिलं होतं. छान होता मेनू.
---

या भागात घरगुती हेल्दी टिफीन देणारे कोणी आहे का?रोज भाकरी-भाजी-उसळ. शक्य असेल तर विकेंडला नॉनव्हेज.

पठारे खानावळ जेव्हा तळवडे मध्ये होती, तेव्हा चिकन रान पार्सल आणून खाल्लेलं.
मला नव्हतं आवडलं तेव्हा.

आताच्या मोशीच्या हॉटेलात थाळी घेतलेली, छान चव होती.
चिकन रान ट्राय करायला हवं पुन्हा एकदा.

मुर्ग मुस्सलम थरमॅक्स चौकातील पंजाबी रसोई मध्ये खाल्लेलं, छान होत

Pages