न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये यहा जात नै निकालनेका क्या?. Happy
बाकी शिंडे तुझी आयडीया छान आहे लहान मुलांसाठी.
लहान मुलाना एखाद्या प्राण्याचा कॉस्चुम घालुन आणा. ते खुप एंजॉय करतील. Happy
आणि कोण 'कोण' होणार आहे ते इथे लिहा. म्हणजे उगाच सगळेच लायन किंवा सगळेच टायगर नको व्हायला.

मोठ्या माणसांनी पण प्राण्यांचे वेश घेऊन यायचे का? का हॅलोविनला घालतात तसे वेगळे वेगळे, भयानक दिसणारे, कपडे घालून यायचे? अर्थात, मी आहे तसाच आलो तरी भयानक, विदूषकासारखा, प्राण्यासारखा, कसाहि दिसतोच.

हा बायकोचा डायलॉग तुम्ही बरा टाकला भाई. इतक्या वर्षांनंतर पण इतका विचार करता बायकोचा म्हणजे कौतुकास्पद आहे, नाही का?

गॉगल पेक्षा लेन्स लावा लाल Proud

आत्ताच नेटफ्लिक्सातुन हॅरी पुत्तर आणि अर्धरक्ती राजकुमार आल्ये. उद्या बघते निवांत.

मी माझ्या मामाला नाशकात मिशन राजमलाईसाठी ऑर्डर दिली आहे. बिचारा माझा मामा त्यासाठी आता कुठेकुठे भटकणार देव जाणे.
फचिनमामाशी संपर्क झाला तर बघतो. झाल्यास एवेएठीला राजमलाई खायला मिळेल.

वा वा.. राजमलाई.. सही रे..
०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मृण्मयी - गाळा
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०९)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे)
१०)सायो- १ - मसालेभात आणि भाजी.
११)चमन - राजमलाई
१२)रूनी पॉटर - २ मोठे (ग्लु वाईन)
१३) विकु
१४) स्वाती

मिलिंदा, बाराएवेएठीबाफावर उ. आणि पां. लिहू नये. (हुकुमावरून!) Proud

मी भारतात त्या सुमारास जाणार असले तर येईन असं आधी म्हंटलं होतं. जानेवारीत जाणं होणार नाही, त्यामुळे येऊ शकत नाही.

(कोण म्हणतंय तिकडे, 'नाही येत तर नको येऊस, स्वतःला इतकं महत्त्वाचं समजून न येण्याबद्दल पोस्टी टाकायची गरज नाही. आली नाहीस तर काही बिघडत नाही.') Proud

नमस्कार ,
मी डेलावेअरला रहाते. मला या ए. वे. ए. ठी. ला यायला व सर्वांशी ओळख करुन घ्यायला आवडेल.

मी कालच मृ नी वैद्यबुवांना पुढच्या गटगच्या वेळी मुबलक प्रमाणात राजमलाई घेऊन यायचं/मागवायचं फर्मान सोडणार होते.

मायबोलीवर एवढ्या स्वाती असूनही (आत्तापर्यंत स्वाती आणि अर्चना यानी जवळपास सेंचूरी मारलीय. ) तुम्हाला आयडी मिळाला. अभिनंदन. तुम्ही मायबोलीकर आहातच तेव्हा याच. (तुम्हाला सगळे नग आणि मी भेटेनच...) Lol

>>>मी कालच मृ नी वौद्यबुवांना पुढच्या गटगच्या वेळी मुबलक प्रमाणात राजमलाई घेऊन यायचं/मागवायचं फर्मान सोडणार होते.
अयायाया सायो, कशामुळे असं झालं? Proud
चमन आणणार आहे ना रा.म.? किती जणांकडून मागवणार? Happy

रुनी Happy
परदेसाई, हो नक्कीच भेटुयात आपण. मग तुम्हाला आयडीची गंमत पण सांगेन.

चला आता मला काय खाउ आणायचा याचा विचार केला पाहिजे.

Pages