Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
बाकि टृंपच्या तथाकथित भिंतीला
बाकि टृंपच्या तथाकथित भिंतीला (रीड इमिग्रेशन पॉलिसी) विरोध करणारे आता बाय्डनचं बिल पास करायला विरोध का, असा लटका राग व्यक्त करताना बघुन हि वैचारीक प्रगल्भतेची सुरुवात असेल कां, अशी शंका मनाला चाटुन गेली...
राज, भिंत=इमिग्रेशन पॉलिसी
राज, भिंत=इमिग्रेशन पॉलिसी याला जर तु वैचारीक प्रगल्भता म्हणत असशील तर कठिण आहे रे बाबा!
अरे ती भिंत प्रकार हा एक फारच मोट्ठा विनोद व खुळचटपणा होता हे बिगरीतल्या मुलाला पण कळत होते. अशी भिंतीने इमिग्रेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्विक्झॉटिक आयडिया फक्त ट्रंपच्याच ( सुपिक?) डोक्यातुन निघु शकते!
तात्याची झापडबंद भलामण करणार्
तात्याची झापडबंद भलामण करणार्यांचा वैचारीक दिवाळखोरीपासून दूर जाण्याचा प्रवास लवकरच सुरू होतो अशी प्रार्थना ! अर्थात तसे होणार नाही ह्याबद्दल मनात अजिबात शंका नाही.
अफगाणिस्तानमधून निघायची बोलणी
अफगाणिस्तानमधून निघायची बोलणी ट्रंपने केली होती म्हणून पुल आउटचा बट्ट्याबोळ झाला ही अ त्यंत लंगडी हास्यास्पद सबब आहे. म्हातारबा ने ट्रंपने जे जे केले ते रद्द करायचा सपाटा लावला होता.
मग अफगाणिस्तानमधून माघार घेण्याचे वेळापत्रक बदलणे अशक्य होते का? आजिबात नाही.
ट्रंपने अंदाधुंद पद्धतीने, अब्जावधीची शस्त्रास्त्रे तालिबानच्या हवाली करूनच काढता पाय घेण्याचे मान्य केला का? आजिबात नाही. हे सगळे बायडनचे कर्तृत्व. जो राज्य करतो तोच त्या घटनेला जबाबदार आहे. द बक स्टॉप्स अॅट द प्रेसिडेंट्स डेस्क.
प्रत्येक बाबतीत ट्रंपची सबब वापरून आपली निष्क्रियता झाकण्याचा बायडन आणि त्याच्या समर्थकांचा प्रयत्न हास्यास्पद आणि दयनीय आहे.
शेंडेनक्षत्रांचे आजचे ट्रंप
शेंडेनक्षत्रांच्या आजच्या ट्रंप विरुद्ध बायडन तुलना असलेल्या पोस्टला एका शब्दाचे उत्तर आहे. “ हॉगवॉश“
(फॉक्स/ न्युजमॅक्सने ने केलेला ब्रेनवॉश म्हटला तरी चालेल
)
बिनतोड मुद्दे खोडता आले नाहीत
बिनतोड मुद्दे खोडता आले नाहीत की मग काय शिवीगाळ सुचते. चालायचेच.
आणि फॉक्स न्यूज ही शिवी असेल तर एम एस एन बी सी, सी एन एन आणि तत्सम म ध्यमे निर्लज्जपणे खोटारडेपणा करून कायम बायडनची तळी उचलत असतात त्यांची नावेही शिवीपेक्षा कमी नाहीत.
अहो “तुमचे सगळे मुद्दे”
अहो “तुमचे सगळे मुद्दे” “बिनतोड” आहेत असा तुम्हीच गोड गैरसमज करुन घेत आहात! आमच्यासाखे जे कुठल्याच मिडियावर एकतर्फी जोर न देता दोन्ही बाजुचा सारासार बुद्धीने विचार करतात त्यांना ते तुमचे मुद्दे तोडायच्या लायकीचे सुद्धा वाटत नसल्यामुळे ते मुद्दे त्यांना “ हॉगवॉश“ वाटणारच! त्यात शिविगाळ कुठुन आली?
आणी ज्या तुमच्या मुद्द्यांशी मी अंशतः सहमत होतो तेव्हा खुल्या मनाने याच बिबीवर तुमच्याशी सहमत आहे असे मीच काही दिवसांपुर्वी जाहीरपणे म्हटले होतेच की!
ट्रम्पवरचे खटले इंटरेस्टिंग
ट्रम्पवरचे खटले इंटरेस्टिंग स्टेजला आहेत. कोलोरॅडो राज्याने त्याला मतपत्रिकेवरून काढण्याच्या केस मधे ट्रम्पच्या बाजूने कोर्टाचा कल दिसत आहे. राज्यघटनेत त्याबद्दल संदिग्धता असणे हे एक कारण पण याने अनेक चुकीचे पायंडे पाडले जातील हे दुसरे. इथे ट्रम्पला मतपत्रिकेवर ठेवण्याचा निकाल आला तर तो बरोबर असेल. लोकांचा निवडीचा पर्यायच काढून घेणे हे चूक आहे - जरी ट्रम्पने ६ जानेवारीला तेच करायचा प्रयत्न केला असला तरी.
दुसर्या केस मधे "इम्युनिटी" बद्दल त्याच्या बाजूने केलेले अचाट क्लेम्स कोर्ट निकालात काढेल अशीच चिन्हे आहेत. अध्यक्षाला असलेली इम्युनिटी अध्यक्ष म्हणून त्याने घेतलेल्या निर्णयासंबंधी, त्याच्या कामकाजासंबंधी असते. ट्रम्पच्या वकिलांनी "अॅब्सोल्यूट इम्युनिटी" असते असा क्लेम केला आहे. तो न्यायालयाने अमान्य केला नाही तरच आश्चर्य असेल.
फारएण्ड, ट्रंपच्या या सगळ्या
फारएण्ड, ट्रंपच्या या सगळ्या खटल्यांकडे फक्त डेमोक्रॅट्सच आशाळभुताने बघत आहेत. सर्व रिपब्लिकन्सनी आपला जिव त्याच्यावर आधीच ओवाळुन टाकला आहे. तो जर निवडणुक जिंकला व खटले हरला तर अॅज अ प्रेसिडेंट म्हणुन तो स्वतःला पार्डन करु शकतो. नाही पार्डन करु शकला तरी एक कन्व्हिक्टेड फेलन असुनही अॅज अ प्रेसिडेंट म्हणुन काम करु शकतो. तसे झाले तर व्हाइट हाउसच्या ओव्हल ऑफिसमधे त्याच्यासाठी खास स्पेशल जेल सेल बांधणार आहेत म्हणे
पण! त्या खटल्यांपेक्षा बायडन दिवसागणिक त्याच्या उतार वयामुळे त्याच्या मेंटल कॅपॅसीटीचा जो घोळ घालतोय त्याने डेमोक्रॅट्सची झोप उडाली पाहीजे!
काल चक्क तो म्हणाला " त्याने मेक्सीकोचा प्रेसिडेंट अब्दुल फतः एल सीसी ( अॅक्च्युअलि तो इजिप्तचा प्रेसिडेंट आहे व बायडनला बहुतेक तसे म्हणायचे होते) याला इजिप्त- गाझा बॉर्डर उघडायला भाग पाडले.
नुकतेच तो असेही म्हणाला होता की तो फ्रांसचा प्रेसिडेंट मितराँला( जो २५-३० वर्षांपुर्वी मेला आहे) गेल्या वर्षी भेटला. झालच तर जर्मन चॅन्सेलर अॅन्जेला मर्कलला नुकताच भेटला( मर्कल ३ वर्षांपुर्वी चॅन्सेलर होती). कठिण आहे!
डेमोक्रॅट्सनी बायडनचे जे क्लोज अॅड्व्हायझर्स व मंत्री आहेत त्यांच्याकडे निट बघायला पाहीजे. त्यात प्रामुख्याने परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन, सरंक्षण मंत्री लॉइड ऑस्टीन, नॅशनल सिक्युरीटी अॅडव्हायजर जेरिमाया सुलिव्हन व व्हाइट हाउस चिफ ऑफ स्टाफ जेफ झिंट्स यांच्याकडे नीट बघुन ठेवले पाहीजे. कारण बायडन जर जिंकला व पुढच्या १-२ वर्षात जर त्याचा डिमेन्शिया खालावला तर हीच लोक अमेरिकेला तारुन नेणार आहेत!
१९८६-१९८८ च्या दरम्यान प्रेसिडेंट रेगनची बुद्धी अल्झहायमरने खालावली तेव्हा हेच झाले होते, नॅशनल सिक्युरीटी अडव्हायझर जनरल पॉइंटडेक्स्टर, परराष्ट्र मंत्री जॉर्ज शुल्ट्झ, संरक्षण मंत्री कॅस्पर वाइनबर्गर व व्हाइट हाउस चिफ ऑफ स्टाफ डॉनल्ड रेगन/ हॉवर्ड बेकर/केनेथ ड्युबरस्टाइन यांनीच सगळा कारभार सांभाळला होता.
फारएण्ड, ट्रंपच्या या सगळ्या
फारएण्ड, ट्रंपच्या या सगळ्या खटल्यांकडे फक्त डेमोक्रॅट्सच आशाळभुताने बघत आहेत. सर्व रिपब्लिकन्सनी आपला जिव त्याच्यावर आधीच ओवाळुन टाकला आहे. >>> खरे आहे मुकुंद!
वास्तविक मागच्या वर्षी या सुमारास ट्रम्प लोएस्ट पॉइंटवर होता. त्याने बॅक केलेले बहुतांश उमेदवार हरले होते. इव्हन फॉक्स ने त्याला जवळजवळ डिसओन केले होते
The game was for the dems to lose! आणि या लोकांनी इतके भोंगळपणे केलेत की स्वतःहून अध्यक्षपद ट्रम्पच्या हातात देत आहेत. बायडेनची हालत पाहता त्यानेच वास्तविक माघार घ्यायला हवी होती. मागच्या वर्षीपर्यंत तो जरी कॅमेर्यासमोर धडाकेबाज नसला तरी ट्रम्प व त्याच्या कंपूला तब्बल तीन वेळा हरवण्याची कामगिरी त्याच्याकडे होती (दोन मिडटर्म्स २०१८, २०२२ व एक जनरल इलेक्शन - २०२०). पण गेल्या वर्षभरात खूप फरक पडलेला दिसतो.
२०२२ मधे अॅबॉर्शन हा प्रमुख मुद्दा डेम्सनी यशस्वीरीत्या वापरला होता. आता इमिग्रेशन वाला रिपब्लिकन्स वापरत आहेत. त्याला डेम्स कडून चपखल उत्तर नाही. सीमेवर असलेल्या राज्यांनी का म्हणून लोड घ्यायचे यालाही त्यांच्याकडे उत्तर दिसत नाही. बहुधा फ्लोरिडामधून एक बस मार्था'ज विनयार्ड का कोठे पाठवली होती तेव्हा तेथील लोकांनी या लोकांचे कसे स्वागत केले वगैरे त्याची कौतुके वाचली होती. पण अशी बस रोज यायला लागली तर त्यांची प्रतिक्रिया काय होईल ते बघण्यासारखे असेल.
अफगाणिस्तान मधून ट्रम्पही तडकाफडकीच निघणार होता हे उघड होते. तरीही बायडेनच्या वॉच खाली जे झाले त्याची जबाबदारी त्याचीच आहे. शेंड्यांशी तेवढ्यापुरता सहमत आहे. ६ जाने. बद्दल मात्र अजिबात नाही. ट्र्म्पचे इतर अनेक गुन्हे हे बढाईखोर वागणे किंवा अध्यक्षपदाच्या जबाबदारीचे गांभीर्य नसणे यातून आलेले आहेत. मात्र ६ जाने. चे त्याचे व त्याच्या कंपूचे लोकांना फितवणे जेन्युईन लोकशाहीविरोधी होते.
म्हातारबाने आणि ट्रंप ह्या
म्हातारबाने आणि ट्रंप ह्या दोघांनी सरकारी गुप्त कागदपत्रे बिनदिक्कत आपापल्या घरात ठेवली होती. मात्र सरकारने ट्रंपला गुन्हेगार ठरवले. समस्त माध्यमांनी त्याची यथेच्छ बदनामी केली. मात्र बायडनला येन केन प्रकारेण पूर्ण निर्दोष घोषित केले. अत्यंत दुटप्पी धोरण दाखवून न्याय मंत्रालय हे म्हातारबाच्या सरकारच्या हातातील एक खेळणे आहे. सोयीचे असेल तिथे आणि तेव्हा कारवाई करायची असे अत्यंत पक्षपाती धोरण राबवले. हा एक
घातक घसरणीचा प्रकार आहे ( स्लिपरी स्लोप) उद्या दुसरी बाजू सत्तेवर आली की असेच वागून दुसर्या बाजूला बळी पाडेल.
म्हातारबा हा भ्रमिष्ट आहे. त्याला तो उपराष्ट्रपती कधी होता हेही आठवत नाही. ना त्याच्या मुलाचा मृत्यू कधी झाला ते आठवत नाही. सबब जरी त्याच्या हातून चुका घडल्या असडल्या तरी मतिभ्रष्ट माणसावर कुठलीही कारवाई करू नये अशी आमची शिफारस आहे. असे रॉबर्ट हर नामक न्याय मंत्रालयाच्या स्पेशल कौन्सिलचा प्रमुख म्हणाला.
आता हा किती दुटप्पीपणा आहे? गुन्हे केले तर भ्रमिष्ट म्हणून सोडून द्या. पण राष्ट्रपतीपदासाठी लागणार्या पात्रतेचे काय? तिथे म्हातारबा अगदी कुशाग्र आहे. समस्त नागरिक एका महिन्यात करणार नाहीत इतके काम म्हातारबा एका दिवसात करतो वगैरे अचाट आणि आचरट दावे केले गेले.
हा रिपोर्ट बाहेर येताच म्हातारबाने आपली झोपमोड सहन करून ( रात्री ७:३० वा!) एक पत्रकार परिषद घेतली. तिथे आपल्या कुशाग्र आणि तरल बुद्धीची प्रचिती यावी म्हणून केलेल्या भाषणात इजिप्तच्या राष्ट्रपतीला मेक्सिकोचा राष्ट्रपती बनवून त्याला गाझा वगैरे प्रकरणात त्याने कसे चांगले काम केले आणि मीच ते करायला लावले वगैरे दावे केले.
हे इतके हास्यास्पद आहे की अगदी त्याच्या ओंजळीने पाणी पिणार्या सी एन एन, एम एस एन बी सीला ह्याकडे दुर्लक्ष करणे अवघड होत आहे. रेशेल मेडो नामक (अनधिकृत) डेमोक्रॅटिक प्रवक्ता "पण तो सायकल चालवतो" वगैरे मखलाशी करून तो किती धडधाकट आणि तंदुरुस्त आहे हे दाखवायचा प्रयत्न केला! पण म्हातारबाच्या भ्रमिष्टपणाचा सूर्य असा कोंबडा झाकून उगवायचा आणि तळपायचा थांबणार नाही!
जगभरातील अत्यंत मुरब्बी, धूर्त, कपटी नेते, जसे पुटिन, शी जिनपिंग, मॅक्रोन, अशांशी बोलणी करताना हे बुद्धी नष्ट झालेले पात्र काय दिवे लावणार आहे? जो २०-३० वर्षापूर्वी मेलेले नेते आज राज्य करत आहेत असे मानतो त्याला बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अंदाज कसा येणार आणि त्यावर आपले डोके चालवून डावपेच कसे खेळणार आहे? ह्या अर्धमेल्या राष्ट्रपतीच्या चेहर्यामागून कुणी कुटिल लोक तर राज्यकारभार करत नाहीत ना?
म्हातारबाने आणि ट्रंप ह्या
म्हातारबाने आणि ट्रंप ह्या दोघांनी सरकारी गुप्त कागदपत्रे बिनदिक्कत आपापल्या घरात ठेवली होती. मात्र सरकारने ट्रंपला गुन्हेगार ठरवले. >>> ट्रम्पला तरी कोठे गुन्हेगार ठरवले होते आधी? रीतसर मागणी त्याच्याकडेही केली होती. पण याने आधी खुशाल सगळी दिली आहेत म्हणून सांगितले. नंतरही अनेक सापडली. तेव्हा याचे वकील म्हणू लागले की ती सगळी अनक्लासिफाइड होती. मग डॉक्युमेण्ट्स अनक्लासिफाइड होतात यावर यांनी एकेक अचाट दावे केले. आठवतात का? नुसता प्रेसिडेण्टने मनातल्या मनात विचार करून ती अनक्लासिफाइड होतात ते प्रेसिडेण्टने घरी नेली की आपोआप अनक्लासिफाइड होतात इथपर्यंत? आणि हे सगळे खुद ट्रम्पने फॉक्स्वर सांगितले होते तेव्हा फेक मीडीया वगैरेचे एक्स्क्यूजही चालणार नाही. त्याच्या वकिलांना वकील गाठायची वेळ आली त्यांनी केलेल्या खोट्या क्लेम्समुळे.
तेव्हा आधी कितीतरी वेळा निकालात काढलेली आर्ग्युमेण्ट्स पुन्हा स्ट्रॉमॅन सारखी आणू नका. या रेटने पुन्हा २०२० ची निवडणूक कशी चोरली होती हे ही सुरू होईल.
वास्तविक दोन्ही म्हातारबा आता नकोत अध्यक्ष म्हणून. कोणी सेन्सिबल मध्यममार्गी तरूणबा असेल तर चालेल. किंवा तरूणबी
काहीही करून ट्रम्प ला
काहीही करून ट्रम्प ला अडकवायचेच प्रयत्न सुरू आहेत की काय असे वाटते.
१ फानी विलिस चे प्रकरण
२ ई कॅरोल जीन ला दिलेली अत्यंत हास्यास्पद नुकसान भरपाई ( ८० मिलियन)
३ आजच ट्रंप ला केलेला ३६० मिलियन दंड व तीन वर्षे बंदी. मुळात ट्रंप ने आपले उत्पन्न जास्त दाखवून कर्ज घेतले होते तर बॅकेने का नाही तपासले ? शिवाय कर्जाची परतफेड झाली असेल तर तो फ्रॉड कसा काय ?
ट्रम्प ॲक्टिव्हली कागदपत्रे
ट्रम्प ॲक्टिव्हली कागदपत्रे लपवत होता, एका जागेवरून दुसरीकडे हलवत होता. बाईडनने असे काही केले नाही. उलट त्याच्या लोकांना चूक लक्षात आल्यावर त्यांनीच सबमिट केले.
कर्जाची परतफेड झाली तरी fraud
कर्जाची परतफेड झाली तरी fraud आहेच. कर्जाच्या व्याजदरात सुद्धा परिणाम होत असतो तुम्ही किती सिक्युरिटी दिली आहे ह्याचा.
काहीही ! locus standi माहित
काहीही ! locus standi माहित आहे का ?
मी माझ्या बँकेला माझा पगार वाढवून सांगितला व कर्ज घेतले, सव्याज परतफेड केली, तर सरकार माझ्यावर एकतर्फी कारवाई करेल ? बँकेने तक्रार केलेली नसताना ?
मी उल्लेखलेल्या इतर दोन प्रकरणांचे काय ?
भारतात fraud साठी केंद्र
भारतात fraud साठी companies act मधे केंद्र सरकार कधीही prosecute करू शकते. Locus standi असो वा नसो. तुम्हाला ह्यापलिकडे माहिती असल्यास नक्की द्या. फायनांशियल मार्केट मध्ये येणाऱ्या claims ची विश्वासार्हता राखणे ही locus standi असू शकते.
इतर दोन प्रकरणाबद्दल तुम्ही तरी कुठे काही लिहिले आहे ? कोर्टातून निर्णय आलेले चुकीचे किंवा कायद्याला धरून नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर लिहा.
घ्या. विकिपीडिया आर्टिकल
घ्या. विकिपीडिया आर्टिकल मध्ये सापडले.
https://en.m.wikipedia.org/wiki/New_York_Executive_Law_%C2%A7_63(12)
New York Executive Law § 63(12), sometimes called simply "63 12" or "63(12)",[2] is a New York law that gives the Attorney General of New York broad powers[3] to investigate and prosecute cases of alleged civil fraud.[2][4] Due to its broad definitions,[5] section 63(12) provides the AG with far-reaching powers to issue subpoenas, as well as low legal hurdles to do so.
लोकहो, हे अमेरिकेचे राजकारण
लोकहो, हे अमेरिकेचे राजकारण आहे. हे असेच असते, तिथे खरे, खोटे, लाज, fairness, ethics, न्याय्/अन्याय असले काही नसते. ज्याचे हती सत्ता तो वाट्टेल ते करू शकतो. म्हणूनच धडधडित खोटे बोलून, लोकांच्या मूर्खपणाचा फायदा घेउन एकदाची सत्ता मिळवायची. डेमोक्रॅट्स, रिपब्लिकन सगळ्यांनी मिळून इराकवर उगीचाच हल्ला करायला संमति दिली नि केला पण. का? बळी तो कानपिळी म्हणून.
<<पण राष्ट्रपतीपदासाठी लागणार्या पात्रतेचे काय?>>
हा प्रश्न विचारणारा कमालीच्या बाहेर भोळा आहे - त्याने राष्ट्रपतिपदासाठी लागणार्या घटनात्मक लायकीचा अभ्यास केलेला दिसत नाहीये. घटनेत कुठे म्हंटले आहे की राष्ट्रपति मतिभ्रष्ट किंवा नेहेमी खरे बोलणारा असला पाहिजे? तुमच्यात दम आहे का की ३५ किंवा ३६ राज्यातल्या लोकांकडून मान्यता घेऊन घटना दुरुस्ती घडवून आणण्याची? साधे स्थानिक मुन्शिपल्टिचे कौन्सिलर तरी होऊ शकता का तुम्ही? तोपर्यंत तुमच्या वाटण्याला नि मताला काही किंमत नाही.
<<मी माझ्या बँकेला माझा पगार वाढवून सांगितला व कर्ज घेतले, सव्याज परतफेड केली, तर सरकार माझ्यावर एकतर्फी कारवाई करेल ? बँकेने तक्रार केलेली नसताना ?>>
अहो सामान्य माणसाची तुलना राजकारणी माणसाशी करू नका. तुमच्या अजून लक्षात येत नाही की सामान्य माणसे नि राजकारणी माणसे यांचे कायदे वेगळे असतात? तुमचे नुसते पुस्तकी ज्ञान.
राजकारणी माणसांना राजकारणी न्याय. त्यांच्यावर खटला भरण्यात न्याय्/अन्याय याचा संबंध नसतो. हे सगळे खेळ जनतेच्या पैशावर चाललेले आहेत, ज्याच्या हाती सत्ता तो करेल ते खरे. तिकडे त्रंपने तर म्हंटलेच आहे की तो जर राष्ट्रपति झाला तर त्याच्या विरोधी लोकांना तो ठार मारेल. आता कुणि म्हणेल हे योग्य नाही, पण सत्ता असेल तर तो तेहि करू शकेल.
अर्ध्याहून अधिक लोक कर भरताना प्रचंड खोटेपणा करतात म्हणून कुणीहि खोटेपणा केला तरी चालेल?
उगाच राजकारणाची चर्चा करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत आपले पैसे, कुटुंबियांची सुरक्षा याकडे लक्ष देऊन उरलेला वेळ मज्जा करण्यात घालवावा. तुम्हाला फक्त एक मत आहे आणि त्याचेहि काय होते, खरेच ज्याला दिले त्याला मिळते का, मिळाले तरी त्याचा उपयोग होतो का याबद्दल तुम्हाला काहीहि अधिकार नाही. मग उगाचच का डोकेफोड?
ट्रम्प च्या मार लागो ची किंमत
ट्रम्प च्या मार लागो ची किंमत यांनी किती ठरवली असेल ? १८ मिलियन. ! ट्रम्प मलाही आवडत नाही पण हा खटला अगदी कै च्या कै आहे. मी एख्याद्या मित्राकडून एक हजार डॉलर्स उसने घेतले , फक्त ९०० परत केले व त्यानेही 'चोराची लंगोटी' या उक्तीप्रमाणे उरलेल्या रकमेवर पाणी सोडले व प्रकरण विसरून गेला तरीही अॅटर्नी जनरल खटला चालवू शकेल. ? मित्राला काही ही प्रॉब्लेम नसेल तरीही ? त्या मानाने हंटर बायडेन ची केस तर ओपन अँड शट आहे, ती का घेत नाहीत ?
नोव्हेम्बर मध्ये निवडणूक आहे. बायडेन वि ट्रंप डिबेट लाच हे घाबरत आहेत व काहीही करून ट्रंप ला निवडणुकीपासून दूर ठेवत आहेत. प्रेसिडेंट कमला हॅरिस !
अमेरिकन राजकरण कळत नाही पण
अमेरिकन राजकरण कळत नाही पण कायदे आणि कर याचा थोडा फार अभ्यास आहे. ट्रंप च्या ३६० मिलियन दंडाचा ९२ पानाचा रिपोर्ट वाचुन काढला. यात काही दम दिसत नाही. कुठल्याही दोन माणसानी/संस्थेने जर मोठ्या रियल ईस्टेटचे मुल्याकन केले तर ते वेगळे येते. उदा नरिमन पॉईट च्या एअर ईडिया बिल्डिंग ची किंमत १६०० ते २५०० कोटी पर्यन्त होती. जेव्हा ती प्रॉपर्टी विकली जाईल तिच खरी किंमत.
सगळ्या रिपोर्ट मध्ये फक्त एकच फ्रॉड आहे आणि तो म्हणजे अबर्दीन स्कॉटलंड मध्ये ट्रंप्न च्या कागदपत्रात आधी १४०० नंतर १२०० घरे होती तर प्रत्यक्षात ५०० घरानाच परवानगी मिळाली. (कदाची स्कॉटीश सरकार आधी जास्त घराची परावानगी देत असेल आणि नंतर कमी केली असेल) घराची किंमत ५० ते ६० हजार पाउड म्हणजे ३०-४० मिलियन डॉलर ने वाढवले आहे. ट्रंपला कमी व्याजदर मिळण्यासाठी २.५ बिलियन डॉलर संपत्ती दाखवायची होती त्यात हे ३०-४० मिलियन म्हणजे काहीच नाही.
दंड ठोकवताना पण जर संपत्ती नसती तर जेवढा व्याजदर लागला असता त्याच रकमेची एक बेस्ट प्रॉपर्टी डील काढुन त्यात जो फायदा झाला तो दंड म्हणुन आकारण्यात आला आहे. किती व्याज बुडवले त्यावर ५-१०% किंवा दुप्पट दंड होउ शकत होता .
ट्रंप ने जास्त वॅल्युएशन दाखवले हा जरी फ्रॉड मानला तरी प्रश्न असा आहे की एवढे मोठे कर्ज देताना बॅकेने ट्रंपने केलेले वॅल्युएशन बरोबर आहे ते का नाही तपासले. सगळे वॅल्युएशन नसते तपासता आले तर टॉप ५ किंवा १० तरी तपासता आले असते.
जर ट्रंप ल शिक्षा झाली तर बॅकेला/ वित्तिय संस्थेला पण शिक्षा झाली पाहिजे. त्या बॅ़केला किती दंड लावला? त्या बॅकेला/ वित्तिय संस्थेनी आजुन किती कर्ज हाय वॅल्युएशन मध्ये दिली आहेत ते बघायचे निर्देश का नाही दिले? (कदाचित दिले असतिल पण त्या रिपोर्ट मध्ये नाहीत आणि त्या बद्दल कुठे ही माहिती आली नाही) सामान्य लोकाच्या ठेवी बॅकेत असतात आणि बॅक जर सगळे कर्ज जास्त वॅल्युएशन वर देत असेल तर ती बॅक डुबण्याची भिती असते ज्यात सामान्य लोकाचे / सरकारचे ( म्हणजे टॅक्स पेयर चे ) नुकसान होउ शकते.
काहीतरी गडबड होत आहे. ट्रम्प
काहीतरी गडबड होत आहे. ट्रम्प ने केवळ व्हॅल्यू नाही स्क्वेअर फुटेज वाढवले होते. फोर्ब्ज मध्ये ओरिजिनली आलेल्या रिपोर्ट मध्ये तसाच आरोप होता.
Allen Weisselberg, the Trump Organisation's former chief financial officer (CFO), made the admission at a civil trial in New York.
He said records overstated the size of the flat by some 20,000 sq feet.
https://www.google.com/amp/s/www.bbc.com/news/world-us-canada-67073825.amp
त्रंपला झालेल्या दंडांची
त्रंपला झालेल्या दंडांची काळजी करू नका. सध्या त्याने स्नीकर्स विकायला काढले आहेत. गोल्ड हायटॉप $३९९ ला. इथलेच काही जण सहज दहा दहा स्नीकर्स विकत घेतील. त्रंपचे म्हणून. याला म्हणतात बिझनेस्स ब्रेन!
शिवाय त्रंपचे अनेक भक्त आहेत - बघता बघता ६०० मिलियन गोळा होतील. दंडाचे सगळे पैसे भरून वर दुसरी एखादी स्टॉर्मी शोधायला त्रंप मोकळा!
अहो ही अमेरिका आहे!! इथे आहेत असे काही लोक जे कर्ज काढूनहि त्रंपचे स्नीकर्स विकत घेतील!
>>इथे आहेत असे काही लोक जे
>>इथे आहेत असे काही लोक जे कर्ज काढूनहि त्रंपचे स्नीकर्स विकत घेतील!<<
गोफंडमी रेज्ड $३३६ मिल्स सो फार. गो फिगर..
बाय्दवे, विजयकुलकर्णी अबकि बार आपका वोट ट्रंपसरकार - पक्का समझु...
न्यू यॉर्क राज्याच्या कोर्ट
न्यू यॉर्क राज्याच्या कोर्ट सिस्टीम मधल्या कोर्टांची नावे अमेरिकेतील इतर राज्यांपेक्षा फार वेगळी आहेत. वरकरणी हा निकाल न्यू यॉर्कच्या "सुप्रीम कोर्टाने" दिलेला असला तरी त्यावर अपील करता येते. कारण न्यू यॉर्क मधले "सुप्रीम" कोर्ट हे खर्या अर्थाने सुप्रीम नाही. तेथे दिलेल्या निकालाविरूद्ध आधी त्याच कोर्टाच्या अॅपेलेट डिव्हिजन मधे अपील करता येते. व त्यानंतर न्यू यॉर्क कोर्ट ऑफ अपील्स मधे दाद मागता येते - ते तेथील सर्वोच्च न्यायालय आहे.
ट्रम्प हे सगळे करेल हे नक्की.
त्याच्या विरूद्ध जे खटले प्रत्यक्षात सध्या चर्चेत हवेत व त्यावर निकाल यायला हवेत ते सोडून भलतेच खटले सध्या जोरात आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या वर्षी असले खटले बाहेर काढून त्याला त्यात अडकवले जात आहे असे कोणाला वाटले तर आश्चर्य नाही. हा सिव्हिल खटला आहे त्याच्यासारखे काही आर्थिक घोटाळे रिपब्लिकन व डेमोक्रॅट्स दोन्हीकडच्या इतर काहींच्या इन्वेस्टिगेशन्स मधे सापडले तर आश्चर्य वाटणार नाही.
म्हणजे त्याने केलेल्या गुन्ह्यांबद्दल किंवा आर्थिक फ्रॉड्स ई. जर असतील तर त्याबद्दल खटलेच चालवू नयेत असे नाही पण निवडणुकीच्या दृष्टीने रिलेव्हन्स असलेले दोनच त्यातले आहेत - २०२० बद्दल "बिग लाय" आणि ६ जानेवारी.
यातल्या २०२० बद्दल त्याच्यावर एक जॉर्जिया मधल्या फोन कॉल्स बद्दल सोडला तर बहुतेक दुसरा कोणताही खटला सध्या सुरू नाही. त्याने ज्या कंड्या पिकवल्या व त्याच्या कंपूतील लोकांनी अॅम्प्लिफाय केल्या त्या "गुन्हा" कॅटेगरीत किती येतील माहीत नाही. पण रिपब्लिकन मतदारांना धादांत खोट्या माहितीवर नादाला लावण्याचे काम त्याने व त्याच्या कंपूने केले. यात प्रत्यक्ष नुकसान त्याच्याच मतदारांचे झाले. कित्येकांना शिक्षा झाल्या (६ जाने. बद्दल). त्यांना वापरणारे लोक कबुली देऊन (हॅनिटी. किंवा ट्रम्पचे अनेक वकील) किंवा दंड भरून मोकळे झाले (फॉक्स), किंवा अजूनही तीच टेप वाजवत आहेत (ट्रम्प, केरी लेक, विवेक रामस्वामी). त्यातून ६ जाने. ला जे झाले तो खटला निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असायला हवा.
काय भयंकर प्रक्षोभक बातमी
काय भयंकर प्रक्षोभक बातमी हेडलाईन आहे सी एन एन ची आज.
The Kremlin has never been richer – thanks to a US strategic partner
म्हणजे भारत.
डेमोक्रॅटसना त्या झेलेन्स्की आणि युक्रेनचा फार पुळका.
काय इमेज होणारे भारताची काय माहीत. कारण अर्धे लोकं(क) सीएनएन वाचतात आणि मते बनवतात.
Russia is entering its third year of war in Ukraine with an unprecedented amount of cash in government coffers, bolstered by a record $37 billion of crude oil sales to India last year,
>>>>>>>>>>> According to a new analysis, which concludes that some of the crude was refined by India and then exported to the United States as oil products worth more than $1 billion.
म्हणजे भारत, रशियाकडुन क्रुड ऑइल घेउन, परत तेच ऑइल अमेरिकेला देउन डॉलर कमावतो. अमेरीकेला 'नको' महणायला काय हरकत होती? कोणी त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यांना माहीत नव्हतं का की मूळात, रशियाकडुन ते ऑइल येतय.
जुनी बातमी. मागच्याच वर्षी
जुनी बातमी. मागच्याच वर्षी अशी बातमी आली होती की रशियाकडे खूप रुपये पडून आहेत कारण भारत त्या तेलाची किंमत रुपयांमध्ये देत होता. ते सेटल झालेले दिसते आहे. त्यात भारतीय कंपन्या ते तेल पुढे विकतात हे पण आलेले होते.
सी एन एन ला उशिरा जाग आली की काय
जयशंकरना मुद्दाम तासडंपट्टी
जयशंकरना मुद्दाम तासडंपट्टी करण्याच्या इराद्याने हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही अमेरीकेचे स्ट्रॅटेजिक अलायन्स आहात पण तुम्ही रशियाकडुन तेलही घेता ते कसं जमवता ब्वॉ.
जयशंकर खमके आहेत ते उत्तर देतात - वी आर स्मार्ट इनफ टु हॅव्ह मोअर ऑप्शन्स. इज दॅट अ प्रॉब्लेम?
ट्रंपने ६ जानेवारी ला जे काही
ट्रंपने ६ जानेवारी ला जे काही भयानक कृत्य केले ते दुसर्या महायुद्धापेक्षा महाभयंकर होते वगैरे वल्गना करणे सोपे आहे. पण फंदफितूरी, राज्य उलथवून टाकण्याचा कट वगैरे आरोप सिद्ध करणे अशक्य आहे. एक तर ट्रंपने असा काही उठाव वगैरे केलेला नाही.
एफ बी आय ने अनेक लोकांना कपटाने फसवून त्यात अडकवले आणि त्यांना महाभयानक शिक्षा ठोठावून आयुष्यातून उठवले आहे. (दुसरीकडे पोलिसाला लाथाबुक्क्यानी तुडवणार्या लोकांना, दंगली करणार्या बी एल एम आणि अँटिफा वगैरे लोकांना सोडून दिले जाते आणि काही न करणार्या लोकांना १०-२० वर्षे तुरुंगात). हे अन्यायकारक आहेच. परंतु एक प्रगल्भ, प्रौढ माणूस ट्रंप म्हणाला म्हणून हे करायला उद्युक्त झाला हे कायदा मानणे अवघड आहे. शिवाय ह्या प्रकरणात काहीही मोठा गैरप्रकार न होता, जे आहेत ते चेक्स आणि बॅलन्सेस ह्यांनी आपले काम करून सत्तांतर घडवले. कुठलेही विघ्न न येता. त्यामुळे ह्या मेलेल्या घोड्याला किती बदडणार हा एक प्रश्न आहे.
तसे मॅक्सिन वॉटर्स, कमलाबाई आणि अशा अन्य महाभागांनी बी एल एम वगैरे लोकांना महात्मा जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर रस्त्यावर उतरा, आंदोलने करा, कुणाला जुमानू नका वगैरे आगलावी भाषणे केली होती आणि नंतर ह्या संघटनांनी केलेल्या दंगलीत निदान डझनभर तरी लोक मेले आणि अब्जावधीची मालमत्ता जळली, नष्ट झाली, लुटली गेली. पण ह्या कुणावरही दंगली करायला उद्युक्त करायचा आरोपही नाही. मात्र ट्रंपला मात्र फायरिंग स्क्वाड आणून भर चौकात गोळ्या घालायची तयारी! खूपच न्याय्य आणि निपक्षपाती कारभार!
म्हातारबाने गुप्त कागदपत्रे घरात ठेवली तेव्हा तो उपराष्ट्रपती होता. त्याला अशा प्रकारे कागदपत्रे गुप्ततेच्या बंधनातून मुक्त करायचा कुठलाही अधिकार नाही. ट्रंप हा अध्यक्ष होता. त्याला तसा अधिकार होता.
न्याय मंत्रालय, एफ बी आय हे जवळपास डेमोक्रॅट पक्षाचे पाळीव कुत्रे बनले आहेत. तो पक्ष सांगेल त्याच्या समोर शेपटी हलवून, लोळण घ्या आणि त्यांनी इशारा केला की संबंधित व्यक्तीचे लचके तोडून त्याला घायाळ करा असे समीकरण बनलेले आहे. त्यामुळे ट्रंपने सहकार्य केले नाही आणि बायडनने केले वगैरे दावे बिनबुडाचे आहेत. म्हातारबा हा दोषी आहे पण त्याचे डोके ठिकाणावर नसल्यामुळे आम्ही आमची सदसदविवेकबुद्धी वापरून त्याच्यावर काहीही कारवाई करत नाही असे त्या हर की फरने नमूद केले आहे. म्हातारबाचे भ्रमिष्टपण आपल्या सोयीनुसार वापरून त्याला शिक्षेपासून वाचवणे हेच दाखवते की संबंधित यंत्रणा अत्यंत पक्षपाती आणि खुनशी आहेत.
ट्रंपने ६ जानेवारी ला जे काही
ट्रंपने ६ जानेवारी ला जे काही भयानक कृत्य केले ते दुसर्या महायुद्धापेक्षा महाभयंकर होते वगैरे वल्गना करणे सोपे आहे >>> तुम्हीच करताय. इथे इतर कोणी असा दावा केलेला नाही. तेव्हा पुढचे सगळे पुराण म्हणजे नुसता कांगावा आहे.
एफ बी आय ने अनेक लोकांना कपटाने फसवून त्यात अडकवले >>> नक्की काय कपट आहे यात?
शिवाय ह्या प्रकरणात काहीही मोठा गैरप्रकार न होता, जे आहेत ते चेक्स आणि बॅलन्सेस ह्यांनी आपले काम करून सत्तांतर घडवले. कुठलेही विघ्न न येता >>> किमान एक व्यक्ती यात गेली. अनेक पोलिस जखमी झाले. सगळे नेते लपवून ठेवावे लागले. या लोकांच्या हातात पेलोसी किंवा पेन्स लागले असते तर काय झाले असते सांगता येत नाही. हे विघ्न न येता कॅटेगरीत येत असेल तर विघ्नाची तुमची व्याख्या जरा सांगा. आणि अगदी काही घडले नाही म्हणून गुन्हाच होत नाही असे धरले तर "खुनाचा प्रयत्न" कॅटेगरीतील सगळे लोक निर्दोष धरावे लागतील.
मुख्य म्हणजे शांततापूर्ण पध्दतीने सत्तांतर झाले नाही. अमेरिकेच्या निदान नजीकच्या इतिहासात पहिल्यांदा.
Pages