लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
हरपा
हरपा
अजून काही--- वही मला 'भेटली'
अजून काही--- वही मला 'भेटली', मुलांना चारून आणते ( पोटची मुले काय जनावरे आहेत चारून आणायला ?) ,लातूर नांदेड कडे यायली ( येत आहे ), तू आलिटिस ना ( आली होतीस ना ) , इन शॉर्ट भाषा कि दुर्गती हो गयी, विनाकारण इलेट्रीसिटी वाया घालवणारे लोक ( वेळेवर विद्युत उपकरणे न बंद करणारे लोक) , नळ चालू ठेवून पाणी वाया घालवणारे लोक, लिफ्ट एकच मजल्यावर अडवून ठेवणारे लोक , बाकीच्यांना कितीही उशीर झाला तरी चालेल .एक विशिष्ट समाजाची नाकातून बोलून नक्कल करणारे लोक.
' ते गाणं/ कविता *बोलून* दाखव
' ते गाणं/ कविता *बोलून* दाखव' हे एक कायम डोक्यात जाणारे वाक्य.
निर्गुणाचे भेटी | आलो
निर्गुणाचे भेटी | आलो सगुणासंगे |
तंव झालो प्रसंगे | गुणातीत || >>> काय आठवण काढलीस हपा! प्राचीन काळी रेडिओवर हे गाणे ऐकले आहे.
मुलांना चारून आणते ( पोटची
मुलांना चारून आणते ( पोटची मुले काय जनावरे आहेत चारून आणायला ?)
>> बापरे. हे तर रोजचेच पेपी आहे.
मुलांना चारून आणते >>>>>
मुलांना चारून आणते >>>>> सातारा, सांगली, कोल्हापूर साईडला हे फार कॉमन आहे.
प्रमाणभाषेचा हट्ट करणे हे पण
प्रमाणभाषेचा हट्ट करणे हे पण एक पेट पीव्ह होऊ शकते.
सातारा, सांगली, कोल्हापूर
सातारा, सांगली, कोल्हापूर भागात भरवणे ला "चारणे" म्हणतात
डोक्यात जाणाऱ्या बऱ्याच
डोक्यात जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी कव्हर झाल्यात धाग्यावर! अजून एक म्हणजे कुणाकडे पाहुणे म्हणून गेलं असताना थेट किचनमध्ये घुसणं. ट्रॉली, कपाट, फ्रिज उगाच उघडून बघणारे. आपलंच घर असल्यासारखं घरभर वावरणे, वस्तू न विचारता वापरणे. खुप मोठी यादी होईल अशी
@ मी कल्याणी..
@ मी कल्याणी..
हो हो हो !! अगदी अगदी .. परवाच माझ्याकडे एका फॅमिलीला डिनरला बोलावले होते तेव्हा तिने आल्या आल्या किचन मध्ये येऊन कपाट उघडू का असे विचारले मी कसे बसे तोंडावर आलेले नको आवरून धरले व कसनुसं, अगदी अस्फुट "हो बघ" म्हटलं , हा माझ्या आयुष्यात पहिलाच प्रसंग...! आणि ती फॅमिली पण पहिल्यांदाच आलेली ..! मी पण गेलेले त्यांच्या कडे पण मी नव्हते बॉ असे काहीच केले ..
डोक्यात जाणाऱ्या बऱ्याच
डोक्यात जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी कव्हर झाल्यात धाग्यावर! >>> अजून काही शिल्लक आहेतच..
पाय घासत चालणारी माणसं. कुणी असं चालत असलं की माझं हातातलं कामच थांबत.
आवरून देणार असलास / असलीस तरच
आवरून देणार असलास / असलीस तरच उघड म्हणायचं
पण खरंच, कोणी अति मोकळं वावरायला लागलं घरात की अस्वस्थ वाटतं. अगदी जवळचे नातेवाईक, मित्र असले तरी. अरे आपण नाही ना राहत त्या घरात, तर कशाला उचकापाचकी करावी. 'आपलंच घर समजा' याला जरा जास्तच मनावर घेतात
पाय घासत चालणारी माणसं. >>>>>
पाय घासत चालणारी माणसं. >>>>> माझा मुलगा..नव्यानं शिकलाय..कितीदा सांगितले तरी घुसेनाय डोक्यात त्याच्या..
उचकापाचक करणारी, घरभर फिरणारी
उचकापाचक करणारी, घरभर फिरणारी, चपला काढून घरात न येणारी माणसे @$%^&#
हा अजून एक खास:
हा अजून एक खास:
लग्न नव्या (किंवा अगदी 15 वर्षं पर्यंत) असलेल्या प्रत्येक नात्यातल्या बाईच्या पोटाला हात लावून, 'काय मग, गुड न्यूज आहे की नै?'असा खेळीमेळीत प्रश्न विचारणे.आता या प्रश्नाचे आऊटकम 2:
1. न्यूज असणे: असली तरी शक्यतो सर्व स्थिर होईपर्यंत 4 महिने जास्त कोणाला सांगायची नसते.तर 'हो, आहे न्यूज' उत्तर मिळावे का?
2. न्यूज नसणे: तुम्ही काही दशरथाला वर देणारे ऋषी आहात का, की तुम्ही हात फिरवल्याने गुड न्यूज निर्माण होईल?
अनु
अनु

विचारतात हे माहिती आहे पण हात लावून
अनु
अनु
) घडलेला एक संवाद:
माझ्यासमोर (माझ्या बाबतीत नाही
"अरे वा.. दुसऱ्यांदा गुड न्यूज आहे वाटतं"

"छे छे.. तिचं पोट सुटलंय"
Food baby
Food baby
तुम्ही काही दशरथाला वर देणारे
तुम्ही काही दशरथाला वर देणारे ऋषी आहात का, की तुम्ही हात फिरवल्याने गुड न्यूज निर्माण होईल>>
अनू
(No subject)
तुम्ही काही दशरथाला वर देणारे ऋषी आहात का, की तुम्ही हात फिरवल्याने गुड न्यूज निर्माण होईल>>>
In that case मला सुटलेलं पोट कमी करून हवंय. हात लावून कमी करून देता का विचारावं लागेल
n that case मला सुटलेलं पोट
n that case मला सुटलेलं पोट कमी करून हवंय. हात लावून कमी करून देता का विचारावं लागेल>>
बाईच्या पोटाला हात लावून>>
बाईच्या पोटाला हात लावून>>
O M G! no way !!
तुम्ही काही दशरथाला वर देणारे ऋषी आहात का>> बघ की!!
शिवाय, नाही असं उत्तर आल्यावर .. म आता करा विचार !! अरे? ते काय जादू ए ? महाभारतात करतात तसं हात वर करून ठीश्शsss केलं की बाळ हातात ..!?
पोट पीव्हज
पोट पीव्हज
हाहाहा पोट पीव्हज
हाहाहा पोट पीव्हज
अरे वा ! अक्षरशः पेट पीव्ह
अरे वा ! अक्षरशः पेट पीव्ह चे हे दुसरे उदाहरण !
मी ते ठिश्श एकदम जुन्या
मी ते ठिश्श एकदम जुन्या महाभारत सेट मध्ये इमाजिन केलं गं अंजली विथ किरणे इफेक्ट
वैगरे
वैगरे
स्मरणरंजनपर लेखांचे रतीब. ( त्यातल्या आठवणींशी रइलएट करता येत नसेल, तेव्हा
)
इथे आधी लिहिलं आहे ते माहीत
इथे आधी लिहिलं आहे का ते माहीत नाही पण सकाळी सकाळी व्हॉट्स ॲप वर येणारे good morning वाले इमेज संदेश....
स्मरणरंजनपर लेखांचे रतीब>>>>
स्मरणरंजनपर लेखांचे रतीब>>>> लेख, गप्पा.. सतत आठवणी उगाळत बसणारी मंडळी! समोच्याला इच्छा असो वा नसो, सतत भूतकाळात रमणारे लोक्स!
अनु, असे पोटाला हात लावून
अनु, असे पोटाला हात लावून विचारणारी माणसे म्हणजे कहर आहे! हे वाचूनच डोक्यात गेलं!
अजून एक प्रकार असतो. एक मूल असेल तर, दुसऱ्याचा विचार केला नाही का, असे विचारणारी मंडळी. बरं नाही केला म्हटलं तर, का नाही ते विचारतात.
Pages