आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धोनी फक्त फलंदाज नाहीये
तो कप्तान आहे.. सीएसकेचा ब्रेन आहे..
आणि आजही त्याची कीपिंग पाहिली का.. काटा किर्र आहे. तिथे त्याचे वय जणू गोठले आहे.. आज देखील स्पेशली पावसानंतर तीन-चार ओवर स्पिनरच्या त्याने आपली कला पेश केली.

बाकी धोनीची जी क्रेझ आहे ती कॅश केली जात आहे ते त्याचा पुरेपूर सन्मान ठेऊनच. म्हणून त्याचे चाहते खुशच आहेत Happy

भारतीय क्रिकेटमध्ये जो पैसा यायला सुरुवात झाली आहे ते सुद्धा सचिन या नावाचे ब्रॅण्डिंग करूनच.. गोड ऑफ क्रिकेट!

आजच्या तारखेला आयपीएलचा सचिन.. किंवा गोड ऑफ आयपीएल हा धोनी आहे.

बाकी सन्मान कुणाचा ठेवला गेला नाही तर तो रोहित शर्माचा.
आणि त्याचे परिणाम ही आपण बघतच आहोत.

राहुलला जशी वागणूक मिळाली त्याचाही निषेध करतो इथे.

या दोन्ही फ्रॅंचाईजी मालकांनी आपल्या लिजंडचा सन्मान कसा करावा हे चेन्नई कडून शिकावे.

आजच्या तारखेला सीएसकेचा फॅन बेस सर्वात मोठा आहे. याचे कारण धोनी आहे. आणि हे ते सुद्धा जाणतात.

धोनीचा क्रिकेटिंग सेन्स कमी झाला आहे. नाहीतर इतकी मोठी सिक्स मारून ओला बॉल स्टेडियमबाहेर घालवला नसता. Proud नवीन कोरडा बॉल आला आणि आरसीबी बॉलर्सना चान्स मिळाला.

कालची match मस्त झाली
धोनीचा स्टेडियम छतावर गेलेला सिक्स आबाबा होता.
रहाणे आणि रचीन्द्र खेळताना आरामात कवालिफाय होणार चेन्नई असे वाटत होते. जडेजाने देखील गणित सोप्पे करण्याचा चांगला प्रयत्न केला.
RCB साठी चांगले वाटले. त्यांची बॉलिंग खतरनाक नाही वाटत. Batting जास्त वर भरोसा वाटले.

पूर्ण पोस्ट वाचा. त्यांनी तो जोक केला होता.
तसेही हे वाक्य जोक म्हणूनच शोभते हे आपण सर्वच जाणतो Happy

अभिषेक शर्माच्या धडाकेबाज फलंदाजी मुळे हैदराबादचा विजय. दुसऱ्या क्रमांकावर आले. आता राजस्थान हरले किंवा पावसामुळे जिंकू शकले नाही तर त्यांचा आणि बेंगलोरचा सामना होईल. दोन चोकर आमने सामने. मजा येईल बघायला. तरी त्यात बेंगलोर फेवरेट असेल..

हैदराबाद वि कलकत्ता = कलकत्ता
राजस्थान वि बेंगलोर = बेंगलोर
हैदराबाद वि बेंगलोर = बेंगलोर

असे होण्याची शक्यता आहे आणि झाल्यास,
फायनल कलकत्ता वि बेंगलोर बघायला मजा येईल !

शर्मा धोनी कप्तान नसल्याने यावेळी नवीन पोरांना, नवीन संघांना ट्रॉफी जिंकायची संधी आहे.
ती सोडू नये.. कारण सांगता येत नाही,
कदाचित पुढच्या सीजनला धोनी चेन्नईचा आणि शर्मा (मुंबईचा किंवा आणखी दुसर्‍या कुठल्या तरी संघाचा) कर्णधार असेल.

आरसीबीने मस्त मोमेंटम पकडलाय आणि त्याचवेळी आरआरची बेक्कार घसरगुंडी झालीय!!
परवाची मॅच शॉर्टर व्हर्जन का होईना पण व्हायला पाहिजेल होती!!
बटलर गेलाय, जयस्वाल खुप कॅज्युअली आउट होतोय, पराग स्थिरावल्यानंतर नेमक्या क्षणी आउट होतोय, ज्युरेल सपशेल अपयशी, पॉवेलला गेल्या काही मॅच मारायलाच जमत नाहिये, हॅटमायर इंज्युअर्ड होऊन बसलाय, एकटा सॅमसन या सगळ्यात कुठेकुठे पुरेसा पडणार? अश्विनला विकेट्स मिळत नाहियेत, चहल जीव तोडून बॉलिंग करतोय पण त्याच्या विकेट्सही आटल्यात, बोल्टला पहील्या ओव्हरला विकेट्स नाही पडल्या तर नंतर त्याचा इतका प्रभाव पडत नाही, संदीप शर्मा आणि आवेश यांचा आवेश ओसरलाय..... कशी काय जिंकायची आमची आरआर? Uhoh
पुढच्या तीन्ही मॅचेस सगळ्यंनी आपापला खेळ कमालीचा उंचावला तर काहीतरी होऊ शकते!!

ज्युरेलला ओपनिंगला खेळवणे आणि अश्विनअण्णाना पुन्हा एकदा जबरदस्ती पिंचहिटर बनवणे हाच पर्याय पुन्हा चाचपून बघायला हरकत नाही कारण त्यांच्या बेंचवरचे बॅट्समन पुरते अपयशी ठरलेत!!

पाहिला अंदाज बरोबर Happy

1. हैदराबाद वि कलकत्ता = कलकत्ता ✓
2. राजस्थान वि बेंगलोर = बेंगलोर
3. हैदराबाद वि बेंगलोर = बेंगलोर

“ आरसीबीने मस्त मोमेंटम पकडलाय आणि त्याचवेळी आरआरची बेक्कार घसरगुंडी झालीय!!” - मोमेंटमच्या आधारावर उद्याची मॅच आरसीबी जिंकावी. पण क्रिकेट फनी गेम आहे. कदाचित आरसीबीने सगळी एनर्जी सीएसकेच्या मॅचमधे खर्ची घातली असेल तर त्यांच्यासाठी उद्याची मॅच अँटीक्लायमेटीक पण ठरू शकते. अर्थात राजस्थानच्या जिंकू शकणार्या मॅचेस हारून दाखवण्याच्या स्किलला अंडरएस्टीमेट करून चालणार नाही.

>>अर्थात राजस्थानच्या जिंकू शकणार्या मॅचेस हारून दाखवण्याच्या स्किलला अंडरएस्टीमेट करून चालणार नाही.
अगदीच!!
गेल्या चार पाच मॅचेस ज्याप्रकारे खेळलेत ते; ते बघता त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही!!
तरीही उम्मीद की एक छोटीसी किरनपे आयपीएलमे इंटरेस्ट कायम है Happy

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे..
परवा चेन्नई बाहेर गेलीच ना..

पण तरी यावेळी चेन्नई नेहमीची वाटत नव्हतीच

बहुधा धोनी संघात असताना दुसरा कर्णधार नेमला की त्याने गोंधळ वाढत असावा..

“तरीही उम्मीद की एक छोटीसी किरनपे आयपीएलमे इंटरेस्ट कायम है ” - Lol म्हणूनच तर इतकी वर्षं डबल आर्सना सपोर्ट करतोय.

संजू सॅमसनने बाद झाल्यावर चिडून बॅट आदळली मैदानावर..
सचिनचा आदर्श ठेवा रे..
बॅट आपटून राग काढणे.. किंवा स्टम्प लाथेने उडवणे हे कधीच आवडले नाही.
मी क्रिकेट खेळताना कधी हातातून सटकून पडली तरी तिच्या पाया पडून उचलतो..

आर सी बी बाहेर...
हरवा अजून चेन्नईला...

आर सी बी आयपीएल जिंकली तर त्यांची इमेज डाऊन होईल आणि त्यांची क्रेझ कमी होईल..
कितीही हरले तरी आम्ही कट्टर आरसीबी फॅन असा जो त्यांचा फॅन बेस आहे तो जाईल..

क्लासिक केस ऑफ लॉ ऑफ एव्हरेजेस
सलग सामने जिंकल्यावर आर सी बी हरायला अन् सलग सामने हरल्यावर आर आर जिंकायला ड्यू होते... तसे झाले...

आजची मॅच चांगली झाली. कालच्यासारखी एकतर्फी नाही झाली. १८व्या ओव्हरमधे सिराजच्या २ विकेट्स नी मॅचमधे परत रंगत आणली होती. पण पॉवेलने डोकं शांत ठेवत राजस्थानसाठी मॅच जिंकून दिली. अजून १०-१५ रन्स आरसीबीने केल्या असत्या तर जास्त चुरशीची मॅच झाली असती.
पहिल्या हाफमधे ७ मॅचेस हारल्यावर आरसीबीने मारलेली धडक कौतुकास्पद होती. सीएसकेविरूद्ध तर त्यांनी त्यांचा खेळ कमालीचा उंचावला होता. स्पेअर अ थॉट फॉर कोहली.

कालच्या तुलनेने सोप्या मॅचमध्ये पण आरआर ने जीव टांगणीला लावलेला!!
संजूने काय विचार करुन इतक्या लवकर स्टेपआउट केले त्याचे त्यालाच माहित..... जयस्वाल, पराग पण असेच सेट झाल्यावर विकेट फेकते झाले!!
गुडलक चार्म हॅटी परत आला आणि मोक्याच्या वेळी खेळला त्यामुळे मॅच आवाक्यात आली तरीही तो आउट झाल्यावर पॉवेलची एकूण देहबोली बघता अज्जिबात कॉन्फिडन्स वाटत नव्हता..... त्या दोन फोर बसल्या म्हणून प्रेशर जरा रिलिज झाले!!
लॉकी फर्ग्युसन, नॉर्किया, उनाडकट, जॉर्डन, वरुण ॲरॉन, दिंडा वगैरे मंडळी डेथ ओव्हर मध्ये बॉलिंगला आली की समोरच्या संघाला जिंकायचा पुरेपूर स्कोप असतो Wink
त्यातून काही अगदी सोप्पे कॅच सुटले
ती उणीव भरुन काढायला थर्ड अंपायर जरा जास्तच आतूर दिसले; नशिबाने सामन्याच्या निकालावर त्याचा काही परिणाम झाला नाही म्हणून नाहीतर लैच शिव्या पडल्या असत्या थर्ड अंपायरला Proud

असो!! आता कोहली, धोनी, रोहित कुणीकुणी नाहिये राहिलेल्या टीमम्समध्ये त्यामुळे काही लोकांसाठी ही आयपीएल बेचव झाली असेल!!

आपल्या आरआरला मात्र खेळ अजुन उंचावावा लागेल.... हैद्राबाद तसा सोप्पा पेपर नाहिये!!

"एकूण देहबोली बघता अज्जिबात कॉन्फिडन्स वाटत नव्हता" - काल राजस्थान जिंकण्यापेक्षा, 'हरायला नको' भावनेनं खेळत असल्यासारखे वाटले. जैस्वाल च्या डिहायड्रेशन नंतर आटलेल्या रन्सचं प्रेशर संजूवर आल्यासारखं वाटलं. अश्विन ने नंतर कॉन्फिडन्सचा मुद्दा मांडलाय. संजूच्या म्हणण्याप्रमाणे टीममधे बर्याच जणांना काहीतरी इन्फेक्शन झालंय, आणि सततच्या प्रवासामुळे रिकव्हरीला वेळ मिळत नाहीये. होपफुली ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून ते हैद्राबादविरूद्ध मैदानात उतरतील.

दिल्ली प्लेऑफ मधे गेल्या खेपेला श्रेयस अय्यर कॅप्टन असताना गेले होते. तरीही ओनर्स नी त्याला डावलून पंत ला कॅप्टन बनवलं (तेंव्हा कुणी रडारड केली असल्याचं स्मरत नाही. दिल्ली हरावी अशी कुणाची इच्छा असल्याचं वगैरे ही आठवत नाही).
यंदा बीसीसीआय नी त्याच्याशी करार पण केला नाही.
आणि आता तोच कोलकाता ला फायनल पर्यंत घेऊन गेलाय. समतोल संघ, गंभीर चं मार्गदर्शन वगैरे अनेक गोष्टी आहेत. पण काव्यात्मक न्यायानी त्यानी ट्रॉफी उचलली तर आश्चर्य वाटायला नको.

मुंबई बाहेर गेली आणि रोहीत रोहीत नावाचा गजर थांबला. पण. या धाग्यावर अजून रोहीत रोहीतचा गजर थांबायचे नाव घेत नाहीये Happy

श्रेयस एका सीझनला नसल्याने पंतला कर्णधार केलेले. श्रेयसला डावलून केले नव्हते.

त्या नंतर पंतला कायम ठेवले गेले. कारण पंतने जे भारतासाठी खेळताना केले त्याने त्याची ब्रँड व्हॅल्यू कमालीची वाढली. आणि आयपीएल साठी ब्रँड व्हॅल्यू सुद्धा महत्त्वाची आहे.

पण नुसते तेच नाही तर खेळ आणि उपयुक्तता म्हटली तरी पंत हा अव्वल फलंदाज विकेट कीपर आहे. त्याला गमावून बिलकुल चालणार नव्हते. त्यामुळे दिल्लीने त्याला सर्वाधिक पैसे देऊन रिटेन करणे स्वाभाविक होते.

आजही येत्या 20-20 वर्ल्डकप संघात पंत आहे. अय्यर नाही.
शर्मा म्हणाल तर त्या संघाचा कर्णधार आहे.

Pages