लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात
तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे 
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. 
आठवेल तसे संपादित करत जाइन.
माझ्या आईला फोनवर मोठ्याने
माझ्या आईला फोनवर मोठ्याने बोलायची सवय आहे. जणू त्याशिवाय त्या दूरवर बसलेल्या व्यक्तीला ऐकूच येणार नाही. यावरून आम्ही तिला खूप चिडवतो. मुळातच तिला मोठ्याने बोलायची आणि खळखळून हसायची सवय. त्यात फोनवर काहे डेसिबल अजून वाढतात.
आता हे आपल्या घरात ठिक आहे, पण बाहेर असे फोनवर मोठ्याने बोलणारी व्यक्ती एखाद्याचे पेट पीव्हज असूच शकेल. पण आमची तर आईच आहे, म्हणून आम्ही हसतो
लँडलाईन असताना सुद्धा आपण फोन
लँडलाईन असताना सुद्धा आपण फोन केला की "हॅलो, मी अमुक बोलतोय/बोलतेय, मला तमक्याशी बोलायचे आहे" असे बोलण्याची पद्धत होती. नाही एवढे तर निदान "हॅलो, तमुक आहे?त का?" एवढे तरी.
आमच्याकडे आई आणि तिकडे माझे
आमच्याकडे आई आणि तिकडे माझे सासरे दोघांनाही फोन असो की समोरासमोर फार मोठ्याने बोलायची सवय आहे.
आईने सासरी असणाऱ्या माझ्या बहिणींना फोन वर नको ते मोठ्याने बोलून आणि ते तिच्या सासू नणंदेला ऐकू जाऊन तिकडे भांडणे लावली आहेत.
दुसरीकडे सासरे बोलले ते मलाही ऐकु आले असेलच हे लक्षात येऊन बायकोला मला सारवा सारवीची स्पष्टिकरणे द्यावी लागलीत.
आता मोबाईलमुळे कोणाचा फोन आहे पाहुन दुसऱ्या खोलीत जाऊन घेणे, अथवा नंतर कॉल बॅक करणे अशी छान सोय झाली आहे.
व्हॉट्सअप वर अनोळखी नंबर ने
व्हॉट्सअप वर अनोळखी नंबर ने व्हिडिओ कॉल/ कॉल करणे.... फार सावध रहा, खासकरून व्हिडीओ कॉलपासून. (धाग्याशी संबंधित नाही, पण तरीही लिहितो आहे, त्याबद्दल क्षमस्व!) एखाद्या मुलाला / पुरुषाला असा अनोळखी क्रमांकावरून कॉल येतो आणि तो घेतल्यावर पलीकडची मुलगी विवस्त्र अवस्थेत असते. नक्की काय प्रकार आहे हे समजून कॉल कट करेपर्यंत त्या मुलीने स्च्रीन्शोत घेतलेला असतो ज्यात त्या मुलाचा / पुरुषाचा चेहरा असतो. आणि मग हा screenshot तुमच्या नातेवाईकांना पाठवू असे सांगून blackmail करून पैसे उकळले जातात. Sextortion म्हणतात या प्रकाराला. त्यामुळे मोबाईल / laptop चा front कॅमेरा कवर करून ठेवणे हा एक चांगला उपाय आहे. तसेच WhatsApp मध्येच 'Silent unknwon callers' असा पर्याय उपलब्ध आहे. Settings > Privacy > Calls
What's app व्हिडिओ मध्ये असणारे लाफिंग ट्रॅक आणि ते मोठ्याने ऐकणारे लोक. फार डोक्यात जातात
मी त्याला घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज म्हणतो! खरोखर तसाच असतो तो!!! BTW, जर मुंबईच्या बेस्ट बसमध्ये कोणी असे व्हिडीओ पाहत असेल तर आपण आता त्यांना बिनधास्त रोखू शकतो. कारण बसमध्ये स्पष्ट सूचना लिहिलेल्या आहेत 'इयरफोनशिवाय ऑडीओ / व्हिडीओ ऐकणे/पाहणे तसेच मोठ्या आवाजात बोलणे यास सक्त मनाई आहे.'
आता मोबाईलमुळे कोणाचा फोन आहे
आता मोबाईलमुळे कोणाचा फोन आहे पाहुन दुसऱ्या खोलीत जाऊन घेणे, अथवा नंतर कॉल बॅक करणे अशी छान सोय झाली आहे.> बरेच सासू - सासरे, आजी - आजोबा किंवा आई - वडील मोबाईलचा स्पिकर ऑन ठेवून त्यावर बोलतात. त्यामुळे आपल्याला अजूनच सावधपणे बोलावं लागतं. :))
अजून एक म्हणजे, बारशी, लग्न
अजून एक म्हणजे, बारशी, लग्न अशा कार्यक्रमांना लाऊड स्पीकर लावून हळद, घाणे भरणे किंवा पाळणा अशा खास प्रसंगांची खास गाणी अत्यंत भेसूर आवाजात बेसूर गात अख्ख्या दुनियेला ऐकवणारे लोक.
>>>> अगदी अगदी. आणि सोबत बारशी लग्न इतयादी कार्यक्रमांना (मराठी असूनही) ओ राजा राजा वगैरे भोजपुरी गाणी लाऊडस्पीकर लावून ऐकवणारे लोक
सार्वजनिक ठिकाणी/ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात मोबाईलवर काहीतरी पाहणारे/ऐकणारे/बोलणारे लोक - यात ज्येष्ठ नागरिक जास्त असतात. एका काकांना मी ट्रेनमध्ये सांगितले होते की आम्हाला त्रास होतो आहे. हेडफोन लावून ऐका. ते काका ओशाळले पण त्यांनी फोन बंद केला.
फोन कानापासून दूर ठेवून बोलल्यामुळे मोठ्याने बोलावे लागणे - यात आमच्या घरातले सर्व ज्येना समाविष्ट आहेत. सतत आठवण करून द्यावी लागते की फोन जवळ धरा. नाहीतर हेडफोनवर बोला. सुरुवातीला तर आम्ही सांगायचो की अजून थोडे मोठ्याने बोललात तर पलीकडे फ़ोनशिवाय ऐकू जाईल.
सार्वजनिक ठिकाणी कर्कश्श
सार्वजनिक ठिकाणी कर्कश्श आवाजात वाजवले जाणारे स्पिकर/डॉल्बी/सिंथेसाईजर नेहमीच डोक्यात जातात.
चार- पाच- सहा-सात वेळा एडिट
चार- पाच- सहा-सात वेळा एडिट केले गेलेले प्रतिसाद
तो आता गप गुमान नॉर्मल ऑडीओ
तो आता गप गुमान नॉर्मल ऑडीओ कॉल करायला लागलाय>>>पण तरी कॉल करतोच

रुवातीला तर आम्ही सांगायचो की अजून थोडे मोठ्याने बोललात तर पलीकडे फ़ोनशिवाय ऐकू जाईल>>> माझेमन
भटजी काडून माईक ओढून बेसूरपणे
भटजी कडून माईक ओढून बेसूरपणे मंगलाष्टकं म्हणणारे लोक्स ...
>> माईक ओढून बेसूरपणे
>> माईक ओढून बेसूरपणे मंगलाष्टकं म्हणणारे
आणि ते थांबतच नाहीत लवकर. असे वाटते त्यांच्या कडचा माईक काढून घेऊन आपणच पूर्ण करावे
ला लाSSS ला लाS..... ल ल ल लाSSS... ला ला ला लाSSS... ला ला लाSSSS
शुभमंगल सावधान. वाजवा वाजवा. वऱ्हाडी मंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नका.
सुरुवातीला तर आम्ही सांगायचो
सुरुवातीला तर आम्ही सांगायचो की अजून थोडे मोठ्याने बोललात तर पलीकडे फ़ोनशिवाय ऐकू जाईल.>>
भटजी कडून माईक ओढून बेसूरपणे मंगलाष्टकं म्हणणारे लोक्स>> ह्यावरून एक प्रसंग आठवला. एका ओळखीच्या लग्नात वधू - वर दोन्ही बाजूंची मंगलाष्टका म्हणायची अगदी चढाओढच सुरू झाली. लग्न लावणारे गुरुजी एकदम वक्तशीर होते. ते मुहूर्त चुकेल म्हणून अस्वस्थ झाले. शेवटी त्यांनी मंगलाष्टका म्हणणाऱ्याकडून माईक हिसकावून घेतला व लग्न लावले.
लोकं फेसबुकवरती फाडकन अॅड
लोकं फेसबुकवरती फाडकन अॅड करतात. आपण विचारलं की "डु आय नो यु?" की एका शब्दात 'हो' म्हणुन मठ्ठपणे शांत बसतात यांच्या म्हणजे अशांच्या कानाखाली जाळ काढावासा वाटतो मला. अॅड करायला हरकत नाही पण ओळख तर द्या. स्वतःचं प्रोफाईल लॉक करुन ठेवलेलं असतं अशा विश्वसुंदर्यांनी आणि आपण ओळखावं अशा अपेक्षेत एक एक शब्द उत्तर देतात.
स्वतःचं प्रोफाईल लॉक करुन
स्वतःचं प्रोफाईल लॉक करुन ठेवलेलं असतं अशा विश्वसुंदर्यांनी >>>>
अगदीच..मी तर इग्नोर मारते अशांना. स्वतः लॉक करून ठेवायचे म्हणजे आपले ठेवावे झाकून, दुसर्याचे पहावे वाकून. 
सिनेमात कधी कधी नळ सुरूच ठेऊन
सिनेमात कधी कधी नळ सुरूच ठेऊन ब्रश करणे दाखवतात, बाहेरून येऊन पायात बुट तसेच ठेऊन पलंगावर झोपताना दाखवतात या दोन्ही गोष्टी फार अस्वस्थ करतात.
आणि तो नळ पुढे सिनेमा
आणि तो नळ पुढे सिनेमा संपेपर्यंत कुणीही बंद करत नाही
ही अजून काही सिनेमॅटिक पिव्ह्ज:
१. हिरो दाढी करताना लावलेले शेव्हिंग क्रीम नीट न धुता तसेच टॉवेलने पुसतो
२. हिरो पाणी पिताना थोडे पाणी तोंडात आणि बहुतेक सगळे ओघळून त्याच्या बनियन किंवा शर्टमध्ये जाते
मामी अगदी अगदी.मला स्क्रीन
मामी अगदी अगदी.मला स्क्रीन फोडून धावत जाऊन नळ बंद करावासा वाटतो.
किंवा सिनेमात फडफडते लाल किंवा पांढरे रेशमी किंवा ऑरगंझा पडदे आणि बाजूलाच जवळपास मेणबत्त्या किंवा काचेच्या शमा ठेवलेल्या असतात.फार चिडचिड होते
नातेवाईकांत एका गणपती ला थर्मोकोल सजावट, लटकलेल्या झिरमिळ्या आणि समोर अर्ध्या फुटावर लावलेला दिवा तसाच ठेवून देवदर्शनासाठी गेले आणि घरी आल्यावर वाऱ्याने उडत्या झिरमिळ्या दिव्याला लागून बऱ्याच गोष्टी काळपट जळालेल्या असा अनुभव आला होता.
सिनेमात भांग पितात तेव्हा पण
सिनेमात भांग पितात तेव्हा पण ओठाच्या दोन्ही बाजूनी ओघळ नाही आला तर हिरोला पैसे कमी मिळतात म्हणे.
आणि पार्क मध्ये बसून
आणि पार्क मध्ये बसून जिवाभावाच्या गोष्टी करताना बीअर ची बाटली थेट बाकामागे किंवा बाजूला भिरकवली नाही तरी दंड होतो
मामी डोंबिवली सिंड्रोम आहे
मामी
डोंबिवली सिंड्रोम आहे हा!
सिनेमा झाल्यावर पुस्तकातल्या
सिनेमा झाल्यावर पुस्तकातल्या पात्रांबद्दलच्या पेट पीव्ह्ज लिहायच्या.
मानव पीवह नाही आणि डोक्यात
मानव
पीवह नाही आणि डोक्यात ही जात नाही... पण सिनेमा आवडला म्हटलं की त्यापेक्षा पुस्तक कसलं भारी! लोक आठवले.
मालिका किंवा सिनेमातला अजून
मालिका किंवा सिनेमातला अजून एक त्रास म्हणजे.... भर चौकात हिरोला हिरोईन चालताना दिसते, हिरो असतो गाडीत.. तो तिच्या अगदी जवळ जाऊन गाडी थांबवतो मग त्यांची चार वाक्य होतात, तो आत बसण्याचा आग्रह वगैरे करतो ही आढेवेढे घेते त्यात अजून २-५ मिनिटं जातात पण अजाऊबाजूचे पब्लिक अजिबात हॉर्न/ किंवा बोंबा मारीत नाही.
सेम हीच बॅकग्राऊंड, आणि हिरोला कोणावर अन्याय होताना दिसला तर गाडी तिथल्या तिथे लावून बाहेर पडून गुंडांची पिटाई... आम्ही अशी कुठे पण गाडी लावली तर चालेल का वाहतूक पोलिसांना? त्यांना चालत नाही म्हणून आम्ही निमूट निघून जातो, नाहीतर अन्याय आम्हाला पण सहन नाही होत.
आता इथे ऑफिसात एक ताजा पेट
आता इथे ऑफिसात एक ताजा पेट पिव्ह... २ लोक कॉल अटेंड करतायत. दोघेही वेगवेगळ्या कॉल वर आहेत आणि दोन्ही स्पीकर वर बोलतायत. इयर किंवा हेडफोन लावायला पैसे पडल्यासारखे वागतात लोक
डोंबिवली सिंड्रोम आहे हा! >>>
डोंबिवली सिंड्रोम आहे हा! >>> आईशप्पथ! मी हे लिहीलेलं खोडलं.
हिरो दाढी करताना लावलेले
हिरो दाढी करताना लावलेले शेव्हिंग क्रीम नीट न धुता तसेच टॉवेलने पुसतो
>>>अगदी अगदी. डॅनियल क्रेग आणि हाली बेरीला खडसावून विचारावेसे वाटते तुमच्यातले नक्की कोण वॊशिंग मशीन लावणार आहे या टॉवेलसकट?
बाहेरून येऊन पायात बुट तसेच ठेऊन पलंगावर झोपताना दाखवतात या दोन्ही गोष्टी फार अस्वस्थ करतात.
>>> आपली आका पण अस्वस्थ व्हायची बहुतेक. कारण ती नायकाला याचा चान्सच न देता बूट काढायची त्याचे, हॉलमध्येच. हिंदी सिनेमातल्या रडाव्या नट्या साधारण या शॉटला डोळ्यातले पाणी पुसत नायकाचे बूट काढायच्या कारण नायक एकतर पिऊन आलेला असायचा किंवा सौतनकडे जाऊन किंवा दोन्ही एकदम करून.
मी घाईत सैतानाकडे जाऊन वाचलं.
मी घाईत सैतानाकडे जाऊन वाचलं.
आणि के ड्रामा मध्ये अगदी भरपूर ताप आलेला नायक किंवा नायिका असेल तरी दुसरी पार्टी टॉवेल भिजवून आणून त्याचा फक्त 5 mm भाग त्या तापग्रस्ताच्या त्वचेला लागेल इतकाच लावून टिपते. मेल्यानो, इतका ओला केलाय तर जरा नीट पसरून घाला ना कपाळावर म्हणावं वाटतं.
आणि शहाणे पांढऱ्या शुभ्र फुल स्लीव्ह फॉर्मल्स मध्ये झाडू मारणे,लालभडक किमची बनवणे, फर्निचर सरकवणे, एकदम लहूलुहान 5 गोळ्या लागलेल्या माणसाचं ऑपरेशन वगैरे गोष्टी करत असतात.घरी नक्की ड्रम भरून पेट्रोल आणि मेडिक्लोर डाग काढायला ठेवलेलं असणार.
सिनेमॅटिक पिव्ह्ज
सिनेमॅटिक पिव्ह्ज
असे तर पुष्कळच निघतील...!!!
अ आणि अ !
आता हा धागा कच्च्या रस्त्या
आता हा धागा कच्च्या रस्त्या वर वळला आहे
फारेंड ने लिहिलेला पिव्ह आठवला- अक्ख्या जग मधे सकाळी सकाळी आंबट ढोण ऑरेंज जुस भरून असतो आणि खाणारा हीरो/कॉलेज मुलगी फक्त टोस्ट अर्धवट चावून निघते..तो जुस कोण पिणार? बाप?
त्याची संध्याकाळ पर्यंत कोणी
त्याची संध्याकाळ पर्यंत कोणी टेबल वरून उचलला नाही तर नारिंगी मदिरा बनेल मुंबई वेदर मध्ये.मग लोकांची स्पर्धा लागेल कोण आधी पिणार ची.
Pages