न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्की, बोविश ऊर्फ चमन येण्याचं करणार आहे असं म्हणालाय.
श्री. अजय येणार असतील तर सगळ्या बाराकरां तर्फे आपण त्यांना प्लॅस्टिकचं घुबड, रंगीत टेप वगैरे देऊ.;)

अजय, आम्ही ह्या वेळी लिफ्ट देउ .. त्यामुळे येण्याच निश्चित कराव... Happy

झक्की, लालु तेव्हा देशात मज्जा करायला जाणार आहे. आणि विजय म्हणजे विकु असतिल तर ते येइन म्हणालेत.

अमृता, माझ्या 'तुझे उकडीचे मोदक नी माझी तशरिफ' ह्या पोस्टचा तू सोयीस्करपणे अनुल्लेखच केलास की ग. Wink

पब्लिक , आता या वरच्या लिस्ट मधल्या लोकांना गृहित धरून चेक पाठवलाय आजच. आता घोळ करू नका कसले.
आता मेनूच्या मागे लागा आता फक्त. Happy
भाजी पोळी /राइस वगैरे जेवणाचा मेनु ठेवायचाय की स्नॅक्स?

झक्की, मी आले तर येताना कागद घेऊन येते. पण माझे हायरिंगच ह्या रीलीजसाठी झालेय त्यामुळे सध्या तरी अवघड वाटतेय येण्याचे.

मी आले तरी द व अमृताच आणेल तेव्हा प्रश्नचिन्ह नको Happy

<<सोयीस्करपणे अनुल्लेखच >>
काळजी करू नका. उकडीच्या मोदकांची आठवण मी यापुढे प्रत्येक वेळी करत जाईन.

अहाहा! अमृताचे उकडीचे मोदक! आता वाट बघणे कठीण झाले आहे. कधी एकदा २३ जानेवारी उजाडेल असे झाले आहे.

माझं नक्की नाही. (त्या सुमारास भारतवारी व्हाया बारा झाली तर येईन.) मी येऊ शकले नाही तर माझ्या वाटणीचे हॉल भाड्याचे पैसे इतरांकडून वसूल कर मैत्रेयी. Proud
येण्याचं ठरलं तर माझ्या राहण्या आणि एअरपोर्टवरून नेण्याआणण्याची सोय पण शोधावी लागेल. Proud

झक्की.. आमंत्रणाबद्दल धन्यवाद Happy
येण्याचं जमेल असं आत्तातरी वाटत नाहीये.. कारण ह्याच महिन्यात २ ट्रिप्स प्लॅन्ड आहेत... पुढे न्यूयॉर्कला आलो तर मिनी गटग करू बारात नक्की.. अणि जमलं तर डिसीला नक्की यायचा प्रयत्न करू तिथे सगळे भेटतीलच...

अहो अमृता, असे नका करू. उकडीच्या मोदकांचा एव्हढा धसका बसला असेल तर नाही आणले तरी चालेल. मी आपले गंमतीत म्हंटले होते.

हे बरोबर नाही हां अमृता. लोकांना फर्माइशी आणि स्वत: मात्र उ मो च्या नावाने लगेच माघार Wink

मॄ ... त्यात काही मोठेसे नाही. उलट एक दिवस आधी आलीस तर भाजलेला हलवा तुला...
(आणि आता अमॄताची पा आ पण तुला).

अमॄता: कारण नंबर टाकत जा.. हिशोब ठेवायला सोईस्कर जाते... Happy

कारण अ‍ॅड कराव लागेल...

२७. इतके मोदक जमणार नाहीये.. फक्त सारण चालणार असेल तरच येइन Happy

ते कंसातल वाचलच नव्हत... मृ, तो डबा नंतर मला देशील न गडे?? Proud

अरेच्या ?! ओके मग . मगाशीच चेक ठेवून आले मेलबॉक्स मधे आणि मग इथे मेसेज टाकला. आता जाऊन घेऊन येते Happy कारण मला पुढचे १-२ आठवडे जास्त वेळ नाहिये फॉलो अप करायला आणि तेवढ्यात कुणाचे अजून कॅन्सल झाले तर काय करणार ?
गैरसमज नका करून घेऊ कुणी, पण आपलं नक्की नसेल तर उगीच पैसे अडकतील, डिपॉझिट नॉन रिफन्डेबल आहे.
ऐन वेळी फक्त साताठ टाळकी जमणार असतील तर खरंच हॉल घेण्यात काही अर्थ नाही.
परत एकदा, गैरसमज नको कृपया. हवे तर माझ्या घरी जमू , बास? Happy

विषय तो नाहीये अमृता. तुझ्या मोदकांचा आणि ते मोदक एवेवेठीला आणणार की नाही त्याची चर्चा सुरू आहे. ती चर्चा माझ्याकडे वळवू नये. Proud

मृ, तू येणार असशील गटगला, तर माझ्याकडे येऊ शकतेस. मै च्या हॉलपासून घर जवळ नाहीये पण नूवर्क एअरपोर्ट पासून जवळ आहे.

माझा प्रचंड गैरसमज झालाय आता.. Proud

अग मै.. मी येणारच आहे ग.. फक्त त्या दिवशी जर प्रचंड स्नो झाला तरच कॅन्सल होण्याची शक्यता आहे.

हे काय? चर्चा सुरू व्हायच्या आधीच कँसल? नाही नाही नाही चालणार.....

(हो म्हणतील त्यानी लगेच आपापले चेक मै ला पाठवायचे आहेत... आरक्षणासाठी)

Pages