४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आणि म्हातारबा ज्याप्रमाणे हटवादी आणि नाठाळ बनला आहे तसेच त्याचे समस्त मायबोलीवरील पाठीराखेही बनले आहेत. त्याने काहीही केले तरी ते गोड मानून त्यालाच मत देणार.
त्यामुळे एक गोष्ट शंभर वेळा सांगितली तरच डोक्यात किंचित धुगधुगी निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिवसचे दिवस तुम्ही तेच ते मुद्दे त्याच त्या शब्दांत लिहीत असता - या डुप्लिकेट पोस्ट्सचं काय एवढं! >>> Lol

समस्त मायबोली? मी तर नाही. तुम्ही एक एक्स्ट्रीम पोझिशन घेतलीत व बाकीच्यांनी त्याला विरोध केला तर त्या सगळ्यानी विरूद्ध बाजूची एक्स्ट्रीम पोझिशन घेतली आहे असे नसते.

बाकी आत्ता ती प्रायमरी लढत आहे. तेव्हा ट्रम्पवर टीका करणार. आत्ता बायडेन बद्दल जितके बोलायचे तितके ती बोलते पण सध्या तो प्रतिस्पर्धी नाही. कोणीतरी तिसराच उमेदवार हवा ही मागणी वाढत चालली आहे, त्या भरवश्यावर ती असेल.

४०% कमी आहे. पण एका अर्थाने तिला फक्त १०% मते फिरवायची गरज आहे.

<<<असू द्या हो! दिवसचे दिवस तुम्ही तेच ते मुद्दे त्याच त्या शब्दांत लिहीत असता - या डुप्लिकेट पोस्ट्सचं काय एवढं!>>>
अनुमोदन.
खोट्या बातम्या परत परत सांगितल्या की बरेच लोक त्या खरे मानतात, म्हणून तसे करायचे.
दोन वर्षे सिनेट, प्रेसिडेन्सी व हाउस ताब्यात असताना त्यांनी ICE च्या लोकांचे बजेट चौपट का केले नाही? श्रीमंतांना टॅक्स ब्रेक देण्यापेक्षा तिथे पैसे खर्च करणे महत्वाचे नाही का? तसेहि श्रीमंतांना टॅक्स ब्रेक देऊन देशातील सर्वसामान्य लोकांचा फायदा होतो हे गेल्या चाळीस वर्षात कुठेहि सिद्ध केले नाही. पण भारत, चीन इथे मात्र लोक जास्त श्रीमंत झाले.

<<<गवत कापण्याचे सुख मिळावे ............... त्यांची जबाबदारी कोण घेणार?>>>
कुणी नाही! दुसर्‍याला दोष द्यायचा.
स्वस्तात मिळते हे महत्वाचे आहे. पैसे वाचवणे व मिळवणे हाच खरा अमेरिकेचा धंदा आहे. राजकारण खेळ, सिनेमा टीव्ही हे सगळे पैसे मिळवण्यासाठी करावे लागते.
त्यासाठी लांडी लबाडी करायची खोट्या युनिवेर्सिट्या स्थापन करायच्या, लोकांचे पैसे बुडवायचे, खोटे बोलायचे, रडायचे, भीक मागायची, कचरा माल विकायला काढायचा, काय वाटेल ते करून पैसे मिळवायचे. दिवाळखोरी काढून वर म्हणायचे की बुडले ते पैसे इतरांचे, माझा फायदाच झाला असे निर्लज्जपणे बोलायचे, हे सगळे अमेरिकनच आहे हो.
हे फक्त एका बाजूनेच होते असे नाही. दोन्ही बाजूंचे लोक तसलेच. कुणाचे कोर्टात सिद्ध होते, कुणाचे नाही.
तुम्ही जरा अजून काही वर्षे इथे काढा, तुमच्या लवकरच लक्षात येईल.

>>>निकी निवृत्तीचे वय वाढवेल व अमेरिकन सैनिकांना मरायला पाठवून आपली तुंबडी भरेल.
+१
हेली पेक्षा ट्रम्प बरा. तसेही ट्रम्प इतका divisive आहे की त्याची अचिवमेंट गेल्याखेपेसारखी भोपळा असणार आहे. त्याला लोकं नेमण्याची अक्कल नाही हे सुध्दा गेल्या टर्म मध्ये आणि नंतर त्याच्या अनेक वकिलांच्या दिव्य कामाने त्याने दाखवून दिले आहे. दररोज हसे करून घेण्यापलिकडे त्याला काही जमणार नाही. हेली सारखे युद्धखोर आणण्यापेक्षा काहीही न जमणारा ठोंब्या आणलेला बरा.
डेमॉक्रॅटिक साइडला बाईडन कितीही भ्रमिष्ट असला तरी त्याने काही चांगली बिले बायपार्टिसन सपोर्ट ने पास केली आहेत. म्हणजे खरे काम करणारी त्याने नेमलेली लोकं तरी चांगली होती. बर्नी सँडर्सने त्याला एनडॉर्स केलेलं ते लोकांच्या नेमणुकीत स्वतःचा से ठेऊनच. त्यामुळे, बाइडन नॉमिनी नसावा अशीच इच्छा आहे. पण जर असलाच, तर ट्रम्प/हेली आणि बाईडन मध्ये कोणता पर्याय चांगला स्पष्ट आहे.

नन्द्या७५, Lol अगदी! तुमच्या सारखं नागडं सत्य कोणी मांडू शकत नाही Lol
आपली तुंबडी भरेल. >> आणि म्हणून ती ट्रम्पपेक्षा हजार पटीने वाईट आहे!
ट्रम्पने घातलेले आणि घालू शकेल असे सगळे गोंधळ आणि नृशंस प्रकार वि. निवृत्ती वय आणि तुंबडी न भरणे महत्त्वाचे! सॉरी १००० पटीने महत्त्वाचे. महान अमेरिकन लोक आणि त्यांचं लॉजिक!
जोकर म्हणून गेलेलाच आहे, यु गेट व्हॉयू फxxxx डिजर्व!

अमितव, मी लेजिस्लेटिव्ह अचिवमेंट संदर्भात तसे लिहिले. सुप्रिम कोर्टात जज तर हेली पण नेमणार आहे, ते पण conservative असणार. कोणताही रीप. नेता त्याबाबत तितकेच नुकसान करणार आहे.
जान ६ हे खूप हानिकारक होते, त्याबद्दल दुमत नाही.

आणि, तिने तिची तुंबडी भरणे हे एकावेळी दुर्लक्षित करता येऊ शकते. पण तिचे आतापर्यंतचे वागणे बोलणे आणि धोरण पाहता ती युक्रेन किंवा इजरायल साठी अमेरिकेला युद्धात उतरवेल अशी दाट शक्यता आहे.

हो, जज नेमलेच असते. पण अ‍ॅबॉर्शनवरचं तिचं कन्सेन्सेस विधान मला आशेचा किरण वाटतं.
लेजिस्लेटिव्ह अचिव्हमेंट हेल्थकेअरचे एकेके करुन लचके तोडणे. बाकी ट्रेड ट्रीटी, नेटो यांची वासलात लावू लागणे. सगळं मायोपिक प्रकारे हाताळणे.

ट्रम्प समर्थकांचे लेजिटिमेट मुद्दे खोडून काढण्या ऐवजी त्यांची टिंगल करणे व 'तुम्हाला काय कळतंय, गप्प बसा' असे म्हणून येन केन प्रकारेण ट्रम्प ला मतपत्रिके पासून दूर ठेवणे , बिग टेक कंपन्या कडून त्याची मुस्कटदाबी करणे वगैरेमुळेच तो पहिल्यांदा निवडून आला व दुसर्‍यांदाही जवळ जवळ निवडून आला. आताही त्याचे समर्थक उत्साहाने सळसळत आहेत, बायडेन समर्थक तेराव्याच्या जेवणाल ज्या उत्साहाने जावे तितपत उत्साही आहेत. मेनस्ट्रीम मिडिया मात्र आताही लोकांना बावळट समजत आहे. MSNBC वर बायडेन ला ९६% मते मिळाली व ट्रंप ला केवळ ६०% असे म्हणत होते. मतांची संख्या मात्र सांगितली नाही.

MSNBC वर बायडेन ला ९६% मते मिळाली व ट्रंप ला केवळ ६०% असे म्हणत होते. मतांची संख्या मात्र सांगितली नाही. >>> फक्त MSNBC च्या टॉक शोज मधे भाग घेणार्‍यांची मते असतील Happy

त्यातही ६०% तात्या Happy

<<>>
???
कोण हा MSNBC छाप टकर कार्ल्सन?

क्ल्पना आहे कि इथे टकर कार्ल्सनची रेघ ट्रेवर नोवापेक्षा लहान आहे, तरिहि टकर कार्ल्सनने घेतलेली पुतीनची मुलाखत बघा हे सुचवण्याचं धाडस करतोय.. एक्स वर आहे...

जर अमेरिका खरोखर लोकशाही असेल फक्त लोकमतावर सगळे निर्णय घ्यावेत. न्यायाधीश काही का म्हणेनात.
सध्या बायडेनची पार्टी सत्तेत आहे म्हणून त्रंपवर ९१ खटले. उद्या तो निवडून आला तर हे सगळे रद्द होईल.
करायचे काय कायदे नि न्यायालये?
अमेरिकेचे खरे काम पैसे मिळवणे. कायदे, वकील नि न्यायाधीश वगैरे कशाला पाहिजे? ते सगळे रद्द करा, सगळ्यांना बंदुका नि मशिन गन्स द्या आणि त्यांना गोळ्यांनीच बोलू द्या!
मज्जा येईल.

अपेक्षेप्रमाणे निकी हेलीने मिशिगनही गमावले आहे. आणि अपेक्षेप्रमाणे तरीही ती शर्यतीतून माघार घेत नाही.
बहुधा ही बाई तिसर्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवेल आणि ट्रंपची मते खाईल म्हणून काही हितचिंतक तिला मलिदा पुरवत असावेत.

दुसरीकडे बायडनला अनेक अरब लोकांनी आणि इस्रायल विरोधकानी नवी डोकेदुखी निर्माण केली आहे, मिशिगनसारखे स्विंग स्टेट हातचे गमावण्याचा जोरदार धोका आहे. केवळ म्हातार्याला धडा शिकवायचा म्हणून अनेक लोक दुसर्‍या कुणाला तरी मत देतील अशी शक्यता आहे.
तिथल्या प्रायमरीत बर्यापैकी लोक तटस्थ राहिले होते. अमेरिकेतील जिहादची राजधानी (जिहाद कॅपिटल) म्हणून ओळखली जाणारे डिअरबॉर्न इथे तर तीव्र बायडन विरोध दिसतो आहे. थोडक्यात इकडे आड तिकडे विहीर अशी म्हातारबाची परिस्थिती दिसते आहे!

म्हातारबाच्या अनिर्बंध घुसखोरीचे अनेक बळी पडताना दिसत आहेत. मुख्य माध्यमे ह्याचा कांगावा जास्त करत आहेत की रिपब्लिकन अशा हत्यांचा राजकारणासाठी वापर करत आहेत. लॅकन रायली सारख्या निरपराध लोकांना काहीही कारण नसताना जीव गमवावा लागतो ह्याचे एम एस् एन बी सी आणि सी एन एन ह्यांना (आणि म्हातारबाचे सरकार) काहीही सोयरसुतक नाही. ज्या लोकांनी देशात दाखल होताच कामा नये अशा लोकांना बिनदिक्कत प्रवेश देऊन त्यांचे उत्पात सामान्य लोकांवर लादणे ह्या प्रकारात म्हातारबा आणि त्याचे "सर्व अर्थाने कुशल, लायक वगैरे" प्रशासन ह्यांचे हात निरपराध लोकांच्या रक्ताने रंगलेले आहेत. पण बहुधा भावी डेमोक्रॅटिक मतदारांची घाऊक आयात होते तेव्हा असे बारिक सारिक कोलॅटरल डॅमेज सहन करावे अशी ह्या डाव्या लोकांची अपेक्षा आहे. मायबोलीवरही हीच भूमिका प्रामुख्याने दिसते आहे. धन्य आहेत लोक. ज्यांना व्हिसा, ग्रीन कार्ड, नागरिकत्व ह्यात इतकी दिव्ये करावी लागतात त्यांना असल्या बेलगाम घुसखोरीबद्द्ल काडीचीही काळजी वाटत नाही. निव्वळ आमचे गवत कापले जाते आहे का? आम्हाला स्ट्रॉबेरी आणि सॅलडची पाने स्वस्तात मिळते आहे ना? आमच्या बॅकयार्ड साफ करणारा स्वस्तात काम करतोय ना? मग झाले!

अमर्याद घुसखोरी हा मुद्दा निवडणूकीच्या प्रचारात चांगला धगधगत राहिला पाहिजे कारण ह्या मुद्द्यावर ट्रंप हा १००% बरोबर आणि बिनडोक म्हातारबा १००% चूक आहे.

शेंडेनक्षत्र, तुम्ही त्रंपचे नवीन स्नीकर्स विकत घेतलेत का? चांगल्या पाच सहा जोड्या विकत घ्या. माझ्याहि साठी एक घ्या, भेट म्हणून,
(बाकी त्रंप्याचे लोक कसले भेट देताहेत? उलट माझेच स्नीकर्स चोरून नेतील!! नि रडतील की माझे स्नीकर्स खूप जुने नि मुळीच स्टायलिस्ट नाहीत!!)
द्या त्याला पैसे, मग ओरडा की बायडेन ने आमची आर्थिक परिस्थिती रसातळाला नेली!
त्रंप एकीकडे मी खूप श्रीमंत आहे म्हणतो, नि दुसरीकडे भीक मागतो.

<<मायबोलीवरही हीच भूमिका प्रामुख्याने दिसते आहे. धन्य आहेत लोक. ........ आमच्या बॅकयार्ड साफ करणारा स्वस्तात काम करतोय ना? मग झाले!>>
१०० टक्के खरे आहे. मी हेच सांगतो आहे.
राजकारण करणारे सगळेच चोर आहेत. ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. त्यातून खोटारडे, निर्लज्ज असे हे लोक. काय त्यांच्या उचापति करता?
बायडेन निवडून आला तर त्याच्याजवळ २४ तास कुणितरी राहिले पाहिजे, त्याच्या हाताला धरून. नाहीतर म्हातारबा काय करेल नि काय नाही!
त्रंपजवळ कुणिहि राहिले तरी काही फरक पडत नाही. त्याचे सगळेच लोक त्याचे गुलाम आहेत. तो कुणाचे ऐकत नाही. फार तर त्याला म्हणा गोल्फ खेळायला जा, टीव्ही बघ, हॅनिटी, बॅनन, माय पिलो वाला बाबा यांच्याशी बोलत बस. बाकी सगळे आम्ही बघतो. ते तो ऐकेल.
चार वर्षांनी दुसरे कुणितरी लोक यावेत बुवा, या म्हातार्‍यांची टिंगल आता शिळी झाली.
गेल्या पन्नास वर्षात राज्यात नि सरकारात दोन्ही पक्षाचे लोक येऊन गेले. माझी आर्थिक परिस्थिती मी जे करीन त्यावर अवलंबून. मग कशाला राजकारणाची डोकेफोडी!

म्हातारबा खुरडत खुरडत एकदाचा दक्षिण सीमेवर जाऊन आला. जाऊन काय दिवे लावले? तर पर्यावरण बदल (क्लायमेट चेंज) विषयी रडगाणे गायले.
रिपब्लिकन काँग्रेस माझे बिल पास करत नाहीत म्हणून सगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत असे धादांत खोटे निवेदन केले.
सत्तेवर बसताच ट्रंपने लागू केलेले समस्त वटहुकूम ह्या मतिमंदाने रद्द केले. त्यानंतर घुसखोरांचे प्रचंड लोंढे जे सुरू झालेत ते आजही थांबण्याचे लक्षण नाही.
लोक इतके कसे निष्काळजी असू शकतात? निव्वळ २८% लोकांना ही घुसखोरी हा चिंतेचा विषय वाटतो आहे. कुठले इस्लामी अल कायदावाले घुसून हमासच्या ऑक्टोबर स्ट्याईलची कत्तल आणि अत्याचार केले तर आणखी थोडे लोक जागे होतील. माध्यमे आणि हाय टेक कंपन्यांनी सामान्य लोकांना इतके ब्रेनवॉश केले आहे की कॉमन सेन्स हा एक रोग असल्यासारखे त्यापासून दूर रहात आहेत. कठिण आहे!

<<<निव्वळ २८% लोकांना ही घुसखोरी हा चिंतेचा विषय वाटतो आहे. >>>
त्यातल्या किती लोकांना खरेच हा चिंतेचा विषय वाटतो नि किती लोकांना रिपब्लिकन तसे म्हणतात म्हणून वाटतो?
अहो अमेरिका म्हणजे फक्त पैसा! पैसे वाचताहेत ना, मग बाकी काहीहि होऊ दे. शिवाय स्वस्तात ड्रग्स मिळतात. आणखी काय पाहिजे?

<<<कुठले इस्लामी अल कायदावाले घुसून हमासच्या ऑक्टोबर स्ट्याईलची कत्तल आणि अत्याचार केले>>

आता पैसे मिळत असतील तर हा धोका पत्करलाच पाहिजे. नो पेन नो गेन!
आणि तसे काही व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर होऊ दे.
अफ्रिकेच्या कुठल्यातरी पाच सहा देशांना बेचिराख करू, इराकला केले तसे!
त्रंपचे तर हात खुमखुमताहेत न्यूक्लिअर वेपन्स वापरायला!!
बरे सौदी अरेबिया ला हात लावण्याची हिंमत नाही. त्रंप्या आला तर रशिया, उत्तर कोरिया, चीन हे सगळे सेफ!! मग कुणाला तरी मारून आपले मोठेपण सिद्ध करायचे.
अजून तुम्हाला अमेरिका समजली नाही!

सुप्रीम कोर्टाने कोलोरॅडो चा ट्रंप ला मतपत्रिके बाहेर ठेवण्याचा निर्णय एकमताने रद्द केला. मला ट्रम्प आवडत नसला तरीही हा निर्णय योग्य आहे असे वाटते.

<<<मला ट्रम्प आवडत नसला>>>
तुम्ही हे आधीच सुप्रिम कोर्टाला सांगायचे होते. तुमचे मत जर त्यांना कळले असते तर त्यांनी त्रंपला नक्कीच मतपत्रिकेबाहेर ठेवले असते. Happy

अमेंडमेंट १४ फक्त चिल्लूपिल्लू स्टेट ऑफिस साठी आहे. टॉप डॉग प्रेसिडेंट ने insurrection attempt केला तर त्याला मात्र लागू नाही. जय हो.

मलाही हा निर्णय योग्य आहे असेच वाटते. हा लोकशाहीतील एक पेच आहे. अर्ध्याहून अधिक लोकांना जर एखाद्या उमेदवाराने जे केले (निवडून आलेले सरकार सत्तेवर येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न) ते जर योग्य होते असे वाटत असेल, तर लोकशाहीतील मूळ तत्त्वानुसार त्यांना त्याला निवडून देण्याचा हक्क आहे. तो हक्क कोर्ट किंवा इतर "अन- इलेक्टेड" लोक डावलू शकत नाहीत.

पण निवडून आलेले लोक नंतर घटनेतील तत्त्वांना व कायद्यानाच हरताळ फासू नयेत म्हणून चेक्स अ‍ॅण्ड बॅलन्सेस आहेत. यातून "निवडून आलेल्या" लोकांवर "प्रत्यक्ष लोकांतून निवडून न येता एखाद्या पदावर नेमलेले" लोक कधीकधी नियंत्रण ठेवू शकतात. इथे तेच प्रयत्न सुरू होते.

इथे याबद्दल प्रचंड ग्रे एरिया आहे. ६ जाने. बद्दल ट्रम्प कोर्टात दोषी ठरला असता आणि यातील राष्ट्राध्यक्षाच्या रोल बद्दल घटनेत नि:संदिग्ध उल्लेख असता तरच त्याला निवडणूक लढण्यापासून रोखणे कायद्याने शक्य झाले असते. पण हे दोन्हीही सध्या नाही.

यात आणखी एक खोच अशी आहे की ट्रम्प व इतर काही नेते निवडून आलेल्या लोकांना सत्तेवर येण्यापासून रोखत होते. पण त्या दिवशी प्रत्यक्षात जे लोक कॅपिटॉल बिल्डिंग मधे घुसले ते अशा मेण्टल बबल मधे होते की त्यांना वाटत होते ते कोणत्यातरी जागतिक कॉन्स्पिरसीपासून अमेरिकन सिस्टीम "वाचवायला" तेथे जात आहेत. आता जगात जेव्हा राजवटी उलथवल्या जातात तेव्हा त्यातली प्यादी अशीच असतात की नाही माहीत नाही. पण निदान हे लोक त्यांच्या डोक्यातील माहितीनुसार लोकशाही वाचवायला तेथे गेले होते. हे मी फक्त प्यादे पब्लिकबद्दल म्हणतोय. नेते लोक नक्कीच निवडलेले सरकार रोखत होते.

टॉप डॉग प्रेसिडेंट ने insurrection attempt केला तर त्याला मात्र लागू नाही. >>> कॉमी, मी ते निकालपत्र अजून वाचले नाही. हा निर्णय घटनेच्या "शब्दशः/तंतोतंत" इंटरप्रिटेशन वरून घेतला आहे, की अजून त्याचे इन्सरेक्शन सिद्ध झालेले नाही म्हणून ते अजून वाचले नाही. शब्दशः तंतोतंत अर्थ लावला असे तर तुम्ही लिहीले आहे तसे दिसते.

छान झाले. कोलोरॅडोचे उन्मत्त लोक ट्रंपला मतपत्रिकेवरून हटवत होते त्यांच्या सणसणीत श्रीमुखात बसली! आता बाकीची राज्ये त्यांचा कित्ता गिरवू शकणार नाहीत. कितीही बहुमत असले तरी आम्हाला आवडत आहे/नाही म्हणून वाट्टेल ती मनमानी करणे कायद्याने संमत नाही असे दिसते आहे.

कोर्ट असे म्हणते की केंद्राच्या निवडणूकीत कुठला उमेदवार पात्र आहे याबाबत राज्य निर्णय घेऊ शकत नाही. तो निर्णय काँग्रेसने घेणे योग्य आहे. सध्याची काँग्रेस असला कुठला ठराव पास करेल असे दिसत नाही.

इन्सरेक्शन हा आरोप सिद्ध झालेला नाही. तो होणारही नाही. ट्रंपला खरोखरच बंड करायचे असते तर त्याच्या हातात समस्त संरक्षण दल आहे. तो त्यातले सैन्य रस्त्यावर उतरवू शकला असता. परंतु त्याला असे काही करायचे नव्हते.
डेमोक्रॅट आणि लिझ चेनी सारखे ट्रंप द्वेष्टे जानेवारी ६ म्हणजे अमेरिका आणि जगातल्या समस्त लोकशाहीवर झालेला आजपर्यंतचा सगळ्यात महाप्रचंड हल्ला वगैरे कांगावे करत असले तर बहुतांश जनतेला ते फार पटत नाही. एक तर ह्या तथाकथित महायुद्धाचा कुठलाही परिणाम न होता नेहमीप्रमाण सत्तेचे हस्तांतर सुखरुप झालेले आहे.

डेमोक्रॅट सगळ्या आघाड्यांवर रडीचे डाव खेळून ट्रंपला आयुष्यातून उठवायचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. बघू या काय होते ते. पण भविष्यात असले रडीचे डाव डेमोक्रॅट लोकांविरुद्धही खेळले जाऊ शकतात.

निकी हेलीने कशीबशी एक प्रायमरी निवडणूक जिंकली (वॉशिंग्टन डी सी) तर समस्त माध्यमे हर्षवायू होऊन नाचू लागली! जणू काही बाईंनी रिपब्लिकन पक्षातर्फे नामांकनच जिंकले की काय असे वाटू लागले!
बघू उद्या सुपर मंगळवार बाईंच्या पदरात किती सिटा घालतो ते.

म्हातारबाच्या डॉक्टरांनी त्याला इतका ठणठणीत असल्याचे सांगितले की जवळपास १८ वर्षाच्या तरूणापेक्षा हा ८१ वर्षाचा तरूण जास्त तंदुरुस्त आणि डोकेबाज आहे की काय असे त्याच्या समर्थकांना वाटेल. ह्या डॉक्टरांचे निदान आणि निकाल ऐकून विज्ञानप्रेषित फौचीचे बोलणेही काहीसे खरे वाटेल इतके ढळढळीत खोटे आहे. जो म्हातारा जवळपास गचकलेला आहे ज्याचा मेंदू इजिप्त आणि मेक्सिकोत ह्यात सरमिसळ करतो, २०२० आणि १९९४ ह्याची सरमिसळ करतो तो शरीराने आणि मनाने कणखर आणि तंदुरुस्त आहे असे मानणे सामान्य लोकांना कितपत पटेल कोण जाणे.
सगळ्यांसमोर आलेला म्हातारबा कायम धांदरट, धडपडणारा, चाचपडणारा, पडणारा, वाट्टेल ते बरळणारा, ७०-८०% बोलणे निरर्थक असणारा असतो. मात्र समस्त कारभारी लोक असा दावा करतात की खाजगीत हा म्हातारबा प्रचंड फिट असतो, सामान्य लोकांना एका दिवसात जमणार नाही इतके काम एका तासात करतो, दहा वीस विषयावर एकाच वेळी मोठ्या कार्यक्षमतेने कामे करतो वगैरे वाट्टेल ते दावे!
निदान थोडे जमिनीवर उभे राहून तरी असले पतंग उडवावेत. पण ह्यांचे दावे एकदम अवकाशात सोडलेल्या हेरगिरी करणार्‍या चिनी बलून सारखे थेट अंतराळात उडणारे असतात!

>>>>इन्सरेक्शन हा आरोप सिद्ध झालेला नाही.

चुकीचे लिहू नका. कोलोरॅडो कोर्टात आरोप सिद्ध झाला आहे. जानेवारी ६ कमिटीचा रिपोर्ट वाचा. कोलोरॅडो डिस्ट्रिक्ट कोर्टाने ट्रम्प ने insurrection attempt केला हे मान्य केले होते, पण अमेंडमेंट १४ राष्ट्राध्यक्षांना लागू नाही ह्या ग्राउंड वर सोडले. तेच कोलोरॅडो सुप्रीम कोर्टाने कायद्याचे वेगळे interpretation करून प्रेसिडेंटला पण लागू आहे असे ठरवून त्याला अपात्र ठरविले. सुप्रीम कोर्टाने त्याला insurrection बद्दल क्लीन चिट दिली नाही. फक्त डिस्ट्रिक्ट कोर्टाचे reading पुन्हा मान्य केले, आणि फेडरल इलेक्शन मध्ये हा कायदा स्टेट वापरू शकत नाही इतकेच सांगितले.
...
मुळात फक्त मॉबने कॅपिटोल बिल्डिंग मध्ये घुसणे एव्हढेच insurrection नाही. तर खोटे स्टेट इलेक्टर नेमणे आणि पेन्स वर दबाव आणून निवडणुकीच्या फेरनेस वर (निराधार) प्रश्न उभे करून इलेक्शन सर्टिफिकेशन थांबवण्याचा प्रयत्न हे सगळे त्यापेक्षा गंभीर गुन्हे सुध्दा होते.

कॉमी, मी ते निकालपत्र अजून वाचले नाही. हा निर्णय घटनेच्या "शब्दशः/तंतोतंत" इंटरप्रिटेशन वरून घेतला आहे, की अजून त्याचे इन्सरेक्शन सिद्ध झालेले नाही म्हणून ते अजून वाचले नाही. शब्दशः तंतोतंत अर्थ लावला असे तर तुम्ही लिहीले आहे तसे दिसते
>>>
मी निकालपत्र वाचले नाही. पण विविध माध्यमांमधून ह्या निर्णयावर जे लिहिले आहे त्यात असेच दिसले.
आणि, माझ्या साधारण समजुतीनुसार, भारतात तरी, सुप्रीम कोर्टात फक्त queastion of law जातो. Queastion of fact नाही. जे fact आहेत ते high कोर्टातच establish होतात. कायद्याचे रीडिंग फक्त सुप्रीम कोर्ट करते. अमेरिकेत सुध्दा वेगळे असेल असे वाटत नाही

कोलोरॅडो कोर्टात आरोप सिद्ध झाला? कसा काय? ट्रंपला बाजू मांडायची संधी न देता?
कुठलेही कांगारू कोर्ट काहीही निर्णंय देणार आणि ते ब्रह्म वाक्य? कायच्या काही!
मुळात रिसरेक्शन ह्या विषयी कोलरॅडो सुप्रिम कोर्टाला निर्णय घ्यायचा हक्कच नाही. कायद्याची इतकीही माहिती न घेता वाट्टेल तो निर्णय देऊन टाकला की असे होते. लोकशाही वाचवा वगैरे ठणाणा बोंब मारत एका उमेदवाराचे नाव कापून आपण लोकशाहीचाच गळा घोटत आहोत ह्याची जाणीव आहे का ह्या उन्मत्त लोकांना?
आधी एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवायचे आणि मग यथावकाश गुन्हे शोधून त्यांचे खापर त्याच्या माथी फोडायचे हा प्रकार चालवला आहे. न्यू यॉर्कच्या एजी ने निवडणूकीच्या प्रचारात हे आश्वासन दिले होते की मी ट्रंपला अडकवणार आणि त्यानुसार एक बिनबुडाचा खटला चालवून एका नालायक पक्षपाती न्यायधीशाकरवी ट्रंपला अब्जावधी डॉलर चा दंड लावला.
अशा प्रकारे घातक पायंडे पाडून लोकशाहीला सुरुंग लावला जात आहे.

Pages