Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाकी याचे उत्तर कोणाकडे आहे
बाकी याचे उत्तर कोणाकडे आहे का?
-------
पांड्या नको होता तर त्याला मध्यमगती किंवा वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू असा पर्याय होता का? आगरकरांनी असा पर्याय कधी आधी कुठल्या सामन्यात चाचपला का?
-------
कालपर्यंत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा कप्तान होता हार्दिक पांड्या.. आणि आता अचानक तो संघात सुद्धा नकोसा झाला ..
बातमी वाचल्यावर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा असा विचार आधी करून बघायचा इतकेच म्हणणे आहे.
आता बहुतेक KKR, RR, SRH आणि
आता बहुतेक KKR, RR, SRH आणि CSK हे याच क्रमाने प्लेऑफमध्ये असतील..... अगदीच काही अनपेक्षित रिझल्ट लागले तर RCB आणि DC ला रिमोट चान्स असतील!!
अगदीच काही अनपेक्षित रिझल्ट
अगदीच काही अनपेक्षित रिझल्ट लागले तर RCB आणि DC ला रिमोट चान्स असतील!!
>>>>>
RCB आणि चेन्नई यांच्या रन रेट मध्ये थोडासाच फरक आहे.. तेवढा मिटवून आरसीबी जिंकली की चेन्नई बाहेर जाईल आणि ते येतील.. आरसीबीने चेन्नईला हरवणे अनपेक्षित म्हणू शकतो हवे तर.. पण रिमोट चान्स नाहीये.. चांगलीच संधी आहे.
RCB ला 18 धावांच्या फरकाने
RCB ला 18 धावांच्या फरकाने किंवा 2 षटकं राखून जिंकायचं आहे...
चान्स बऱ्यापैकी आहे...
नेमके आकडे शोधले तर हे मिळाले
नेमके आकडे शोधले तर हे मिळाले
beating csk by at least 18 runs, if they score 200. If they're chasing 200, they will need to win in about 18.1 overs
अजून एक संधी म्हणजे जर हैदराबाद आपले दोन्ही सामने हरले तर त्यांचा रनरेट सुद्धा घसरून खाली जाईल. त्या केस मध्ये चेन्नईला कसेबसे हरवणे सुद्धा पुरेसे ठरेल.
पण मुळात वरचे टारगेट अवघड नाही.
सांगायचा मुद्दा असा की
सांगायचा मुद्दा असा की
वृत्तपत्राने म्हटले म्हणजे ती बातमी खरी असे नसते. तेवढ्यावर तिला खरी समजणे हा भाबडेपणा आहे.
>>
इथे कुणी डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीये, पण मटा ची क्रेडीबिलिटी तुझ्यापेक्षा खूप वर आहे यावर ही दुमत नाही. त्यामुळे तू उगाच त्यांच्याशी स्पर्धा करायच्या फंदात पडू नको...
मटाची बातमी खरीही असेल किंवा
मटाची बातमी खरीही असेल किंवा खोटीही. नसेल विश्वास तरीही काही हरकत नाही. मी फ्कत काय लिहिलीय हे सांगितलं. पण मटात लिहिलय तर चर्च तर होणारच. जय शहाणे मात्र शर्माला मात्र कॅप्टन म्हणून घोषित केलं होत. BCCI सेक्रेटरीला हे अधिकार नसावेत. हे परस्पर घोषणा करणार असतील तर निवड समिती तरी कशाला पाहिजे?
घोषणा केली असेल. निवडले कोणी?
घोषणा केली असेल.
निवडले कोणी?
मटा ची क्रेडीबिलिटी
मटा ची क्रेडीबिलिटी तुझ्यापेक्षा खूप वर आहे यावर ही दुमत नाही.
>>>
आता हे कोणी ठरवले?
हे सुद्धा मटावाल्यानी छापले का
त्यामुळे तू उगाच त्यांच्याशी स्पर्धा करायच्या फंदात पडू नको...
>>>>
माझी स्पर्धा फक्त माझ्याशीच असते. दुसऱ्याशी स्पर्धा करणे हा मी माझा अपमान समजतो
घोषणा केली असेल.
घोषणा केली असेल.
निवडले कोणी?
टीम निवडीच्या आधीच घोषणा केली होती.
टीम निवडीच्या आधीच घोषणा केली
टीम निवडीच्या आधीच घोषणा केली होती.
>>>>
टीम निवडीच्या आधी कर्णधार निवडला असेल निवड समितीनेच..
हीच योग्य पद्धत आहे. म्हणजे नंतर संघ निवडताना कप्तानाचे सुद्धा मत लक्षात घेता येते.
आगरकरची काही तक्रार आहे का?
आगरकरची काही तक्रार आहे का? मला कर्णधार शर्मा नको होता किंवा मला हे माझ्या इच्छेप्रमाणे कर्णधार किंवा संघ निवडू देत नाहीत वगैरे वगैरे..
की मटा हाच सगळ्याचा आधार
कदाचित जय शहाच्या घरी सिक्रेट
कदाचित जय शहाच्या घरी सिक्रेट मीटिंग झालेली असू शकते.
राजस्थान सुरुवात चांगली नाही.
राजस्थान सुरुवात चांगली नाही.
पुढचा सामना कलकत्ता सोबत आहे.
जर दोन्ही सामने हरले तर पहिल्या दोन मध्ये स्थान मिळवणे अवघड होईल. जर खाली घसरले तर ते नाही जिंकत यंदा आयपीएल.. सालाबादप्रमाणे..
हा पॉवेल तर काही एक कामाचा
हा पॉवेल तर काही एक कामाचा नाही!!
आगरकरने असे स्टेटमेंट
आगरकरने असे स्टेटमेंट दिल्याचा व्हिडिओ नसेल तर विश्वास ठेऊ नका इतकीच अपेक्षा आहे. >> रोहित शर्मा आयपील बॅटींग कॅजुअली घेतो असे स्टेटमेंट दिल्याचाव्हिडिओ बघायला मिळेल इतकीच अपेक्षा आहे.
टीम निवडीच्या आधी कर्णधार निवडला असेल निवड समितीनेच.. >> इथे दोन पोस्ट्स कमी टाकून जय शाह ची प्रेस काँफरन्स बघत जा रे. निवडीचा अधिकार निवडसमितीचा हे सगळॅ ऑन पेपर बरोबर आहे पण बीसीसीआय ने असे नॉर्म्स कधी फॉलो केले आहेत ?
हा पॉवेल तर काही एक कामाचा
हा पॉवेल तर काही एक कामाचा नाही!! >> ह्या वेळी एकदमच गंडलाय. पण पिच पण ट्रिकी आहे असे वाटले. रियान चिकाटी दाखवतोय हे बघून बरे वाटले.
आरसीबीने चेन्नईला हरवणे
आरसीबीने चेन्नईला हरवणे अनपेक्षित म्हणू शकतो हवे तर.. पण रिमोट चान्स नाहीये.. चांगलीच संधी आहे. >> हो त्यांनाच चान्स अधिक वाटतोय डीसी पेक्षा . त्यांच्या मॅच च्या आधी त्यांना नक्की काय करायची गरज आहे हे स्पष्ट झालेले असणार आहे. फक्त चेन्नई मोक्याच्या वेळी खेळ उंचावण्यात पटाईत आहे.
रोहित शर्मा आयपील बॅटींग
रोहित शर्मा आयपील बॅटींग कॅजुअली घेतो असे स्टेटमेंट दिल्याचाव्हिडिओ बघायला मिळेल इतकीच अपेक्षा आहे. Lol
>>>>>>>>
ते निरीक्षण आहे. त्याचा दरवर्षीचा एप्रोच आणि बोडीलँग्वेज बघून केलेले. हे मी यावर्षीचा नाही तर आधीही म्हणायचो.
पण आगरकरला पांड्या नको होता हे काही निरीक्षणं नाही झाले. उगाच वादाला वाद घालायचा असेल तर खुशाल घाला..
पण उलट मी वर म्हटल्याप्रमाणे यातही निरीक्षण करायचे झाल्यास आगरकरने पांड्या नको होता तर पर्याय शोधायचा प्रयत्न केला का? कोणाला त्या हेतूने संधी दिली का? याचेही उत्तर कोणाकडे नाही..
उलट कालपर्यंत रोहित शर्माचा ट्वेंटी-ट्वेंटी साठी विचार होत नव्हता, पांड्याला भावी कर्णधार म्हणून बघितले जात होते अशी विधाने इथेच येत होती
निवडीचा अधिकार निवडसमितीचा हे
निवडीचा अधिकार निवडसमितीचा हे सगळॅ ऑन पेपर बरोबर आहे पण बीसीसीआय ने असे नॉर्म्स कधी फॉलो केले आहेत ?
>>>>>>
कमाल आहे. अशी विधाने मी केली की तेव्हा ती पटत नाही तुम्हाला... असो.
ऑन पेपर अधिकार कोणाला आहे हे क्लिअर केले त्याबद्दल धन्यवाद.
आगरकरने जर पर्याय शोधायचा
आगरकरने जर पर्याय शोधायचा प्रयत्न केला असेल तर त्याने मायबोली वर धागा काढायला पाहिजे होता का? की मी पर्याय शोधतोय म्हणून.
हा हा..
हा हा..
मायबोलीवर धागा काढायला परवानगी दिली नसेल जय शाह ने..
पण पर्याय कसे चाचपले जातात असे तुम्हाला वाटते. मीटिंग रूम मध्ये बोलावून इंटरव्ह्यू घेउन की मैदानात खेळायची संधी देऊन?
जर दुसऱ्या प्रकारे असेल तर ते आपल्या पासून लपणार नाही.
सुरुवातीला 9 पैकी 8 सामने
सुरुवातीला 9 पैकी 8 सामने जिंकल्यावर राजस्थानचा सलग चौथा पराभव.
सुरुवातीला त्यांच्या विजयाचा धडाका सुरू होता तेव्हाच म्हटले होते हे. जिथे खेळ उंचवायचा तिथेच हरणारा संघ आहे हा. यावेळी सुद्धा तेच करत आहेत.
जर पहिल्या दोन मध्ये नाही राहिले तर अवघड होईल यांचे. शेवटचा सामना कलकत्त्याशी असल्याने तसेच वाटत आहे आता.
संजू सॅमसन सुद्धा बरेच कूल असतो इतरवेळी. पण आज फार चीडचीड करत होता. तिथेच आज सामना जातोय हे समजून चुकलो.
ते निरीक्षण आहे. त्याचा
ते निरीक्षण आहे. त्याचा दरवर्षीचा एप्रोच आणि बोडीलँग्वेज बघून केलेले. हे मी यावर्षीचा नाही तर आधीही म्हणायचो. >> तू जन्माला आल्यापासून म्हणत असशील, पण तुझ्याकडे पुरावा नाही (जसा तू मटा ने द्यावा असे म्हणतो आहेस) हे सत्य बदलत नाही. पण ह्यावर तू हिरिरीने वाद घतला आहेस.
कमाल आहे. अशी विधाने मी केली की तेव्हा ती पटत नाही तुम्हाला... असो. >> तू अशी केलेली विधाने मी कधी अमान्य केली, परत पुरावा दे उगाच नेहमीसारखा हवेत गोळीबार नको. (तू शर्मा , धोनी नि चुम्मा (याईक्स) सोडून फारसे वेगळे कधी काय बोलतोस हा प्रश्नच आहे)
आसामच्या पुराच्या बातमीचं
आसामच्या पुराच्या बातमीचं भाकित ‘दिब्रूगड धोक्यात आहे असं आमचा बातमीदार म्हणतो‘ ह्या ओळीसकट आपल्या वहीत लिहून ठेवणार्या होरारत्न आण्णा पावश्यांचा वंशज मायबोलीवर आहे हे आपलं अहोभाग्य!!
कमाल आहे. क्रिकेट विषयक
कमाल आहे. क्रिकेट विषयक निरीक्षण आहे त्याला पुरावा लागतो. पण बीसीसीआय आणि जय शहावर मनमानी करत असल्याचा आरोप करताना पुरावा लागत नाही
उद्या एखाद्या चांद्रयान मोहीमे संदर्भात काही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली तर त्या संदर्भात सारे निर्णय शास्त्रज्ञ किंवा इस्रो प्रमुखांनी न घेता मोदीजीनीच घेतले असे बोलून मोकळे व्हाल
(तू शर्मा , धोनी नि चुम्मा
(तू शर्मा , धोनी नि चुम्मा (याईक्स) सोडून फारसे वेगळे कधी काय बोलतोस हा प्रश्नच आहे)
>>>>>>>>>
बरेच काही बोलतो. माझे निरीक्षण इतके अफाट आहे की माझे कित्येक अंदाज खरे होतात. मी ड्रीम इलेव्हन जुगाराला विरोध करतो अन्यथा आतापर्यंत काही शे करोडपती असतो
आणि तुम्ही वर उल्लेख केलेले खेळाडू याना जेव्हा कोणी ओळखत नव्हते तेव्हापासून मी त्यांचे टॅलेंट हेरून त्यांना सपोर्ट करत आलोय. केवळ उगवलेल्या सूर्याला नमस्कार करत नाही मी..
उद्या इलेक्शन कमिशनर ची घोषणा
उद्या इलेक्शन कमिशनर ची घोषणा मोदींनी परस्पर मीटिंग न घेताच केली तर चालेल का? ह्यात पंतप्रधानानी नेमलेला एक सदस्यही असतो तो मात्र शांत बसेल कारण नेमणूकच त्यांनी केलेली असते.
NDTV स्पोर्टलाही बातमी आलेली आहे. भारत जिंकला तर काहीही चर्चा होणार नाही दुर्दैवाने बाहेर पडलो तर मात्र गोंधळ होईल.
सेलिक्शन कमिटी मध्ये फक्त आगरकर नसणार अजूनही काही लोक असतील. एखादा सेलेक्टर बघतही असेल की मॅचेस. सध्याच्या टीम मध्ये नवीन प्लेअर्स ही निवडले असतील त्यांच्या मॅचेस वेळी आगरकर येऊन बसायचे का?
“ माझी स्पर्धा फक्त माझ्याशीच
“ माझी स्पर्धा फक्त माझ्याशीच असते. दुसऱ्याशी स्पर्धा करणे हा मी माझा अपमान समजतो”
“ माझे निरीक्षण इतके अफाट आहे की माझे कित्येक अंदाज खरे होतात.”
“ तेव्हापासून मी त्यांचे टॅलेंट हेरून त्यांना सपोर्ट करत आलोय.”
I specialist
गेट वेल सून!!
फेरफटका, मला आवडते
फेरफटका, मला आवडते माझ्याबद्दल बोलायला.
दुसर्यांबद्दल बोलायला देखील आवडते. पण त्यासाठी तुम्ही शर्मा शाहरूख पंत असायला हवे. मग मी भरभरून बोलतो
Pages