Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Enjoy
Enjoy
---------
महाराष्ट्र टाईम्स बातमी
---------
अर्जुन तेंडुलकरसह चार खेळाडूंचा हार्दिक पंड्याने चांगलाच गेम केल्याचे आता समोर येत आहे.
एकिकडे हार्दिकला ट्रोल केले जात आहे. हार्दिकची तक्रार रोहित शर्मासह काही खेळाडूंनी केली आहे. पण दुसरीकडे हार्दिकचे मात्र संघातील वागणे मात्र चांगले नसल्याचे आता समोर येत आहे.
मुंबईच्या संघावर नामुष्की ओढवली असली तरी हार्दिक मात्र पार्टीमध्ये मस्ती करत असल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकला कर्णधारपदाचे गांभीर्य नसल्याचे आता समोर येत आहे.
हार्दिकने रोहित शर्मापासून लसिथ मलिंगापर्यंत आजी-माजी खेळाडूंचा अपमान केला आहे. पण आता त्याने संघातील युवा खेळाडूंनाही सोडलेले नाही.
https://marathi.indiatimes.com/sports/cricket/iplt20/news/hardik-pandya-...
बातमी म टा ची असल्याने आता हा विषय संपला आहे असे समजू शकतो.
याईक्स >>
याईक्स

>>
बातमी म टा ची असल्याने आता हा
बातमी म टा ची असल्याने आता हा विषय संपला आहे असे समजू शकतो.
>>
च्यायला, मला इतके दिवस वाटंत होतं की वेड पांघरून पेडगावला जातोय... पण आता मात्र हे काढलेलं सोंग नसावं अन् खराच काहीतरी लोच्या असावा असं वाटायला लागलं आहे...
गेट वेल सून रे...
“ याईक्स” हे मिसलं होतं
“ याईक्स” हे मिसलं होतं
मी भरभरून बोलतो >> एकदम
पण त्यासाठी तुम्ही शर्मा शाहरूख पंत असायला हवे. मग मी भरभरून बोलतो >> एकदम चोक्कस ! एकदम he is the who of the you in the I of the he in which you are the I and I is the you - and that you in you and he in you वाल्या गुरूदेवांसारखेच बोलतो. मंडळ शर्मा शाहरूख पंत ह्या बिचार्यांच्या दु:खात सहभागी आहे.
वाईड बॉल ठरवताना बॅटसमन
वाईड बॉल ठरवताना बॅटसमन डिलीव्हरी रिलीज पॉईटं ला कुठे होता हे बघून ठरवतात (त्यातही जर गार्ड लेग स्टंपच्या बराच बाहेर घेतला असेल नि बॉल टाकल्यावर आत शिफ्ट होऊन बॉल लेग च्या बाहेर पण आधीच्या गार्ड साठी यॉर्क होईल असा पिच झाला तर वाईड देतात का ? ) तर वेस्त हाईट नो बॉल्स ठरवताना बॅटसमन डिलीव्हरी रिलीज पॉईटं ला कुठे होता - क्रीजच्या बाहेर कि डीप हे का बघत नाही ? शेवटी नो बॉल चे उद्देश अनाठायी फायदा घेता येऊ नये हे आहे ना ?
मटाच्या बातमीने
मटाच्या बातमीने अपेक्षेप्रमाणे शर्मा पांड्या विषय क्लोज केला.. चला पुढे जाऊया.
आज एक पॉईंट मिळाल्याने हैदराबादचे प्ले ऑफ तिकीट कन्फर्म झाले हा फायदा.
पण खेळून आणि जिंकून दोन गुण मिळाले असते तर त्यांना पहिल्या दोन मध्ये यायचे चांसेस जास्त राहिले असते हा तोटा.
शर्मा मारतोय आणि अंबानी
शर्मा मारतोय आणि अंबानी परीवार उदास दिसतेय.. अगदी सिक्स मारून पन्नास केले तेव्हा सुद्धा उदास होते.
ते सुद्धा 28 बॉल 53 .. टीम सकोर 67
हरली मुंबई !
हरली मुंबई !
हार्दिक पांड्या आणि मुंबई मॅनेजमेंटने मुंबईचा संघ तळाला दहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवला!
हार्दिक पांड्या आणि मुंबई
हार्दिक पांड्या आणि मुंबई मॅनेजमेंटने मुंबईचा संघ तळाला दहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवला!
>>
फार पूर्वी नाही, २०२२ मधे ही तिथेच होता (पांड्या नव्हता तेंव्हा)
अख्खा संघ डिसजॉइंट होता अन् नीट खेळला नाही हे मान्य करण्यात काय प्रॉब्लेम आहे?
कुठलाही संघ ना केवळ त्याच्या कॅप्टन मुळे जिंकतो ना केवळ त्याच्या कॅप्टन मुळे हरतो हे तुला कधी उमगणार???
ना केवळ
ना केवळ
>>>>>
कोण म्हणाले आहे केवळ?
कुठे म्हणालो आहे केवळ?
पण कप्तानाचे श्रेय त्याला द्यायला इथे लोकांना काय प्रॉब्लेम आहे...
आवडीचे खेळाडू कप्तान असतील तर वाहवा..
नावडतीचे मीठ मात्र अळणी
२०२२ मधे ही तिथेच होता
२०२२ मधे ही तिथेच होता
>>>>
हो.. कारण सगळी संघ निवड फसली होती.
फलंदाजी नवखी आणि गोलंदाजी युनिट आयपीएल इतिहासातील सर्वात कमजोर असावे.
पण तेच गेल्या वर्षी असेच गोलंदाजी युनिट घेऊन मुसंडी मारली होती.
गोलंदाज चांगले नसले तर कप्तानाचा आणखी कस लागतो. की हे सुद्धा मान्य नाही आता..
आणि हो. एका वर्षीचे आठवताना पाच वर्षीचे जिंकलेले विसरू नका.
आवडीचे खेळाडू कप्तान असतील तर
आवडीचे खेळाडू कप्तान असतील तर वाहवा..
नावडतीचे मीठ मात्र अळणी
>>
बरोब्बर
शर्मा कप्तान असताना शेवटचे आले तर संघ निवड फसली
अन् पांड्या कप्तान असताना शेवटचे आले तर पांड्या नी कुठे नेऊन ठेवला संघ...
यालाच आक्षेप होता...
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा संघ बलवान आणि समतोल होता हे मान्य नसेल तर ठीक. माझी काही हरकत नाही
पंड्याच्या निवडीबाबत जय शहा
पंड्याच्या निवडीबाबत जय शहा ने स्टेटमेंट दिलंय की फक्त आयपीएलचा परफॉर्मन्स नाही तर बाहेर खेळण्याचा अनुभव वगेरे विचारात घेऊन समितीने निवड केली आहे.
“माझी काही हरकत नाही” -
“माझी काही हरकत नाही” -
>>बाहेर खेळण्याचा अनुभव
>>बाहेर खेळण्याचा अनुभव
हाच क्रायटेरिया असेल तर जयस्वाल, सॅमसन, दुबे यांना असा कितीसा अनुभव आहे बाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा?
बाकी काही नाही; पांड्याला घेणे हा नाईलाज आहे कारण उपलब्ध पर्यायात दुसरा कुणी फास्ट बॉलिंग ऑलराउंडर इतक्यात चमकला नाहीये; असा एखादा ठोस पर्याय गेल्या वर्षात किंवा या आयपीएल मध्ये समोर आला असता तर पांड्याला सरळ बाहेर बसवला असता!!
उपकप्तान करण्यामागे काय नाईलाज असावा हे मात्र कळत नाहिये!!
आयपीएलमध्ये कॅज्युअल ॲप्रोच
आयपीएलमध्ये कॅज्युअल ॲप्रोच बाळगून फलंदाजी करणारा आणि यंदा फॉर्ममध्ये नसणारा रोहीत शर्मा या सीजनला मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला आहे
सिंहाचा घसा बसला असला तरी मांजरीपेक्षा मोठ्याने गुरगुरतो.
- एक जपानी म्हण
४६ चेंडूमध्ये ९८ पाहिजेल CSK
४६ चेंडूमध्ये ९८ पाहिजेल CSK ला प्लेऑफ साठी..... रचिन रविंद्र सेट आहे!!
करतील का??
बंगलोर आत चेन्नई बाहेर
बंगलोर आत
चेन्नई बाहेर
वा वा ! हॅपी फॉर आरसीबी.
वा वा ! हॅपी फॉर आरसीबी.
ग्रेटेस्ट फिनिशरांना फिनीश करता आलं नाही वाटतं??
ग्रेटेस्ट फिनिशरांना फिनीश
ग्रेटेस्ट फिनिशरांना फिनीश करता आलं नाही वाटतं??
>>
,जो जीता वोही सिकंदर स्टाईल टॉप गिअर एकदम शेवटी टाकला, पण सस्टेन नाही करता आला.
२ ओव्हर आधी गिअर चेंज करायला हवे होते...
आता अजून एका सीझन ची निश्चींती झाली
ग्रेटेस्ट फिनिशरांना फिनीश
ग्रेटेस्ट फिनिशरांना फिनीश करता आलं नाही वाटतं??
>>>>>
अशाच कॉमेंटच्या प्रतीक्षेत होतो
Fact सर्वाँना ठाउक आहे. ज्याला मान्य करायचा आहे तो करणार. ज्याला मान्य करायचे नाही तो नाहीच करणारा. त्यामुळे न बोलणेच उत्तम
बाकी मजा आली!
शेवटच्या ओवरच्या पहिल्या बॉलला धोनीने जो चेंडू बेंगलोरच्या बाहेर पोहोचवला तो बघून कोहलीचा जसा चेहरा झाला होता ते बघून वाईट वाटले. कारण तो आज बाल वन पासून अगदी जिद्दीने प्रयत्न करत होता. मग ती फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण. शेवटी त्याचा आनंद बघून चेन्नई बाहेर गेल्याचे दुःख वाटले नाही.
सहा सामने सलग हरल्यानंतर सहा सामने सलग जिंकले. हॅट्स ऑफ!!
आता इथून बेंगलोर आणि कोहली आयपीएल जिंकावे म्हणजे यादगार होईल. ऑरेंज कॅप सुद्धा आता कोहलीची फिक्स झाली. पण तिला ट्रॉफी शिवाय मजा नाहीच.
मस्त मॅच झाली. मला ना
मस्त मॅच झाली. मला ना आरसीबीमधे इंटरेस्ट आहे ना सीएसके मधे. पण सीएसके नॉक आउट झालेले बघायला मजा आली
धोनीला पूर्ण सीझन आयटेम साँग सारखे वापरले त्यांनी. आज तो आला तेव्हा मला वर्ल्ड कप २०११ मधल्या त्याच्या ९१ ची आठवण झाली. तो व जडेजा होते म्हंटल्यावर नक्कीच चान्स होता. But sport is very brutal, especially to aging guys
आरसीबी कधीच आवडते नव्हते पण एखाद्या वेळेस कोहली, फाफ, दिनेश कार्तिक ई लोक जिंकलेले चालतील.
खरं आहे, सीएसके नॉक आउट
खरं आहे, सीएसके नॉक आउट झालेले बघायला मजा आली.
जबरदस्त झाली मॅच. थरारक!!
जबरदस्त झाली मॅच. थरारक!! पावसानंतर बॉल कसला ल्हतरनाक वळत होता! मागच्या वर्षी एका ओव्हरनंतर (रिंकू सिंग च्या पाच सिक्सेस) व्हिलन ठरलेल्या यश दयालने आज शेवटच्या ओव्हरमधे आरसीबीला क्वालिफाय करून आणि मॅच जिंकवून द्यावी हा काव्यात्मक न्याय होता.
शिवम दुबेचा आजचा सीन समजला
शिवम दुबेचा आजचा सीन समजला नाही.
सीझनभर गोल्डन फॉर्म मध्ये होता. हवे तेव्हा मोठे फटके मारत होता.
पण आज मात्र चांगल्या चालू असलेल्या सामन्याचे मोमेंटम काढून घेतले. ते सुद्धा इतके वाईट की पंधरा बॉल मध्ये फक्त 7 केले. त्यात सुद्धा जवळपास दोनदा आऊट झाला. कारण एक कॅच सुटली. हे सुद्धा काय कमी म्हणून सेट बॅट्समन राचिन रवींद्रला रन आउट सुद्धा केले...
शिवम दुबेचा आजचा सीन समजला
शिवम दुबेचा आजचा सीन समजला नाही.
सीझनभर गोल्डन फॉर्म मध्ये होता. हवे तेव्हा मोठे फटके मारत होता.
पण आज मात्र चांगल्या चालू असलेल्या सामन्याचे मोमेंटम काढून घेतले. ते सुद्धा इतके वाईट की पंधरा बॉल मध्ये फक्त 7 केले. त्यात सुद्धा जवळपास दोनदा आऊट झाला. कारण एक कॅच सुटली. हे सुद्धा काय कमी म्हणून सेट बॅट्समन राचिन रवींद्रला रन आउट सुद्धा केले...
आता सीएसकेचा सीझन संपल्यावर
आता सीएसकेचा सीझन संपल्यावर हे लिहितो. एखाद्या रणांगणावर असामान्य पराक्रम गाजवून निवृत्त झालेल्या वॉर हीरोला नंतर गावातल्या जत्रेत लोकांच्या मनोरंजनासाठी चार तलवारबाजीचे लुटूपुटूचे हात करायला लावल्यासारखं धोनीला शेवटच्या ४-५ बॉल्स साठी बॅटिंगला उतरवून मॅचच्या निकालावर काहीही परिणाम न होता, त्याच्याकडून चौकार, षटकार मारून घेतले हे मला खूप अपमानास्पद वाटलं. पैसा, ब्रँड व्हॅल्यू पायी आपण आपल्याच एका लिजंडचा अपमान करतोय हे ऑर्गनायझर्स च्या आणि आपल्या मनोरंजनापायी आपण ह्यात मजा शोधतोय हे फॅन्सच्या सुद्धा लक्षात आलं नाही. मुंबईने जसं सचिनला त्यांच्या सेट-अपमधे सामावून घेतलं तसं काहीसं चेन्नई करू शकले असते. आपल्याला आपल्या लिजंड्सवर प्रेम जरी करता येत असलं तरी त्यांचा यथोचित मान ठेवता येतो का?
फेफ टोटली सहमत. आयटेम साँग
फेफ टोटली सहमत. आयटेम साँग म्हंटलो ते त्याकरताच. धोनीची २०११ ची कामगिरी इतकी मोठी आहे की त्याला असल्या पुचाट आयपीएलमधल्या तलायवागिरीची काही गरज नाही. दीवारचा व्यक्तिमत्त्वाने स्क्रीन व आवाजाने थिएटर व्यापणारा अमिताभ नंतर एखाद्या भोजपुरी पिक्चरमधल्या हीरोसारखा लाल बादशाह मधे नाचताना पाहावा तसे वाटते.
यश दयालने आज शेवटच्या ओव्हरमधे आरसीबीला क्वालिफाय करून आणि मॅच जिंकवून द्यावी हा काव्यात्मक न्याय होता. >>> हो खरे आहे. कॉमेण्टेटर्स काहीतरी म्हणत होते तेव्हा मला कळाले. मला इतके लक्षात नव्हते.
रहाणे ला King of under-performance म्हणायला हवे. आज अजून २०-३० रन्स केल्या असत्या जर फरक पडला असता. त्याची विकेट फर्ग्युसनने काढली असली तरी ते प्रेशर आधीच्या ओव्हरमधे रन्स न निघाल्याने आलेले होते. रचिन रवीन्द्र मस्त खेळत होता.
Pages