आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>जैस्वाल च्या डिहायड्रेशन नंतर आटलेल्या रन्सचं प्रेशर संजूवर आल्यासारखं वाटलं
शक्य आहे!! पण तरीही तो फटक्याचा प्रयत्न सामन्याच्या त्या वेळी जरा अतातायी वाटला. संजू शक्यतो थंड डोक्याने खेळणारा प्राणी आहे!!
बोल्टने कमालीचा पहिला स्पेल टाकला.... दुसऱ्या बाजूने रन्स वाहत असूनसुद्धा हा गडी फक्त ३-४ रन्स देत होता!!
अश्विनअण्णा पण गेल्या दोन तीन मॅचमध्ये फॉर्मात आलेत.
पण ट्रेविस हेड, क्लासेन आणि अभिषेक शर्माचे आव्हान समोर आहे!!
क्लासेन सुरुवातीला काही दिवस राजस्थानमध्ये होता ना बहुतेक पण त्यावेळी तो अगदीच खेळला नाही!!

“क्लासेन सुरुवातीला काही दिवस राजस्थानमध्ये होता ना बहुतेक पण त्यावेळी तो अगदीच खेळला नाही!!” - बरोबर. डॅरेल मिचेल पण होता पण खास प्रभाव पडला नव्हता त्याचा पण.

बोल्ट, अश्विन आणि संजूविषयी सहमत आहे.

तरीही तो फटक्याचा प्रयत्न सामन्याच्या त्या वेळी जरा अतातायी वाटला. संजू शक्यतो थंड डोक्याने खेळणारा प्राणी आहे!!
>>
अगदीच
इतक्या आधी इतकं पुढे यायची गरज नव्हती.
स्वत: कीपर असल्याने हे सॅमसन कडून होणं आणखी अनपेक्षित होतं

“तरीही तो फटक्याचा प्रयत्न सामन्याच्या त्या वेळी जरा अतातायी वाटला.”
“इतक्या आधी इतकं पुढे यायची गरज नव्हती.”

तो नुसता पुढे आला असं नाही तर तो स्पिनच्या विरुद्ध अँगलने पण पुढे आला. त्यामुळे तो मुळातच लाईनमधे नव्हता, त्यातून बॉल वळल्यावर पूर्ण फसला. अर्थात कर्ण शर्मालाही क्रेडिट द्यायला हवं.

१८० विनिंग स्कोअर ठरू शकतो ह्या विकेटवर. हैद्राबादकडे चांगले फास्ट बॉलर्स आहेत जे ही विकेट आणि लाँग बाऊंड्रीज चांगल्या प्रकारे एक्स्प्लॉइट करू शकतात.

176 टारगेट
स्पिन गोलंदाजी चहल आश्विन निष्प्रभ ठरले तरीही 175
कमी पडला स्कोअर
पण तरीही राजस्थानची फलंदाजी पाहता क्लोज होईल असे वाटत आहे.

संजू सॅमसन लौकिकाला जागला. खेळपट्टी स्लो झाली की तो नेहमीच गंडतो. चेन्नईला त्याचा रेकॉर्ड नक्कीच खराब असेल.

राजस्थानचे स्पिनर निष्प्रभ ठरले याचे आश्चर्य वाटले होते.
ते याचसाठी..
कारण हैदराबादच्या स्पिनरनी सामना डोक्यावर फिरवला..

एकेक करून दोन्ही चोकर टीम बाहेर पडल्या...

Final - SRK vs SRH Happy

आणि ही पण!
"अरे हैद्राबाद सॉलिड पैसा ओततय! कमिन्स आणि हेड! जिंकायचं आहे ह्यावेळी असं दिसतय. "
वैद्यबुवा, एकदम on the spot!

हैद्राबाद आज जबरदस्त खेळले. कमिन्सला भारतात येऊन जिंकायची कला अवगत झालेली दिसतीय. Happy

गेल्या दोन्ही मॅचेसमधे, सेट झाल्यावर दमल्यानंतर किंवा क्रँप्स आल्यानंतर जैस्वालने विकेट फेकली हे चांगलं लक्षण नाहीये.

फायनल कमिन्स विरुद्ध गंभीर अशी रंगणार
राजस्थान बाहेर गेले ते बरे झाले. अन्यथा कलकत्ता फायनल जिंकेल हे जवळपास फिक्स झाले असते.
आता तुल्यबळ लढत होईल असे वाटतेय. तरी कलकत्ता किंचित फेवरेट वाटत आहे आणि

माझी इच्छा सुद्धा गंभीरने जिंकावे अशी आहे. तो माणूस मला आवडतो. जसा आत तसा बाहेर आहे. उगाच शांत आणि कूल असल्याचा आव आणत नाही.

फायनल मॅच हैदराबाद आणि कलकत्ता यांच्यात होणार आहे.
आणि मजेशीर गोष्ट म्हणजे दोन्ही संघातील एकही प्लेयर भारतीय वर्ल्ड कप टीम मध्ये नाही.

यावर रोहीत शर्मा म्हणाला की हे चांगले आहे. आमच्या पोरांना सरावाला वेळ मिळेल Proud

राजस्थान लौकिकाला जागले Happy

आता या वर्ल्डकपनंतर द्रवीड राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षक/मॅंटॉरपदी परत यावा आणि पुढच्या वर्षी राजस्थानने कप जिंकावा असे स्वप्नरंजन करुया!!

आता हैद्राबाद किंवा कलकत्ता कुणीही जिंकले तरी कि फरक पडता है Wink

द्रविड ट्वेंटी-ट्वेंटी फॉरमॅट कोच ही गोष्टच पचायला जड जाते. किंबहुना बदलत्या स्वरूपात वन डे मध्ये सुद्धा कोच म्हणून तो योग्य व्यक्ती नाही.
येत्या काळात पंत किंवा जो कोणी कर्णधार होईल त्यासोबत गंभीरला कोच करावे. किंवा नेहरा सुद्धा चांगला पर्याय आहे. फक्त कर्णधार सोबत bonding हवे.

प्ले ऑफ सामनावीर.
स्टार्क, आश्विन, शाहबाझ अहमद
तिन्ही गोलंदाज.
त्यामुळे थोडे बरे वाटले.

https://www.facebook.com/share/r/K263soFCoHFZXUJ6/?mibextid=Ls6BEq

हे बघा.. रोहीत शर्मा आयपीएल फलंदाजी हलज्यात घेतो.
हे फक्त मी बोलत नाही.
यावर रिल सुद्धा बनतात
फक्त मी म्हटले की लोकांना जगावेगळे वाटते Happy

या पोस्ट मध्ये एकदोन मी आहेत. फेरफटका बोल्ड करा Happy

https://www.facebook.com/share/r/iSUd4HbN3ETm3Krd/?mibextid=Ls6BEq

ओनर असा हवा..
ऐका गंभीरच्या तोंडून.
शाहरूख खान कधीच त्याच्याशी क्रिकेट बद्दल बोलला नाही.
उलट त्याला स्पष्टच सांगितले होते की माझ्यापेक्षा जास्त क्रिकेट तुला कळते. त्यामुळे मी तुला त्याबद्दल सांगायला लागलो तर तुला कसे वाटेल हे मी समजू शकतो.

गंभीर खेळाडू म्हणून भारी होता.... मला आवडायचा तो!!
पण कोच/मेंटोर वगैरेचे पेशन्स नाहियेत त्याच्यात.... एकतर हायपर असतो नाहीतर एकदम खांदे पाडून; तोंड पाडून बसतो.

मेंटोर एक अंधश्रद्धा आहे Happy
जे काही असतो ते कोच असतो

बाकी कलकत्ताची ओळख कोच गंभीरची टीम म्हणूनच वाटते. श्रेयस अय्यर त्याचा कप्तान आहे हे चटकन लक्षात सुद्धा येत नाही.

“ पण कोच/मेंटोर वगैरेचे पेशन्स नाहियेत त्याच्यात” - खूप स्ट्राँग पर्सनॅलिटी आहे रे त्याची. इंडियाच्या स्टार कल्चरमधे फिट होणं अवघड आहे.

जॉन राईट- गांगुली हे मी बघितलेले सगळ्यात भारी कॉंबो होते आणि त्याच्या खालोखाल गॅरी कर्स्टन-धोनी..... आपल्याला असे जरा लो प्रोफाईल लोकच जमतात.

हैदराबादने टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली खरी..
पण आज स्थिती काही चांगली नाही..

१०.२ ओवर ६२-५
तरी १४० धावा झाल्या पाहिजेत.. मागचा सामना राजस्थानला चेस अवघड गेलेला.. पुन्हा कलासेंन बरीच मदार आहे

७१-६
हा चक्रवर्ती पुन्हा खूप विकेट काढतोय... २१ झाल्या

Pages