आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भारतीय क्रिकेट प्रेमींचे एक चांगले आहे.. जास्त सन्मान ते त्यांनाच देतात जे देशासाठी चांगले खेळतात. जे आयपीएल मध्येच चमकतात आणि देशासाठी खेळताना गळपटतात अशांची इतकी क्रेझ दिसून येत नाही. पण याउलट कोणी आयपीएल मध्ये पाट्या टाकत का असेना लोकांना ते चालते. पण देशासाठी खेळताना जो चांगली कामगिरी करतो त्याला बघायला गर्दी असते. आणि हा तर भारताचा कप्तान आहे. गेल्या दशकातील कोहलीच्या जोडीने एक लिजेंड खेळाडू आहे. त्यामुळेच आजही अकरा सामने झाले तरी रोहीत रोहीत चे नारे चालूच आहेत..

“ भारतीय क्रिकेट प्रेमींचे एक चांगले आहे.. जास्त सन्मान ते त्यांनाच देतात जे देशासाठी चांगले खेळतात. जे आयपीएल मध्येच चमकतात आणि देशासाठी खेळताना गळपटतात अशांची इतकी क्रेझ दिसून येत नाही. पण याउलट कोणी आयपीएल मध्ये पाट्या टाकत का असेना लोकांना ते चालते. ”

डिस्क्लेमर: हे फक्त कॉमेंटकर्त्याच्या लाडक्या खेळाडूंच्या बाबतीत लागू आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या हा ह्या नियमाला अपवाद धरावा Rofl

गेल्य्या दोन मॅचेसमध्ये राजस्थान जरा जास्तच निवांत खेळले... अश्याने त्यांच्या टॉप टू मधला स्पॉट धोक्यात यायचा!!
पॉवेल अगदीच गंडलेला आहे..... त्यांची लोअर ऑर्डर फारशी टेस्ट झालेली नाहिये...... चहल कधी नव्हे ते गेल्या दोन मॅचेसमध्ये ऑफ कलर वाटतोय!!
पराग आणि जयस्वाल वारंवार बेफिकीर फटके मारुन आऊट होतायत..... अवघड होईल अश्याने!!

“ गेल्य्या दोन मॅचेसमध्ये राजस्थान जरा जास्तच निवांत खेळले” - राजस्थान ओळखीच्या मुक्कामावर पोहोचले आहेत का रे? क्वालिफिकेशनच्या उंबरठ्यावर येऊन अडखळण्याच्या - यहीं वह जगह हैं पाशी??

मला वाटतं की जयस्वाल चा डावरेपणा सोडला तर फॉर्म बेसिस आत्ता तरी कोहली त्याच्यापेक्षा बेटर ओपनर वाटतो.

त्यामुळे रो-को नी ओपन करावं, तीन नंबर ला संजू असावा, त्या नंतर सूर्या, पांड्या / पंत / दुबे पैकी दोघं, जाडेजा, अक्षर / चहल, कुलदीप, अर्षदीप / सिराज, बुमरा

पहिल्या सामन्यात तरी मी प्युअर करंट फॉर्म बेसिस पंत (कीपर), दुबे, चहल अन् अर्षदीप प्रेफर करीन.

आयपीएलमध्ये त्याचा फोकस कप्तानीवर असतो. >> अच्छा ! मला आपले असे वाटत होते कि बॅटस्मन म्हणून त्याला आधी ट्रेड करून मुंबई ने घेतले होते नि मग काही वर्षांनी कप्तान केले वगैरे. पण त्यांचा तर लाँग टर्म प्लॅन होता कि हा कप्तानीवर फोकस करणार नि बॅटींग कॅजुअली घेणार तेंव्हा त्याला आपण नंतर कप्तान करण्यासाठीच घेऊ. कसली दूरदृष्टि आहे राव ! पांड्याबाबत पण असाच विचार केला असेल का रे ? Lol

हो आणी मग बॅटींग कॅजुअलीच घेणार असेल तर (आता कप्तानही नाही) म्हणून बाहेर बसवला तर त्याचे "फॅन" अनादर वगैरे बोंबलत परत धुमाकूळ घालतील तर त्यांचे समर्थन नाही करणार ना ?

आले! म्हणून तर कर्णधारपद काढून घेतले. >> असे सरळ उत्तर काय देता ? नेहमी टँजंट टाकायचा. म्हणजे रोहित नॉन स्टॉप खेळतोन, त्याने अ‍ॅप्रोअच चेंज केला, भारतीय कप्तानपद हा भार आहेच. परत निष्कारण त्याला पांड्या वादात खेचले त्याच्या बिनडोक फॅन्स नी, त्यामूळे ब्रेक न मिळालेला खेळाडू फेल जाऊ शकतो काही सामन्यांमधे वगैरे साध्या सरळ स्पष्टीकरणांपेक्षा अशा पिंका मारत जायच्या हो

यहीं वह जगह हैं पाशी > जास्तीच गझला ऐकतोयस वाटते आजकल फेफ Wink बाद फेरीमधे राजस्थान निवांत खेळण्यापेक्षा आता खेळले तर बरे आहे रे.

6 ovr 107/0
Abhishek 46(18, 6x4, 3x6)
Head 58(18, 7x4, 5x6)

बाब्बो

अशक्य धुतलं आहे राव.
मला वाटतंय की जयस्वाल राहूदे आणि त्या अभिषेक ला घेवून जावे.

काहीही प्रकार होता. मात्र अभिशेक ला स्पिन खेळताना बघणे हे प्युरिस्ट ड्रीम आहे राव. काय ते फूटवर्क नि बॉल रीड करून टप्प्यावर जाणे. !

“ जास्तीच गझला ऐकतोयस वाटते आजकल” - Lol जिथे गद्याची ताकद संपते तिथे पद्य सुरू होतं. आजची हैद्राबादची बॅटिंग एखाद्या पोवाड्यापेक्षा कमी नव्हती. १० ओव्हर्समधे १६०?? ही आयपीएल संपेपर्यंत ३०० पार होईल बहुदा.

हेच तर एक शर्माचे मला नेहमीच आवडत आले आहे. त्याला माहीत आहे की कुठे किती जीव जाळायचा Happy

आणि गंमत बघा..

पण तरीही...

आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणार्यांच्या यादीत तो क्रिस गेल नंतर दुसरया क्रमांकावर आहे. भारतीयांमध्ये पहिला आहे. Happy

आणि

सर्वाधिक सामनावीर मिळवणाऱ्यामध्ये एबीडी आणि गेलं नंतर तिसरा आहे. भारतीयांमध्ये पहिला आहे. Happy

...

मुंबई इंडियन मॅनेजमेंट आपल्या कर्माची फळे भोगत आहे Happy

आले टँजंट आले. वरच्या विधानांमधून कप्तानीवर लक्ष देतो नि बॅटींग वर नाही वगैरे जस्टीफाय कसे होतात हे त्या एक रोहित शर्मालाच माहित असावे बहुधा Lol

छे हो.. काही सिद्ध किंवा जस्टेफाय करायचे नव्हते. शर्माचे पराक्रम मांडायची संधी घेतली. माझा छंद आहे तो. आणि ते एवढे आहेत की रोज नवीन मांडू शकतो Happy

बाकी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या कर्णधाराला त्याची कप्तानी सिद्ध करायची गरज खरेच आहे का Happy

तूच सांग लेका ! "आयपीएलमध्ये त्याचा फोकस कप्तानीवर असतो." नि :पण तो नेहमीच आयपीएल कॅज्युअल घेतो:: हे तूच म्हणाला आहेस. Lol

रजत पाटीदार ने या सीजन 19-21-21 चेंडूत तीन वेगवान अर्धशतक मारले.
घेऊन चला मग आता यालाही वर्ल्डकपला.
कसोटी सिरीज मध्ये काय खेळत होता त्यालाच पत्ता नव्हता.

आयपीएलमध्ये त्याचा फोकस कप्तानीवर असतो." नि :पण तो नेहमीच आयपीएल कॅज्युअल घेतो
>>>>

हो. तसेच आहे ते. फलंदाजीत जीव जाळत नाही तो आयपीएलमध्ये फार. पण तरीही आपली व्हॅल्यू टिकवून आहे तो याचे कारण म्हणजे कप्तानीत झेंडे रोवतो. एक लीडर आहे तो. सारेच कप्तान लीडर नसतात. आयपीएल मध्ये इकडचे तिकडचे गोळा केलेले खेळाडू असताना हा गुण सर्वात महत्त्वाचा ठरतो. आजच्या घडीला ज्या दोन खेळाडूंमध्ये हा गुण ठासून भरला आहे त्यांच्याकडेच पाच पाच आयपीएल ट्रॉफी असणे यात आश्चर्य नाही.

मला अजूनही हसायला येते की हे मुंबई मॅनेजमेंट ला कसे कळले नाही. की निव्वळ राजकारण, पक्षपात आणि आपण मालक आहोत तर मनमानीच करायची होती.

त्यादिवशी कोणीतरी म्हटले होते की पुण्याच्या संघातून खेळताना धोनीने कप्तान म्हणून इतके खराब परफॉर्म का केले.. याचे कारण सुद्धा यातच लपले आहे. तो लीडर या भूमिका शिरलाच नव्हता. एक तर त्याला दोन वर्षे घेऊन परत चेन्नईची सूत्रे सांभाळायची होती. दुसरे म्हणजे पुण्याचा संघमालक. संजीव गोएंका. काय बोलावे या माणसाबद्दल. काहीच नाही बोलत उगाच इथल्या लोकांच्या भावना दुखवायच्या. आता लखनऊचा तोच मालक आहे. मागच्या सामन्यात हरल्यानंतर राहुलला मैदानावरच ओरडत होता. समालोचकाना सुद्धा ते आवडले नाही. बातमी आणि विडीओ पाहिला असेलच.

असो, या पार्श्वभूमीवर रोहीत विरुद्ध मुंबई मॅनेजमेंट वादात क्रिकेटप्रेमी आपल्या हिटमॅन सोबत आहेत याचा पुन्हा एकदा आनंद होत आहे !

क्रिकेटप्रेमी आपल्या हिटमॅन सोबत आहेत >> क्रिकेटप्रेमी नाही अतीरोहितप्रेमी म्हण.

पुढचे मेगा ऑक्शन इंटरेस्टींग असेल नक्कीच.

फलंदाजीत जीव जाळत नाही तो आयपीएलमध्ये फार : एक लीडर आहे तो
>>
आता कळलं की मुंबईचे बॅटर लोक जेंव्हा बॅटिंग सिरीयसली घेत नाहीत तेंव्हा ते लीडर ला फॉलो करत असतात...

मग पांड्या नी पण सुरुवातीचे काही सामने सीरियसली बॅटिंग केली नव्हती तेंव्हा तुला त्याचा का राग आला?? तो तर लीडर च्या स्टेप्स फॉलो करत होता ना??

क्रिकेटप्रेमी नाही अतीरोहितप्रेमी म्हण.
>>>>

रोहित प्रेमी इतके आहेत माहित नव्हते Happy
अरेरे.. मग तर मुंबई मॅनेजमेंट ची अती कीव येते y..
त्यांना रोहितची लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यू कळलीच नाही म्हणावे..

मग पांड्या नी पण सुरुवातीचे काही सामने सीरियसली बॅटिंग केली नव्हती तेंव्हा तुला त्याचा का राग आला??
>>>>>

पांड्या नाही खेळला आणि मुंबई हरली तर त्याचा मला का राग येईल Lol
तुम्हाला आनंद म्हणायचे आहे का Lol

असे खरेच करत असतील का?

करत असतील तर कोणाच्या आदेशाने?

आणि तो आदेश पाळत यात सारे सामील असतील का?

आणि का? यात कोणाचा काय फायदा?

की फक्त धोनीवर जळणाऱ्यांनी ही पोस्ट बनवली आणि वायरल केली आहे?

पण आता कोणालाही हे प्रश्न पडणार नाही
कारण यात धोनीला टारगेट केले आहे Happy

#नावडतीचे_मीठ_अळणी

Pages