डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जिथे राहणे आहे तो आजूबाजूचा परिसर जास्त झाडा झुडुपांमध्ये गुडूप असेल तर अनेक कीटक घरात आणि घराच्या आसपास (गॅलरी वगैरे) मुक्त वावरत असतात आणि त्यांना खायला मग पाळी पाळीने काही पाली येऊ शकतात. हीच गोष्ट कोळ्यांची. अश्या परिसरात बहुदा कोळ्यांची जाळी दर आठवड्यात काढावी लागतात. त्यामुळे पेस्ट कंट्रोल फार प्रभावी उपाय ठरत नसेल.

पेस्ट कंट्रोल ने फार फरक पडत नाही आमच्याकडे.आजूबाजूला जास्त झाडं आणि कंपोस्ट असल्याने.फक्त लपलेल्या पाली बाहेर येतात त्यांना मारावं लागतं.दर 2 वर्षात फ्युमिगेशन पण करतो.त्याने ढेकूण वगैरे ना फरक पडतो.

अरे हो, हा व्हिडीओ सापडला, मागे कार्यालयाच्या स्टेजवर साप फिरत होता तेव्हा काढलेला
डिस्कलेमर:
1. व्हिडिओ अर्थातच कंटाळवाणा आहे कारण त्यात 3 मिनिट एकच साप दिसतो आहे, फॉरवर्ड करून करून बघा.
2. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करू नका कारण त्यावर हा एकच व्हिडीओ आहे जो मायबोलीवर अपलोड व्हिडिओ बटन न सापडल्याने तिकडे टाकला आहे.
3. यात बरेच मनोरंजक संवाद होते, साप लिंबू खातो का, सापाचं नाव अजय आहे का वगैरे.आय होप मी ते संवाद काढलेला व्हिडीओ अपलोड केला असेल, चुकून मूळ संवाद असलेला अपलोड झाला असेल तर म्युट करून बघा Happy
4. अकाउंट माझाच आहे लिंकवर क्लिक करणे सुरक्षित आहे.
https://youtu.be/FtPufozBw6s?feature=shared
5. सापाला 'तिथेच थांब हां, पटकन कपाटातला सुपर झूम वाला कॅमेरा घेऊन येते' सांगून कळत नसल्याने साध्या मोबाईल ने फार चांगलं झूम नसलेला काढावा लागला.मागच्या वेळी एक एकदम हॅण्डसम सोनेरी 4 फूट धामण मस्त कुंपणावर होता आडवा, सुंदर फोटो आला असता.अगदी त्याचे डोळे गोल बाहुल्या आहेत का टोकदार बाहुल्या ते पण बघता आलं असतं.पण खिडकी बंद करण्याच्या माझ्या वात्रट मोहाने ही संधी वाया घालवली.साप अँड ऑपोर्च्युनिटीज डझ नॉट वेट फॉर यु.

साप अँड ऑपोर्च्युनिटीज डझ नॉट वेट फॉर यु.>>>> स्टेटमेंट ऑफ द इयर…

चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करू नका >>> असं सांगणारी पहिलीच व्यक्ती म्हणून लकडी पुलावर/राजीव गांधी पुलाखाली चौकात अनुचा जाहिर सत्कार करावा कइ?

बाकी १.५ स्पीडने व्हिडीओ पाहिल्यामुळे साप फारच चपळ वाटला.

पण पाल येऊ नये म्हणून नाही का यामागे एका धाग्यावर चर्चा झालेली !! तो मंत्र लिहायचा असतो (म्हणजे भिंतीवर.. दारावर असं नाहीतर तू पालीवर लिहायला बघशील
mi _anu )
कांची नरेश राजा की काहीतरी

किती ठिकाणी लिहायचा कांची नारदराजा?आणि अंजू च्या घरी तो फेल झालाय Happy
कांची नारद राजा असं सर्वत्र लिहिलेला वॉलपेपर बनवणे अशी नवीन बिझनेस आयडिया आली यातून.

कांची नारदराजा?>> अगं कांची नरेश राजा
कांची नारद राजा असं सर्वत्र लिहिलेला वॉलपेपर बनवणे>> यावरून आता मला काय आठवले असेल सांग ? ते एक कार्टून आहे बघ, कस्टमर मागतो झोपाळा सॉफ्टवेअर लीडर काय समजतो प्रोग्रामर काय बनवतो नि शेवटी मिळते काय??

https://www.zentao.pm/blog/tree-swing-project-management-tire-analogy-42...

इथे आहे बघ ते कार्टून

पालीस फक्त एकच पाली भाषा वाचता येत असेल तर .... !! (मराठी/संस्कृत/हिंदी येत नसेल तर... ??)>> वाक्य लिहून त्याखाली translate असा option द्यायचा
:जोरात पळणारी बाहुली:

श्रीरामपूरला फार खतरनाक मोठ्या पाली यायच्या आणि त्या मंत्रावरून मस्त बागडायच्या Lol

एवढ्या मोठ्या पाली मी डोंबिवली , नालासोपारा आणि आता परत डोंबिवलीत कधीच बघितल्या नाहीत.

अंजली सही Lol , पाली भाषा समजत असेल पालींना.

ते ट्रान्सलेट बटन पण पाली भाषेत लागेल ना? >> रिव्हर्स - फारवर्ड बाण! अर्थात फार वर्ड न वापरता हा प्रॉब्लेम सोडवता येईल. Wink

मानव, तुमचा उपाय अवलंबून एक चिकटपट्टी आणि त्यावर हिट चे चिकट तेलकट पिवळे इंजेक्शन थेंब टाकले आहेत.खाली किचन सिंक च्या ड्रेन जवळ झुरळं मुरवायला बोरिक पावडर रचून ठेवली आहे.
Uv पाल रिपेलर बाथरूममध्ये लावला होता,पण प्लग सैल होतो आहे सारखा.गॅलरीत नीट लागतो.
पाल रिपेलर स्प्रे आज आले.लहानपणी स्पोर्ट डे ला मिळायच्या तश्या नारिंगी गोळ्या, ओडोमोस, आणि लिपटन चा लेमन टी असा मिश्र वास आहे.तितक्यात स्वयंपाकघरात खिडकीवर पालबेबी दिसलं.खिडकी उघडून ते बाहेरच्या बाजूला गेल्यावर धाडकन खिडकी लावून पाडून टाकलं(सीमा, मुझे माफ कर दो सीमा)
पाल रिपेलर चे सील उघडून सर्वत्र घमघमाट केलाय.आता पाली यायच्या थांबतात की 'लेट्स गो टू द अरोमॅटिक लाऊंज फॉर डेट हनी' म्हणून वास घ्यायला मुद्दाम येतात ते बघायचं.
पेस्ट कंट्रोल पण करणार आहे.फक्त त्यांनी नव्या रंगावर ते स्किन कलर कणिक ड्रॉप लावायला नको.विचारून करेन.

शिशूपालांना अक्कल कमी असते पण त्यांना एखाद महिना हकलवत राहिले तर त्यांना आपल्याला बेघर केलं आहे हे समजते आणि सहसा मोठी पाल घरात येत नाही. त्यांना मारणे पण सोपे असते पण आपण कृष्ण नसल्याने मेलेल्या शिशूपालाची विल्हेवाट आपल्यालाच लावायला लागते आणि ते खूप वाईट काम असते.

स्किन कलर कणिक ड्रॉप लावायला नको. >>> ते बहुदा झुरळांकरता असतात. पालींकरता स्प्रेच असतो. पण त्याचे ओघळ नविन रंगावर छान मिरवतात.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार म्यांवबोली.कॉम वर एका मांजरीने पोस्ट टाकली आहे - 'माझ्या संडासात एक बाई रोज फिनेल, दालचिनी, काकड्या आणून टाकते, तिचे काय करू?'

आता नाही हो टाकत.फार महाग पडतं दालचिनी आणि काकड्या टाकणं.आणि फिनेल ला दाद देत नाही.हल्ली बहुधा माऊ ने शी ची जागा बदललीय.

जीथे पाली असतात तेथे पान‌ओव्आचे पान ठेऊन पहा. हा उपाय किमान ७ दिवस तरी करून पहा. पाल ती जागा सोडून जाते.

Pages