४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

न्यू यॉर्क मधून बाकीच्या रियल इस्टेटवाल्यांनी घाबरून पळून जाऊ नये म्हणून गव्हर्नर नी तुम्ही घाबरू नका ( जो पर्यंत तुम्ही डेमोक्रॅट विरुद्ध जात नाही) असे आश्वासन दिले आहे. एखाद्याने दुसर्‍याचा रुपया १ बुडवला तर त्या रुपयाचे लॉटरी तिकिट घेतले असते तर त्याला लाखाचे लोटरी लागली असती म्हणून एक लाख रुपये दंड करण्यासारखे आहे हे.

शेण्ड्यांच्या बाकी कॉमेण्ट्स बद्दल - मी म्हातारबाच्या कल्ट मधे नाही. डेमोक्रॅट्सच्याही नाही. जे कोणी कायदे धाब्यावर बसवून लुटालूट करत असतील त्यांना पकडा व जी काय शिक्षा असेल ती करा. इव्हन म्हातारबाने कायदे मोडले असतील तर त्यालाही सपोर्ट नाही.

एकीकडे वोकपणा व दुसरीकडे बिनडोकपणा यात मधे काही सेन्सिबल ऑप्शन असेल तर सांगा. आपला फुल सपोर्ट असेल Happy

ट्रंपने ६ जानेवारी ला जे काही भयानक कृत्य केले ते दुसर्‍या महायुद्धापेक्षा महाभयंकर होते वगैरे वल्गना करणे सोपे आहे
>>>जानेवारी ६ हिमनगाचे टोक आहे. फेक इलेक्टर नेमण्याची स्कीम हा पाण्याखालचा हिमनग आहे.

डेमोक्रॅट पक्षाच्या थोर थोर विचारवंत, कुशल ओघवती वक्ता (आणि म्हातारबा गचकला तर राष्ट्रपतीपदावर हक्क असणार्या) कमलाबाई हॅरिस यांनी जानेवारी ६ चा हल्ला हा पर्ल हार्बर आणि ९/११ च्या हल्ल्याच्या तोडीचा आणि भयंकर असल्याचा दावा केला होता. आजही यूट्यूबवर मिळेल.
https://www.youtube.com/watch?v=_YnYHO4_98A
हेच पालुपद अनेक डेमोक्रॅट आणि लिझ चेनीसारखे रायनो (नाममात्र रिपब्लिकन) आळवत असतात.
तेव्हा जानेवारी ६ हा दोन महायुद्धे, समस्त दहशतवादी हल्ले यापेक्षाही भयंकर काहीतरी होते अशी बोंबाबोंब डेमोक्रॅटिक पक्ष आणि त्या कल्टचे सदस्य नियमितपणे करत आहेत असे म्हणायला जागा आहे.
ह्या प्रकरणामुळे सत्तांतरात कुठलीही बाधा आली नाही. ट्रंपने मिलिटरी तैनात करुन नव्या सरकारला प्रतिबंध केला नाही.
एका आंदोलन करणार्या बाईचा जीव गेला. त्या हत्येची चौकशी होऊ दिली नाही.
एफ बी आय चे एकेकाळचे उद्दिष्ट हे गुन्ह्याचा तपास करून गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर केस दाखल करणे आणि पुरावे देऊन त्यांना शिक्षा होईल असे बघणे असे होते. पण आजकाल ते डेमोक्रॅट पक्षाचे हत्यार आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्याची बदनामी होत असल्यास सोशल नेटवर्क कंपन्यांशी संपर्क करून अशा पोस्टी प्रकाशित करणार्या लोकांना त्या नेटवर्कवरून तात्पुरते वा कायमचे बाद करणे, संबंधित लेख, पोस्ट वगैरे दाबून टाकणे, ते व्हायरल होऊ न देणे इ. प्रकार केले जातात.
जर व्हाईट सुप्रिमसिस्ट गट काही करणार असा संशय असेल तर एफ बी आय त्या गटात सामील होऊन आपणही त्यातलाच एक असल्याचे भासवत त्या निखार्‍याची भडकणारी आग बनवतो. त्याकरता द्रव्य, सामग्री, नियोजन हे सगळे करतो. आणि मग वेळ साधून संबंधित लोकांना अडकवतो. हे एन्ट्रापमेण्ट आहे आणि बेकायदेशीर आहे. अशा प्रकारच्या एफ बी आयच्या सक्रिय ढवळाढवळीशिवाय कदाचित त्या उपद्रवी गटाने इतके पुढचे पाऊल कदाचित उचललेच नसते इतका त्यांचा सहभाग असतो.
जानेवारी ६ प्रकरणात अनेक एफ बी आय चे हस्तक सामील होते. त्यांनी अनेक लोकांना उद्युक्त करुन अनेक गोष्टी करायला लावल्या आणि त्या सरकारने दाबून टाकल्या आहेत.
ट्रंप हा वाईट्ट असल्यामुळे कुठलेही सरकारी विभाग कसेही वापरले तरी चालतात असा सोयिस्कर समज डेमोक्रॅट आणि त्यांच्या नियंत्रणाखाली चालणार्या डीप स्टेटने करून घेतला आहे.

देशाच्या सीमा नष्ट करून कुठलीही पार्श्वभूमी न तपासता लाखो बेकायदा लोकांना घुसखोरी करायची मुभा देणे हे जानेवारी ६ पेक्षा कितीतरी जास्त भयानक कृत्य आहे. अशा प्रकारे घुसलेले अतिरेकी सहज ९/११ सारखा हल्ला करू शकतील. आपण ट्रान्स लोकांकरता पुरेसे प्रेमळ आहोत की नाही, आपले सैनिक योग्य सर्वनामे वापरत आहेत की नाही, सैन्यात पुरेसे लेस्बियन, गे आणि ट्रान्स लोक भरती होतायत का नाही असल्या महत्त्वाच्या गोष्टीत रमलेले सैनिकी तळ एखादा घुसखोर इस्लामी दहशतवादी ताब्यात घेऊन तिथली शस्त्रास्त्रे हस्तगत करून काहीतर भयंकर कृत्य घडवू शकतो. जगाच्या पाठीवरून कुठुनही लोक येऊन व्हिसा बिसा न बनवता अमेरिकेत घुसून गायब होऊ शकतात हे किती भयानक आहे.
पण डेमोक्रॅट पक्षाचे वोक तत्त्वज्ञान पिऊन तर्र झालेल्या लोकांना हे खुपेनासे झालेले आहे. धन्य आहे हा देश आणि त्याचे देशवासी!

डेमोक्रॅट पक्षाच्या थोर थोर विचारवंत, कुशल ओघवती वक्ता (आणि म्हातारबा गचकला तर राष्ट्रपतीपदावर हक्क असणार्या) कमलाबाई हॅरिस यांनी जानेवारी ६ चा हल्ला हा पर्ल हार्बर आणि ९/११ च्या हल्ल्याच्या तोडीचा आणि भयंकर असल्याचा दावा केला होता

>>> कमलाबाई काहीही बोलतील. त्याचा जाब इथे कशाला विचारताय? मला वाटले की इथे कोणीतरी म्हणत आहे म्हणून तुम्ही म्हणताय.

ट्रंप च्या केस मध्ये आणखी एक पाचर मारून ठेवली आहे, त्याने तो दंड अपील करायचा आधीच भरायला हवा! जो पर्यंत भरत नाही तोवर त्यावर रोज ८० हजार डॉलर्स व्याजही आहे. खरे तर त्या केस मध्ये फ्रॉड वगैरे काहीही नाही. रियल इस्टेट वाले कर्ज घेताना थोडीफार अतिशयोक्ती करतातच. इथे तर बँकेनेही आमचे नुकसान झालेले नाही असे सांगितले आहे. वर मी उल्लेख केलेल्या इतर दोन केसेसही बोगस आहेत.

अब की बार ट्रंप सरकार ! Happy

<<सेन्सिबल ऑप्शन >>>
अमेरिकन राजकारणात असले काही नसते हो.
उलट सर्वात्मका सारखे सर्वात राजकारण.
तुम्ही जरा जपूनच रहा. उद्या तुम्ही स्वतःची दाढी कशी केली यावरून सुद्धा राजकारण करतील, नि वरील काही लोक म्हणतील लोक फक्त दाढ्या करत बसले, ते बायडेन मुळे झाले नि आता अमेरिकेचा नाश होणार.
तात्पर्य - दाढी जपून करा.

>>कमलाबाई काहीही बोलतील. त्याचा जाब इथे कशाला विचारताय? मला वाटले की इथे कोणीतरी म्हणत आहे म्हणून तुम्ही म्हणताय.

कमलाबाई हे एक हिमनगाचे टोक आहे. बाकी बहुतेक प्रस्थापित माध्यमे हीच धून आळवतात. आणि इथले एकंदरीत लेखन बघता ह्या मुख्य प्रवाहातील व्यक्त होणारे मत म्हणजे धर्मवाक्य असे मानणार्यांची संख्य मोठी आहे. त्यामुळे इथलाही विचार ह्याच पठडीतला असणे अशक्य नाही.

>>>
अशा प्रकारे घुसलेले अतिरेकी सहज ९/११ सारखा हल्ला करू शकतील. आपण ट्रान्स लोकांकरता पुरेसे प्रेमळ आहोत की नाही, आपले सैनिक योग्य सर्वनामे वापरत आहेत की नाही, सैन्यात पुरेसे लेस्बियन, गे आणि ट्रान्स लोक भरती होतायत का नाही असल्या महत्त्वाच्या गोष्टीत रमलेले सैनिकी तळ एखादा घुसखोर इस्लामी दहशतवादी ताब्यात घेऊन तिथली शस्त्रास्त्रे हस्तगत करून काहीतर भयंकर कृत्य घडवू शकतो. जगाच्या पाठीवरून कुठुनही लोक येऊन व्हिसा बिसा न बनवता अमेरिकेत घुसून गायब होऊ शकतात

...त्यामुळे इथलाही विचार ह्याच पठडीतला असणे अशक्य नाही.
<<<
फॅक्ट्स, हायपॉथीसिस, एक्स्ट्रापोलेशन हे सगळे शब्द समानार्थी वाटतात बहुतेक तुम्हाला. काय काय होऊ शकतं याबद्दलचे तुमचे आडाखे हायपरथीसीस म्हणायला हवेत.

...त्यामुळे इथलाही विचार ह्याच पठडीतला असणे अशक्य नाही. >> आत्याबाईला मिशा असत्या तर ...... Lol

देशाच्या सीमा नष्ट करून कुठलीही पार्श्वभूमी न तपासता लाखो बेकायदा लोकांना घुसखोरी करायची मुभा देणे हे जानेवारी ६ पेक्षा कितीतरी जास्त भयानक कृत्य आहे. >> आता दोन दिवसांपुर्वी नव्या इमिग्रेशन बिलाला विरोध झाला हे योग्यच होते असे कोणी तरी म्हणालेले खरे Lol

घुसखोरांना रोखायला पुरेसे कायदे असताना एक मूर्ख, धूळफेक करणारा कायदा आणायची काय गरज? म्हातारबाला असलेले कायदे लागू करायला काय अडचण आहे? रिमेन इन मेक्सिको हा नियम बायडन कुठल्याही कायदा बदलाशिवाय लागू करू शकतो. टेक्ससने काटेरी तारांचे कुंपण घातले आहे ते तसेच ठेवू शकतो. पण नाही. नवे इमिग्रेशन बिल आणून कुठल्यातरी लॉबिस्ट गटाचे उखळ पांढरे करण्याचे धंदे चालू आहेत.

नवा कायदा ज्याचा डावे आणि डेमोक्रॅट उदोउदो करत आहेत तो कायदा आठवड्याला की दिवसाला ५००० बेकायदा घुसखोर बिनदिक्कत घुसू देतो.
बाकीही गोष्टी अनाकलनीय आहेत. युक्रेन रशिया युद्ध हे अनंत काळ चालू रहावे म्हणून अब्जावधी डॉलर त्या युद्धाला देणे हे ह्या घुसखोरी बिलात का घुसडले आहे?

>>
फॅक्ट्स, हायपॉथीसिस, एक्स्ट्रापोलेशन हे सगळे शब्द समानार्थी वाटतात बहुतेक तुम्हाला. काय काय होऊ शकतं याबद्दलचे तुमचे आडाखे हायपरथीसीस म्हणायला हवेत.
<<
मी घराचे मागील दार सताड उघडून गाढ झोपलो किंवा महिनाभर बाहेर गेलो तर घरात चोरी होणार हे निव्वळ हायपोथेसिस आहे? मग काय विषाची परी़क्षा घेऊन तसे होईपर्यंत वाट पहायची?
एखादी अल काईदा सारखी संघटना (जी तालिबानच्या राज्यात पुन्हा डोके वर काढत आहे असा यु एन चा रिपोर्ट आहे) जिला अमेरिकेत घुसून ९/११ सारखा हल्ला करायचा असेल तर अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरील अंदाधुंद घुसखोरी ह्याला सुवर्णसंधी मानणार नाही काय? सी आय ए किंवा एफ बी आयच्या कुठल्याही लिस्टवर असणारे अ तिरेकी अशा प्रकारे विना चौकशी घुसू शकणार नाहीत काय?
तसे होईपर्यंत वाट बघून मगच ते ठरवणार का? हे म्हणजे सायनाईड हे जालीम विष आहे हे मी स्वतः चाखून बघेपर्यंत खरे मानणार नाही अशातला प्रकार आहे! असो. डेमोक्रॅटिक पक्षाच्या दावणीला बांधलेले लोक विचारशक्ती हरवून निर्बुद्ध मेंढरे बनतात असे दिसते आहे.

न्यू यॉर्क शहराचे आदरातिथ्य उपभोगून झाल्यावर हे बेकायदा पाहुणे लोकांना चाकू भोसकणे, मारामार्या करणे वगैरे विधायक कार्यात गुंतले आहेत. बेकायदा घुसखोर हे देशाला मिळणारे वरदान आहे असे ओबामा साहेबांचे वचन जगप्रसिद्ध आहेच त्याचीच प्रचिती येते आहे.
https://www.nbcnewyork.com/news/local/police-looking-for-multiple-people...
आपापल्या देशात अपार अत्याचार, यातना, छळवणूक आणि अर्थातच पर्यावरणीय उत्पात ह्यामुळे हे निष्पाप जीव अमेरिकेत घुसतात. हजारो डॉलर्सवाले डेबिट कार्ड, आलिशान हॉटेलात वास्तव्य , अंथरूण, पांघरूण वगैरे करदाते, नागरिक ह्यांना कधी न मिळू शकणार्या "हक्काच्या सोयी" मिळवतात आणि मग फावल्या वेळात पोलिसांना झोडपून काढणे, चोर्या करणे, भोसकाभोसकी, हाणामार्या वगैरे कार्यक्रम करून अमेरिकन अर्थव्यवस्था बळकट करतात. किती रम्य दृश्य आहे!
म्हातारबा असेच कोट्यावधी घुसखोर जगाच्या पाठीवरून कुठुनही अमेरिकेत आणत राहो आणि अमेरिकेला सुपरपॉवर बनवत राहो!

<<कायदा आठवड्याला की दिवसाला ५००० बेकायदा घुसखोर>>
अहो, दिवसाला नाही तासाला ५०,००० घुसतात. तुम्ही नीट रिसर्च केला नाहीत. तुम्ही पण आता सीएनेन बघता की काय? फक्त हॅनिटी, टकर, माय पिलो वाला, मार्जोरी ग्रीन यांचे ऐका. गेला बाजार ज्युलियानी आहेच.
आणि असे नसले तरी आता मी लिहीले आहे म्हणजे सगळ्यांच्या रिसर्चमधे ते येईलच. तुमच्यापण!!
लिहून टाकायचे हो काहीच्या काही, खरे खोटे बघायला आपण काही वोक नाही हो. मग म्हणायचे मी रिसर्च केला आहे!!
तुम्हाला जर तुमच्या सारखी मते असणारी माणसे बघायची असतील, तर जॉर्डन क्लेप्पर ला यू ट्यूबवर बघा.
३९९ डॉ चे स्नीकर्स ७००० डॉ.ला घेऊन एक माणूस धन्य झाला. आता तो बोंबलत फिरेल, ग्रोसरी घ्यायला पैसे नाहीत - बायडेन ची चूक!!

मागा ची कॅप काय, टीशर्टस काय आता स्निकर्स. सर्व मर्चंडाईझ ठेवलय. लोक घेतायत-घेतायत. अमेरीकेतील कंझ्युमेरिझमचे फायदे - झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये.

एकिकडे वोकिझम चा अतिरेक आणी दुसरीकडे फ्रोझन एम्ब्र्योजनाही नागरीक म्हणून हक्क देणारे अलाबामा टाईप्स !
कोणता झेंडा घेऊ ?

ट्रंपने पैसे मिळवण्याकरता बूट वगैरे वस्तू विकायला काढल्या हे पाहून म्हातारबाही जागा झाला आहे. त्यानेही आपल्या नावाने काही वस्तू विकायला काढल्या आहेत असे कळते!
मेटाम्युसिल गोल्ड!
गोल्डन अ‍ॅडल्ट डायपर पॅक!
गोल्ड प्लेटेड अ‍ॅडल्ट वॉकर!
गोल्डन हियरिंग एड!
लिमिटेड एडिशन लाईफ अलर्ट सिस्टम!
गोल्डन ऑर्थोपिडिक शूज !

आता युक्रेन आणि चीनकडून मिळणार्या लाचेपेक्षा कैकपट पैसा ह्या ब्रँड मर्चंडाईज विक्रीतून मिळेल. खात्री बाळगा!

नाही हो. बहुतेक डेमोक्रॅट्स शिकलेले असतात, निदान कॉलेज ग्रॅज्युएट तरी. ते असे नाही फालतू गोष्टी विकत घेत.
आता त्रंपने ठरवले की आपणहि या गोष्टी विकायला ठेवाव्या तर अगदी तरुण मुले सुद्धा या गोष्टी ५००० डॉ. देऊन विकत घेतील, मग म्हणतील, बायडेनने महागाई आणली!!

म्हातारबाच्या फिरलेल्या डोक्यातल्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला गेला आहे!
जॉर्जिया विद्यापीठाच्या आवारात एक तरूणी व्यायाम म्हणून धावत होती तेव्हा तिचा क्रूर पद्धतीने खून केला गेला. ही तरूणी जवळच्या नर्सिंग कॉलेजमधे शिकत होती.
ह्या मुलीचा खून करणारा कोण होता?
मुख्य प्रवाहातील माध्यमे ह्या बाबतीत जेव्हा गैरसोयीचे असते तेव्हा शक्य तितके मौन पाळतात. उदा. कॅन्सस सिटी इथे सुपरबोल जिंकल्यानंतर निघालेल्या मिरवणूकीत झालेला जीवघेणा गोळीबार. असो.

ह्या निरपराध मुलीला अशा निर्घृण पद्धतीने मारणारा व्हेनेझुएला ह्या देशातून बेकायदारित्या अमेरिकेत घुसलेला एक घुसखोर होता. त्याने हे थोर कृत्य केले. हा इसम २०२२ साली अमेरिकेत घुसला होता. त्याचा भाऊ देखील घुसखोर आहे आणि तो नकली ग्रीन कार्ड दाखवून लोकांना गंडवत होता असे कळते. अमेरिकेचे करदात्यांच्या खर्चाने होणारे महागडे आदरातिथ्य उपभोगून त्याच देशाच्या नागरिकांच्या नरडीचा घोट घेणे ही अजब कृतज्ञता आहे!

अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्ती असणारे लोक कुठलीही तपासणी न करता घुसवून म्हातारबा सामान्य लोकांचे जीवन मुष्किल करत आहे. एक दिवस आपल्यालाही अशा चोरीमारी, दरोडा किंवा खून ह्याला तोंड द्यावे लागू शकेल ह्याची जाणीव ठेवा.
पण म्हातारबाचे वसुधैव कुटुंबकम हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी समस्त डेमोक्रॅट समर्थकांची आहे. अशी बारिकसारिक संकटे येत असली तरी ह्या मार्गावरुन ढळायचे नाही!

नि़की हेली आपल्या घरच्या राज्यातही (साउथ कॅरोलिना) ट्रंपकडून पराभूत झाली. बर्‍यापैकी फरकाने हरली पण तरी बाई लढतच आहे. आता आपल्या हक्काच्या राज्यातही हार पत्करल्यावर तिला नक्की कुठून जिंकण्याची आशा आहे हे कळत नाही.
कदाचित ट्रंपला कुठल्यातरी आरोपाखाली शिक्षा होऊन त्याचे पार कंबरडे मोडून जाईल आणि मग ही बाई बाय डिफॉल्ट उमेदवार बनेल असे काही गणित मांडले असावे.
ही बाई आणि म्हातारबा ह्यातील फरक हळूहळू घटत चाललेला दिसत आहे.

कदाचित ट्रंपला कुठल्यातरी आरोपाखाली शिक्षा होऊन >> नाही. तसे काही आता उरलेल्या महिन्यात होण्याची शक्यता फार कमी आहे. पण न्यू हॅम्पशायर आणि साउथ कॅरोलीना दोन्हीकडे ४०% मते जर मिळत असतील तर अजून रेस मधे राहणे काही चुकीचे नाही. ट्रम्प डिस्क्वालिफाय होण्याच्या शक्यतेपेक्षा दोन्हीकडचे म्हातारे सोडून तिसरा कॅण्डिडेट असावा अशा मताचे बरेच लोक आहेत. त्यांचा पाठिंबा वाढत जाईल अशी तिला आशा असेल. आणि महिला कॅण्डिडेट म्हणून सुद्धा "सबर्बन मॉम्स" ज्या सहसा ट्रम्पला पाठिंबा देत नाहीत आणि जे सध्या बायडेनवर खुश नाहीत अशांना आपल्याकडे वळवायचा प्रयत्न असेल.

<<अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्ती असणारे लोक कुठलीही तपासणी न करता घुसवून म्हातारबा सामान्य लोकांचे जीवन मुष्किल करत आहे.>>

हे खरे आहे.
गेली १० वर्षे माझ्याकडे गवत कापायला, घर साफ करायला, लहान सहान दुरुस्तीची कामे करायला,न्कचरा गोळा करायला अनेक दक्षिण अमेरिकन लोक येत आहेत. त्यातले बरेच बहुधा बेकायदेशीरपणे इथे रहात असतील. त्यामुळे ही सर्व कामे फार स्वस्तात होतात. माझे जीवन त्यामुळे फार कठिण झाले आहे. कुठे बरे पैसे खर्च करावेत?

गवत कापण्याचे सुख मिळावे म्हणून बेकायदा घुसखोरांना कोट्यावधी संख्येने घुसू द्यावे हे अगदी मान्य. पण गवताबरोबर निरपराध लोकांचे गळेही कापले जातात त्याची जबाबदारी हे गवतकाप्यांचे आश्रयदाते घेतील काय?
घर साफ करायला स्वस्त आणि मस्त बेकायदा घुसखोर उपलब्ध असणे हा नागरिकांचा हक्क आहे असे मानू पण मग हेच घुसखोर एखादे रिकामे घर हेरून ते लुटून साफ करतात त्याला जबाबदार कोण?
असले लोक अनेकदा अमली पदार्थ आणून त्याचे व्यसन लावतात आणि ओव्हरडोस वगैरे प्रकरणात अनेक लोक विशेषतः तरूण लोक मरतात. त्यांची जबाबदारी कोण घेणार?
असली बारीकसारीक कामे किती आहेत आणि त्या कामांच्या प्रमाणात बेकायदा घुसखोरी होत आहे की अवाच्या सवा होते आहे हे तपासायचे नाही काय?
अमेरिकेत भरपूर गुन्हेगारी आहे. असे असताना पुन्हा लाखो होतकरू गुन्हेगार परदेशातून आयात करण्यामागे काय विचार आहे?

निकीबाईला विजयाकडे जाणारा कुठला मार्ग दिसतो आहे ते अनाकलनीय आहे. तिला तिच्या राज्यात ४०% सुद्धा मते मिळालेली नाहीत.
ट्रंपवर टीका करण्याच्या नादात ती फारच डाव्या दिशेला सरकत आहे. कदाचित कुठल्याशा तिसर्या पक्षाच्या वतीने उमेदवार बनायचे स्वप्न बघत असावी.
एक तर ती मॅकेन आणि लिन्ड्सी ग्रॅहमच्या तोडीची युद्धखोर आहे. शस्त्रास्त्र लॉबीने तिला भक्कम मलिदा चारला असावा ज्यामुळे ती युक्रेन रशिया युद्धासाठी अमेरिकेने अजून अब्जावधी रुपये वाया घालवावेत ह्या मताची आहे.
बाकी सरकारने हवे तितके सामान्य नागरिकांच्या समस्त गोष्टींमधे नाक खुपसून हवे तिथे हस्तक्षेप करावा (स्नुपिंग) वगैरे मौलिक विचार मांडलेले आहेत.
बेकायदा घुसखोरी देखील तिला फारशी नामंजूर आहे असे वाटत नाही.
एकंदरीत ज्या आक्रमकतेने ती ट्रंपवर तुटुन पडते तितकी आक्रमकता अर्धमेल्या म्हातारबाबद्दल दाखवताना दिसत नाही. त्यामुळेच समस्त मुख्य प्रवाहातील माध्यमांची ती एक लाडकी उमेदवार बनली आहे. पण (त्यांच्या) दुर्दैवाने एकही विजय तिला मिळवता आला नाही आहे. आणि यानंतरही मिळेल अशी लक्षणे नाहीत. त्यामुळे किती कमी फरकाने ती हरली ह्याचीच कौतुके गायली जात आहेत.

असू द्या हो! दिवसचे दिवस तुम्ही तेच ते मुद्दे त्याच त्या शब्दांत लिहीत असता - या डुप्लिकेट पोस्ट्सचं काय एवढं!

हा हा हा! त्याचे काय आहे एक विरुद्ध ऊर्वरित मायबोली असा एकतर्फी सामना असल्यामुळे द्विरुक्ती होणारच.

Pages