पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या मायबोलीवर पुर्यासाठी खुप टिप्स होत्या. आत्ता सापडत नाही. पुर्या(कसं लिहायच?) चांगल्या फुलुन तशाच राहतील अशी खात्रीपुर्वक क्रुती द्या ना कुणीतरी

दिनेशदा,
व्हेज बिर्यानी सारखी हमखास हिट जाइल अशी चिकन बिर्यानी लिहा ना प्लीझ

मला ईदच्या दिवशी मुस्लिम जो शिरकुर्मा करतात शेवयांचा त्याची रेसिपी कोणी देईल काय?? माझी प्रचंड आवडती डिश आहे ही....

हे मी वाचल. पण अजुन एका ठिकाणी होत. मला मागे कधीतरी वाचल्याच आठवतय. मनुस्वीनीने लिहिलं होत बहुतेक

ह्याच धाग्यावर असंख्य टिपा आहेत पुर्‍यांसाठी. कणिक भिजवताना चिमुट दोन चिमुट साखर घालायची म्हणजे खाली बसत नाहीत पुर्‍या (फुलल्या तर :फिदी:).

मला आज भाजीवाल्याकडे एक भाजीच्या फणसाचा तुकडा मिळालाय. त्याने तो सोलुन म्हणजे साल काढुन दिलाय मला. पण त्याची भाजी कशी करायची ते मला माहीत नाही. कोणी तरी सांगा ना प्लिज. त्यात बर्‍यापैकी आठळ्या आहेत त्या कशा वापरायच्या म्हणजे त्याम्च्यावरच पातळ आवरण[साल] काढायची ना? ही कुयरी नाहीये.

PC111254.JPG तो फणस असा दिसतोय.PC111255.JPG

मनिषा इथे बहुदा शोनुने लिहीलेली कृती आहे (कॅनमधल्या)फणसाची कुठेतरी.

मिनोती धन्यवाद गं.. करुन पाहते. मी साधी खिर करते पण खजुर घालायचे माहित नव्हते...

वरचा फणस बराच तयार झालेला दिसतोय. त्याची ती कॅनवाली भाजी नाही होणार बहुतेक.

आमच्याकडे असा तयार झालेला पण अजुन न पिकलेला फणस मुद्दाम भाजीसाठी काढतात. त्याचे गरे काढायचे, आठळ्यांवरचे आवरण काढून आठळ्या चिरुन घ्यायच्या आणि मग गरे+आठळ्यांची भाजी करायची. आधी तेलात मोहरी+जिरे + हिंग, मग हिरवी मिरची , कढिपत्ता. मग गरे+आठळ्या टाकायचे. पाण्याचा एक हलकासा हबका मारुन दणदणीत वाफ आणली की गरे+आठळ्या शिजतात. मग मिठ+ भरपुर कोथिंबीर + ओले खोबरे घालायचे, झाकुन एक वाफ आणायची आणि ताटल्या भरुन द्यायचे. पब्लिक वाटच पाहत असते भाजी कधी होते आणि कधी खायला मिळते याची. आपण पोहे कसे खातो तशीच खायची. चपाती वगैरे ची काही गरज नाही.

चिकन नूडल सूपची कृती देणार का कोणी ? दोन जणांना एकवेळी पुरेशी होइल एवढ्या प्रमाणात द्या प्लीज.

वैद्य, मॅगी आम्ही खात नाही.>>>> तुमच्या शान च्या खिलाफ आहे वाटतं.

फणस पनीर कोफ्ता

साहित्य : 1 वाटी लगदा (फणसाला व विळीला तेल लावून फणस कापून घ्या. फोडी मोठ्याही चालतील. चांगल्या धुवून कुकरमध्ये डब्यात पाणी न घालता 3 ते 4 शिट्या होऊ द्या. थंड झाल्यावर लगदा करा.) पाव वाटी किसलेले पनीर, पाव वाटी बटाट्याचा उकडून लगदा, पाव वाटी कॉर्नफ्लावर, थोडं मीठ, थोडी साखर व पाव चमचा मिरेपूड.

ग्रेव्हीसाठी साहित्य : टोमॅटो पांढरट रंगावर घेऊन त्याची प्युरी बनवून घ्या. 10-12 काजू भिजवून, तीळ भिजवून अर्धी वाटी, गरम मसाला दीड चमचा, आले पेस्ट 1 चमचा, लसूण पेस्ट पाव चमचा, पाव वाटी खोवा, थोडे वरून फ्रेश क्रीम.

कोफ्ता : उकडलेल्या फणसाचा गर, पनीर मळलेले व बटाट्याचा लगदा मिसळून घ्या. चवीनुसार मीठ, साखर व थोडी मिरेपूड घाला.
कॉर्नफ्लावर पाव वाटी घाला. चांगले कालवून छोटे छोटे गोलाकार कोफ्ते बनवून तेलावर लालसर तळून काढा. कोफ्ते बनवून ठेवा.

ग्रेव्ही : गरम कढईत तेल घालून (भरपूर तेल) जिरे घाला. काजू व तिळाची वाटलेली पेस्ट घाला. परता, आल्याची पेस्ट व लसणाची पेस्ट, टोमॅटो प्युरी घाला. चांगली परता. बाजूंनी तेल सुटेल. थोडा खोवा घाला, परता, गरम मसाला घाला व थोडे दूध मिश्रीत पाणी घाला. मीठ व थोडी साखर घाला. ग्रेव्ही चांगली उकळू द्या. फ्रेश क्रीम घाला, गॅस बंद करा. देताना डिशमध्ये कोफ्ते घालून वरून ग्रेव्ही घाला.

{ओम गुगल देवताभ्यो नम: || शोधल्याने मिळत आहे रे। आधी शोधलेचि पाहिजे। ||} Happy

शुभंकरोती
या बाफवर या पानाच्या अगदी वर लिहीलेली पाककृतींविषयीची सूचना तुम्ही वाचाच असा प्रेमळ आग्रह आहे तुम्हाला.

Lol

नाचणीच्या भाकरी कशा करतात? नाचणीची लापशी करताना जे पीठ वापरते तेच भाकरीला वापरलं तर चालेल का? पिठात मीठ घालायचं का नाही?

कुठे विचारु कळल नाही म्हणुन इथे विचारते. मुंबईत गायीचं दुध कुठलं चांगलं? माझी मुलगी आहे लहान ८ महिन्यांची. तिच्यासाठी लोणी, तुप करायला हवय. महानंद कसं आहे?

admin चुकिच्या ठिकाणी असेल तर योग्य ठिकाणी हलवा.

मनिशा पहिला हताला खोबरेल तेल लाउन घे. त्या फणसाचे अजुन उभे ३ तुकडे कर. मधला जो घट्ट भाग आहे तो कपुन टाक. त्याचा कहि युझ नाहि. जो उरलेला भाग आहे त्यात मोठे दिसतात ते गरे आणि पातळ असतो तो कचरा. तो कढुन टाक. आता जो उरलेले गर आहेत ते उभेच चिरुन घे. जरा मउ असेल तर बि पण घे. जुन असेल तर काढुन थेव. (ति सुकवुन मसुरच्या आमटित घाल).
बाकि भजि साधनने सांगितल्या प्रमाणेच फक्त आम्हि फोडणित हिंग, मोहरी आणि आल्-लसुण-मिरचिच वाट्प घालतो. शेवटि त्यात भरपुर खोबर आणि कोथिंबीर. (फणस जुन असेल तर मिरचि एवजि मसाला घालावा व पणि घालुन शिजवावि. चालत असल्यास ह्या मसल्या वाल्या भजित शेवटि खोबर घालताना सुकि खाडितलि कोलंबि पाण घालतात )अहाहा ...... आम्हि मालवणला असताना ह्या भाज्या पेजेबरोबर खायचो. आठ्वण आलि. आजच बजारत जाउन बघुन येते फण्स आल कि नहि ते.

Pages